क्रीडादिनापासून फिट इंडिया मुव्हमेंट शुभारंभ...
हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडादिन म्हणून देशभर साजरा करण्यात येतो...
२९ ऑगस्ट २०१९ ला नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये स्टेडियम मध्ये हिट इंडिया मोमेंट ला शुभारंभ...
हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस २९ ऑगस्ट हा "राष्ट्रीय क्रीडादिन" म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त 'फिट इंडिया' चळवळ सुरू करण्यात आली असून याचा प्रारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्पीच फिट इंडिया मूव्हमेंट... 👇 CLICK HERE 👇
योगासन, स्वच्छ भारत या चळवळी पाठोपाठ आता 'फिट इंडिया' ही चळवळ देशभर निर्माण करण्यात आली आहे. २९ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीतील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये फिट इंडिया मुव्हमेंटला प्रारंभ झाला.
फिट इंडिया मुव्हमेंटमध्ये २९ ऑगस्ट रोजी सर्व शाळा व महाविद्यालयातील तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांना शपथ देण्यात येणार आहे. यात सर्व विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग आवश्यक आहे. तसेच सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद, महापालिका सदस्यांनाही शारीरिक तंदुरुस्तीबाबत शपथ देण्यात येणार आहे.
गावा- गावांमध्ये महिला व पुरुषांसाठी फिट इंडिया मुव्हमेंट आवश्यक आहे प्रत्येकाने स्वतःसाठी या चळवळीचा भाग व्हावे.. फिट इंडिया मुव्हमेंटमध्ये नागरिकांसह खेळाडू, क्रीडा संघटकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
No comments:
Post a Comment