"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*01/09/24 रविवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *01. सप्टेंबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण कृ. १४, पक्ष :कृष्ण पक्ष,
तिथि ~चतुर्दशी, नक्षत्र ~आश्लेषा,
योग ~परिघ, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:23 सूर्यास्त-18:52,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

01. *अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

01. *तोंड दाबून बुक्क्यांचा मार –*
   ★ अर्थ ::~ विनाकारण जुलूम
         सहन करावा लागणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01. *सत्यं कण्ठस्य भूषणम् ।*
   ⭐अर्थ ::~  सत्य बोलणे हे
   गळ्यातील खरे आभूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 ★ 01. सप्टेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २४४ वा (लीप वर्षातील २४५ वा) दिवस आहे.
★ १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर – राष्ट्रीय पोषक आहार सप्ताह

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९५६ : भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC of India) स्थापना झाली.
●१९५१ : अर्नेस्ट हेमिंग्वे यांची ’द ओल्ड मॅन अ‍ॅन्ड द सी’ ही कादंबरी प्रकाशित झाली. या कादंबरीबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक व पुलित्झर पुरस्कार मिळाले.
●१९३९ : जर्मनीने पोलंडवर आक्रमण केले. या घटनेमुळे दुसर्‍या महायुद्धाची सुरुवात झाली.
●१९११ : पं. भास्करबुवा बखले यांनी पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना केली.

      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४९ : पी. ए. संगमा – लोकसभेचे सभापती आणि मेघालयचे मुख्यमंत्री
◆१९२१ : माधव मंत्री – यष्टीरक्षक व उजव्या हाताचे फलंदाज
◆१९०८ : कृष्ण नारायण तथा के. एन. सिंग – हिन्दी चित्रपटांतील गाजलेले खलनायक
◆१८९६ : अभय चरणारविंद भक्तिवेदांत तथा स्वामी प्रभूपाद – हरेकृष्ण पंथाचे संस्थापक

       ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००८ : थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक
●१८९३ : काशिनाथ त्र्यंबक तेलंग – प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, हिंदू कायद्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी प्रयत्‍न केले. भगवद्‌गीतेचा त्यांनी इंग्रजीत अनुवाद केला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01. *✸ हे राष्ट्र देवतांचे ✸*
       ●●●●●००००००●●●●●
हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे

कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघुत्तमाची
रामायणे घडावी येथे पराक्रमाची
शिर उंच उंच व्हावे हिमवंत पर्वतांचे

येथे नसो निराशा थोड्या पराभवाने
पार्थास बोध केला येथेच माधवाने
हा देश स्तन्य प्याला गीताख्य अमृताचे

येथेच मेळ झाला सामर्थ्य-संयमाचा
येथेच जन्म झाला सिद्धार्थ गौतमाचा
हे क्षेत्र पुण्यदायी भगवन्‌ तथागताचे

हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे
येथे शिवप्रतापी नरसिंह योग्यतेचे

येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
जनशासनातळीचा पायाच 'सत्य' आहे
येथे सदा निनादो जयगीत जागृताचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01. *❂ विजयी वरदान ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
भगवंताचे जया लाभले। चिर विजयी वरदान।
संघा वाचुन कोण स्विकारिल। काळाचे आव्हान॥धृ॥

परंपरचे पौरुषाचे।पराक्रमी पुरुषांचे।
पुनीत पावन घडते येथे।पुजन वसुंधरेचे।
मांगल्याचे पावित्र्याचे। राष्ट्रीय चारित्र्याचे।
संघशक्तिने चरित्र घडते। बाल-तरुण-प्रौढाचे।
इथेच मिळतो मायभूमिला। अग्रपुजेचा मान॥१॥

पुण्यपुरातन इथे सनातन।ध्वज भगवा आमुचा
ग्राम नगर गिरिकंदरि डोले। जगी दिग्विजयाचा।
विश्वगुरुपदी सदा नांदला।विजयी जगताचा।
नानक गुरुचा महाराणाचा। विक्रमी शिवबाचा।
नील अंबरी फडकत असता। चढे नवे अवसान॥२॥

काल्पनीक प्रांतांच्या सीमा।भेद इथे ते सरले।
जाति-पंथ-भाषेचे अंकुर।कधी न इथे रुजले।
भिन्नत्वातुन अभिन्नतेचे।विशाल मंदिर उठले।
अंजिक्य-अविचल मंदिरात या।केशवदर्शन घडले।
कोटि कोटि हृदयांत चिरंतन। कार्याचा अभिमान॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

01. *❝ वर्तणुक माणुसकीची ❞*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एका बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीची ही गोष्ट आहे.

    कामाचा वेळ संपत आला होता सगळे घरी जाण्यासाठी तयार होते.
तेवढ्यात कंपनीमध्ये थोडा तांत्रिक बिघाड झाला. म्हणून तो व्यक्ति तो बिघाड दुरुस्त करायला गेला. त्याला काम करण्यात खुप उशीर लागला.
तोपर्यंत प्लांट बंद झाला. लाइट बंद करून दरवाजे सील करण्यात आले.
अशा परस्थितित त्याचा बर्फ आणि थंडी ने जिव जाणे, निश्चित होते..!!

    त्या माणसाला काही सुचेनासं झालं,
पण तासा भरात एक चमत्कार झाला. आणि कोणी तरी दरवाजा उघडला.
तो समोर पाहतो तर सुरक्षा रक्षक हातात टॉर्च घेऊन उभा होता. त्याने त्याला बाहेर काढून त्याचा जिव वाचवला.

     प्लांट बाहेर आल्यावर त्याने सुरक्षा रक्षकाला विचारले, "तुम्हाला कसे कळले की मी आत अडकलोय." सुरक्षा रक्षक म्हणाला, "या प्लांट मध्ये जेवढे लोक काम करतात त्यात तुम्ही एकटेच असे आहात की जे रोज मला येताना नमस्कार आणि जाताना "राम राम" बोलता...  आणि आज सकाळी तुम्ही कामावर आलात पण संध्याकाळी गेला नाहीत. म्हणून माझ्या मनात शंका आली आणि मी पाहायला आलो."

   त्या व्यक्तीला कधी वाटले देखील नव्हते की त्याचे एखाद्याला एवढा छोटा सन्मान देणे, एक दिवस त्याचा जिव वाचवेल.
    म्हणून नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा कधीही कोणाला भेटाल तेव्हा त्याच्या सोबत हसून सन्मान पूर्वक बोलून मग पुढे जा.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    माणूसकीच तुम्हांला शेवट पर्यंत साथ देईल... म्हणून सर्वांबरोबर माणूसकीने वागा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01.   *पायाचं दुखणं आणि संकुचित विचार माणसाला कधीच पुढे जाऊ देत नाहीत....*
   *तूटलेली लेखणी आणि इतरांशी ईर्ष्या स्वतःच भाग्य लिहू देत नाही....*
*कामाचा आळस पणा आणि पैशाचा लोभ माणसाला मोठ होऊ देत नाही...,*
  *आपणच खरे आहोत बाकी सर्व खोटे हा विचार माणसाला माणूस होऊ देत नाही....!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  गिंडी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?
  ➜ तामिळनाडू.

✪  शुद्र पुर्वी कोण होते ? या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
  ➜डाॅ.बाबासाहेब आंबेडकर.

✪  स्वतंत्र भारताचे पहिले संचारमंत्री कोण होते ?
  ➜ रफी अहमद किडवाई.

✪  धुळे जिल्ह्यातून कोणता नवीन जिल्हा तयार करण्यात आला ?
  ➜ नंदूरबार.

✪  विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार असते ?
  ➜ टंगस्टन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

01. *❒♦काशिनाथ तेलंग♦❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ३० ऑगस्ट १८५०
*●मृत्यू :~ १ सप्टेंबर १८९३*

    ★ "काशिनाथ त्र्यंबक तेलंग" ★

   💎 प्राच्यविद्या संशोधक, कायदेपंडित, सुधारक आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या संस्थापकांपैकी एक....!!

    🔷मुंबई येथे मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झाला. वयाच्या चौदाव्या वर्षी ते मॅट्रीक झाले. मॅट्रिकला संस्कृत विषय घेऊन उत्तीर्ण होणारे ते पहिले विद्यार्थी होत. पुढील शिक्षणाकरिता त्यांनी एल्फीस्टन महाविद्यालयात प्रवेश केला. १८६८ मध्ये बी. ए. झाले. १८६९च्या शेवटी ते एम्. ए. झाले. एम्. ए. करता करताच त्यांनी कायद्याचा अभ्यास केला. ते वयाच्या १९ व्या वर्षी एम्. ए. एल्एल्. बी. झाले. नेहमीच प्रथम क्रमांक राहिल्यामुळे त्यांना अनेक शिष्यवृत्त्या व बक्षिसे मिळाली. पुढे ते एल्फीस्टन महाविद्यालयात अधिछात्र होते.

    🔶 त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयात वकिलीस सुरुवात केली. पुढे १८८९ मध्ये उच्च न्यायालयात त्यांची न्यायाधिश म्हणून नियुक्ती झाली. हिंदु कायद्यातील सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला. संमतिवयाच्या कायद्यास त्यांची मान्यता होती. मुंबईला काँग्रेस स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. काँग्रेसचे ते १८८५–८९ पर्यंत चिटणीस होते. पहिल्या अधिवेशनापासून त्यांनी महत्त्वाच्या ठरावावर भाषणे केली. १८९२ साली त्यांची मुंबई विश्वविद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली.काशिनाथ त्र्यंबक तेलंग  कायद्याप्रमाणेच इतिहास, राज्यशास्त्र, भाषासाहित्य या विषयांचा त्यांचा व्यासंग मोठा होता. मराठी, इंग्रजी, संस्कृत या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते, तर फ्रेंच, जर्मन या भाषाही त्यांना अवगत होत्या. संशोधनाच्या क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनिय आहे.

    🔷  स्टुडंट्स लिटररी अॅड सायंटिफिक सोसायटी व हिंदू युनियन क्लब या दोन संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. ते स्टुडंट्स सोसायटीचे सचिव होते. (१८७२–८९) आद्य शंकराचार्य हे पश्चिम मगधचा राजा पुर्ववर्मा याच्या कारकिर्दीत होऊन (इ. स. ५९०) गेल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे. डॉ. वेबर यांनी रामायण–काळासंबंधीचा मांडलेला सिद्धान्त तसेच लेरिंगेर याचे भगवत्गीते संबंधीचे प्रतिपादन त्यांनी तर्कशुद्ध पद्धतीने खोडून काढले. स्त्रीशिक्षण,  विधवाविवाह, इ. सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते. त्या दृष्टीने त्यांनी हिंदु कायद्यात सुधारणा केल्या.

   🔶  ईल्बर्ट बिलाविरुद्ध युरोपियन लोकांनी केलेल्या चळवळीस तय्यबजी व फिरोझशहा यांच्याबरोबर त्यांनीही विरोध केला.मराठी भाषा व मराठी वाङ्मय यांच्या समृद्धीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी महाराष्ट्र भाषासंवर्धक मंडळी स्थापन केली. तिचा उद्देश ऐतिहासिक, चरित्रात्मक, बोधपर व उपयुक्त विषयांवर ग्रंथनिर्मिती करावी असा होता. त्यांचे बहुतेक ग्रंथ अनुवादित स्वरूपाचे आहेत. त्यांचे स्फुट लेख जर्नल ऑफ द रॉयल एशियाटिक सोसायटी व इंडियन अँटिक्वेरी या नियतकालिकातून प्रसिद्ध झाले.

   🔷  ‘शास्त्र व रूढी यांच्या बलाबलां विषयी विचार’ ‘सामाजिक विषयांसंबंधी तडजोड’ हे त्यांचे मराठी निबंध प्रसिद्ध असून त्यातून त्यांनी धार्मिक सुधारणांसंबंधी विचार मांडले. भर्तृहरीची नीती व वैराग्य शतके व मुद्राराक्षस नाटक हे त्यांचे संपादित ग्रंथ. त्यांनी इंग्रजीत गीतेचा गद्यपद्यात्मक अनुवाद केला. शहाणा नाथन आणि स्थानिक स्वराज्यव्यवस्था हे त्यांचे आणखी दोन अनुवादित ग्रंथ. त्यांची व्याख्यानेही ग्रंथरूपाने पुढे प्रसिद्ध झाली. आईबापाची मर्जी राखण्याकरिता त्यांना सतत सतावणाऱ्या मूळव्याधीचे ऑपरेशन करण्यास त्यांनी नकार दिला व त्यातच त्यांचा मृत्यू १ सप्टेंबर १८९३ झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
        *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ रविवार ~01/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment