*02/10/24 बुधवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *02. ऑक्टोबर:: बुधवार*
🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद अमावस्या,
नक्षत्र ~उत्तराफाल्गुनी,
योग ~ब्रह्म, करण ~चतुष्पाद,
सूर्योदय-06:29, सूर्यास्त-18:25,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
02. *प्रत्येक क्रांति ही एका मनुष्याच्या विचारातुन जन्म घेते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔵🟢🔴
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
02. *घरोघरी मातीच्या चुली*
*★ अर्थ ::~* - सगळीकडे सर्वसाधारण एकच परिस्थिती असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
02. *आचार्यदेवो भव ।*
⭐अर्थ ::~ आचार्यांमध्ये देव पहा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 02. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक अहिंसा दिन
★हा या वर्षातील २७५ वा (लीप वर्षातील २७६ वा) दिवस आहे.
★महात्मा गांधी जयंती
★लाल बहादूर शास्त्री जयंती
★बालसुरक्षा दिन
★स्वच्छता दिन
★गिनीचा स्वातंत्र्यदिन
~*★ मृत्यू / पुण्यतिथी ★*~
🔹•••°°~°°°••◆••°°°~°°•••🔹
●२००६ : निकेल माइन्स, पेनसिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिश शाळेत पाच शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले व नंतर आत्महत्या केली.
●१९६९ : महात्मा गांधींच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा व सही असलेल्या २, ५, १० व १०० रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.
●१९५८ : गिनीला (फ्रान्सपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
●१९५५ : पेरांबूर येथे ’इन्टिग्रल कोच याने पहिल्या दूरदर्शन संचाचे प्रात्यक्षिक दाखवले.
●१९०९ : रमाबाई रानडे यांनी पुणे सेवासदन सोसायटीची स्थापना केली.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४२ : आशा पारेख – चित्रपट अभिनेत्री
◆१९२७ : पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक
◆१९०८ : गंगाधर बाळकृष्ण तथा ‘गं. बा.‘ सरदार – विचारवंत व साहित्यिक, पुरोगामी चळवळीचे भाष्यकार, दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
◆१९०४ : लाल बहादूर शास्त्री – स्वतंत्र भारताचे तिसरे पंतप्रधान. त्यांना मरणोत्तर ’भारतरत्न’ सन्मानाने गौरविण्यात आले होते.
(मृत्यू: ११ जानेवारी १९६६)
◆१८९१ : विनायक पांडुरंग करमरकर – शिल्पकार, १९२३ मधे पुण्याच्या श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या आवारात बसवलेला शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा त्यांनी बनवला आहे. पद्मश्री
◆१८६९ : महात्मा गांधी (मृत्यू: ३० जानेवारी १९४८ - नवी दिल्ली)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
१९८५ : रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता
●१९७५ : के. कामराज – स्वातंत्र्यसैनिक, खासदार व तामिळनाडुचे मुख्यमंत्री
●१९२७ : स्वांते अर्हेनिअस – स्वीडीश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ
●१९०६ : राजा रविवर्मा – चित्रकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
02. *✸मराठी पाउल पडते पुढे !✸*
●●●●००००००●●●●
खरा स्वधर्म हा आपुला --
जरी का कठीणु जाहला
तरी हाची अनुष्ठीला, भला देखे--स्वराज्य तोरण चढे
गर्जती तोफांचे चौघडे--
मराठी पाउल पडते पुढे !
माय भवानी प्रसन्न झाली---सोनपावली घरास आली
आजच दसरा, आज दिवाळी---
चला, सयांनो, अंगणि घालू
कुंकुमकेशर सडे--
मराठी पाउल पडते पुढे !
बच्चे आम्ही वीर उद्याचे ---
बाळमुठीला बळ वज्राचे
वारस होऊ अभिमन्यूचे ---
दूध आईचे तेज प्रवाही
नसांतुनी सळसळे --
मराठी पाउल पडते पुढे !
स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे--
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे, सिद्ध होई--
तदा संकटी देव धावून येई !
जय जय रघुवीर समर्थ
शुभघडीला शुभमुहूर्ती..
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी, जय भवानी..
दश दिशांना घुमत वाणी
जयजयकारे दुमदुमवू हे..
सह्याद्रीचे कडे !!
