"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*02/02/19 शनिवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

  *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 02/02/2019 ❁*
      *🔘 वार ~ शनिवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *02. फेब्रुवारी:: शनिवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             पौष कृ. १३
     तिथी : कृष्ण पक्ष त्रयोदशी,
          नक्षत्र : पूर्वआषाढा,
        योग : हर्शन, करण : गर,
सूर्योदय : 07:12, सूर्यास्त : 18:32,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

02. *कविता म्हणजे भावनांचं चित्र!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

02. *आजा मेला नातू झाला*
      *★ अर्थ ::~*  एका हानीबरोबर दुसऱ्या गोष्टीचा फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

02. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी ।
   ⭐अर्थ ::~ आई आणि जन्मभूमी या स्वर्गाहूनही श्रेष्ठ आहेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *02. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक पाणथळ भूमी दिन
★हा या वर्षातील ३३ वा दिवस आहे.
★World Wetland Day

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७१ : इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर *’जागतिक पाणथळ भूमी दिन’* म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
●१९३३ : अ‍ॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७९ : शमिता शेट्टी – अभिनेत्री
◆१८८४ : डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. ’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय.
◆१८५६ : स्वामी श्रद्धानंद – स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षण महर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता
●१९३० : वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार.
●१९१७ : महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे स्‍नेही आणि विख्यात वैद्य यांनी देहत्याग केला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. *✹अजिंक्य भारतमाता ✹*
        ●●●●●००००००●●●●●
दिशादिशांतुन कोटि मुखांतुन निनाद एकच आता
अजिंक्य आमुची भारतमाता जय जय भारतमाता॥धृ॥

इथे जान्हवी नित्य वहाते घेउन अमृतधारा
इथे झुळझुळे मलयगिरीचा शीतल गंधित वारा
धवल हिमालय या भूमीचा जगात उन्नत माथा॥१॥

इथे जन्मले राम दाविण्या कर्तव्याचा पंथ
कृष्ण सांगती धनंजयाला अमोल गीताग्रंथ
वेदामधुनी इथे वाहती ज्ञानसुधेच्या सरिता॥२॥

बालशिवाही इथे न झुकवी अधमापुढती मान
प्रतापराणा रणराणीचा असे अम्हा अभिमान
इतिहासातुन इथे रंगते पुरुषार्थाची गाथा॥३॥

मानवतेची चाड अम्हांपरि दानवतेची चीड
सत्यासाठी मनी न कधिही धरु भीति वा भीड
प्राणदीप हा विझवू हासत आम्ही देशाकरिता॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

02. *❂ देशकार्यि विरमु दे ❂*
      ==••◆◆●★●◆◆••==
अमूर्त मूर्त मूर्तिमंत तुजसमान होऊ दे
येत शरण तव पदांसि देशकार्यि विरमु दे॥

उमलतिल ह्या कळया हळूहळूंचि पाकळ्या
तत् सुगंध तुजसमान सर्वदूर पसरु दे॥१॥

पुष्पफले नको आम्हासि अर्पु दे तुझ्या पदांसि
स्वार्थाचे होमहवन तुजपुढेचि होउ दे॥२॥

आम्हासि तूच ध्येय देव सेवु धरुनि भक्तिभाव
पूजने तुझ्या आम्हास देवरुप होउ दे॥३॥

अससि भव्यदिव्य दीप तेज तुझे असे अमूप
ज्योत तीच आमुच्याही ह्रदयांतरि उजळु दे॥४॥

करुनिया तुझ्यासमान होउ देच वर्धमान
देश धर्म संस्कृतिचे संरक्षणचि होउ दे॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

02.  *❃ यशाचे गमक ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एका गावामध्ये एक खूप श्रीमंत शेतकरी होता. त्यांचाकडे खूप पैसा होता पण,त्याची पाच मुले ही खूप आळशी होती .कोणतेच परिश्रम करण्याची त्यांची ईच्छा नव्हती. या गोष्टीचा त्या श्रीमंत शेतकऱ्यांला मोठा विचार पडायचा की माझ्या म्रुत्यू नंतर ही माझी मुले काहीच करणार नाही सर्व सम्पत्ति फुकट जाईल,म्हणून त्या शेतकऱ्यांनी सर्व मुलांना बोलावले व सांगितले कि मी गावाला जात आहे तेंव्हा तुम्ही सर्व शेतं खोदून शेतात आपल्या पूर्वजांनी सोने ठेवले आहे .ते सर्व सोने तुम्ही काढून सर्व वाटून घ्या मी वापस ये पर्यंत हे कार्य पूर्ण करा .शेतकरी गावाला गेल्यानंतर सर्व मुलांनी पूर्ण शेतं खोदले त्यांना कुठे सोने दिसले नाही पण ,शेतं पूर्ण खोदले व पाऊस सूध्हा भरपूर पडला तेंव्हा सर्वानी शेतांमध्ये धान पेरले व चांगले उत्पन्न सुध्हा निघाले .त्यांनी ते धान मार्केट ला विकून खूप धन जमवले शेतकरी वापस आला तेंव्हा सर्व हकीगत त्या मुलांनी सांगितली तेंव्हा शेतकरी खूप खुश झाला व म्हणाला हेच खरे धन.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   खूप मेहनतीने व कष्टाने कोणतेही कार्य केले तर यश नक्कीच मिळते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

02.     घर सुटतं पण आठवन
   कधीच सुटत नाही....
      जीवनात ""आई"" नावाचं पान कधीच मिटत नाही...!!
      सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात....
     शेवटच्या श्वासाबरोबर आई हेच शब्द राहतात...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

02. *महाराष्ट्र : महत्त्वाची शिखरे.*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
        _शिखर~उंची~ जिल्हा_
०१) कळसुबाई~१६४६~अहमदनगर
०२) साल्हेर~ १५६७~ नाशिक
०३) महाबळेश्वर~ १४३८~ सातारा
०४) हरिश्चंद्रगड~१४२४~अहमदनगर
०५) सप्तश्रुंगी~१४१६~ नाशिक
०६) तोरणा~ १४०४~ पुणे
०७) अस्तंभा~ १३२५~ नंदुरबार
०८) त्र्यंबकेश्वर~ १३०४~ नाशिक
०९) तौला~ १२३१~ नाशिक
१०) वैराट~ ११७७~ अमरावती
११) चिखलदरा~ १११५~ अमरावती
१२) हनुमान~ १०६३~ धुळे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
 ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02. *❒ समर्थ रामदास स्वामी ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ एप्रिल १६०८
जांब, जालना, महाराष्ट्र
●मृत्यू :~ २ फेबुवारी १६८१
सज्जनगड, सातारा, महाराष्ट्र

◆पंथ ~ समर्थ संप्रदाय
◆साहित्यरचना ~ दासबोध , मनाचे श्लोक, करुणाष्टके ,आत्माराम, अनेक स्फुट रचना
◆भाषा ~ मराठी
◆कार्य भक्ती ~शक्तीचा प्रसार, ◆जनजागृती ~ समर्थ-संप्रदाय व मठांची स्थापना
◆वडील ~ सूर्याजी ठोसर
◆आई ~ राणूबाई
◆प्रसिद्ध वचन ~ "जय जय रघुवीर समर्थ"
◆तीर्थक्षेत्रे ~ सज्जनगड, शिवथर घळ

    रामदासाचा जन्म मराठवाड्यातील जांब ह्या लहानश्या गावचा. मूळचे नाव नारायण सूर्याजी ठोसर. सिद्धपुरुष म्हणून लोक ‘समर्थ रामदास’ म्हणतात. त्यांनी महाराष्ट्रात राम, हनुमान ह्यांची मंदिरे काढली. राजकारण, धर्मकारण जाणीवपुर्वक अंतर्भुत करणारे रामदास हे एकमेव महाराष्ट्रीय संत होय. करुणाष्टके, मनाचे श्लोक, सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ही त्यांची महाराष्ट्रात घरोघरी म्हटली जाणारी आरती.
    समर्थांनी पूर्वसूचना देऊन माघ वद्य शके सोळाशे तीन सन १६८१ रोजी देह ठेवला. हीच दासनवमी होय. दास बोधाचे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म, श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वतः अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणाऱ्या (आजही मार्गदर्शक ठरणाऱ्या) समर्थांनी शके १५७१ च्या वैशाखात समर्थांनी शिवाजी महाराजांना अनुग्रह दिला. महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढे सज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजी महाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१)  समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ शनिवार ~ 02/02/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment