"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*01/06/18 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*🌅 _महाराष्ट् शिक्षक पॅनल_* 🌅
 ━━═•●◆●★❂★●◆●•═━━
*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
====●●●★♦★●●●====

*❂ दिनांक:~ 01/06/2018 ❂*
       *🔘 वार ~ शुक्रवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘✽⌘⌘⌘*
  *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
➖➖➖➖➖➖➖➖
    *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
➖➖➖➖➖➖➖➖
  *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.in/?m=1
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]   ❂ आजचे पंचाग ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🍥 *01. जून :: शुक्रवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
          अधिक जेष्ठ कृ. ३
       तिथी : कृष्ण पक्ष तृतिया,
               नक्षत्र : मूल,
     योग : शुभ, करण : वणीज,
सूर्योदय : 06:00, सूर्यास्त : 19:12,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]    ❂ सुविचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01. हसा खेळा पण शिस्त पाळा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

01. *वारा पाहून पाठ फिरवावी –*
            *★ अर्थ ::~*
    वातावरण पाहून वागावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01. जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यम्।
मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति।।
चेत: प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं।
सत्संगति कथय किं न करोति पुंसाम्।।
             ⭐अर्थ ::~
  चांगल्या मित्रांची सोबत बुद्धिची जडता नष्ट करते, वाणीमध्ये सत्याचा संचार घडवते, मान आणि उन्नती वाढवते. आपणच विचारा की, सत्संगति माणसाचे काय भले करत नाही?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 *★01. जून★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★दुर्गदिन
★हा या वर्षातील १५२ वा (लीप वर्षातील १५३ वा) दिवस आहे.
★आंतरराष्ट्रीय बाल दिन

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : रमेश चंद्र लाहोटी यांनी भारताचे ३५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●२००१ : नेपाळचे राजे वीरेन्द्र, राणी ऐश्वर्या यांच्यासह अकरा जणांची युवराज दीपेन्द्र यांनी निर्घृण हत्या केली.
●१९९६ : भारताचे ११ वे पंतप्रधान म्हणून एच. डी. देवेगौडा यांनी सूत्रे हाती घेतली.
●१९४५ : ’टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ची स्थापना झाली.
●१९३० : मुंबई व पुणे दरम्यान दख्खनची राणी (Deccan Queen) ही रेल्वेगाडी सुरू झाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : आर. माधवन – अभिनेता
◆१९२९ : फातिमा रशिद ऊर्फ ’नर्गिस’ दत्त – हिन्दी चित्रपट अभिनेत्री
◆१८७२ : नारायण मुरलीधर गुप्ते ऊर्फ ’कवी बी’ – त्यांची ‘चाफा बोलेना, चाफा चालेना ...‘ ही कविता खूप प्रसिद्ध आहे.
◆१८४२ : सत्येंद्रनाथ टागोर – पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : दक्षिण अफ्रिकेचा क्रिकेट कप्तान हॅन्सी क्रोनिए यांचे विमान अपघातात निधन
●२००१ : नेपाळचे राजे वीरेन्द्र यांची हत्या
●१९९८ : गो. नी. दांडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मराठी लेखक, इतिहासकार व ’गडसम्राट’
●१९९६ : नीलम संजीव रेड्डी – भारताचे ६ वे राष्ट्रपती, लोकसभेचे ४ थे सभापती, केंद्रीय मंत्री व आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्य चळवळीतील एक निष्ठावान कार्यकर्ते
●१९६८ : हेलन केलर – अंध व मूकबधीर असुनही कला शाखेची पदवी मिळवलेल्या पहिल्या व्यक्ती, समाजसेविका, राजकीय कार्यकर्त्या व शिक्षिका
●१९४४ : महादेव विश्वनाथ धुरंधर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट, कलेला वाहून घेतलेल्या या चित्रकाराने सुमारे ५,००० हून अधिक चित्रे काढली.
●१९३४ : श्रीपाद कृष्ण कोल्हटकर – नाटककार, वाङ्‌मय समीक्षक व विनोदी लेखक 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

01.  *❃❝ मन, आणि भावना ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   एक गृहिणी आपल्या मुलाला घेवून बाजारातून चालली होती, त्यावेळेस त्या बाजारातून एका चोराला काही शिपाई पकडून नेत होते, त्या मुलाने आपल्या आईला विचारले "आई तो कोण आहे आणि त्याच्या भोवती शिपाई का आहेत?" आई म्हणाली "तो चोर आहे, त्याला पकडले आहे, त्याला आता शिक्षा होईल व तो तुरुंगात जाईल".

 थोडे पुढे गेल्यावर पुढून नगरीचा राजा येत होता आणि त्याच्या भोवती पण शिपाई होते, त्यावेळेस मुलगा लगेच आईला म्हणाला "आई तो बघ आजून एक चोर आला", आई म्हणाली "हळू बोल, ते मारतील आपल्याला, तो राजा आहे."
  मुलगा आईला म्हणाला "काय फरक आहे? राजा भोवती पण शिपाई आहे आणि चोरा भोवती पण शिपाई आहे."
    आई म्हणाली "जमीन आसमानचा फरक आहे, त्या चोराच्या भोवती जे शिपाई होते त्यांच्या ताब्यात तो चोर होता, त्याला काहीही करायचे स्वतंत्र नाही, जिकडे नेतील तिकडे जायचं, जिथे ठेवतील तिथे राहायचे, देतील ते खायचं, त्याला स्वतच्या मनाच काहीच करता येत नाही." राजाच्या भोवती जे शिपाई आहेत ते राजाच्या ताब्यात आहेत, राजा सांगेन तिकडे नेतील, जे सांगणार ते करणार, राजा बोलला कि तुम्ही जा मला एकटे राहू देत, राजा मुक्त आहे."

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
 "आपले मन, आपल्या भावना आणि आपले विकार हे शिपाई आहेत', आपण त्यांच्या ताब्यात असलो तर आपण 'चोर' आहोत,
   ते आपल्या ताब्यात असले तर आपण 'राजा' आहोत. निवड तुमची आहे."
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करुन काढुन टाकायलासुरवात केली की...
   आपोआप आयुष्यात
चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01. *✿ सामान्य ज्ञान भारत ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■  *भारतात एकूण किती बंदरे आहेत*?
●  199 (13-प्रमुख व 186-लहान)

■   *भारतीय रेल्वे मार्गाचे एकूण प्रकार किती आहे* ?
●  तीन (Broad guage-1.676 mt., Meter guage- 1 mt, Narrow gauge0.610 mt.)

■  *तुतिकोरीन बंदर कोणत्या राज्यात आहे ?*
● तमिळनाडू

■  *सध्या भारतात एकूण किती राष्ट्रीय महामार्ग आहेत?*
●  299

■ * रिहांद जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?*
●  उत्तर प्रदेश( यमुना नदीवर)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

01. *❒श्रीपाद कृष्ण कोल्हटकर❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~  २९ जून १८७१
●मृत्यू :~ १ जून १९३४

        हे मराठी मराठीतील आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी व समीक्षक होते. "बहु असोत सुंदर, संपन्न की महा" या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत.

      त्यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण अकोला येथे झाले. वडील अमरावती येथे शिक्षक होते. कोल्हटकरांना लहानपणापासून नाटकांची आवड होती आणि वडिलांमुळे त्यांना अनेक नाटके पाहता आली. १०वी नंतर डेक्कन कॉलेज, पुणे येथे गेले. पुण्यात शिकत असतांना त्यांना शिवराम महादेव परांजपे, वि. का. राजवाडे, एस. एस. देव यांच्यासारखे शिक्षक लाभले. इ.स. १८९१ मध्ये कोल्हटकरांनी पहिल्यांदा संस्कृत नाटक मृच्छकटिकमध्ये अभिनय केला. तसेच शिकत असतांनच विक्रम शशिकला या नाटकावर कोल्हटकर यांनी लिहिलेली समीक्षा विविधज्ञानविस्तारमध्ये प्रसिद्ध झाली होती. इ.स. १८८७ साली कोल्हटकरांनी एल एल. बी. चे शिक्षण पूर्ण केले व ते अकोला येथे आपला व्यवसाय करू लागले. १९०१ साली कोल्हटकर बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथे वास्तव्यास गेले.

         *◆ पुरस्कार व गौरव ◆*
    कोल्हटकर पुणे येथील दुसऱ्या कविता संमेलनाचे आणि पुणे येथे इ.स. १९२७ साली भरलेल्या १३ व्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.

       मराठी लेखक गंगाधर देवराव खानोलकर यांनी कोल्हटकरांचे चरित्र लिहिले आहे. याखेरीज खानोलकरांनी कोल्हटकरांच्या संकलित लेखांचा "कोल्हटकर लेखसंग्रह" या नावाचा संग्रहग्रंथही संपादला आहे.

     कोल्हटकर ज्योतिषतज्ज्ञदेखील होते. ते तिसऱ्या ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*◆ शुक्रवार ~ 01/06/2018 ◆*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

1 comment: