"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*02/09/24 सोमवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *02. सप्टेंबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
श्रावण अमावस्या, नक्षत्र ~मघा,
योग ~शिव, करण ~चतुष्पाद,
सूर्योदय-06:23 सूर्यास्त-18:52,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

02. *त्यागामध्ये शांतीचा निरंतर वास असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02.   गाढवापुढे वाचली गीता,
     कालचा गोंधळ बरा होता
      ★अर्थ :~ मुर्ख माणसाला कितीही समजावुन सांगितले तरी त्याचे मुर्खतेचे आचरण बदलत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02.  *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
         ⭐अर्थ :: ~
   उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

    🛡 ★ 02. सप्टेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील २४५ वा (लीप वर्षातील २४६ वा) दिवस आहे.

        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोनदा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.
●१९४६ : भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.
●१९२० : कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.
●१९१६ : पाटणा उच्‍च न्यायालयाची स्थापना

      ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४१ : साधना शिवदासानी ऊर्फ ’साधना’ – चित्रपट अभिनेत्री
◆१८८६ : प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे – साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्‍न करणारे कृतिशील समाजसुधारक.
◆१८७७ : फ्रेडरिक सॉडी – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ

    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : श्रीनिवास खळे – संगीतकार
●२००९ : आंध्र प्रदेशचे १४ वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचे विमान अपघातात निधन
●१९९९ : डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रण चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत.
●१९९० : नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता  लेखक
●१९७६ : *विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर –* मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, त्यांच्या ’ययाति’ या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे.
●१९६० : डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर – वनस्पतीतज्ञ, ’विज्ञानवर्धिनी महाराष्ट्र’(MACS)या संस्थेचे संचालक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02.  *✸ मग बोलू युध्दातून ✸*
        ●●●●●००००००●●●●●
भारताचे नागरिक
याचा आम्हा आभिमान
काय सांगू आम्हासाठी
राष्ट्रध्वजाची हो शान ।।धृ।।

याची घेता घेता आन
झाले शहिद जवान
देश माझा बलवान
आम्हा आहे अभिमान ।।१।।

रंग राष्ट्रध्वजाचे हो
एक दोन आणि तीन
शांती समृध्दीचे दोन
समाधान आणखीन ।।२।।

हिन्दी बांधव आम्ही हो
देश माझा हिंदुस्थान
राज्य लोकशाहीजे हे
याचा आम्हा अभिमान ।।३।।

अतिरेकी सावधान
माझा भारत महान
इथे नाही चालणार
काही कट कारस्थान ।।४।।

प्रश्न सोडवू सुटता
अरे आम्ही शांतीतून
युध्द आम्हीही जाणतो
मग बोलू युध्दातून ।।५।।
    ~सौ. मंगला मधुकर रोकडे, धुळे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02.    *❂ प्रभु भक्ति दो। ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
आत्मश्रद्धा से भर जाऊँ, प्रभुवर ऐसी भक्ति दो।
समभावों से कष्ट सहूँ बस, मुझ में ऐसी शक्ति दो॥

कईं जन्मों के कृतकर्म ही, आज उदय में आये है।
कष्टो का कुछ पार नहीं, मुझ पर सारे मंडराए है।
डिगे न मन मेरा समता से, चरणो में अनुरक्ति दो।
समभावों से कष्ट सहूँ बस, मुझ में ऐसी शक्ति दो॥

कायिक दर्द भले बढ जाय, किन्तु मुझ में क्षोभ न हो।
रोम रोम पीड़ित हो मेरा, किंचित मन विक्षोभ न हो।
दीन-भाव नहीं आवे मन में, ऐसी शुभ अभिव्यक्ति दो।
समभावों से कष्ट सहूँ बस, मुझ में ऐसी शक्ति दो॥

दुरूह वेदना भले सताए, जीवट अपना ना छोडूँ।
जीवन की अन्तिम सांसो तक, अपनी समता ना छोडूँ।
रोने से ना कष्ट मिटे, यह पावन चिंतन शक्ति दो।
समभावों से कष्ट सहूँ बस, मुझ में ऐसी शक्ति दो॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02. *❃❝ कोरडी सहानभुती ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
         एक कोल्हा एका विहिरीत पडला व त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागले. तो आपले डोके मोठ्या मुष्कीलीने पाण्याबाहेर ठेवू शकत होता.

      इतक्यात एक लांडगा त्या ठिकाणी आला व विहिरीत पडलेला कोल्हा पाहून मोठ्या कळवळ्याने त्याला म्हणाला,

      'अरेरे ! मित्रा तूच का आत पडला आहेस ? तिथे तुला फारच थंडी वाजत असेल, आणि तू पडलास तरी कसा विहिरीत ? तुझी स्थिती पाहून मला फार वाईट वाटतं हे कसं काय झालं ते तरी मला कळू दे.'

       त्यावर कोल्हा म्हणाला, 'मित्रा, तू कृपा करून जर एखादी दोरी आत सोडशील तर तुझ्या या शाब्दिक कळकळीपेक्षा ती मला या वेळी अधिक उपयोगी पडेल. विहिरीतून वर येण्यासाठी तू मला मदत कर, म्हणजे मी माझी हकीगत तुला सांगतो.'

         *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   एखाद्या संबंधाने नुसत्या शब्दांनी खूप कळकळ दाखविण्यापेक्षा त्याला थोडी जरी प्रत्यक्ष मदत केली तरी त्याची किंमत फार मोठी आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02.   *काही वेळा आपली चुक नसतांनाही शांत बसणं योग्य असत कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही...*

      *मोडतोड करायला ज्ञान लागत नाही परंतु तडजोड करायला मात्र खुप शहाणपण लागते...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

02. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  महाराष्ट्रातील क्षेञफळाने सर्वांत मोठा जिल्हा कोणता ?
  ➜अहमदनगर.

✪ सध्या महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत ?
  ➜३६ जिल्हे.

✪  ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  ➜ चंद्रपूर.

✪  रायगड जिल्ह्यात भात संशोधन केंद्र कोठे आहे ?
  ➜ कर्जत.

✪ अंजीर पिकाचे उत्पादन सर्वांत जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते ?
  ➜ राजेवाडी.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

02. *❒ वि. स. खांडेकर ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
मराठीतील एक लोकप्रिय साहित्यिक
_*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
         _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
●जन्म :~ १९ जानेवारी १८९८
*●मृत्यू :~ २ सप्टेंबर १९७६*

"विष्णू सखाराम तथा ’वि. स.’ खांडेकर"

     यांची मराठीतील एक लोकप्रिय साहित्यिक म्हणून गणना केली जाते .वि.स. खांडेकर यांचे संपूर्ण नाव विष्णू सखाराम खांडेकर असे होते. त्यांचा जन्म १८९८ मध्ये सांगली येथे झाला. त्यांचे शिक्षण पुणे व सांगली येथे झाले. मराठीतील श्रेष्ठ कांदबरी कारांपैकी ते एक होते. वि.स. खांडेकर यांनी आपल्या साहित्यसेवेचा प्रारंभ कथालेखनापासून केला. त्यांनी अनेक लघुकथा व रुपकथा लिहिल्या आहेत. इ.स. १९३० मध्ये ‘हृदयाची हाक’ ही पहिली कांदबरी त्यांनी लिहिली.

      रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता खांडेकरांच्या कथेत आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स. खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात. जीवनासाठी कला हे त्यांच्या समग्र लेखनाचे सूत्र होते.

    मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, त्यांनी ’कुमार’ या टोपण नावाने कविता लेखन तर ’आदर्श’ या टोपणनावाने विनोदी लेखनही केले आहे.

   खांडेकरांनी छाया, ज्वाला, देवता, अमृत, माझं बाळ, इत्यादी चित्रपट लिहिले असून त्यापैकी काही चित्रपट गाजले होते. खांडेकर हे जीवनवादी साहित्यिक म्हणून ओळखले जातात. ‘जीवनासाठी कला’हा साहित्यातील पक्ष त्यांनी उचलून धरला होता.

    ते साहित्य अकादमीचे फ़ेलो होते. त्यांच्या ‘ययाती’या कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला होता. भारत सरकारने इ.स. १९६८ मध्ये ‘पद्‍मभूषण’ हा किताब देउन त्यांचा गौरव केला होता .भारतीय ज्ञानपीठातर्फ़े १९७४ मध्ये ‘ज्ञानपीठ’पारितोषिक त्यांना मिळाले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
         *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁सोमवार~ 02/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment