"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

अनमोल सुविचार 12


  ■★ अनमोल सुविचार ★■  
  ╰════════════╯
२७६)  भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.

२७७)  माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.
🟣🔵🟥💜🟩🟡🟢
२७८)  बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

२७९)  शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

२८०)  तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.

२८१)  आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही; सुविचार असावे लागतात.

२८२)  जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.

२८३)  आपलं जे असतं ते आपलं असतं आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.

२८४)  जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार !

२८५)  लीनता आणि विनयशिलता या धार्मिकतेच्या दोन शाखा आहेत.
🟣🔵🟥💜🟩🟡🟢
२८६)  ह्रदये परस्परांना द्यावीत, ती परस्परांच्या अधीन करू नयेत.

२८७)  कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे धावलात तर ते दुर पळतात.

२८८)  हाव सोडली की मोह संपतो आणि मोह संपाला की दुःख संपते.

२८९)  आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.

२९०)  गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.

२९१)  आदर्श गृहिणी ही शेकडो गुरूंहून श्रेष्ठ आहे.

२९२)  जो त्याग मनापासून केलेला नसतो, तो टिकत नसतो.

२९३)  अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.

२९४)  तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना .

२९५)  न मागता देतो तोच खरा दानी.

२९६)  चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.

२९७)  केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
🟣🔵🟥💜🟩🟡🟢
२९८)  समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही.

२९९)  भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.



३००)  दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे. 

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 आणखी अनमोल सुविचार वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 01
 02
 03
 04
 08 09 10 11 12 13 ⏩⏩
       

🟣🔵🟥💜🟩🟡🟢

🟣🔵🟥💜🟩🟡🟢

No comments:

Post a Comment