"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*29/04/24 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *29. एप्रिल:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
चैत्र कृ.5, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~पूर्वाषाढा,
योग ~सिद्ध , करण ~तैतिल,
सूर्योदय-06:11, सूर्यास्त-19:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🟢🔵🟣
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

29. *बुध्दीला पटल्याशिवाय कोणताही विचार स्वीकारू नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

29. *हाती काम मुखी नाम*-
   *★ अर्थ ::~* देवाचे नाव व उद्योग एकाच वेळी सुरु असणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

29. *सा विद्या या विमुक्तये ।*
      ⭐अर्थ ::~ मोक्षप्राप्ती करणे शिकवते तीच खरी विद्या होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

    🛡 *★29. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
★ हा या वर्षातील ११९ वा (लीप वर्षातील १२० वा) दिवस आहे.

    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
  🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९१ : बांगलादेशच्या दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यात आलेल्या एका भीषण चक्रीवादळाने सुमारे १,३८,००० लोकांचा बळी घेतला तर सुमारे १ कोटि लोक बेघर झाले.
●१९४५ : दुसरे महायुद्ध – इटलीतील जर्मन सैन्याने दोस्त राष्ट्रांपुढे बिनशर्त शरणागती पत्करली.
●१९३३ : ’प्रभात’चा ’सिंहगड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७० : आंद्रे आगासी – अमेरिकन लॉनटेनिस खेळाडू
◆१९६६ : फिल टफनेल – इंग्लिश फिरकी गोलंदाज
◆१९३६ : झुबिन मेहता – भारतीय संगीतकार
◆१९०१ : मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट
◆१८६७ : डॉ. शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन'
◆१८४८ : राजा रविवर्मा – चित्रकार

    ~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
    🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : जे. के. गालब्रेथ – कॅनेडियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ
●१९८० : श्रीकृष्ण के. क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक
●१९८० : सर अल्फ्रेड हिचकॉक – चित्रपट दिग्दर्शक
●१९६० : पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले (जन्म: ८ डिसेंबर १८९७)
●१९४५ : हाइनरिक हिमलर – जर्मन नाझी अधिकारी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

29. *✸ आम्ही चालवू हा पुढे ✸*
       ●●●●●००००००●●●●●
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

पिता-बंधु-स्‍नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा !

जिथे काल अंकूर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !

शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा !

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा !

तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

29.  *✹धार वज्राची मिळू दे !✹*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !

पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !

सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटतांना दर्वळू दे !

लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

*29. ❃ सिंह व बुध्दिमान माणूस ❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    एका जंगलात एके दिवशी एक पारधी शिकारीसाठी आला. त्याला पाहून जंगलातील प्राणी घाबरून सैरावैरा पळू लागले. एका सिंहाने ते पाहिले, तो पळणाऱ्या प्राण्यांना म्हणाला, "अरे माझ्यासारखा शक्तिमान प्राणी तुमचा राजा असताना तुम्हाला घाबरण्याचे काहीच कारण नाही."सिंह असे बोलतो न बोलतो तोच सूं सूं करत एक बाण आला व सिंहाच्या पंजात घुसला. सिंह तसाच विव्हळला. तीन पायावर पळत सुटला, एका कोल्ह्याने पाहिले व म्हणाला, "वनराज आताच तर आपण शौर्याच्या, शक्तीच्या गप्पा मारत होता, मग आता का घाबरून पळता आहात.' यावर सिंह कोल्ह्याला म्हणाला, अरे बाबा, मी शक्तीने सर्व प्राण्यांत श्रेष्ठ असलो तरी माणूस हा प्राणी बुध्दीने सामर्थ्यशाली आहे त्याची बरोबरी करणारा दुसरा प्राणी नाही.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   बुध्दीच्या सामर्थ्यापुढे शारीरिक सामर्थ्य कमी पडते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

29.   "वेळ , तब्बेत आणि नाती ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते."
     "पण"ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते."  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

29. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली होती ?
➜ १६०० साली.

✪ भारताची राष्ट्रीय लिपी कोणती आहे ?
➜ देवनागरी.

✪ पहिली ऑलिंपिक स्पर्धा केव्हा भरली होती ?
➜ १८९६.(ग्रीस)

✪ विधानसभेच्या सदस्याला काय म्हणतात ?
➜ आमदार.

✪ भारतात सर्वप्रथम सूर्योदय व सूर्यास्त    कोणत्या राज्यात होतो ?
➜ अरुणाचल प्रदेश.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

29. *❒ दादासाहेब फाळके ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
🔸जन्म :~ ३० एप्रिल १८७०
      त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र, भारत
🔹मृत्यू :~ १६ फेब्रुवारी १९४४
       नाशिक, महाराष्ट्र, भारत
🔸कार्यक्षेत्र :~ दिग्दर्शक, निर्माता

    ☀ धुंडिराज गोविंद फाळके
       ऊर्फ दादासाहेब फाळके ☀

   🔷हे चित्रपटनिर्मिती करणारे महाराष्ट्रातील व भारतातील पहिले चित्रपटनिर्माते होते आणि यासाठीच त्यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते . *१९१३ साली त्यांनी निर्मिलेला राजा हरिश्चंद्र हा चित्रपट मराठी व भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट होय.* १९३७ पर्यंतच्या आपल्या १९ वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी ९५ चित्रपट व २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो.

    🔶त्यांनी गोध्रा येथे छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला. परंतु, गोध्ऱ्यात झालेल्या ब्युबॉनिक प्लेगाच्या उद्रेकात त्यांची प्रथम पत्नी आणि मूल दगावल्यावर त्यांना ते गाव सोडावे लागले. लवकरच, त्यांची ल्युमिएर बंधूंनी नेमलेल्या ४० 'जादूगारां'पैकी एकाशी, जर्मन कार्ल हर्ट्‌झ याच्याशी ओळख झाली. त्यानंतर त्यांना 'भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थे'साठी ड्राफ्ट्समन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्या धडपड्या स्वभावामुळे लवकरच ते नोकरीच्या बंधनांना कंटाळले व त्यांनी छपाईचा व्यवसाय सुरू केला. शिळाप्रेस छपाईच्या तंत्रात ते वाकबगार होते. त्यांनी राजा रविवर्मांसोबत काम केले. पुढे त्यांनी स्वत:चा छापखाना काढला, तसेच छपाईची नवी तंत्रे आणि यंत्रे अभ्यासायला जर्मनीची वारी केली.

    🔷छपाई व्यवसायात त्यांच्या सहकाऱ्यांशी त्यांचे विवाद झाले आणि फाळकेंनी छपाईच्या व्यवसायास रामराम ठोकला. पुढे "लाईफ ऑफ ख्रिस्त" (Life of Christ) हा मूकपट पाहिल्यानंतर त्यांनी आपले लक्ष हलत्या चित्रांच्या (चित्रपट, English:Motion Pictures) व्यवसायाकडे वळवले व १९१२ साली त्यांनी राजा हरिश्चंद्र हा पहिला मूकपट काढला जो ३ मे १९१३ साली मुंबईच्या कॉरोनेशन चित्रपटगृहात (Coronation Cinema) प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा दाखवण्यात आला.

*☀दादासाहेब फाळके पुरस्कार*
     🔶दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁सोमवार~29/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment