"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Showing posts with label थोरपुरुष माहिती. Show all posts
Showing posts with label थोरपुरुष माहिती. Show all posts

September 15, 2024

महामहीम द्रौपदी मुर्मू संघर्ष जीवनाचा...

 

   सर्वात तरुण राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या पहिल्या व्यक्ती... 

◆ जन्म :- २० जून १९५८

    या एक भारतीय राजकारणी असून सध्या त्या भारताच्या राष्ट्रपती म्हणून कार्यरत आहेत. भारताच्या स्वातंत्र्या नंतर जन्मलेल्या त्या सर्वात तरुण आणि राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या पहिल्या व्यक्ती आहेत.  भारताच्या राष्ट्रपती म्हणून काम करणाऱ्या प्रतिभा पाटील  यांच्यानंतर मुर्मू या दुसऱ्या महिला आहेत. त्या भारतीय जनता पक्षाच्या सदस्या होत्या.

        २५ जुलै २०२२ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला. त्यांनी भारतीय संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सरन्यायाधीश  एनव्ही रमण यांच्या हस्ते राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती म्हणून निवडून आलेल्या भारतातील आदिवासी समुदायातील त्या पहिल्या व्यक्ती आहेत.

    २०२२ च्या भारतीय राष्ट्रपती निवडणुकीसाठी त्या भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार होत्या. भारताच्या राष्ट्रपतीपदासाठी निवड होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला.  तर पहिल्या अनुसूचित जमातीच्या  (आदिवासी) व्यक्ती आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या त्या भारताच्या पहिल्या राष्ट्रपती असून आत्तापर्यंतच्या (तरुण) सर्वांत कमी वयाच्या राष्ट्रपती आहेत. त्यांनी यापूर्वी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून काम पाहिले होते. त्या मूळ ओडिशा राज्यातील असून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या  झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.


सत्यघटना... 

    मॅडम सौ. राणी सोयामोई कॉलेज मधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत होत्या .

    त्यांच्या अंगावर हातातील घड्याळाशिवाय दुसरं कुठल ही आभूषण दिसत नव्हत. इतकंच काय तर विद्यार्थ्यांना सर्वात जास्त आश्चर्य याच वाटल की , त्यांनी तोंडाला पावडर सुद्धा चोपडलेली नव्हती.

    भाषण इंग्रजीत होत .त्या फक्त जास्तीत जास्त पाच मिनिट बोलल्या असतील पण त्या पाच मिनिटाच्या भाषणातील शब्द हे समाजात अंजन लावणारे आणि दृढ संकल्पाने भरलेले होते. 

इतक्यात विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.

प्रश्न - मॅडम आपलं नाव काय आहे ? 

     माझं नाव राणी आहे .सोयमोई , हे माझं कुटुंबातील नाव आणि मी उडीसातील मूळ निवासी आहे....अजुन काही विचारायचं आहे ? 

   विद्यार्थ्यांमधील एक हाडकुळी , बारीक मुलगी उभी ठाकली .

" विचार , बाळा?" 

" मॅडम , तुम्ही "मेकअप" का नाही करत ? 

June 25, 2024

छत्रपती शाहू महाराज

  

दिव्यत्वाची जेथ प्रचीती

  तेथे कर माझे जुळती ..!!

     🙏🌲🙏🌹🙏🌲🙏

रयतेचा राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती "26 जून सामाजिक न्याय दिवस"  निमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!!

रयतेचा राजा राजश्री छत्रपती शाहू महाराज जयंती "26 जून सामाजिक न्याय दिवस" संपूर्ण माहिती व सूत्रसंचालन

🔗🔗👇👇🔗🔗 

January 12, 2024

राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती

  १२ जानेवारी, राजमाता जिजाऊ  माँसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती..!!

   छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांना घडवणाऱ्या जिजाऊ तसेच युवकांना चारित्र्यसंपन्न आणि ध्येयवादी आयुष्यासाठी प्रेरणा देणारे स्वामी विवेकानंद या दोहोंची जयंती एकाच दिवशी असणे हा तसा विलक्षण योगायोग..! जिजाऊंच्या संस्कारांची आणि विवेकानंद यांच्या प्रेरणादायक विचारांची शिदोरी राष्ट्राला अभिमान वाटावा अशी युवा पिढी घडवण्यासाठी पुरेसे आहेत. ही शिदोरी गाठीशी घेऊन मार्गक्रमणा करूया आणि देशाला अभिमान वाटावा असे कार्य करण्याची शपथ घेऊया!

    जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन..! 

संपूर्ण माहिती वाचण्यासाठी क्लिक करा...

October 15, 2022

★...अग्निपंख...★

 


भारतरत्न अवुल पाकीर जैनुलाबदिन अब्दुल कलाम

   नुसती वर्तमानपत्रे टाकून 

नाही होता येत डॅा.ए. पी.जे अब्दुल कलाम..... 

    आणि त्यांच्यासारखी हेअर स्टाईल डोक्यावर ठेवूनही नाही होता येत "मिसाईल मॅन"....

     त्यासाठी असावी लागते

डोक्यात नशा नवनिर्मितिची आतून तळमळ, जिद्द आणि स्वत:च्या लग्नाची तारीख विसरण्याइतकं झोकून देणं हाती घेतलेल्या देशकार्यासाठी.... 

   करावा लागतो अठरा तासांचा दिवस अभ्यासासाठी  आणि पाहावी लागतात दिवास्वप्नं...

    झोप उडवणारी लावून अग्निपंख घ्यावी लागते गनभरारी नव्या दिशेने

February 26, 2020

स्वातंत्र्यवीर सावरकर


स्वा सावरकर म्हणत..
वरं जनहीतं ध्येय,केवला न जनस्तुती....
व्यापक जनहितासाठी प्रसंगी अप्रीय भुमिका घ्यावी लागली तर ती अवश्य घ्यावी..कारण जनस्तुती हे ध्येय नसून जनहीत हे अंतीम ध्येय आहे... जगद्गुरू तुकोबाराया देखील म्हणतात.
कोणी निंदा कोणी वंदा.. 
आमचा लोकहिताचा धंदा...!!

October 01, 2019

महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती

भारत देशाला जय जवान जय किसान हा मंत्र देणारे.....    भारताचे दुसरे  पंतप्रधान.....
    *❒ लाल बहादूर शास्त्री ❒*  
यांच्याबाबत संपूर्ण माहिती बसण्यासाठी क्लिक करा..




August 30, 2019

देशभक्त मा. जावेद अहमद

एक रूपया पगार घेऊन छत्तीस वर्षे पोलीस खात्यात काम करणारा सच्चा राष्ट्रभक्त/ देशभक्त मा. जावेद अहमद

            डॉ अब्दुल कलाम यांचेनंतर ज्यांनी अंत:करणात स्थान मिळविले असे अधिकारी म्हणजे मा जावेद अहमद.  जावेदसाहेब १९८० च्या बॅचचे IPS अधिकारी .