Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/xCSUZ5
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *02. डिसेंबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.१, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~ज्येष्ठा, 
योग ~धृति, करण ~बव, 
सूर्योदय-06:55, सूर्यास्त-17:59,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂* 
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
02. *मित्र परिसासारखे असावेत म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
02. *एकना धड भाराभर चिंध्या* 
      *★ अर्थ ::~* 
- एकाच वेळी अनेक गोष्टी केल्यास एकही गोष्ट चांगली होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
02.  *आचार्यदेवो भव ।*
 ⭐अर्थ ::~ आचार्यांमध्ये देव पहा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
    🛡 ★ 02. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन
★ हा या वर्षातील ३३६ वा (लीप वर्षातील ३३७ वा) दिवस आहे.
★ International Day for the Abolition of Slavery
    ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००१	:	एन्रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
●१९९९	:	काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर
●१९८८	:	बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्या त्या पहिल्या महिला होत.
●१९४२	:	एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा विधायक उपयोग करण्याचे दालन खुले झाले.
  ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३७	:	मनोहर जोशी – लोकसभेचे सभापती, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
◆१९१३	:	दत्ता उर्फ दादा धर्माधिकारी – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक 
◆१८९८	:	इन्दर लाल रॉय – पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट 
◆१८५५	:	सर नारायण गणेश चंदावरकर – कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, डिप्रेस्ड क्लास मिशनचे अध्यक्ष (१९०६),  
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६	:	एम. चेन्ना रेड्डी – आंध्र प्रदेशचे ११ वे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेशचे राज्यपाल 
●१९०६	:	बाळाजी प्रभाकर मोडक – ’कालजंत्री’कार, शालिवाहन शक व तिथी आणि ख्रिस्ती सन यांचा मेळ घालण्याचे कोष्टक तयार करणारे, विज्ञानप्रसारक, लेखक 
●१५९४	:	गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
02.  *✸ भाग्यविधाता भारती ✸*
     ●●●●●००००००●●●●●
जिचं सारं काही पती
तिच सती भाग्यवती
सारं काही देता देता
तिची ओंजळ कां रिती ।।धृ।।
सारं काही तिच्या हाती
रिती भाती नाती गोती
तरी पदरी कां तिच्या 
यावे आसवांचे मोती  ।।१।।
निती आणखी अनिती
तिच्या पदराच्या गाठी
पाप - पुण्याची प्रचिती
तिच्या एकटीच्या साठी ।।२।।
तिने जगावे जीवन 
त्याची बनून आरती
काही करिता मनाचे
तिला छळून मारती ।।३।।
जिवा जीवन देण्याची 
तिची असते प्रवृत्ती
जन्मा आधिच का तिची
तरी संपते आवृत्ती  ।।४।।
दुनियेच्या नजरेत
तिने उरावे कां रती
भाग्य विधाता देशाला
कसे म्हणावे भारती ।।५।।   
     ~सौ.मंगला मधुकर रोकडे धुळे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━
02. *❂ शारदे हवे तुझे वरदान ❂*
   ━━═●✶✹★✹✶●═━━
*शारदे हवे तुझे वरदान ll धृ ll*  
मानवतेची गावी गाणी,
अशी आम्हा दे जिवंत वाणी l
अन्यायाचे दर्शन होता,उसळो त्वेष उधान ll१ll
*शारदे हवे*.......
स्वतंत्र भारतभूचे वैभव ,सामर्थ्याने नटलेले नव,
उच्छवासाचा प्रबंध व्हावा, गाता भारत गान ll२ll
*शारदे हवे*.......
मराठीयेची नगरी आम्ही शिल्पकार की रचनाप्रेमी 
जीवन मंदीर उभवू सुंदर हा अमुचा
अभिमान ll३ll
*शारदे*..........
उकलायाला जीवनशास्त्रे,पहावया नव विक्रमक्षेत्रे
दिव्यदृष्टी दे करावयाला उन्नत जीवन मान ll४ll
*शारदे हवे*........
दिवंगतांच्या अतृप्त आशा,पूर्ण कराया अशी मनीषा,
भीष्मकामना निववाया दे,अर्जुन शर संधान ll५ll
*शारदे हवे*.......
नव्या युगाची नवीन सृष्टी नव्या मानवा दे नव दृष्टी
हवा शारदे नवा वीरंची नवचातुर्य निधानll६ll
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
02.  *❃❝ असंतुष्ट मोर ❞❃*
     ━═•●◆★●◆●•═━━
    *एके दिवशी मोराला आपला आवाज फार कर्कश आहे ह्याचे फार दुःख झाले.* म्हणून त्याने सरस्वती देवीची प्रार्थना केली, 'हे देवी ! मी तुझे वाहन असता स्वरामध्ये कोकिळेने मला लाजवावं हे तुझ्या कीर्तीस शोभण्यासारखं नाही. कोकिळा बोलू लागली म्हणजे सर्व लोकांचे कान तिकडे लागतात आणि मी तोंड उघडलं की लोक माझी थट्टा करतात.'
मोराचे हे बोलणे ऐकून देवी त्याची समजूत घालत म्हणाली, 'अरे, कोकिळा तिच्या गोड आवाजामुळे श्रेष्ठ आहे असे तुला वाटतं, पण देखणेपणा व मोठेपणा यांच्या बाबतीत तूही भाग्यवान आहेस.
देवीचे हे बोलणे ऐकून मोर म्हणाला, 'देवी, आवाज गोड नाही तर देखणेपणा काय करायचा आहे?' त्यावर देवी म्हणाली, 'अरे देवाने प्रत्येकास एकेक गुण दिला आहे. तुला सौंदर्य, गरुडाला बळ, कोकिळेला आवाज, पोपटाला बोलण्याची शक्ती, पारव्याला शांती. हे पक्षी जसे आपापल्या गुणांवर संतुष्ट आहेत, तसं तूही असावंस, उगाच आशा वाढवून दुःख करण्यात अर्थ नाही.'
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
    एकाच्याच अंगी सगळे गुण आढळत नाहीत. तेव्हा आपल्या अंगी जो गुण असेल त्याचाच चांगला उपयोग करून आपण समाधानी असावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━
02. *ज्या दिवशी माणूस समजेल की, समोरचा माणूस चुकीचा नाही, फक्त त्याचे विचार आपल्या विचारांपेक्षा वेगळे आहेत. त्या दिवशी जीवनातील अनेक दुःख संपतील....!!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
02. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
 ✪  'महाराष्ट्राचे मॅंचेस्टर' असे कोणत्या शहराला संबोधले जाते ?
  ➜ इचलकरंजी.
 ✪  मिरचीचे सर्वांधिक उत्पन्न घेणारे राज्य कोणते ?
  ➜ आंध्रप्रदेश.
  ✪ आसाम राज्याचे राजधानीचे नाव काय आहे ?
  ➜ दिसपूर.
 ✪  लोखंडाच्या उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?
  ➜ चौथा.
 ✪  ' ऑर्चिड्स ' ही दुर्मिळ फुले कोणत्या राज्यात सापडतात ?
  ➜ सिक्कीम 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
02. *❒♦बहिणाबाई चौधरी♦❒*  
     ━═•●◆●★●◆●•═━
●जन्म	 :~ २४ ऑगस्ट १८८०*
           जळगाव (महाराष्ट्र)
●मृत्यू	 :~ ३ डिसेंबर १९५१
●पुरस्कार	 :~ खान्देशकन्या कवयत्री
    ◆ बहिणाबाई नथुजी चौधरी ◆
    या अहिराणी-मराठी कवयित्री होत्या. बहिणाबाईंच्या काव्याचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश असतो.
        ◆चरित्र आणि जीवन ◆
     बहिणाबाईंचा जन्म असोदे (जळगाव जिल्हा ) ह्या गावी झाला. हे गाव खानदेशातील जळगावापासून अंदाजे ६ कि. मी. अंतरावर आहे. जन्म नागपंचमीच्या दिवशी झाला. मध्ये वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये- ओंकार, सोपान आणि काशी झाली. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमच अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी  बहिणाबाईंना वैधव्य आले.  बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या बहात्तराव्या वर्षी जळगावात ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला.
       त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत.
     ◆ बहिणाबाईंच्या कविता ◆
    महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये (दुसरी आवृत्ती १९६९) प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे.
      ◆काव्य रचनेची वैशिष्ट्ये◆
  अहिराणी (खानदेशी) भाषेतून; त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत. अतिशय सोप्या शब्दांत जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे. खानदेशातील आसोद हे बहिणाईंचे जन्मगाव. तिथला परिसर, तिथे बोलली जाणारी खानदेशी/अहिराणी भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वत: शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांची सुख-दु:खे, त्यातले चढउतार, झाडे, प्राणी, निसर्ग - या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.
   ◆ अभिप्राय आणि समीक्षा ◆
   ‘जुन्यात चमकेल आणि नव्यात झळकेल असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे, हा तर मोहोरांचा हंडा आहे’, अशा शब्दांत आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईंच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता.
बहिणाबाईंचे हे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
 *❁सोमवार ~ 02/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment