*01/11/24 शुक्रवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *01. नोव्हेंबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन अमावस्या, नक्षत्र ~स्वाती,
योग ~प्रीति, करण ~नाग,
सूर्योदय-06:39, सूर्यास्त-18:04,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
01. *सर्वच प्रश्न सोडवून सुटत नसतात, काही प्रश्न सोडून दिले की सुटतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
01. *मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये -*
★ अर्थ ::~ एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
01. *प्रज्ञा नाम बलं ह्येव निष्प्रज्ञस्य बलेन किम् ।*
⭐अर्थ ::~
प्रज्ञा हेच खरे बळ आहे. प्रज्ञाहीन माणसाला बळाचा काय उपयोग ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 01. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक शाकाहारी दिन
★हा या वर्षातील ३०५ वा (लीप वर्षातील ३०६ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९७३ : ‘मैसूर‘ राज्याचे नाव बदलुन ते ‘कर्नाटक‘ असे करण्यात आले.
●१९५६ : भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र हे राज्य अस्तित्त्वात आले. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
●१९५६ : दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.
●१९५६ : केरळ राज्य स्थापना दिन
●१८४५ : ’ग्रँट मेडीकल कॉलेज’ हे भारतातले पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा, मुंबई येथे सुरू झाले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७४ : वी. वी. एस. लक्ष्मण – क्रिकेटपटू
◆१९७३ : ऐश्वर्या राय – अभिनेत्री
◆१९४० : रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५ वे सरन्यायाधीश
◆१९२१ : शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार
◆१८९३ : इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : कॉम्रेड दत्ता देशमुख – शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते
●१९९३ : नैनोदेवी – ठुमरी, दादरा व गझल गायिका
●१९९१ : *अरुण पौडवाल –* संगीतकार व संगीत संयोजक
●१८७३ : दीनबंधू मित्र – बंगाली नाटककार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
01. *✸ चिरविजयाचे वारस आम्ही*
●●●●●००००००●●●●●
चिरविजयाचे वारस आम्ही
कर्तव्याचे पुजक आम्ही
चिरविजयाचे वारस आम्ही॥धृ॥
व्यक्ति सुखाचे पाश तोडुनी ध्येयपथावर युवक चालले
अविरत अमुच्या तपस्येतुनी संघटनेचे तत्व उदेले
संघटनेचे सेवक आम्ही॥१॥
समाजसेवा ब्रीद आमुचे स्वार्थ सुखाची आस नसे
थोर कारणी देह वहावा एक मात्र हा ध्यास असे
ध्येय पथावर सैनिक आम्ही॥२॥
खडतर असले वाण घेतले स्वेच्छेने तर आम्ही आमुच्या
या भूमीचे भाग्य अखेरी प्रयत्नातुनी घडेल आमुच्या
पराक्रमाचे पाइक आम्ही॥३॥
तमा न आम्हा कळिकाळाची केवळ अमुचे कार्य करु
कर्तव्याचे पूजक आम्ही ध्येयास्तव या जगू मरु
चिरविजयाचे वारस आम्ही॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
01. *✹नमन गणराज तुला✹*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
तू सुखकर्ता, सिद्धिविनायक
शुभकारक तू आम्हाला
विघ्नेश्वर तू भवतारक तू
प्रथम नमन गणराज तुला
कर्पूरगौरा, मंगलदायक
भक्तगणांना तू सुखकारक
सकल जनांच्या हरिसी चिंता
चिंतामणी जन म्हणती तुला
गौरीसुता, शिवशंकर तनया
विद्यापती तू करिसी किमया
श्रद्धेने जे धरिती पाया
देसी तयांना तुच लळा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
01. *❃ समाधान हेच खरे धन ❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एका श्रीमंत माणसाजवळ अमाप धन होते. तरीही त्याला समाधान नव्हते. एके दिवशी एक साधू त्या गावात आला. श्रीमंत माणसाने त्याची बरीच कीर्ती ऐकली. तो त्याच्याकडे गेला. आपली मनोव्यथा त्याला सांगितली. 'मला सात पिढय़ा पुरेल एवढी संपत्ती हवी आहे,' अशी मागणी त्याने त्या योगी पुरुषाकडे केली. त्या संत पुरुषाने श्रीमंत माणसाला आपादमस्तक न्याहाळले व ते म्हणाले, 'तुझ्या घराजवळ एक झोपडे आहे. त्यात एक म्हातारी राहते. त्या म्हातारीला पुरेल एवढा शिधा फक्त तू नेऊन दे. तुझ्या संपत्तीत पाहिजे तेवढी वाढ होईल.
दुसर्या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस त्या झोपडीत गेला व म्हातारीला म्हणाला, 'तुझ्यासाठी मी पीठ, साखर, डाळ, तूप अशा वस्तू आणल्या आहेत. त्यांचा स्वीकार व्हावा.' म्हातारीने नम्रतापूर्वक उत्तर दिले, 'आज खाण्यासाठी पुरेल एवढी सामग्री आमच्याकडे आहे. त्यामुळे तू देत असलेल्या खाद्य वस्तूंची आम्हाला गरज नाही.' मग आपण उद्यासाठी म्हणून त्याचा स्वीकार करावा.' श्रीमंत माणूस उद्गारला, 'अंगण साफ करणारी म्हातारीची सून उद्गारली, 'आम्ही कोणत्याही गोष्टीचा संग्रह करून ठेवत नाही. उद्याची आम्हाला काळजी नसते. आमचे रोजचे जेवण आम्हाला व्यवस्थित मिळत राहते.' ते ऐकून श्रीमंत माणूस चकित झाला. 'उद्याची काळजी न करणारे हे लोक कोठे आणि सात पिढय़ांची काळजी करणारा मी कोठे?' असा विचार त्याच्या मनात आला. संतोष व समाधान हेच खरे धन, ही दृष्टी त्याला मिळाली.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
जीवनात संतोष व समाधान हेच खरे धन आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
01. माणूस कितीही गरीब असला तरी त्याच्याबरोबर
*भेद भाव करू नका*
*कारण*त्याचा काळ आणि वेळ ⏰ कधी बदलेल हे कोणीही ☝ सांगू शकत नाही*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
1. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ महाराष्ट्रात सध्या किती माळढोक पक्षी आहेत ?
➜ केवळ एक.
✪ इलेक्ट्रिक वाहने,मोबाईल अशा उपकरणांच्या बॅटरी तयार करण्यासाठी कशाचा वापर करण्यात येतो ?
➜ लिथियम.
✪ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात शतक ठोकणारा पहिला भारतीय कर्णधार कोण ठरला आहे ?
➜ रोहीत शर्मा.
✪ संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस कोण आहेत ?
➜ ॲटोनियो गुटेरेस.
✪ १५०० एकराचे जंगल शाबूत ठेवण्यासाठी पेटून उठलेल्या मध्यप्रदेश राज्यातील महिलेचे नाव काय आहे ?
➜ उजीयारो केवटीया,समनापूर जि.डींडोरी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
01. *❒ ♦अरुण पौडवाल ♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●मृत्यू :~ १ नोव्हेंबर १९९१
*अश्विनी ये ना !-----* प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी ग असे सुंदर गाणे संगीतबद्ध करणाऱ्या
एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचं गारुड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली. मराठी चित्रपटसृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. अनिल मोहिले आणि अरुण पौंडवाल या जोडगोळीने यानंतरही अनेक अप्रतिम गाणी दिली. कोणताही वाद्यवृंद कार्यक्रम संगीतकार अनिल-अरुण या जोडीच्या गीतांच्या सादरीकरणा शिवाय पूर्णच होत नाही.
शब्द सूरांवर जबरदस्त हुकुमत असलेल्या या संगीतकार जोडीने अनेक हिट गाणी दिली आहेत. निर्माते शरद व सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटातील अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वच गीतांनी गोल्डन व सिल्व्हर ज्युबली साजरी केली आहे. वसंत देशपांडे यांनी गायलेल्या ‘प्रथम तुला वंदितो’, आशा भोसले यांच्या ‘या रावजी बसा भावजी’ व सचिन पिळगावकर यांच्या बेबी डान्स बेबी या गीतांनीही चांगलीच दाद मिळवली होती. ‘नाव मोठ लक्षणं खोटं’ ‘अरे संसार संसार’, ‘गंमत जंमत’, ‘धूमधडाका’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘भुताचा भाऊ’, ‘अशी ही बनवा बनवी’ यातील सर्वच गीते आजही रसिकांच्या मनावर रुंजी घालतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁शुक्रवार~1/11/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment