"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*02/03/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *02. मार्च:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
माघ कृ.6, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~षष्ठी, नक्षत्र ~विशाखा,
योग ~व्याघात, करण ~वणिज,
सूर्योदय-07:12, सूर्यास्त-18:31,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

02. *मरण हे अपरिहार्य आहे त्याला भिऊ नका.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

02. *ज्या गावच्या बोरी, त्याच गावच्या बाभळी*
      *★ अर्थ ::~*
- एकाच गावातील लोक एकमेकाना चांगले ओळखतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]     ■ विशेष ■*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

★०१/०३/२०१९: भारतीय जाबाज विंग कमांडर *"अभिनंदन वर्तमान"* दोन दिवसानंतर (५६ घंटे नंतर ) पाकिस्तानमधून भारतात परत..
*जय हिंद.. वंदे मातरम..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★02. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ६१ वा (लीप वर्षातील ६२ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : मध्य अफगाणिस्तानातील बामिया शहराजवळ प्राचीन आणि अमूल्य ठेवा असलेल्या सुमारे ६,००० बुद्ध मूर्ती धर्मबाह्य ठरवून मूलतत्त्ववादी तालिबानने उखळी तोफा आणि रणगाड्यांच्या साहाय्याने उद्‍ध्वस्त करण्यास सुरूवात केली.
●१९७८ : स्वित्झर्लंडमधील दफनभूमीतुन चार्ली चॅप्लिनची शवपेटिका चोरीला गेली.
●१९५२ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सिंद्री येथील खत कारखान्याचे उद्‍घाटन
●१८५७ : जे. जे. स्कूल ऑफ आर्टस सुरू झाले

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३१ : राम शेवाळकर – मराठी साहित्यिक (मृत्यू: ३ मे २००९)
◆१९३१ : मिखाईल गोर्बाचेव्ह – सोविएत संघाचे शेवटचे अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते
◆१९२५ : शांता जोग – चित्रपट  रंगभूमीवरील अभिनेत्री
◆१७४२ : विश्वासराव – पानिपतच्या र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : पं. श्रीपादशास्त्री जेरे – धर्म व अध्यात्माचे गाढे अभ्यासक, करवीरभूषण, वेदशास्त्रसंपन्न
●१९८६ : डॉ. काशिनाथ घाणेकर – मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते
●१९४९ : *सरोजिनी नायडू* –प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी,
●१७०० : मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज यांचे सिंहगडावर निधन
●१५६८ : मीरा रत्‍नसिंह राठोड ऊर्फ संत मीराबाई
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. ✸आला किनारा आला किनारा
          ●●●●●००००००●●●●●
आला किनारा, आला किनारा
निनादें नभीं नाविकांनो इशारा

उद्दाम दर्यामधे वादळी
जहाजे शिडावून ही घातली
जुमानीत ना पामरांचा हकारा

प्रकाशें दिव्यांची पहा माळ ती
शलाका निळ्या-लाल हिंदोळती
तमाला जणु अग्‍नीचा ये फुलोरा

जयांनी दलें येथ हाकारली
क्षणासाठी या जीवनें जाळली
सुखेनैव स्वीकारुनी शूल-कारा

तयांच्या स्मृती गौरवे वंदुनी
उभे अंतीच्या संगरा राहुनी
किनार्‍यास झेंडे जयाचे उभारा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

02. *❂ अनंता तुला कोण पाहु ❂*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अनंता तुला कोण पाहू शके ?
तुला गातसा वेद झाले मुके.
मतीमंद अंधा कसा तू दिसे ?
तुझी रूपतृष्णा मनाला असे.

तुझा ठाव कोठे कळेना जरी,
गमे मानसा चातुरी माधुरी.
तरूवल्लरींना भुकी मी पुसे,
"तुम्हा निर्मिता देव कोठे वसे ?"

फुले सृष्टीची मानसा रंजिती,
घरी सोयरी गुंगविती मती,
सुखे भिन्‍न ही, येथ प्राणी चुके
कुठे चिन्मया ऐक्य लाभू शके ?

तुझे विश्व ब्रह्मांड, ही निस्तुला
कृती गावया रे कळेना मला.
भुकी बालका माय देवा चुके,
तया पाजुनी कोण तोषू शके ?

नवी भावपुष्पे तुला वाहिली,
तशी अर्पिली भक्तिबाष्पांजली
तुझ्या पद्मपत्रावरी ती स्थिरो
प्रभू ! कल्पना जल्पना त्या हरो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

02. *❃ फसवे बाह्यरूप ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एका रानातल्या खडकावर दोन घोरपडी उन्ह खात बसल्या असता त्यापैकी एकजण दुसरीस म्हणाली, 'आमची स्थिती मोठी शोचनीय आहे ! आम्ही फक्त जिवंत आहोत एवढंच, बाकी सगळ्या जगात आमच्याकडे कोणी ढुंकूनही बघत नाही.

     आमच्या क्षुद्रतेचा धिक्कार असो ! यापेक्षा रानातल्या वार्‍यासारख्या उड्या मारणार्‍या हरणाचा जन्म मिळाला असता तर काय मजा आली असती !' हे बोलत असताच एक हरिणामागे लागलेल्या शिकारी कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला व धावून थकलेल्या हरणाचा जीव कुत्र्याने घेतलेला तिने प्रत्यक्ष पाहिला.

    त्यावेळी दुसरी घोरपड आपल्या स्थितीविषयी कुरकुरणार्‍या पहिल्या घोरपडीला म्हणाली, 'ज्या हरणाचं जीवन आपल्याला मिळावं अशी इच्छा तू करीत होतीस त्या हरणाची स्थिती किती भयंकर आहे, हे आता प्रत्यक्षच पाहा अन् ज्या मोठेपणाबरोबर अनेक दुःखही भोगावी लागतात तो मोठेपणा देवाने आपणास दिला नाही याबद्दल त्याचे आभार मान !'

         *_🌀तात्पर्य_ ::~*
  *बाह्य रूपावर जाऊन फसू नये, कारण त्याच्या अंतर्यामी दुःख असण्याचीच शक्यता असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

02. *माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर नसते...!*
तर ते चांगल्या विचारावर असते..!
कारण आधार कायम सोबत नसतो...
   *पण चांगले विचार कायम बरोबर राहतात...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

02. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  भारतीय रेल्वेनंतर दुस-या क्रमांकाची सर्वांधिक कर्मचारी असणारी कंपनी कोणती ?
➜ कोल इंडिया.

✪  भारताने चिनुक हेलिकॉप्टर कोणत्या देशाकडून विकत घेतले ?
➜ अमेरिका.

✪ प्रसिद्ध शालिमार बाग ( गार्डन ) कोणत्या राज्यात आहे ?
➜ जम्मू - काश्मीर.

✪ 'माणदेशी माणसं' हा कथासंग्रह कोणत्या लेखकाचा आहे ?
➜ व्यंकटेश माडगूळकर.

✪  दहीमध्ये कोणते आम्ल असतें ?
➜ लॅक्टिक आम्ल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

02. *❒श्रीमती सरोजिनी नायडू❒*
      ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
🔹जन्म :~ १३ फेब्रुवारी १८७९
         हैद्राबाद, आंध्र प्रदेश
*🔸मृत्यू :~ २ मार्च १९४९*
      अलाहाबाद, उत्तर प्रदेश, भारत

    🔹उत्तर प्रदेशचे राज्यपाल
             🔸कार्यकाळ
【इ.स. १९४७ – इ.स. १९४९】

             *💥सरोजिनी नायडू*
   ♦भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्त्यां, प्रभावी वक्त्त्या व कवयित्री. सरोजिनींच्या आई वरदासुंदरीदेवी मूळच्या बंगालच्याच. त्या बंगालीमध्ये कविता करीत. सरोजिनींवर अशा सुसंस्कृत पालकांचे संस्कार लहानपणीच झाले. यांतून त्यांचे कविमन घडले आणि लहानपणीच त्यांना कविता रचण्याचा छंद जडला व स्फूर्ती मिळाली. निजामाची छात्रवृत्ती घेऊन पुढे त्या इंग्लंडला उच्च शिक्षणासाठी गेल्या (१८९५). लंडन आणि केंब्रिज येथे थोडे शिक्षण घेतल्यानंतर प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून इटली पाहून त्या मायदेशी परतल्या; पण या वास्तव्यात त्यांचा एडमंड गॉस या इंग्रज साहित्य समीक्षकाशी चांगला परिचय झाला. त्यांनी आपल्या काही कविता त्यास दाखविल्या आणि पुढील काव्यलेखनात गॉस यांचे त्यांस चांगलेच मार्गदर्शन लाभले. द गोल्डन थ्रेशोल्ड (१९०५) या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहास गॉसनी प्रस्तावना लिहिली आणि हा काव्यसंग्रह त्या वेळच्या साहित्यक्षेत्रात चांगलाच गाजला. त्याला वृत्तपत्रांतून यथोचित प्रतिसाद मिळाला. रवींद्रनाथ टागोरांनीही सरोजिनींचे कौतुक केले.
   
     🔶सरोजिनींनी द गोल्डन थ्रेशोल्डनंतर द बर्ड ऑफ टाइम (१९१२) व द ब्रोकन विंग (१९१७) हे काव्यसंग्रह प्रसिद्ध केले. हिंदी महिलेने सुरेख इंग्रजीत लिहिलेल्या या कविता स्वरमाधुर्य, राष्ट्रीय दृष्टिकोण, प्रेमाचा पुरस्कार व क्रांतिकारक राष्ट्रवादी विचार इ. वैशिष्ट्यांनी लोकप्रिय झाल्या. पाश्चात्त्य तसेच पौर्वात्त्य देशांत त्यांस कीर्ती लाभली आणि कवयित्री म्हणून त्यांचा नावलौकिक वाढला. *‘भारतीय कोकिळा’* म्हणून त्यांचा सर्वत्र उल्लेख होऊ लागला. मात्र त्यांच्या गीतरचनेचा सूर एलियटच्या नव्या काव्यप्रवाहाशी जुळला नाही व ती थांबली.

    ♦त्यानंतर सरोजिनी नायडू देशसेवा, समाजसेवा इत्यादी गोष्टींकडे वळल्या. याचे दुसरेही कारण असे होते की, १९०३ ते १९१७ च्या दरम्यान त्यांचा {मोहंमद अली जिना] गोपाळ कृष्ण गोखले, रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, ॲनी बेझंट, सी. पी. रामस्वामी अय्यर, जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी अशा एक एक श्रेष्ठ आणि ज्येष्ठ व्यक्तींशी या ना त्या निमित्ताने परिचय झाला. या व्यक्तींच्या विचारा आचारांकडे त्या आकृष्ट झाल्या. त्यांनी होमरूल लीगसाठी ॲनी बेझंट आणि सी. पी. रामस्वामी अय्यर यांच्या बरोबर हिंदुस्थानभर दौरा काढला. आपल्या भाषणांतून त्यांनी तरुणांचे कल्याण, श्रमप्रतिष्ठा, स्त्रीस्वातंत्र्य व राष्ट्रवाद यांचा पुरस्कार केला. सरोजिनी नायडूंनी गोखल्यांना गुरुस्थानी मानले आणि महात्मा गांधींचे नेतृत्व पूर्णतः स्वीकारले.

     🔷हैदराबाद येथील प्लेगच्या साथीत त्यांनी फार परिश्रम घेऊन जनतेला सर्वतोपरी मदत केली. त्याबद्दल त्यांना "कैसर– इ– हिंद" हे सुवर्णपदक देण्यात आले; पण ते त्यांनी जालियनवाला बाग येथील हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारला हत्याकांडाच्या निषेधार्थ परत केले. रौलट कायदा, माँटेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार वगैरे विविध चळवळींत त्यांनी काँग्रेसच्या ध्येयधोरणांनुसार प्रसार आणि प्रचार केला, मोहिमा काढल्या आणि गांधींच्या असहकार चळवळीत हिरिरीने भाग घेतला. सरोजिनींनी हिंदु मुसलमान ऐक्य व स्त्रियांचे पुरुषांच्या बरोबरीने काम करण्याचे हक्क आणि स्वातंत्र्य हेच आपले जीवनकार्य मानले. होमरूल लीगच्या निमित्ताने त्यांनी देशभर असंख्य व्याख्याने दिली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शनिवार~02/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment