"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

1/12/24 रविवारचा परिपाठ

Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *01. डिसेंबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक अमावस्या, नक्षत्र ~अनुराधा,
योग ~सुकर्मा, करण ~नाग,
सूर्योदय-06:55, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

01. *पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

01. *अंग पेक्षा बोंगा मोठा*
             *★अर्थ ::~*
वस्तुस्थितीपेक्षा तेच अवडंबरच मोठे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01.   *भावे हि विद्यते देव: ।*
    ⭐अर्थ :: ~ भाव तेथे देव आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 ★ 01. डिसेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक एडस प्रतिबंध दिन
★ हा या वर्षातील ३३५ वा (लीप वर्षातील ३३६ वा) दिवस आहे.
एन. सी. सी. दिन

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (कै.) इंदिरा गांधी यांना ’वूमन ऑफ द मिलेनियम’ म्हणून मानांकित करण्यात आले.
●१९८१ : AIDS विषाणूची प्रथमच ओळख पटली.
●१९६५ : भारताच्या सीमांच्या संरक्षणासाठी सीमा सुरक्षा दलाची (Border Security Force) स्थापना
●१९६३ : नागालँड भारताचे १६ वे राज्य बनले.
●१९४८ : एस. एस. आपटे यांनी ’हिन्दुस्तान समाचार’ ही बहुभाषिक वृत्तसंस्था स्थापन केली.
●१९१७ : बाबूराव पेंटर यांनी ’महाराष्ट्र फिल्म कंपनी’ची स्थापना केली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६३ : अर्जुना रणतुंगा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व व्यवस्थापक
◆१९५५ : उदित नारायण – पार्श्वगायक
◆१९०९ : बा. सी. मर्ढेकर – मराठी नवकाव्याचे प्रणेते
◆१८८५ : आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर – गांधीवादी देशभक्त, शिक्षणतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, 

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९० : विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी
●१९८८ : गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
●१९८५ : शंकर त्रिंबक तथा ’दादा’ धर्माधिकारी – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01.   *✸ महाराष्ट्र देशा ✸*
      ●●●●००००००●●●●
मंगल देशा,पवित्रा देशा,महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशानाजुक देशा,कोमल देशा, फुलांच्याहि देशाअंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशाबकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशाभाव भक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशाशाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशाध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी, वैभवासि, वैराग्यासीजरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा,महाराष्ट्र देशासह्याद्रीच्या सख्या,जिवलगा, महाराष्ट्र देशापाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषागोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषातुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांचीमंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांचीध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01.*❂ शारदे हवे तुझे वरदान ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
मानवतेची गावी गाणी,
अशी आम्हा दे जिवंत वाणी l
अन्यायाचे दर्शन होता,उसळो त्वेष उधान ll१ll
   *शारदे हवे तुझे वरदान*

स्वतंत्र भारतभूचे वैभव ,सामर्थ्याने नटलेले नव,
उच्छवासाचा प्रबंध व्हावा, गाता भारत गान ll२ll
*शारदे हवे*.......

मराठीयेची नगरी आम्ही शिल्पकार की रचनाप्रेमी
जीवन मंदीर उभवू सुंदर हा अमुचा
अभिमान ll३ll
*शारदे*..........

उकलायाला जीवनशास्त्रे,पहावया नव विक्रमक्षेत्रे
दिव्यदृष्टी दे करावयाला उन्नत जीवन मान ll४ll
*शारदे हवे*........

दिवंगतांच्या अतृप्त आशा,पूर्ण कराया अशी मनीषा,
भीष्मकामना निववाया दे,अर्जुन शर संधान ll५ll
*शारदे हवे*.......

नव्या युगाची नवीन सृष्टी नव्या मानवा दे नव दृष्टी
हवा शारदे नवा वीरंची नवचातुर्य निधानll६ll
*शारदे*........
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

01.  *❃❝ सम्राट आणि साधू ❞❃*
   ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   एक सम्राट रात्रीच्‍या वेळी राजधानीत फेरफटका मारीत असे आणि काय चालले आहे याचा आढावा घेत असे. फेरफटका मारत असताना सम्राटाला एक साधू जागा असलेला दिसायचा. त्‍याच्‍या कुटीत पाण्‍याचे मडके आणि दोन कपडयाशिवाय काहीच नव्‍हते तरी तो ‘’जागे रहा, झोपू नका, नाहीतर लुटले जाल’’ असा जोरजोरात आवाज देत असायचा. सम्राटाला वाटले हा साधू वेडा आहे मात्र त्‍याच्‍याशी एकदा बोलायला हवे. सम्राटाने एके दिवशी त्‍याला विचारले,तुमच्‍याकडे धनदौलत, गाडीघोडा, संपत्‍ती वगैरे काहीही नसतानासुद्धा तुम्‍ही इतके का जागता आणि सावधान राहता, साधू म्‍हणाला, राजा, आपण आपल्‍या महालात जो कचरा जमा केला आहे की, तो जर लुटला गेला तर काही फरक पडणार नाही, कारण आपण तो परत मिळवू शकता, परंतु या माझ्याकडे जे धन आहे ते लुटले गेले तर ते परत मिळणार नाही.त्‍यामुळे मी सदैव सावध राहतो. राजा म्‍हणाला, माझ्याकडे असलेल्‍या हत्ती घोडे, हिरे दागिने, सोने चांदी याला तुम्‍ही कचरा समजत आहात, साधूने उत्तर दिले, ज्‍याला आपण अमूल्‍य समजत आहात ते धन, संपत्ती, हत्तीघोडे, राजवाडा कोणीही तुमच्‍याकडून हिसकावून घेऊ शकते पण माझी संपत्ती ही ईश्र्वरदत्त आहे. त्‍यामुळे मी स्‍वतला सावधान करतो, माझ्या मनात मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना, भय, अहंकार यांचा प्रवेश होऊ नये, अर्थात माझे मन हे ईश्‍वराने दिल्‍या प्रमाणे, लहान बालकाप्रमाणे कोरे असावे. या मानवी दुर्गुणांचा स्‍पर्श जर माझ्या मनाला झाला तर माझे कर्म बिघडेल आणि माझ्याकडून पाप घडेल. म्‍हणून मी रात्री स्‍वतलाच सांगत असतो नव्‍हे माझ्या आत्‍म्याला सांगत असतो झोपू नको, तू झोपलास तर हे विषय तुझ्यावर आक्रमण करतील व तुला गिळंकृत करतील. साधुचे ते विचार ऐकून राजा त्‍याचे चरणी लीन झाला व साधुला गुरुस्‍थान दिले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  मोह, लोभ, मद, मत्‍सर, क्रोध, वासना,भय,अहंकार यांची संगत न घेता जर जीवन जगण्‍याचा प्रयत्‍न केला तर जीवन सुखकर होते. वाईटापासून आपले संरक्षण होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01.  *ना कुणाशी स्पर्धा असावी*  
*ना कुणाचा द्वेष असावा,* 
*ना कुणाच्या पुढे* 
          *जाण्याची आकांक्षा असावी,*
*ना कुणाला कमी* *लेखण्याची गुर्मी असावी,*
      *फक्त स्वतःला सिद्ध करण्याची* 
*जिद्द असावी...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

01. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ भारतातील सर्वांत मोठे संग्रहालय कोणते ?
➜ इंडियन म्युझियम.( कोलकाता )

✪  पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा करतात ?
➜ तामिळनाडू.

✪  देशातील पहिला निर्मल जिल्हा कोणता आहे ?
➜ कोल्हापूर.

✪ सागरी संपत्ती असलेल्या थोरियमचा उपयोग कुठे केला जातो ?
➜ अणूऊर्जा निर्मिती.

✪ २०१६ - १७ मध्ये कोणत्या संघाने दुलिप ट्राफी क्रिकेट स्पर्धा जिंकली होती ?
➜इंडिया ब्ल्यू .

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

01. ❒ ’काकासाहेब’ कालेलकर ❒ 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १ डिसेंबर १८८५ -
       सातारा, महाराष्ट्र
●मृत्यू :~ २१  ऑगस्ट १९८१

०आचार्य दत्तात्रय बाळकृष्ण तथा ’काकासाहेब’ कालेलकर

   गांधीवादी देशभक्त, शिक्षतज्ञ, समाजसुधारक, इतिहासकार, बहुभाषा कोविद, रसिक, सखोल चिंतक, गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरू (१९२८), राज्यसभा सदस्य (१९५२ - १९५८), अनुसूचित जमातींच्या आयोगाचे अध्यक्ष (१९५३), गुजराथी साहित्यपरिषदेच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष (१९५९), हिन्दी विश्वकोश निर्मिती समितीचे सदस्य, साहित्य अकादमी पारितोषिक (१९६६) व फेलोशिप (१९७१) विजेते, पत्रकार व गुजराथी साहित्यिक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁रविवार ~ 01/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment