"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

अनमोल सुविचार 08


     ■★ अनमोल सुविचार ★■   
  ╰════════════╯
१७६)  जग भित्र्याला घाबरवते आणि घाबरवणाऱ्याला घाबरते.

१७७)  दुःख हे बैलालासुध्दा कोकिळेसारखं गायला लावतं.

१७८)  शिकणाऱ्याला शिकवावं लागत नाही; तो स्वतःहून शिकतो.

१७९)  जग हे कायद्याच्या भीतीने चालत नाही ते सद्विचाराने चालते.

१८०)  परिस्थितिला शरण न जाता परिस्थितीवर मात करा.

१८१)  ऎकावे जनाचे करावे मनाचे.

१८२)  एका वेळी एकच काम आणि तेही एकाग्रतेने करा.

१८३) केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.

१८४)  बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.

१८५)  चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही.

१८६)  तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं.

१८७)  दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय.

१८८)  स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.

१८९)  स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला.

१९०)  त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या !

१९१)  जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या

१९२)  दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात.

१९३)  पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

१९४)  उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

१९५)  जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते.

१९६)  मरावे परी कीर्तीरूपे उरावे.

१९७) आयुष्य जगून समजते; केवळ ऎकून , वाचून , बघून समजत नाही.

१९८)  मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य.

१९९)  बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.

२००)  तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 आणखी अनमोल सुविचार वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 01
 02
 03
 04
 08 09 10 11 12 13 ⏩⏩

                  🔘 "इंग्रजी सुविचार "🔘  

No comments:

Post a Comment