कवयित्री - शांता शेळके
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
02. *❂ गगन, सदन तेजोमय ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
गगन, सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश, देई अभय
छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्यातून, तार्यांतुन
वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण
हे तुझेच रूप सदय
वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय
भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकल-शरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
02. *❃❝ सत्याची कास ❞❃*
━━•●◆●★★●◆●•═━
एक छोटं गांव, त्या गांवात गरीब कुटुंब राहत होतं. मुलाचे आई वडील काबाड कष्ट करती असत. पण त्यांचा एकुलता एक दिनू नावाचा मुलगा, तो बिचारा छोटी छोटी कामे करून शिकत असे. काम करून तो दमून जात असे. तो अभ्यास करून, आपला नंबर खाली जाता काम नये असा सतत झटत असे.
त्याचप्रमाणे तो आपल्य वर्ग शिक्षिकाच्या छोटी छोटी कामे करत असे. त्यामुळे शिक्षकांना त्याच्या बद्दल नेहमी सहानुभूती वाटत असे. त्याला ते वह्या, पुस्तके देत असत. दिनूची हुशारी पाहून शिक्षक त्याला म्हणाले, ''अरे दिनू तू एवढा अभ्यास करतोस मग तू स्कॉलरशिप परीक्षेला का बसत नाहीस? तू परीक्षा दिलीस तर नक्की त्या परीक्षेत पास होशील. तुला स्कॉलरशिपही मिळेल'' पण परिस्थितीमुळे दिनू गप्पच बसला. त्यावर तो विचार सतत करू लागला की आपण छोटी छोटी कामे करतो त्यामुळे आपणाला कसे बसे मिळते. त्यानीच आपले पोट कसे बसे भरत. मग स्कॉलरशिपची फी कशी भरणार.
आता फी भरण्यास थोडे दिवस राहिले. दिनू सारखा विचार करू लागला. असे होतात तोच शिक्षक म्हणाले, ''आता फी भरण्यास फक्त एक दिवसच राहिला आहे.'' दिनू म्हणाला, ''गुरुजी मी फी उद्या नक्की भरतो.'' गुरुजी म्हणाले ठीक आहे. उद्या फी भर पण जाताना हे पुस्तक घेऊन जा.'' असे आवर्जून गुरुजीने सांगितले. ''ते पुस्तक तू वाच.'' दिनूने घाई घाईने ते पुस्तक घेतले व घरी गेला. वेळ न दवडता ताबडतोब त्याने ते पुस्तक उघडले तो काय? त्या पुस्तकात चमत्कार त्याला दिसला. त्या पुस्तकात चक्क 500 रुपयांची कोरी नोट त्याला दिसली. त्याला आश्चर्य वाटले. अरे पण मी तर पुस्तकात 500 रुपयांची नोट ठेवलेली नव्हती. मग कोठून आली ही नोट! तो विचार करू लागला. त्याच्या लक्षात आले की, ही नोट नक्की गुरुजींची आहे. ती नोट मी कशी घेणार? ते पैसे गुरुजींचे आहेत. पैसे गुरुजींना परत नेऊन दिले पाहिजेत. असे म्हणून तो ताबडतोब ती नोट घेऊन गुरुजींच्या घराचा रस्ता गाठला. पण त्याच्या मनात आले की, या पेश्याने स्कॉलरशिपची फी भरता येईल. कपडे, पुस्तके, आपल्या आई वडिलांना कपडे घेता येतील. हे आपणांस फारच उपयोगी आहेत. पण, 'हे पैसे आपले नाहीत.' तो धावत धावत गुरुजींच्या घरी पोहोचला.
गुरुजी आराम खुर्चीत बसून वाचत होते. तो तेथे दिनू पोहोचला. दिनू म्हणाला, ''गुरुजी आपण जे पुस्तक मला वाचायला दिले होते. त्या पुस्तकात 500 रुपयाची नोट होती. ती आपली नोट आहे. ही घ्या.'' गुरुजी म्हणाले, ''धन्यवाद दिनू.'' एखाद्याने हे पैसे आपल्या जवळ ठेवेले असते. तुझी अशी परिस्थिती त्यात तु फीचा अजिबात विचार केला नाहीस. तू ताबडतोब 500ची नोट माझ्याकडे घेऊन आलास. खरोखर तू प्रामाणिक इमानदार सच्चा मुलगा आहेस. हे आज मला कळले''. शाब्बास! दिनू तुझी परीक्षा घ्यावी म्हणून मी 500 रुपयाची नोट पुस्तकात ठेवली होती. त्या परीक्षेत तु उत्तीर्ण झालास. 'धन्य तु दिनू''. असे आनंदाने उद्गगार गुरुजींनी काढले. कोणती परीक्षा गुरुजीँ '' दिनू म्हणाला. ''सत्त्वपरीक्षेत तू उत्तीर्ण झालास. ''असे म्हणून गुरुजींनी दिनूला इनाम दिले.'' हे काय गुरुजी, हे काय करता, मला इनाम कशामुळे. तू शिक. चांगला शहाणा हो. परीक्षा देत राहा. तुला ही पुस्तके, वह्या नवे कपडे व परीक्षेची फी भरल्याची ही पावती.
हे पाहून दिनूला चांगले बक्षीस मिळाले. तो जोरात अभ्यास करू लागला. अन शेवटी स्कॉलरशिप परीक्षेत सर्व केंद्रात पहिला आला. त्यामुळे दिनूच्या सर्व हाल अपेष्टा संपल्या. सर्व समस्या त्याच्या प्रामाणिकपणाने वागल्यामुळे आपोआप सुटल्या. भाग्यवान दिनू.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
जो नेहमी सत्याने वागतो, प्रामाणिकपणाने वागतो त्याला चांगली किंमत नेहमी मिळते. 'सत्याची कास धरा. सत्य कधीही लपत नसते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
02. *कुणी तरी मला विचारले, या*
*जगात आपल एकदम जवळच अस कोण आहे ?*
*मि त्याला हसत उत्तर दिल...*
🕐 *वेळ* 🕐
*जर का वेळ चांगली असेल तर सार जग आपल ,*
*आणी ती जर खराब असेल तर कोणीच आपल नाही...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
02. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ धुळे जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणता जिल्हा तयार झाला आहे ?
➜नंदुरबार.
✪ गंधक या खनिजाचे उत्पादक राज्य कोणते ?
➜हरियाणा.
✪ अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ कोणते ?
➜चौंडी.( अहमदनगर )
✪ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या शहरात आहे ?
➜दिल्ली.
✪ शिखांचा पवित्र आद्यग्रंथ कोणता ?
➜गुरूग्रंथ साहेब.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
02. *❒ राष्ट्रपिता महात्मा गांधी ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
पूर्णनाव :~ मोहनदास करमचंद गांधी
◆जन्म :~ ०२/१०/१८६९
◆मृत्यू :~ ३०/०१/१९४८
●चळवळ :~ भारतीय स्वातंत्र्यलढा
●स्मारक :~ राजघट
●प्रभाव :~ लिओ टॉलस्टाय, जॉन रस्किन, गोपाळ कृष्ण गोखले
●पत्नी :~ कस्तुरबा गांधी
◆ मोहनदास करमचंद गांधी ◆
यांना महात्मा गांधी या नावाने ओळखले जाते. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम *महात्मा* ही उपाधी दिली. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना इ स १९४४ मध्ये सुभाषचंद्र बोस यांनी *राष्ट्रपिता* असे संबोभाले,असे म्हणतात. गांधीजी सविनय *सत्याग्रहाच्या कल्पनेचे* जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.
असहकार आणि अहिंसेच्या तत्त्वावर आधारित सत्याग्रहाचा उपयोग गांधीजींनी प्रथम दक्षिण आफ्रिकेमध्ये, तेथील भारतीयाना त्यांचे नागरी हक्क मिळवून देण्यासाठी केला. १९१५ मध्ये भारतात परत आल्यावर त्यांनी चंपारणमधील शेतकऱ्यांना जुलमी कर व जमीनदार यांच्याविरुद्ध लढण्यासाठी एकत्र केले. १९२१ साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सूत्र संभाळल्यानंतर गरिबी निर्मूलन,आर्थिक स्वावलंबन,स्त्रियांचे सामान हक्क ,सर्व-धर्म-समभाव, अस्पृश्यता निवारण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे स्वराज या साठी देशभरात चळवळ चालू केली.
१९३० मध्ये इंग्रजांनी लादलेल्या मिठावरील कराविरोधात त्यांनी हजारो भारतीयांचे ४०० कि मी लांब दांडियात्रेमध्ये प्रतिनिधित्व केले.
१९४२ मध्ये त्यांनी इंग्रजांविरुद्ध *भारत छोडो आंदोलन* चालू केले. या आणि यासारख्या इतर कारणांसाठी त्यांना भारतात तसेच दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेकदा तुरुंगात टाकण्यात आले.
त्यांच्या शेवटच्या वर्षांमध्ये भारत पाकिस्तान फाळणीमुळे व्यथित झालेल्या गांधीजींनी हिंदू मुस्लिम दंगे थांबवण्यासाठी प्रयत्न केले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★🔅★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁बुधवार ~02/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment