"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Showing posts with label राष्ट्रीय देशभक्ती कार्यक्रम. Show all posts
Showing posts with label राष्ट्रीय देशभक्ती कार्यक्रम. Show all posts

August 10, 2025

Happy Independence Day

 


ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,

त्यांच्या चरणी ठेविते माथा...!!

 "भारत-भू"ला पारतंत्र्याच्या मगरमिठीतून मुक्त करणाऱ्या सर्व "देशभक्तांना" मानाचा मुजरा....!!


१५ ऑगस्ट: स्वातंत्र्य दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी देशाला ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य मिळालं आणि भारत एक सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयास आले.

★ऐतिहासिक महत्त्व-

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला सुमारे २०० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीतून मुक्ती मिळाली. या स्वातंत्र्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपलं जीवन समर्पित केलं होतं. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखालील अहिंसक चळवळी, तसेच भगतसिंग, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या क्रांतीकारकांच्या योगदानाला या दिवशी उजाळा मिळतो. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी, भारताची फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार आणि विस्थापन झाले. तरीही, या दिवसाने भारताच्या इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात केली.

★स्वातंत्र्य दिनाची पार्श्वभूमी-

१९३० पासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने २६ जानेवारी हा दिवस 'पूर्ण स्वराज दिन' म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली होती, पण प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळाल्यावर १५ ऑगस्ट हा दिवस निश्चित करण्यात आला. लॉर्ड माउंटबॅटन यांनी १५ ऑगस्ट ही तारीख निवडली, कारण याच दिवशी दुसऱ्या महायुद्धात जपानने मित्र राष्ट्रांसमोर शरणागती पत्करली होती.

★स्वातंत्र्य दिन साजरा करण्याची पद्धत-

स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा दिल्लीतील लाल किल्ल्यावर होतो. भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि देशाला संबोधित करतात. या सोहळ्याला 'एकवीस तोफांची सलामी' दिली जाते. देशभरात शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि देशभक्तीपर गाण्यांचे आयोजन केले जाते. या दिवशी लोकांना मिठाई वाटली जाते. भारतीय नागरिक आपल्या घरांवर, गाड्यांवर राष्ट्रध्वज फडकवून आपला राष्ट्रभक्तीचा गौरव व्यक्त करतात.


स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy Independence Day!

आज 15 ऑगस्ट, भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त, वंदे मातरम आणि भारत माता की जय म्हणत आपल्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांना आदराने वंदन करूया. या दिवशी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले प्राण अर्पण केले, त्या सर्व वीरांना आणि वीरांगनांना सलाम.
आपल्या तिरंगा ध्वजाचा मान राखूया आणि जय हिंद म्हणून आपल्या देशाच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करूया.

तुमच्या सर्व स्वप्नांना आणि आकांक्षांना यश मिळो! Independence Day 2025 च्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा..!

 स्वातंत्र्यदिनाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा....🌹💐जय हिंद..।।

   आचंद्र सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे...।।

   १५ ऑगस्ट २०२५  भारतात सगळीकडे ७९ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला होतोय . भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम....

   बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो !!

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद...!!

माझ्या सर्व भारतीय बांधवांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा... जय हिंद,जय भारत...

भारत माता कि जय... वंदे मातरम्...!!

   ! जय हिंद ! वंदे मातरम !
   नतमस्तक मी त्या सर्वांसाठी
  ज्यांनी भारत देश घडवीला...!!

     सीमेवर प्राणपणाने देशाची राखण करून देशवासीयांना सुखासमाधानाने जगू देणाऱ्या आमच्या जांबाज सैनिकांना मानाचा मुजरा ! जय हिंद ! वंदे मातरम !नतमस्तक मी त्या सर्वांसाठीज्यांनी भारत देश घडवीला...!!

🔘🔘🔘🔻🔘🔘🔘

August 06, 2025

गुरु पौर्णिमा सूत्रसंचालन

 

नमस्कार, 🙏
सर्वप्रथम आपल्या सर्वांचे या पवित्र गुरु पौर्णिमेच्या दिवशी मी .... मन:पूर्वक स्वागत करतो..!

"|| ॐ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ||
गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||

    गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला "गुरुपौर्णिमा" असे म्हटले जाते.
   आजचा दिवस आपल्या गुरूंसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा, त्यांच्या ऋणाची आठवण करून देणारा आहे."
❀ पाहूणे स्थानापन्न करणे -           "हिऱ्याशिवाय कुंदणाला शोभा नाही... गोडीशिवाय ऊसाला शोभा नाही...!!  
सुगधांशिवाय फुलाला शोभा नाही... तसेच अध्यक्षांशिवाय कार्यक्रमालाही शोभा नाही...!!  
   म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माननीय.... यांनी स्विकारावे अशी मी त्यांना विनंती करतो.
   यानंतर प्रमुख पाहुण्यांना सन्मानपूर्वक मंचावर निमंत्रित करावे.

❀🪔 दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदना -

"आता कार्यक्रमाची सुरुवात आपण दीपप्रज्वलन करून करणार आहोत. ज्योती म्हणजे ज्ञान, आणि अज्ञानरूपी अंध:कार दूर करण्याचं प्रतीक....

December 01, 2024

26/11 मुंबई दहशतवादी हल्ला

   

  26/11 अर्थात 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर झालेला दहशतवादी हल्ला असा भ्याड हल्ला होता, जो मुंबईची ओळख बनू पाहत असला तरी मुंबईला कधीच ती आपली ओळख बनू द्यायची नव्हती.

🔴🔵

   या घटनेला इतकी वर्षं उलटली, तरी प्रत्येक भारतीयाच्या मनात याच्या कटू आठवणी जिवंत आहेत.

   लष्कर-ए-तैयबाच्या प्रशिक्षित सशस्त्र दहा अतिरेक्यांनी मुंबईतील अनेक ठिकाणी आणि प्रतिष्ठित इमारतींवर हल्ला केला होता.

   सलग चार दिवस झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोक मारले गेले. 26 नोव्हेंबर 2008 च्या त्या रात्री सुरू झालेल्या गोळीबाराने मुंबई हादरली.

August 22, 2024

राष्ट्रीय अंतराळ दिवस

 23 ऑगस्ट 'राष्ट्रीय अंतराळ दिवस'


National Space Day 2024:

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून घोषित केला आहे. 23 ऑगस्ट 2023 हा दिवस भारतीय अंतराळ क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण होता. भारताने या दिवशी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा चौथा देश ठरला, तसेच चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय प्रदेशात पोहोचणारा पहिलाच देश बनला. या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय अंतराळ दिवस' म्हणून घोषित केला आहे. 

  या वर्षी राष्ट्रीय अंतराळ दिन 2024 ची थीम 'चंद्राच्या स्पर्शाने जीवनाचा अनुभव घ्या: भारताची अंतराळ कथा', असं आहे. ही थीम समाज आणि तंत्रज्ञानावर अवकाश संशोधनाचा महत्त्वपूर्ण प्रभाव अधोरेखित करते.

   23 ऑगस्ट 2024 रोजी साजऱ्या होणाऱ्या पहिल्या 'राष्ट्रीय अंतराळ दिना'च्या समारंभासाठी इस्रो सज्ज आहे. या दिवसाच्या निमित्ताने भारताच्या अंतराळ क्षेत्रातील यशाचे आणि भविष्यातील उद्दिष्टांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे.

    भारत अंतराळ संशोधनात लक्षणीय प्रगती करत आहे. त्यामुळे राष्ट्रीय अंतराळ दिन देशाच्या प्रगतीवर विचार करण्याची त्याचे योगदान साजरे करण्याची आणि भविष्यातील पिढ्यांना अंतराळ संशोधनात मोठे उद्दिष्ट ठेवण्याची प्रेरणा देते. 

★राष्ट्रीय अंतराळ दिवसाची संकल्पना आणि उद्दिष्टे ~

यंदाच्या राष्ट्रीय अंतराळ दिनाची संकल्पना 'चंद्राला स्पर्श करून जीवनाला स्पर्श: भारताची अंतराळ गाथा' अशी आहे. 

January 25, 2024

गणराज्य दिन


 ह्रदयात माझ्या तिरंगा

कर्मात माझ्या तिरंगा....

श्वासात माझ्या तिरंगा

नसांत माझ्या तिरंगा....

भासांत माझ्या तिरंगा

जगात माझ्या तिरंगा...

नभात माझ्या तिरंगा...

रंगात माझ्या तिरंगा.....

ढंगात माझ्या तिरंगा....

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

गणराज्यदिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा..!!

January 26, 2023

प्रजासत्ताक दिन/गणराज्य दिन

ह्रदयात माझ्या तिरंगा..... 

कर्मात माझ्या तिरंगा....!! 

श्वासात माझ्या तिरंगा...

नसांत माझ्या तिरंगा....!! 

भासांत माझ्या तिरंगा...

जगात माझ्या तिरंगा....!!

नभात माझ्या तिरंगा...

रंगात माझ्या तिरंगा.....

ढंगात माझ्या तिरंगा....!!

मेरी आन बाण शान तिरंगा....!!!गणराज्यदिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा..!!

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

August 14, 2019

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा


ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,
त्यांच्या चरणी ठेविते माथा...
      १५ ऑगस्ट २०१९ भारतात सगळीकडे ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जातोय. भारताला स्वातंत्र्य मिळ्वुन देणार्‍या सर्व हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम.
 बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो!!
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद..!