"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

अनमोल सुविचार 06


     ■★ अनमोल सुविचार ★■   
  ╰════════════╯
१२६)  गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

१२७)  कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.

१२८)  स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !

१२९)  ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.

१३०)  जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो जगावर काय प्रेम करणार!

१३१)  सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.

१३२) श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.

१३३)  आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.

१३४)  एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो...

१३५)  प्रेमाला आणि द्वेषालाही प्रेमानेच जिंका.

१३६)  आपण चुकतो तिथे सावरतो तोच खरा मित्र !

१३७)  आपला जन्म होतो तेव्हा आपण रडत असतो आणि लोक हसत असतात. मरताना आपण असं मरावं की आपण हसत असू आणि लोक रडत असतील !

१३८)  स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच अनर्थ टळतात.

१३९)  अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.

१४०)  हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

१४१)  आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

१४२)  बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?

१४३)  कलेशिवाय जीवन म्हणजे सुगंधाशिवाय फूल आणि प्राणाशिवाय शरीर !

१४४)  टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही.

१४५)  नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.

१४६)  यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही.

१४७)  आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते; ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.

१४८)  खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऎकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

१४९)  जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

१५०)  प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

 आणखी अनमोल सुविचार वाचण्यासाठी Page  NO. ला क्लिक करा...

 01
 02
 03
 04
 08 09 10 11 12 13 ⏩⏩
          

No comments:

Post a Comment