*08/11/23 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *08. नोव्हेंबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन कृ.१०, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~दशमी, नक्षत्र ~पूर्वाफाल्गुनी,
योग ~इन्द्र, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:41, सूर्यास्त-18:02,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
08. सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
08. उथळ पाण्याला खळखळाट फार
★ अर्थ ::~ सामर्थ्य कमी असताना
अधिक प्रदर्शन करणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
08. *सा विद्या या विमुक्तये ।*
⭐अर्थ ::~ मोक्षप्राप्ती करणे शिकवते तीच खरी विद्या होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 08. नोव्हेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ३१२ वा (लीप वर्षातील ३१३ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००२ : जी. बी. पटनायक यांनी भारताचे ३२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
●१९४७ : पंजाब अँड हरयाणा उच्च न्यायालयाची स्थापना
●१९३९ : म्युनिक येथे अॅडॉल्फ हिटलर प्राणघातक हल्ल्यातुन बचावला.
●१८९५ : दुसराच एक प्रयोग करत असताना विल्हेम राँटजेन यांना क्ष किरणांचा शोध लागला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७६ : ब्रेट ली – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज
◆१९२७ : लालकृष्ण अडवाणी – भारताचे उपपंतप्रधान, केन्द्रीय माहिती व नभोवाणी मंत्री, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते
◆१९१९ : पु. ल. देशपांडे तथा ’पु. ल.’ – आपल्या अलौकिक प्रतिभेने जगभरातील मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारे आणि त्यांची अभिरुची संपन्न करणारे लेखक, नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार, गायक, वादक आणि वक्ते (मृत्यू: १२ जून २००० - पुणे)
◆१९१७ : कमल समर्थ ऊर्फ कमल रणदिवे – कर्करोग संशोधन क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ, पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित,
◆१९०९ : नरहर वामन तथा ’नरुभाऊ’ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, निर्भिड पत्रकार व काँग्रेसचे तत्त्वनिष्ठ नेते
◆१६५६ : एडमंड हॅले – हॅलेच्या धूमकेतूचा शोध लावणारे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ, भूवैज्ञानिक, गणितज्ञ, हवामानशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१६७४ : जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी
●१२२६ : लुई (आठवा) – फ्रान्सचा राजा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
08. *✹भारत देश है मेरा✹*
●●●●००००००●●●●
जहाँ डाल-डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा
वो भारत देश है मेरा
जहाँ सत्य, अहिंसा और धर्म का पग-पग लगता डेरा
वो भारत देश है मेरा
ये धरती वो जहाँ ऋषि मुनि जपते प्रभु नाम की माला
जहाँ हर बालक एक मोहन है और राधा हर एक बाला
जहाँ सूरज सबसे पहले आ कर डाले अपना फेरा
वो भारत देश है मेरा
अलबेलों की इस धरती के त्योहार भी हैं अलबेले
कहीं दीवाली की जगमग है कहीं हैं होली के मेले
जहाँ राग रंग और हँसी खुशी का चारों ओर है घेरा
वो भारत देश है मेरा
जब आसमान से बातें करते मंदिर और शिवाले
जहाँ किसी नगर में किसी द्वार पर कोई न ताला डाले
प्रेम की बंसी जहाँ बजाता है ये शाम सवेरा
वो भारत देश है मेरा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थणा ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
08. *❂ सत्यम् शिवम् सुंदरा ❂*
━═●✶✹★★✹✶●═━
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम् शिवम् सुंदरा
शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा
विद्याधन दे अम्हांस
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा
होऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
कीर्तिचा कळस जाय उंच अंबरा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
08. *❃❝ प्रेरणा ❞❃*
━━•●◆●★●◆●•═━
संत राबिया रोज पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकीत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता. उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियानी त्याच्यांकडे पाहून स्मितहास्य केले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते ? हे त्या तरुणांना कळले नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली,"मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासारखे सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे. माझे हसू हे देवाप्रती आभाराचे आहेत." हे ऐकून ते तरुण तिथेच उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या कामात मग्न होत्या. मग काही वेळाने त्या रडू लागल्या. तरुणांना कळेना कि काही वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व पुन्हा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या," आधी मी हसले होते धरतीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण त्यांच्या इच्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत. तरुणांनी या बलाचा वापर जर सृजनासाठी केला तर जगाचे किती कल्याण होईल. असे होत नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला रडू आले." तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबियाने त्यांना प्रेरित केले. त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, भुकेलेल्याना अन्न आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे त्यांना समजावले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
प्रत्येकाने जर थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुंदर दिसण्यास वेळ लागणार नाही. दुसरा कोणी करण्याची वाट पाहण्यात आयुष्य संपून जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
08. *वाळूमध्ये पडलेली साखर मूंगी खावू शकते परंतु हत्ती नाही. म्हणून छोट्या माणसांना कधी छोटे समजू नका. कधी कधी छोटी माणसे सुध्दा मोठी मोठी कामे करून जातात.*
*कधीही आपली मान गर्वाने ताठ करू नका. जिंकणारे आपला गोल्ड मेडल सुध्दा मान झुकवूनच घेत असतात...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
08. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ मुथय्या मुरलीधरन ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबधित आहे ?
➜ क्रिकेट.(श्रीलंका)
✪ भारतातील सर्वात दक्षिणेकडील टोक कोणत्या नावाने ओळखले जाते ?
➜ इंदिरा पॉइंट.
✪ जेथे आकाश जमिनीला टेकल्या सारखे दिसते अशा ठिकाणास काय म्हणतात ?
➜ क्षितिज.
✪ भारतरत्न मिळवणारी पहिली महिला कोण होती ?
➜ इंदिरा गांधी.
✪ महर्षी व्यास यांनी कोणत्या ग्रंथाची रचना केली आहे ?
➜ महाभार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
08. *❒ ♦पु.ल. देशपांडे♦ ❒*
━━•●◆●★●◆●•═━
◆जन्म नाव :~ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
◆टोपणनाव :~ पु.ल.
●जन्म :~ ८ नोव्हेंबर १९१९, मुंबई
●मृत्यू :~ १२ जून २०००, पुणे
◆पुरस्कार :~ पद्मश्री सन्मान,
महाराष्ट्र भूषण, साहित्य अकादमी,
महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार,
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष.
◆ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे ◆
हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात. लेखक आणि कवी वामन मंगेश दुभाषी ऊर्फ ऋग्वेदी हे पु. ल. देशपांड्यांचे आजोबा होते तर आणि सतीश दुभाषी हे मामेभाऊ आहेत.
गुळाचा गणपती या सबकुछ पु. ल. म्हणून गाजलेल्या चित्रपटात त्यांच्या प्रतिभेच्या विविध पैलूंचे दर्शन घडते. पु.ल. देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले.
कॉलेजमध्ये असताना पु.ल. गायकांना साथ करीत. पु.ल. पेटी वाजवत, त्यांचा भाऊ रमाकांत तबला आणि मधुकर गोळवलकर सारंगी वाजवीत. मिळालेले १५ रुपये तिघेही वाटून घेत. पार्ले टिळक विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पु.ल., मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजातून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल्एल.बी. झाले, आणि कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी करून पुण्याला आले. त्यापूर्वी ते पेट्रोल रेशनिंग ऑफिसमध्ये कारकून आणि ओरिएंटल हायस्कूलमध्ये शिक्षक होते. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.आणि नंतर एम.ए. केले.
फर्ग्युसनमध्ये असताना पु.ल.देशपांडे यांनी चिंतामण कोल्हटकरांच्या ’ललितकलाकुंज‘ व ’नाट्यनिकेतन‘ या नाट्यसंस्थांच्या नाटकांतून भूमिका करायला सुरुवात केली, आणि पु. ल. नट झाले.
१९४८साली पु.ल.देशपांडे यांनी ’तुका म्हणे आता‘ हे नाटक आणि ’बिचारे सौभद्र‘ हे प्रहसन लिहिले, आणि पु.ल. नाटककार झाले.
चित्रपटसृष्टीत पदार्पण
१९४७ ते १९५४ या काळात ते चित्रपटात रमले. ’वंदे मातरम्‘, ’दूधभात‘ आणि ’गुळाच्या गणपती‘त ते त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने प्रसिद्धीस आले. म्हणजे चित्रपटाचे कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन सर्वच पुलंचे असे.
१९५८मध्ये पुलंना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर मीडिया ऑफ मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले. १९५९मध्ये पु.ल.देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते झाले. दिल्ली दूरदर्शनवर सुरू झाले त्यावेळचा पहिला कार्यक्रम पुलंनी निर्मिला होता. दूरदर्शनवरील बिर्जू महाराजांच्या नृत्याचा कार्यक्रम होता. संथगतीत सुरू झालेल्यानृत्याची लय वाढत वाढत चौपट झाली. अशा वेळी त्या द्रुतगतीतही तबला वाजवून पुलंनी आपले तबला प्रावीण्य दाखवून दिले.
◆ उल्लेखनीय ◆
दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. साहित्य अकादमी, संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार मिळवणाऱ्या मोजक्या प्रतिभावंतात पुलंचा समावेश होतो.
मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर र्फॉर्मिंग आर्ट्स‘ (NCPA) या संस्थेत पुलंनी अनेक प्रयोग केले.
पु.ल. भाषाप्रेमी होते. त्यांना बंगाली, कानडी येत असल्याने ते त्या त्या समाजातील लोकांत सहज मिसळत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁बुधवार ~08/11/2023❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment