"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*02/04/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/keEtnB
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🟢🔵🟣
🍥 *02. एप्रिल:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन कृ.8, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~पूर्वाषाढा,
योग ~परिघ, करण ~बालव,
सूर्योदय-06:32, सूर्यास्त-18:52,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

02. *प्रार्थना म्हणजे मनाचं स्थान.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02.   *वरातीमागून घोडे –*
  ★ अर्थ ::~ एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02.  *विनयात् याति पात्रताम् ।*
   ⭐अर्थ :: ~ नम्रतेमुळे पात्रता येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 *★02. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक स्वमग्नता जनजागृती दिवस
★ हा या वर्षातील ९२ वा (लीप वर्षातील ९३ वा) दिवस आहे.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : क्रिकेट विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा २८ वर्षांच्या कालखंडानंतर विजय
●१९९० : स्मॉल इन्डस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (SIDBI) ची स्थापना
●१९८४ : सोयुझ टी-११ या अंतराळयानातुन राकेश शर्मा या पहिल्या भारतीय अंतराळवीराने उड्डाण केले. तो ७ दिवस २१ तास व ४० मिनिटे अवकाशात होता.
●१८७० : गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ यांच्या प्रेरणेने पुणे सार्वजनिक सभेची स्थापना झाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४४ : अजय देवगण – अभिनेता
◆१९२६ : सूर्यकांत रामचंद्र खांडेकर – कवी व गीतकार
◆१८९८ : हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय – हिन्दी चित्रपटांतील प्रसिद्ध चरित्र अभिनेते. ते कवी (इंग्रजी), नाटककार, संगीतज्ञही होते. खासदार होते. कमलादेवी चट्टोपाध्याय यांचे पती व सरोजिनी नायडू यांचे बंधू होत.

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९२ : आगाजान बेग ऊर्फ आगा – आपल्या निखळ विनोदानी रसिकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते
●१९३३ : के. एस. रणजितसिंहजी – कसोटी क्रिकेट खेळाडू व महाराजा, यांच्या स्मरणार्थ १९३४ पासून ’रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा’ खेळल्या जातात.
●१८७२ : सॅम्युअल मोर्स – ’मोर्स कोड व तारायंत्राचे जनक आणि चित्रकार
●१७२० : *बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. *✸ "सारे जहाँ से अच्छा" ✸*
      ●●●●●००००००●●●●●
सारे जहाँ से अच्छा
हिंदुस्तान हमारा
हम बुलबुलें हैं उसकी
वो गुलसिताँ हमारा।
परबत वो सबसे ऊँचा
हमसाया आसमाँ का
वो संतरी हमारा
वो पासबाँ हमारा।

गोदी में खेलती हैं
जिसकी हज़ारों नदियाँ
गुलशन है जिनके दम से
रश्क-ए-जिनाँ हमारा।

मज़हब नहीं सिखाता
आपस में बैर रखना
हिंदी हैं हम वतन है
हिंदुस्तान हमारा।
                 - मुहम्मद इक़बाल
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. *❂ गगनसदन तेजोमय ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
गगनसदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जगजीवन जनन-मरण
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकलशरण मनमोहन
सृजन तूच, तूच विलय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02.  *❃❝ लढा पडा घडा..!! ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    अनेक उमद्या तरूणांच्या प्रयत्नांना बाधा पोहचविण्याचं काम ही मंडळी करत असतात. आयुष्याची दिशा ही स्वतः ठरवायची असते आणि त्या दिशेने स्वतःशी प्रामाणिक राहून वाटचाल करायची असते. मी जे करत आहे ते योग्य व विधायक आहे, नियमांना धरून आणि लोकांच्या कल्याणासाठी आहे असं स्वतःच्या मनाला पटलं की ते स्विकारायचं आणि पुढं जायचं.

       चुकीच्या कामाला चुकीचं म्हणणारी जशी माणसं आहेत तशी चांगल्या कामालासुद्धा वाईट घोषित करून त्याचा अपप्रचार करणारे महाभाग समाजात खूप आहेत. ते पदोपदी आढळतात. त्यांच्याशी वाद न घालता पुढे जायचं. आपलं काम करत रहायचं. कारण मूर्खांशी वाद घातला की ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणून सोडतात. आपल्या विरोधात उगीचच कोणी अपप्रचार करत असतील तर त्यांना अजिबात किंमत न देता साफ दुर्लक्ष करणं आणि आपणं अधिक वेगानं प्रगती करणं यापेक्षा चांगलं उत्तर नाही.
      रमेश घोलप शिक्षक असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला होता. 'वेड लागलंय त्याला, घर नाही रहायला आई बांगड्या भरत फिरते आणि ह्याला चांगली सरकारी नोकरी लागली तर त्याचा राजीनामा दिलाय....' असं बरचं काही काही म्हणत होते लोक तेंव्हा. ज्यावेळी मी आय. ए .एस. झालो तेंव्हा तेच लोक म्हणू लागले की " धाडस आणि स्वतःवरचा विश्वास काय असतो हे रमेश घोलप कडून शिका. सरकारी नोकरीचा राजीनामा देण्याची डेरींग केलती त्यानं. ठरवलं ते केलंच" म्हणजे असे असतात लोक. लोक काय म्हणतील याचा विचार केला असता तर आज मी आय. ए. एस. झालो नसतो. आयुष्यात स्वतःच्या क्षमता, आवड, स्वप्नं स्वतःला माहित असतात. त्यानुसार निर्णय घ्यायचे. लोक काहीही म्हणू द्या, स्वतःच्या प्रयत्नांनी तो निर्णय योग्य होता हे सिद्ध करून दाखवायचे. ज्यावेळी एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही असं लोक म्हणत असतात तेंव्हाच ती गोष्ट करून दाखविण्यात मजा असते.
   *"प्रयत्न सोडू नका, सडू नका.*
*लढत रहा, पडत रहा, घडत रहा..!"*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. *"सत्य सांगण्यासाठी कुणाच्याही, शपथेची गरज नसते...*
     
*नदीला वाहण्यासाठी कुठल्याही,*
    *रस्त्याची गरज नसते...*
       *जे आपल्या हिंमतीच्या,*
            *जोरावर जीवन जगतात...*
   *त्यांना ध्येयाकडे पोहचण्यासाठी,*
  *कुठल्याही रथाची गरज नसते"..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■ महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०

■ महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई

■ महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर

■ महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६

■ महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02. *❒ बाळाजी विश्वनाथ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    मराठी साम्राज्य अधिकारकाळ
(१७ नोव्हेंबर१७१३ - २ एप्रिल १७२०)

★पूर्ण नाव :~ बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख (पेशवे)
●जन्म :~ १६६२ (तारीख अनिश्चित)
            श्रीवर्धन, रायगड
*●मृत्यू :~ २ एप्रिल १७२०*
   सासवड, पुणे जिल्हा, महाराष्ट्र

       बाळाजी विश्वनाथ (भट) देशमुख  किंवा पेशवे बाळाजी विश्वनाथ हे मराठी साम्राज्याचे पहिले पेशवे पंतप्रधान होते.

     महादजी विसाजी देशमुख हा बाळाजीचा पणजोबा व भट घराण्याचा ज्ञात पुरुष. भट घराण्याकडे दंडाराजपुरी आणि श्रीवर्धन या परगण्यांची देशमुखी वंशपरंपरेने चालत आली होती. ही देशमुखी शके १४००पासून शके १६०० पर्यंत अव्याहत चालू होती असे इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात, तर रियासतकार ही देशमुखी १४७८ च्या सुमारास मिळाली असावी असे मानतात. तसेच बाळाजी विश्वनाथाचे वडील व आजोबा शिवाजीच्या सेवेत असावेत असेही रियासतकार म्हणातात. १५७५ च्या सुमारास महादजीकडे ही परंपरागत देशमुखी होती. महादजीस, नारो महादेव व परशुराम उर्फ शिवाजी अशी २ मुले. शिवाजीस ३ पुत्र कृष्णाजी, अंताजी व विश्वनाथ उर्फ विसाजी. विश्वनाथ हा बाळाजीचा पिता. बाळाजीला ४ भाऊ होते. कृष्णाजी, जानोजी, विठ्ठल व रुद्राजी.

     देशमुखीचे घराणे असल्याने बाळाजीस मोडी वाचन, हिशेब, संध्या-रुद्रादी कर्मे यांचे शिक्षण मिळाले. वयाच्या १०-१२व्या वर्षी बर्वे घराण्यातील ’राधाबाई’ हिच्याशीर त्यांचा विवाह झाला. इ.स. १६८९ च्या सुमारास म्हणाजे संभाजीच्या हत्येनंतर सिद्दीने उचल खाल्ली, त्यामुळे बाळाजीला श्रीवर्धन सोडावे लागले. त्यातच भट घराणे आंग्‍ऱ्यांना सामील आहे या संशयाने सिद्देने भट घराण्याचा छळ चालू केला. त्यांच्या "जानोजी" नावाच्या भावास सिद्दीने पोत्यात घालून समुद्रात बुडवल्याची कथा आहे. त्याच किंवा तशाच कारणास्तव पिढीजात देशमुखी सोडून "बाळाजी भट" हे "भानु" कुटुंबाबरोबर साताऱ्यास आले. सिद्दीच्या हशमांनी पाठलाग सुरू केल्यावर मुरूड येथील "वैशंपायन" कुटुंबाकडे त्यांनी काही आठवडे आश्रय घेतला. पुढे याची आठवण ठेवून एका "वैशंपायन" गुरुजींना त्यांनी आपले कुलोपाध्याय केले. शिवाय एक वैशंपायन १२०० स्वारांचे सरदार होऊन मध्यप्रदेशात ’सागर’ प्रांतात गेले असा उल्लेख मिळतो.

    बाळाजींबरोबर असलेल्या "भानु" कुटुंबात ३ भाऊ होते. "हरी महादेव, बाळाजी महादेव आणि रामजी महादेव." त्या पैकी "बाळाजी महादेव" हा "नाना फडणवीस" याचा आजा. (भट) देशमुख -फडणवीस-वैशंपायनांचे संबध हे ३ पिढ्या जुने होते. पुढे १७१९ मध्ये दिल्लीस गेलेल्या सैनिकांची मोगलांशी लढाई झाली त्यात "बाळाजी महादेव भानु" कामी आले. म्हणजे पेशव्याच्या हत्येचा प्रयत्न होणार हे कळल्यावर बाळाजी विश्वनाथाचा जीव वाचवायला बाळाजी महादेव त्याच्या पालखीत बसला आणि कटवाल्यांकडून मारला गेला. स्वामिनिष्ठेची ही पराकाष्ठाच होती.

     बाळाजी विश्वनाथ याने रामचंद्रपंत अमात्य यांच्याकडे कोठीवर कारकून म्हणून काम केले. त्यांची हुशारी धनाजी जाधव यांच्या नजरेस आली. धनाजीरावांनी आपले दिवाण म्हणून आपल्या सेवेस घेतले. याचवेळी ते त्या भागाचे महसूल अधिकारी झाले. दिल्लीचा पातशहा "अबु मुझफ़्फ़र मुहिउद्दीन मुहम्मद औरंगजेब आलमगीर गाझी" स्वतः अवघ्या सामर्थ्यासह महाराष्ट्रावर कोसळला होता. महाराष्ट्राचा छत्रपती संभाजी त्याने हाल-हाल करून मारला होता. अशाच अस्मामी-सुलतानी संकटाला स्वराज्य पडेल ती किंमत देऊन तोंड देत होते. संताजी-धनाजी, नेमाजी-खंडेराव हे गनिमी काव्याचे डाव टाकत मोठ्या मजला मारीत होते. बाळाजी विश्वनाथ फार जवळून सगळे अनुभवत होता. १७०५ च्या दरम्यान त्याने देखील आपली समशेर गाजवली.ती बहुतेक जास्तच परजली असावी, कारण १६९९-१७०२ मध्ये बाळाजीला पुण्याची सुभेदारी मिळाली. आता त्याच बाळाजीला १७०५ च्या गुजरात स्वारीच्या दरम्यान दौलताबाद येथील सुभेदारी देखील मिळाली. या सुभेदारीच्या काळातील बाळाजीची एक मुद्रा उपलब्ध आहे - "श्री उमाकान्त पदाभोजा भजनाप्रमुन्नते: बाळाजी विश्वनाथस्य मुद्रा विजयहेतराम।"

    छत्रपती राजारामांच्या अकाली निधनानंतर ’खेळणा’ उर्फ ’विशाळगडावर’ त्यांच्या ’शिवाजी’ या पुत्रास बसवले गेले. ४ वर्षांचा मुलगा मराठ्यांचा छत्रपती झाला. पुढे ५-६ वर्षे मराठी सत्ता औरंगजेबाशी झुंजत होती. सातारा, परळी(सज्जनगड), सिंहगड(कोंडाणा), पन्हाळगड, विशाळगड असे किल्ले फितुरीने औरंगजेबाकडे आले. विशाळगडासाठी तर त्याने त्या काळी
२ लाख रुपये मोजल्याचा पुरावा आहे. तर पन्हाळ्यासाठी त्याने ५० हजार रु. मोजले. १७०४ मध्ये त्याने राजगड व तोरणा घेतला. १७०२ मध्ये सिंहगडाच्या लढ्याच्यावेळी केवळ सामर्थ्य तोकडे पडले म्हणून प्रदीर्घ लढ्यानंतर तडजोडीची बोलणी करायला मोगलांच्या छावणीत "बाळू पंडित" म्हणजेच बाळाजी गेला होता. मात्र तत्पूर्वी किल्ला लढवत असताना "दारुगोळा कमी भासतोय, तरी त्वरा करा!" असे दारुगोळा पाठविण्यासंबधीचे पत्र त्याने "अंबाजीपंत पुरंदरे" यांना लिहिलेले आढळते.

    २० फेब्रुवारी १७०७ रोजी अहमदनगर येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला. ही बातमी मिळताच माळव्याच्या सुभेदारीवर असलेल्या त्याचा मुलगा - आज्जमशहा त्वरेने अहमदनगरला आला. ईदच्या मुहूर्तावर १४ मार्च १७०७ रोजी त्याने स्वतःला बादशहा म्हणून जाहीर केले. व आपला भाऊ शहा आलमचा काटा काढायला तो उत्तरेत निघाला. याच वेळी झुल्फिकारखान व इतरांच्या सल्ल्याने त्याने ८ मे १७०७ रोजी शाहूंची सुटका केली. मात्र येसूबाईंना त्याने कैदेतच ठेवले. ऑगस्ट १७०७ मध्ये शाहू महाराष्ट्रात आले. ताराराणींनी सात वर्षे औरंगजेबाशी लढा देऊन आपले कर्तृत्व सिद्ध केले होते, शाहूने गादीवर आपला हक्क सांगताच संघर्ष होणार हे अटळ झाले. शाहूने सुरुवातीला समजूतदारपणे घेतले मात्र ताराराणींनी लढाईची तयारी करताच शाहूंचा नाइलाज झाला. धनाजी जाधव व परशुराम त्रिंबक सैन्य घेऊन निघाले. शाहूंनी धनाजीस बोलणी करावयास बोलावून घेतले. धनाजी जाधवांच्या पदरी असलेल्या खंडो बल्लाळ, बाळाजी विश्वनाथ आनि नारो राम यांनी शाहूंचा पक्ष बरोबर असून त्यांचा पक्ष घेण्याची गळ धनाजीरावांना घातली. धनाजी ससैन्य शाहूंच्या बाजूने गेले. परशुराम त्रिंबकाने याला विरोध केला मात्र अखेर खेड येथील लढाईत शाहूंनी आपले वर्चस्व सिद्ध केले. शाहूंनी धनाजीरावांना सेनापतीपद, नारो शंकरांना सचिवपद व बाळाजी विश्वनाथास मुतालिक म्हणून नेमले आणि सेनाकर्ते असा किताबही दिला.

    बाळाजी विश्वनाथांच्या मृत्यूनंतर पेशवेपद त्यांचे पुत्र बाजीरावाकडे आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ मंगळवार~02/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment