*02/11/24 शनिवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *02. नोव्हेंबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक शु.१, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~विशाखा,
योग ~आयुष्मान्, करण ~किंस्तुघ्न,
सूर्योदय-06:39, सूर्यास्त-18:04,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
02. *अत्तर सुगंधी व्हायला फ़ुले सुगंधी असावी लागतात.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
02. *आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना –*
★ अर्थ ::~ दोन्ही बाजूंनी अडचण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
02. *नास्ति ज्ञानात् परं सुखम् ।*
⭐अर्थ ::~
ज्ञानापेक्षा दुसरी कोणतीही गोष्ट अधिक आनंददायी नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 02. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३०६ वा (लीप वर्षातील ३०७ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९९९ : दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
●१९४० : दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६५ : शाहरुख खान – अभिनेता व निर्माता
◆१९६० : अनु मलिक – संगीतकार
◆१९२१ : रघूवीर दाते – ध्वनीमुद्रणतज्ञ, हिन्दी, मराठी, गुजराती आणि उडिया भाषांतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनीमुद्रण त्यांनी केले.
◆१८९७ : सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९),
◆१८८२ : डॉ. के. बी. लेले – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते
●१९९० : भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट.
●१९५० : जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक
●१८८५ : बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर – नाटककार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొ
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
02. *✸ ऐ मेरे प्यारे वतन ✸*
●●●●●००००००●●●●●
ऐ मेरे प्यारे वतन, ऐ मेरे बिछड़े चमन
तुझ पे दिल कुरबान
तू ही मेरी आरजू़, तू ही मेरी आबरू
तू ही मेरी जान
तेरे दामन से जो आए
उन हवाओं को सलाम
चूम लूँ मैं उस जुबाँ को
जिसपे आए तेरा नाम
सबसे प्यारी सुबह तेरी
सबसे रंगी तेरी शाम
तुझ पे दिल कुरबान
माँ का दिल बनके कभी
सीने से लग जाता है तू
और कभी नन्हीं-सी बेटी
बन के याद आता है तू
जितना याद आता है मुझको
उतना तड़पाता है तू
तुझ पे दिल कुरबान
छोड़ कर तेरी ज़मीं को
दूर आ पहुँचे हैं हम
फिर भी है ये ही तमन्ना
तेरे ज़र्रों की कसम
हम जहाँ पैदा हुए उस
जगह पे ही निकले दम
तुझ पे दिल कुरबान
~प्रेम धवन
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
02. *❂ सूर्यनारायणा नित् नेमाने ❂*
━━═●✶✹★●★✹✶●═━━
सूर्यनारायणा नित् नेमानं उगवा
अंधाराच्या दारी थोडा उजेड पाठवा
ओंजळीनं भरू दे गा पाखरांच्या चोची
दु:खात पंखांना असो सावली मायेची
आबादानी होवो शेत भरू दे दाण्याचे
तुझ्या पालखीला शब्द बांधू तुकोबाचे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
02. *❃❝ दैवी खेळ ❞❃*
━━═•●◆●★●◆●•═━━
आर्थर अँश हा इटली मधील अतिशय नावाजलेला टेनिसपटू होता. १९८३ मध्ये त्याच्या हदयावर शस्ञक्रिया करावी लागली. त्यावेळी त्याच्या शरीरात दूषित रक्त चढवल्यामुळे त्याला कैन्सरची लागण झाली. त्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून त्याला अनेक पञे येत राहिली.
त्यातील एका पञात म्हटले होते...
इतक्या वाईट आजारासाठी देवाने तुलाच का निवडले ? या पञाला उत्तर देताना आर्थर म्हणतो...
"५ कोटी मुले टेनिस खेळू लागली, ५० लाख मुले टेनिस खेळायला शिकली, त्यातील ५ लाख मुले व्यावसायिक टेनिस खेळाडू बनली, त्यातील ५० हजार मुले टेनिस
सर्किटमध्ये दाखल झाली,
त्यातून ५ हजार मुले ग्रॅडस्लँम
स्पर्धेसाठी निवडली गेली. त्यातील फक्त ५० टेनिसपटू विम्बलडनसाठी
निवडले गेले, त्यातील चौघे उपांत्य फेरीत आणि दोघे अंतिम फेरीत पोचले. त्या दोन जणांपैकी मी जेव्हा विम्ब्लडनसाठी विजेतेपदाचा करंडक
उंचावला तेव्हा मी देवाला कधीही विचारले नाही की, माझीच निवड
का केलीस ? मग आत्ताच वेदना होत असताना माझीच निवड का केली,
असे मी देवाला कसे विचारु ?"
"सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस बनवते... अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त
विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते."
यशस्वी लोक आपल्या
निर्णयाने जग बदलतात
आणि अपयशी लोक
जगाच्या भीतीने आपले
निर्णय बदलतात...
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
02. सुख ही एक मानसिक
सवय आहे,
ती लावून घेणं आपल्याच
हातात आहे.
तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
तितकंच सुखी तुम्ही रहाल.
तुमच्या सुखी रहाण्यावर
केवळ तुमचाच अधिकार असतो.
इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच
शकत नाहीत...
ही गोष्ट एकदा लक्षात आली
की जगणं फार सोपं होऊन जाईल...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
02. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ भारतीय चित्रपट सृष्टीचें जनक कोणास म्हणतात ?
➜ दादासाहेब फाळके.
✪ डिझेल इंजिनचा शोध कोणी लावला ?
➜ रूडाल्फ डिझेल.
✪ 'फटका' या काव्यप्रकाराचे जनक कोणास म्हणतात ?
➜ अनंत भवानीबाबा घोलप.
✪ व्हाॅलिबाॅल खेळातील बाॅलचे वजन किती ग्रॅम असते ?
➜ २७० ते २८० ग्रॅम.
✪ डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज समता संघ केव्हा स्थापन केला ?
➜ ४ सप्टेंबर १९२७
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
02. *❒ ♦श्यामची आई♦ ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*श्यामच्या आईचं आज काय करायचं...?*
●यशोदा सदाशिव साने
●मृत्यू :~ २ नोव्हेंबर १९१७
कोकणातल्या एका सामान्य कर्जबाजारी गरीब कुटुंबातील महिलेला महाराष्ट्राने १०० वर्ष लक्षात ठेवावे. स्मृती शताब्दी महाराष्ट्र साजरी केल्या गेली. तिचा साधा फोटो ही उपलब्ध नसताना तिला १०० वर्षे पुजावे हे विलक्षण आहे.
गुरुजींची आई कोकणातल्या एका खेड्यात जन्मली आणि तिथेच संपून गेलेली. नवरा, सासू, सासरे, मुले, आजारपण याच विश्वात राहणारी. तरी पण महाराष्ट्राच्या भावविश्वात तीचं स्थान काय म्हणून कायम आहे?
वसंत बापट यांनी साने गुरुजींच्या एका नातेवाईकाला मोठ्या उत्सुकतेने विचारले होते की कशी होती हो गुरुजींची आई? तेव्हा तुसडेपणाने ते म्हणाले की अहो काही विशेष नव्हती. चार चौघीसारखी दिसायची.काही वेगळी नव्हती.
यावर वसंत बापट लिहितात की *सामान्य असण्यातील हेच तिचे असामान्यत्व आहे.*
मला ‘शिक्षण विषयाच्या या लेखमालेत म्हणून गुरुजींच्या आईवर का लिहावेसे वाटते? महात्मा गांधी म्हणत की *'आई हे मुलाचे पहिले विद्यापीठ आहे’*.या वाक्याच्या प्रकाशात गुरुजींची आई हीच एक शाळा आहे. शाळेत मूल असते ६ तास आणि उरलेले १८ तास घरात असते. त्याच्या आयुष्यात शाळा खूप उशिरा येते. सुरवातीची महत्वाची वर्षे या आईच्या विद्यापीठातच तर जातात. तेव्हा शाळा जीवनात काय करते याचे मूल्यमापन करताना आई नावाच्या शाळेत मूल काय शिकते आणि त्यापेक्षा काय शिकायला पाहिजे? हे आपण विचार करू या...
त्यासाठी अगोदर श्यामच्या आईची वैशिष्ठ्ये कोणती? ती महाराष्ट्राला एवढी का भावली? हे लक्षात घ्यायला हवे.
*‘श्यामची आई’* कोणतेच तत्वज्ञान सांगत नाही. ती एक सोशीक भारतीय महिला आहे. अविरत कष्ट, सोशीकता आणि अपार समजूतदारपणा यांनी तीचं आयुष्य व्यापलेलं आहे. त्यामुळे ती आजच्या नव्या पिढीच्या तथाकथित स्वातंत्र्यवादी महिलांना आदर्श वाटणार नाही, पण तिचे ते समर्पण केवळ गुलामी म्हणून बघता येणार नाही. ती हलाखीच्या दारिद्रयात अत्यंत स्वाभिमानी आहे.स्वत:च्या वडिलांना ही ती दरिद्रयात आम्ही आमचे बघून घेऊ हे सुनावते. सावकाराचा माणूस घरावर जप्ती आणू शकतो हे माहीत असूनही त्याने स्त्री म्हणून तिच्यावर शेरेबाजी करताच ती नागिणीसारखी परिणामाची पर्वा न करता त्याच्या अंगावर धावून जाते. हा तिचा दारिद्रयातला स्वाभिमान थक्क करून टाकतो. श्यामने कुठेतरी जेवायला गेल्यावर दक्षिणा आणल्यावर ती त्या गरिबीतही ते पैसे मंदिरात नेऊन द्यायला सांगते. गरिबीतल्या तिच्या या मूल्यसंस्काराचे भान महत्वाचे आहे. ती स्वत: मुलांना आदर्श तिच्या समर्पणातून घालून देते.
मला स्वत:ला गुरुजींची आई एक शिक्षिका म्हणून खूप भावते. कुटुंबव्यवस्थेत ठरवले तर किती प्रकारचे अनुभव दिले जाऊ शकतात? छोट्या छोट्या प्रसंगातून ती जाणिवा विकसित करते. यासाठी मला ती भावते. ती पर्यावरण, जातीयताविरोध, गरिबांविषयी कणव, समर्पण हे सारं सारं शिकवते. श्यामने मुक्या कळ्या खुडल्यावर किंवा झाडाची जास्त पाने तोडली तरी ती आई त्याला पर्यावरणाची, झाडाच्या भावनांची जाणीव करून देते. आपला मुलगा भित्रा बनू नये म्हणून ती सक्तीने त्याला पोहायला पाठवते. दलित म्हातारी मोळी उचलू शकत नाही म्हणून त्या बुरसटलेल्या काळात श्यामला दलित म्हातारीला स्पर्श करायला लावते. या सर्व गोष्टीतून ती जे संस्कार त्याच्यावर करते ते त्या काळाच्या कितीतरी पुढचे आहेत.
सोप्या सोप्या प्रसंगातून ती जे तत्वज्ञान सांगते ते किती विलक्षण आहे. श्याम डोक्यावरचे केस वाढवतो. वडील रागावतात.तेव्हा श्याम वैतागून म्हणतो, “आई केसात कसला गं आलाय धर्म" तेव्हा ती म्हणते, "तुला केस राखायचा मोह झाला ना. मोह टाळणे म्हणजे धर्म!" इतकी सोपी धर्माची व्याख्या क्वचितच कोणी सांगितली असेल. किंवा लाडघरच्या समुद्रात ती समुद्राला पैसे वाहते. तेव्हा श्याम म्हणतो की ज्याच्या पोटात रत्न आहेत त्याला पैसे कशाला? तेव्हा ती म्हणते की सूर्याला ही आपण काडवातींनी ओवाळतोच ना? प्रश्न त्या कृतज्ञतेचा आहे.
अभावातले आनंद आणि समर्पणातला आनंद ती मुलांना शिकवते. स्वत:ला सणाच्या दिवशी साड्या नसताना स्वत:ला आलेल्या भाऊबीजेतून ती पतीचे फाटके धोतर बघून नवे धोतर आणवते. श्यामला त्यातून एकमेकांसाठी काय करायचे असते याचे भान येते.
आज मध्यमवर्ग /उच्च मध्यमवर्गात मुलांवर सुखाचा मारा होतो. त्यातून त्याच्या संवेदना तरल राहत नाहीत. जीवनात आनंद, यश विकसित करावे लागतात, रेडीमेड मिळत नाहीत याची जाणीव मुलांना असणे आवश्यक आहे. अभाव वाट्याला न आल्याने गरीबी वंचितता याची वेदना कळत नाही आणि अभावातूनही पुढे कसे जायचे हे उमगत नाही किंवा आजूबाजूचे जग हे ही सुखवस्तू असल्याने या गरीबांच्या जगण्याचा परिघच परिचित होत नाही. पुन्हा वाचन, संगीत, निसर्ग असे अनुभव बहुतेक घरात न दिल्याने मुले टीव्ही, मोबाइल, कार्टून, दंगामस्ती असले स्वस्त आनंदाचे मार्ग शोधतात व त्यातून त्यांची विचारशक्ती व संवेदनाच विकसित होत नाही.
पालकांची स्वयंव्यग्रता ही पुन्हा समस्या बनली आहे. पालक दिवसभर काम आणि घरी आल्यावर टीव्ही फोन आणि सोशल मीडियात रमून गेलेत. याला मुलांच्या आई ही अपवाद नाहीत. यातून मुलांशी संवाद बंद झालेत. घरात वस्तु मिळताहेत पण प्रेम आणि संवाद मिळत नाहीये. यातून मुले प्रेम दुसरीकडून, वस्तूमधून मिळवतात आणि संवाद ही चुकीचा करू लागतात.
इथेच नेमकी श्यामची आई मला महत्वाची वाटते. ती मुलाशी सतत बोलत राहते. वैतागून चिड चिड न करता पण कणखरपणे ती त्याला समजावून सांगते. छोट्या छोट्या प्रसंगातून त्याला मूल्य परिचित करून देते. केवळ शब्दाने संस्कार करण्यापेक्षा आपल्या अपरिमित कष्टाने आणि मायेने संस्कार करते. आजच्या सुशिक्षित कुटुंबातील श्यामच्या आईकडून हे शिकायला हवे.
*खरा तो एकची धर्म*
*जगाला प्रेम अर्पावे...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁शनिवार ~ 02/11/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment