"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

अनमोल सुविचार 13

  
   ■★ अनमोल सुविचार ★■   
  ╰════════════╯
301) आपल्या दोषांवरचे उपाय नेहमी आपल्याकडेच असतात; फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.

302) आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.

303) जे नंतर चांगले वाटते, तेच कृत्य नैतिक व जे नंतर दुःखकारक ठरते, ते अनैतिक !

304) कडू घोट प्रेमळ माणसाच्या हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.

305) परमेश्वर ख्रऱ्या भावनेलाच साहाय्य करतो.

306) भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.

307) माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म.

308) बोलावे की बोलू नये, असा संभ्रम निर्माण झाला असता मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.

309) शत्रूने केलेले कौतुक हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.

310) तिरस्कार पापाचा करा; पापी माणसाचा नको.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
  आणखी अनमोल सुविचार वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

No comments:

Post a Comment