"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*01/04/24 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🟢🔵🟣
🍥 *01. एप्रिल:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन कृ.7, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~सप्तमी, नक्ष |त्रमूळ,
योग ~वरीयान्, करण ~विष्टि,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]     ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

01.   *नेहमी तत्पर रहा; बेसावध आयुष्य जगू नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

01. *कोळसा किती उगाळला तरी काळाच*     
   *★ अर्थ ::~* - वाईट गोष्टींची कितीही चिकित्सा केली , तरी त्यातून काहीही चांगले निर्माण होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

01. *परोपकाराय सतां विभूतय: ।*
       ⭐अर्थ ::~ सज्जनांचे ऐश्वर्य परोपकारासाठी असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

    🛡 *★01. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ एप्रिल फूल दिवस
★ हा या वर्षातील ९१ वा (लीप वर्षातील ९२ वा) दिवस आहे.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : ’गूगल’ने gmail ही सेवा सुरू केली.
●१९९० : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्‍न’
●१९५७ : भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला. ६४ पैशांचा रुपया जाऊन १०० नव्या पैशांचा रुपया चलनात आला.
●१९३५ : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या भारतातील मध्यवर्ती बँकेची स्थापना झाली.
●१८८७ : मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४१ : अजित वाडेकर – भारताचे क्रिकेट कप्तान, डावखुरे फलंदाज
◆१९३६ : तरुण गोगोई – आसामचे मुख्यमंत्री
◆१८८९ : डॉ. केशव बळीराम हेडगेवार – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले अध्यक्ष
◆१६२१ : गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : एन. के. पी. साळवे – भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष
●२००६ : राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार 
●१९९९ : श्रीराम भिकाजी वेलणकर – भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक,
●१९८९ : श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी – समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01. *✸ हे राष्ट्र देवतांचे ✸*
       ●●●●●००००००●●●●●
हे राष्ट्र देवतांचे,हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रमायणे घडावी येथे पराक्रमांची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
01.  *❂ सूर्यनारायणा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
सूर्यनारायणा नित्‌ नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा

ओंजळीनं भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सावली मायेची

आबादानी होवो शेत भरू दे दाण्याचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

01. *❃ लांडगा आणि सिंह ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    एकदा एक लांडगा व एकू सिंह रानात हिंडत होते थांबा मी आता जवळच एका मेंढीचा आवाज ऐकला. त्यावरून इथे जवळच मेंढ्या चरत असाव्यात असं वाटतं. तेव्हा मी पटकन जाऊन एखादी मेंढी तुमच्याकरता घेऊन येतो. असे बोलून लांडगा आवाजाच्या दिशेने गेला. परंतु, तेथे मेंढ्यांच्या जवळच धनगर व कुत्रे उभे होते. ते पाहून लांडगा घाबरला व पळतच सिंहापाशी आला. तेव्हा सिंहाने विचारले,हे काय, तू काहीच आणले नाहीस ? तेव्हा लांडग्याने उत्तर दिले, 'महाराज, तिथे मेंढ्या आहेत खया, पण त्या इतक्या अशक्त आहेत की, त्या सगळ्या खाल्ल्यावरसुद्धा आपलं पोट भरणार नाही !

    *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*  जी वस्तु आपल्याला मिळणे कठीण, तिला नावे ठेवणे हा मनुष्यस्वभावच आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

01.  *प्रभावाने जवळ येणाऱ्या लोकांपेक्षा स्वभावाने जवळ येणाऱ्या लोकांना जपा,आयुष्यात कधीच पश्चाताप होणार नाही....!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
01. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ महाराष्ट्र राज्याची राजभाषेचे नाव काय आहे ?
➜ मराठी.

✪  महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता?
➜ हरियाल.

✪  महाराष्ट्र राज्याच्या राज्यवृक्षाचे नाव काय आहे ?
➜ आंबा.

✪  महाराष्ट्र राज्याच्या खेळाचे नाव काय आहे ?
➜ कबड्डी.

✪  महाराष्ट्र राज्याचे उच्च न्यायालय कोठे आहे ?
➜ मुंबई
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

01. *❒ केशव बळीराम हेडगेवार ❒*
       ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
🔸टोपणनाव :~ डाँ. हेडगेवार
*🔹जन्म :~ १ एप्रिल १८८९*
नागपूर, महाराष्ट्र, भारत
🔸मृत्यू :~ २१ जून  १९४०
नागपूर, महाराष्ट्र, भारत
🔹चळवळ :~ हिंदू धर्म पुनरुज्जीवनवाद व सुधारणा
🔸संघटना :~ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

      *💥केशव बळीराम हेडगेवार*
   🔶हे भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक होते. डाँ. हेडगेवार यांचा जन्म जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेला १ एप्रिल १८८९ मध्ये महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश च्या मधल्या बोधाण तालुक्यातील कुंदाक्रुती गावाता झाला.

    🔷हेडगेवारांचे शिक्षण त्यांच्या मोठ्या भावाने केले. मैट्रिक पास झाल्या नंतर, इ.स. १९१० साली ते चिकित्सा शिक्षण घेण्या साठी ते कोलकात्ताला गेले. तरुणपणात सशस्त्र क्रांतीत सहभाग घेतलेला. शाळेत असताना त्यांनी - व्हिक्टोरिया राणीच्या राज्यारोहणाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वाटण्यात आलेली मिठाई रागाने फेकून दिली होती. तसेच पुढे ‘वंदे मातरम्‌’ चा घोष केल्याबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. बंगालमधील प्रत्यक्ष क्रांतिकार्यात सहभाग घेता यावा यासाठी त्यांनी आपले उच्चशिक्षण जाणीवपूर्वक कोलकतामध्ये घेतले. तेथे ते अनुशीलन समिती या क्रांतिकारी संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते बनले. पुढील काळात नागपुरात परतल्यावर काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील अनेक आंदोलनांमध्ये भाग घेतला व अनेक वेळा कारावास भोगला. इ.स. १९२० ते इ.स. १९३१ या काळात ते अनेक सत्याग्रहांमध्ये, आंदोलनांमध्ये सहभागी होते.

     🔶देशात इतर अनेक विचार प्रवाह असूनही त्यामध्ये राष्ट्र म्हणून विचार करणारी एकही यंत्रणा नाही. या भूमिकेतूनच डॉक्टरांनी इ.स. १९२५ सालच्या विजयादशमीच्या दिवशी (दि. २७ सप्टेंबर, इ.स. १९२५) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना स्थापन केली. इथे हिंदूंचे संघटन करताना हिंदू स्वयंसेवक संघ न म्हणता राष्ट्रीय हा शब्द वापरला. कारण हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व ही डॉक्टरांची ठाम धारणा होती. याच राष्ट्रीय समाजाला संघटित करून राष्ट्राला परम वैभवाला न्यायचे हे संघटनेचे ध्येय ठरवून त्यांनी वाटचालीला आरंभ केला. स्थापनेच्या क्षणापासून डॉक्टरांचे संघटना बांधणी, विस्तार, मुनष्यबळ नियोजन, संघटनेची रचना, विचारधारा, एकूण कार्यपद्धती - या सर्व गोष्टींबाबतचे चिंतन व प्रत्यक्ष कार्य चालूच होते. दरम्यान इ.स. १९२९ मध्ये डॉ. हेडगेवार यांची औपचारिकरीत्या ‘सरसंघचालक’ (राष्ट्रीय प्रमुख किंवा प्रमुख संघटक) या पदावर नियुक्ती झाल्याचे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घोषित केले.

    🔷चारित्र्यसंपन्न व्यक्तिनिर्माण व त्या आधारावर राष्ट्रनिर्माण या अंतिम ध्येयाचा विचार त्यांनी संघस्थापनेच्या माध्यमातून केला. डॉ. हेडगेवार हे कुशल संघटक, मार्गदर्शक व नेते होते. त्यांच्याच प्रेरणादायी नेतृत्वामुळे गोळवलकर गुरुजी, बाळासाहेब देवरस, भैय्याजी दाणी, एकनाथजी रानडे (स्वामी विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार), पं. दीनदयाळ उपाध्याय आदी नेते - कार्यकर्ते भारताला प्राप्त झाले. इ.स. १९२५ ते इ.स. १९४० या काळात, सतत १५ वर्षे डॉक्टर देशभर प्रवास करत होते, एक-एक माणूस, कार्यकर्ता, स्वयंसेवक घडवण्याचा व संघाला जोडण्याचा प्रयत्न करत होते.

    🔶सच्चे नेतृत्व, त्याग, सेवा, समर्पण भावना,दूरदर्शी विचार आणि शिस्तबद्ध, निश्र्चल व व्रतस्थ कार्यजीवनशैली ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची विविध अंगे होती. दिनांक २१ जून,इ.स. १९४० साली डॉक्टरांचे निधन झाले. त्यापूर्वी एक वर्ष आधी त्यांनी संघाच्या कार्यपद्धतीबाबत संघस्वयंसेवकांसाठी काही निर्देश देऊन ठेवले. संघाची निश्र्चित अशी कार्यपद्धती तयार झाली व जणू आपल्या पश्चात संघटनेला ध्येयप्राप्तीसाठीची शिदोरीच त्यांनी संघाला अर्पण केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ सोमवार ~01/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment