"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*05/07/24 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://urlzs.com/dmQmp
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *05. जुलै:: शुक्रवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
ज्येष्टअमावस्या, नक्षत्र ~आर्द्रा,
योग ~ध्रुव, करण ~चतुष्पाद,
सूर्योदय-06:06, सूर्यास्त-19:20,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

05. *विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

05.   *अति तेथे माती*
            ★ अर्थ ::~
  कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचा शेवट वाईट होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

05. *गुरुसेवा गया प्रोक्ता ।*
   ⭐अर्थ ::~ गुरूंची सेवा गया या तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे. (गुरुसेवेने तीर्थक्षेत्री गेल्याचे फळ मिळते.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●━━

     *🛡 ★ 05. जुलै ★ 🛡*
🔻===●●●★●●●===🔻
★महाकवी कालिदास दिन
★हा या वर्षातील १८६ वा (लीप वर्षातील १८७ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश आयोगाचे सदस्य एन. पंत यांना ’आर्यभट्ट पुरस्कार’ जाहीर
●१९७५ : ’देवी’ या रोगाचे भारतातुन समूळ उच्‍चाटन झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जाहीर केले.
●१९५४ : आंध्रप्रदेश उच्‍च न्यायालयाची स्थापना

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४६ : राम विलास पासवान – केंद्रीय मंत्री, राज्यसभेचे खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष
◆१९२५ : नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल
◆१९२० : आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक
◆१९१६ : के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : बाळू गुप्ते – लेग स्पिन गोलंदाज
●१९९६ : चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ ’बाबूराव अर्नाळकर’ – रहस्यकथाकार
●१८२६ : सर थॉमस स्टॅम्फोर्ड रॅफल्स – सिंगापूरचे संस्थापक व ब्रिटिश मुत्सद्दी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

05. *✸ "सारे जहाँ से अच्छा" ✸*
      ●●●●००००००●●●●
सारे जहाँ से अच्छा
हिंदुस्तान हमारा
हम बुलबुलें हैं उसकी
वो गुलसिताँ हमारा।
परबत वो सबसे ऊँचा
हमसाया आसमाँ का
वो संतरी हमारा
वो पासबाँ हमारा।

गोदी में खेलती हैं
जिसकी हज़ारों नदियाँ
गुलशन है जिनके दम से
रश्क-ए-जिनाँ हमारा।

मज़हब नहीं सिखाता
आपस में बैर रखना
हिंदी हैं हम वतन है
हिंदुस्तान हमारा।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

05.     *❂ सिद्धगणेशा ❂*
   ━═●✶✹★★✹✶●═━
विनायका हो सिद्धगणेशा
रंगसभेला या तुम्ही या

पक्षी गाती घरट्यामधुनी
आशीर्वच हो द्या तुम्ही द्या

नृत्यविशारद तुम्ही लंबोदर
हाती शोभे परशू तोमर
नाद कटीला बांधुनि या

अपराधाला घाला पोटी
तुमच्या माझ्या प्रेमासाठी
रसिकाशी ही भेटीगाठी 
काव्यसुधा ही प्राशुन ओठी
तृप्त मनाने ढेकर द्या

आम्ही बालक तव गुण गायक
कृपावंत हो प्रभु गुण ग्राहक
प्रसाद हाती घेऊनि या
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●━━

05.   *❝ आईची ममता ❞*
     ━━•●◆●★●◆●•━━
      एका स्‍त्रीचा पती तरूणपणीच वारला. तिला एकच मुलगा होता. तिने मजुरी करून मुलाला शिकविले. ज्‍यादिवशी मुलाला नोकरी लागल्‍याचे तिला समजले तेव्‍हा समजले तेव्‍हा तिच्‍या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्‍या परिश्रमांचे चीज झाले असे तिला वाटले. पण पुढे जाऊन मुलगा तिला विचारेनासा झाला. एकदा तर आई आणि मुलामध्‍ये प्रचंड वादावादी झाली. मुलाने टोकाचा निर्णय घेतला व आईच्‍या डोक्‍यात दगड घातला. बिचारी आई रक्तबंबाळ अवस्‍थेत रस्‍त्यावर पडली. रस्‍त्यावरून जाणा-या एका वाटसरूने दुस-या एकाला विचारले,''का हो बुवा, या म्‍हातारीला असे काय झाले की रस्‍त्यावर रक्तबंबाळ अवस्‍थेत पडली आहे.'' दुसरा माणूस त्‍या वाटसरूला म्‍हणाला,'' अहो महाराज या बाईच्‍या पोटच्‍या मुलाने भांडण केले व भांडणाभांडणात त्‍याने हिच्‍या डोक्‍यात दगड घातला व मुलगा निघून गेला.'' वाटसरू हळहळला व म्‍हणाला,'' काय पण बिचारीवर दिवस आले, पोटच्‍या मुलगा इतका कसा वाईट निघू शकतो, दुष्‍ट, दुराचारी, नराधम मुलाला तर खरे म्‍हणजे फासावरच द्यायला पाहिजे आहे.'' त्‍याचे हे बोलणे ऐकताच इतकेवेळ आडवे पडून असणारी आई जागेवरच उठून बसली व म्‍हणाली,'' बाबा रे तू तुझ्या रस्‍त्याने निघून जा. माझा मुलगा हा माझ्यासाठी अनमोल ठेवा आहे. आत्ता तो रागात आहे. राग शांत झाल्‍यावर त्‍याला त्‍याची चूक समजून येईल व तो पुन्‍हा आईच्‍या मायेसाठी माझ्या मांडीवर विसावण्‍यासाठी परत येईल. बाबा रे, मला जर मुलगाच झाला नसता तर मला कोणी आई म्‍हणून हाक मारली असती. त्‍याच्‍यामुळे मी आई झाले आहे. तो चुकीचा वागला असेल तर माफ मीच करणार आहे.''

         *🌀तात्पर्य ::~*
   *मुलाने कितीही चूक केली तरी माफ करणारी ती एकमेव अशी आई*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═┅━

05.  चुकीच्या निर्णयाविरोधात जाहीर
*बंड करण्याची धमक*
              ज्यांच्यात असते...
*त्यांच्यात स्वतःच अस्तित्व निर्माण*
करण्याची देखील धमक असते..!!

            एकटं पडण्याची...
*भीती त्यांनाच असते ज्यांना गुलाम म्हणून जगायची सवय असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═┅━

05. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ जिथे आकाश जमिनिला टेकल्यासारखे दिसते त्या ठिकाणाला काय म्हणतात ?
➜क्षितिज.

✪  भारतातील सर्वांत संपन्न राज्य कोणते ?
➜पंजाब.

✪  नागार्जूनसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधले आहे ?
➜कृष्णा नदी.

✪ भारतीय संविधान समितीची स्थापना कधी झाली ?
➜ ६ डिसेंबर १९४६.

✪ सी.पी.यू. या संक्षिप्त शब्दाचा पूर्ण अर्थ काय आहे ?
➜सेंट्रल प्रोसेसिंग युनिट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●━━

05. ❒ सरखेल कान्होजी आंग्रे ❒
   ━━●◆●★◆★●◆●•━━
●जन्म :~ ऑगस्ट इ.स. १६६९
हर्णे, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र, 
●मृत्यू : ~ ४ जुलै  १७२९
कुलाबा किल्ला, अलिबाग, महाराष्ट्र, 
◆आरमार प्रमुख कार्यकाळ (१६९८ - १७२९)

    ★ "सरखेल कान्होजी आंग्रे" ★

    *सरखेल या शब्दाचा अर्थ आरमार प्रमुख असा होतो*. आंग्रे १८ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. आपले अखंड आयुष्य त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढण्यात घालवले. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठीकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. परकीय सत्तांनी त्यांच्यावर ते समुद्री चाचे असल्याचा आरोप केला होता. १६ व्या शतकात कुंजली मरक्कर यांनीही परकीय सत्तेविरुद्ध असाच पराक्रम गाजवला होता. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नानंतरही, मरेपर्यंत कान्होजी आंग्रे यांचे मराठा आरमार अजिंक्य राहिले.

             *★ उगम ★*
    कान्होजी आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने ’तुझ्या अंगार्‍याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) त्याप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बरेच बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्लाच पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणापासूनच समु सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.

      १६९८ मध्ये साताराच्या भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन, मुंबई पासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहर च्या ताब्यातले जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिले. कान्होजींनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनींच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.

    १७०७ मध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू  गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणार्‍या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्याबाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हटले जाते.

      कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली.

         *★नाविक तळ ★*
   १६९८ मध्ये कान्होजींनी आपला पहिला नाविक तळ विजयदुर्ग या सागरी किल्यावर स्थापन केला. हा किल्ला मुंबईपासून केवळ ४२५ कि.मी. अंतरावर असल्याने त्या बंदरावर वचक ठेवण्याच्या दृष्टीने महत्वाचा होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या या किल्याला घेरिया या नावानेही ओळखले जाई. अखंड जहाज किल्याच्या आत घेण्याची सुविधा या किल्यात होती. मुंबईजवळच्या खांदेरी आणि उंदेरी या बेटांवर आपला तळ स्थापन करून कान्होजींनी मुंबई बंदराच्या प्रवेशद्वाराची नाकेबंदी केली. येणाऱ्या जाणाऱ्या व्यापारी जहाजांकडून त्यांनी कर वसुल करायला आरंभ केला.१७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजींनी अलिबाग या गावाची स्थापना केली. त्यांनी अलिबागी रुपया या नावाने चांदीची नाणीही चलनात आणली. अंदमान बेटांवरही कान्होजींचा तळ असल्याचा उल्लेख आहे. ही बेटे भारतभूमीला जोडण्याचे श्रेयही त्यांनाच दिले जाते.

            *★ मोहिमा ★*
    कान्होजींनी आपल्या कारकीर्दएत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले. ४ नोव्हेंबर १७१२ रोजी कान्होजींच्या आरमाराने मुंबईचे ब्रिटिश गव्हर्नर विल्यम ऐस्लाबी यांचे खाजगी जहाज अल्जेरीन पकडले. त्या जहाजावरील ब्रिटिशांच्या कारवारमधील वखारीचा प्रमुख थॉमस क्राउन लढाईत मारला गेला. त्याच्या पत्नीला युद्धबंदी करण्यात आले. १३ फेब्रुवारी १७१२ मध्ये कान्होजी आणि इंग्रजांत तह होऊन ३०००० रुपयांच्या खंडणीच्या मोबदल्यात ते जहाज आणि स्त्री इंग्रजांना परत करण्यात आली. या तहान्वये ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजांना त्रास न देण्याचे कान्होजींनी मान्य केले. या प्रकाराने विल्यम कमालीचा त्रस्त झाला आणि ऑक्टोबर १७१५ मध्ये आपल्या मायदेशी इंग्लंडला परत गेला.

     २६ डिसेंबर १७१५ मध्ये चार्लस बून यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक करण्यात आली. त्यांनी कान्होजींना पकडण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण त्यात ते अपयशी ठरले. उलट कान्होजींनी १७१८ मध्ये इंग्रजांची तीन व्यापारी जहाजे पकडली. इंग्रजांनी कान्होजींना समुद्री चाचे म्हणून घोषित केले. कान्होजींनी मुंबई बंदराची पूर्ण नाकेबंदी करुन ईस्ट इंडिया कंपनीकडून ८७५० पौंडाची खंडणी वसूल केली.

      १७२० मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्यावर हल्ला चढविला. त्यांनी किल्यावर तोफांचा जोरदार मारा केला, पण विजयदुर्गाची तटबंदी ते भेदू शकले नाही. हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पुनश्च मुंबईला माघार घेतली. २९ नोव्हेंबर १७२१ मध्ये व्हॉईसरॉय फ्रँसिस्को जोस डी सँपीयो इ कॅस्ट्रो यांच्या पोर्तुगीज आरमाराने आणि जनरल रॉबर्ट कोवान यांच्या इंग्रज आरमाराने, कमांडर थॉमस मॅथ्यूज यांच्या नेतृत्वाखाली ६००० सैनिकांसह आणि ४ जंगी जहाजांसह कान्होजींविरुद्ध संयुक्त मोहीम हाती घेतली. मेधाजी भाटकर आणि मैनक भंडारी या आपल्या अत्यंत कुशल आणि शूर सरदारांच्या सहाय्याने कान्होजींनी हा हल्ला पूर्णपणे परतवून लावला. या अपयशानंतर डिसेंबर १७२३ मध्ये इंग्लंडला परतले. त्यांच्यावर देशद्रोहाचा आणि चाच्यांशी संधान बांधण्याचा आरोप ठेऊन खटला चालविण्यात आला. याच दरम्यान गव्हर्नर बूनही इंग्लंडला परतले. बून मायदेशी परतल्यानंतर कान्होजींच्या मृत्यूपर्यंत पश्चिम सागरी किनाऱ्यावर शांतता राहिली.
        
              *★ मृत्यू ★*
    ४ जुलै १७२९ मध्ये कान्होजी आंग्रेंचा मृत्यू झाला. त्यावेळी सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते. अलिबाग शहरात कान्होजी आंग्रेंची समाधी आहे. मुंबईच्या नेव्हल डॉकयार्डमध्ये त्यांचा पुतळा उभा आहे.

     कान्होजी नंतर शेखोजीने १७३३ म्हणजे त्याच्या मृत्यूपर्यंत काही प्रमाणात आरमाराची धुरा सांभाळत पराक्रम गाजवला. पुढच्या काळात या सागरी शक्तीकडे मराठ्यांचे दुर्लक्ष झाले आणि ब्रिटिशांनी संधी साधून हळूहळू आपले पाय कोकण किनारी पसरवण्यास सुरूवात केली.
अलीबाग येथील कान्होजी आंग्रे यांची समाधी

     वाढत्या परकीय आक्रमणाला तोंड देण्यासाठी भारताच्या सागरी सीमेचे रक्षण करणे किती महत्त्वाचे आहे हे कान्होजी त्या काळीच ओळखून होते. त्यांच्या सागरी साम्राज्याच्या उत्कर्षाला त्यांच्याकडे ब्रिटिशांहून संख्येने अधिक आणि बलाढ्य आरमार होते. त्यांच्याशी टक्कर घेण्याची कोणाची हिम्मत नव्हती.आपल्या आरमारात काही विदेशी सरदारांनाही त्यांनी बाळगले होते.
   
          *★ विशेष नोंदी ★*
    १५ सप्टेंबर १९५१ रोजी भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाचे नामकरण आय. एन. एस आंग्रे असे करण्यात आले. कान्होजी आंग्रे यांच्या निर्विवाद कर्तृत्वाचा हा मानबिन्दू होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
║▌║▌║█❃❂❃█║▌║║▌

*❁शुक्रवार~05/07/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment