*03/01/24 बुधवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *03.जानेवारी:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═
मार्गशीर्ष कृ.7, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~सप्तमी,
नक्षत्र ~उत्तराफाल्गुनी,
योग ~शोभन, करण ~बव,
सूर्योदय-07:12, सूर्यास्त-18:12,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
03. *एकमेकांची प्रगती साधते ती खरी मैत्री.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
03. *गर्वाचे घर खाली*
*★ अर्थ ::~*
गर्वामुळे शेवटी फजिती होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
03. *गतस्य शोचनं नास्ति ।*
⭐अर्थ ::~ भूतकाळातील
गोष्टींविषयी चिंता करू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 *★03. जानेवारी★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ जागतिक बालिका दिन,
★ महिला मुक्तिदिन,
★ हा या वर्षातील तिसरा दिवस आहे.
★ जागतिक अॅक्युप्रेशर थेरपी दिन
★ मूलभूत कर्तव्यपालन दिन
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४ : नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
●१९५७ : हॅमिल्टन इलेक्ट्रिक या कंपनीने जगातील पहिले बॅटरीवर चालणारे मनगटी घड्याळ विक्रीसाठी आणले.
●१९५० : पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते पुणे येथे राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे (NCL) उद्घाटन झाले.
●१९२५ : बेनिटो मुसोलिनी इटलीचा हुकूमशहा बनला.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३१ : य. दि. फडके – लेखक, विचारवंत व इतिहाससंशोधक
◆१९२१ : चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
◆१८८३ : क्लेमंट अॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान
◆१८३१ : *सावित्रीबाई फुले* – समाजसेविका (मृत्यू: १० मार्च १८९७)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : सतीश धवन – इस्रोचे अध्यक्ष
●२००० : डॉ. सुशीला नायर – स्वतंत्र भारताच्या पहिल्या आरोग्यमंत्री, महात्मा गांधींच्या स्वीय सहाय्यिका
●१९९८ : प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक,
●१९९४ : अमरेन्द्र गाडगीळ – मराठी बालकुमार साहित्य चळवळीचे प्रवर्तक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
03. ★स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला ★
●●●●००००००●●●●
स्वर्गाहुनही प्रिय आम्हांला अमुचा सुंदर भारत देश
आम्ही सारे एक, जरीही नाना जाती, नाना वेष
या भूमीच्या आम्ही कन्या, कोमल भाव मनी
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष
श्रीरामाचे, शीकृष्णाचे अजून आहे स्मरण मनास
वीर शिवाजी, प्रताप, बाजी.. थोर आमुचा हा इतिहास
रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश
हिमायलापरि शीतल आम्ही, आग पेटती परि उरात
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत
या देशाची गौरवगाथा हाच अम्हाला दे आदेश
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
03. *❂ देह मंदिर ❂*
✶✶✹✹★★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
03. *❃ मुर्खा बरोबर वाद नको ❃*
━═•●◆●★●◆●•═━
गाढव वाघाला बोलतो गवत पिवळ असत. वाघ बोलतो गाढवाला गवत हिरव असत. त्यांच्यात वाद होतो. ते सिंहाकडे जातात निवाडा करायला. दरबारात सर्व जमलेले असतात. गाढव शहाणपणा करत सर्वांना समोर सिंहाला बोलतो कि गवत पिवळ असत आणि हा वाघ बोलतो कि हिरव असत तुम्ही आता सांगा कि खर काय आणि खोट काय. सिंह स्मितहास्य करतो आणि सर्वांन समोर सांगतो की गाढव बरोबर बोलतो. गवत पिवळ असत.आणि वाघाला एक वर्षाची शिक्षा करतो. गाढव आनंदाने माकडउड्या मारत जंगलात निघून जात.
सर्व दरबार संपल्यावर वाघ जाऊन सिंहाला विचारतो कि तुम्हाला माहित आहे ना कि गवत हिरव असत तरीही का मला शिक्षा केली. सिंह बोलला कि मी शिक्षा तुला ह्यासाठी केली कारण तो गाढव आहे आणि हे सर्वांना माहीत आहे. आणि गवत हिरवच आहे ह्यात काहीच शंका नाही. पण तरीही तू एका गाढवा बरोबर वाद घालत बसून स्वतःच वेळ वाया घालवलास म्हणून तुला शिक्षा दिली.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
ध्येय गाठायच असेल तर वाटेत येऊन रेकणाऱ्या गाढवांकडे दगड न फेकता बिस्कीट फेका. आणि पुढे व्हा कारण पुढे वाटेत अशी भरपूर गाढवं भेटणार आहेत. ध्येय महत्वाचं आहे गाढवां बरोबरचा वाद नाही..!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
03 *जिवनात कठीण परीस्थिती सुद्धा एका वाँशिंग मशीन सारखी आहे....*
*जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा पण…*
*जेव्हा आपण त्यातुन बाहेर येतो,*
*तेव्हा आपल व्यक्तिमत्व पहिल्या पेक्षा,*
*"अधिक स्वच्छ, चांगल आणि चमकदार असतं"....*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
03. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ विंचू हा कोणत्या संघातील प्राणी आहे ?
➜ आथ्रीपोडा.
✪ इलेक्ट्राॅनचा शोध कोणी लावला ?
➜ जे.जे.थाॅमसन.
✪ एका मानवी किडनीचे वजन किती असते ?
➜ १५० ग्रॅम.
✪ पित्ताचे ( Bile ) पीएच मान किती आहे ?
➜ ७.७
✪ शरीराचे उत्तकाचे ( Tissues ) निर्माण कशामुळे होते ?
➜ प्रोटीन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
03. *❒ ♦सावित्रीबाई फुले♦ ❒*
━═•●◆●★●◆●•═━
शिक्षणप्रसारक, समाजसुधारक, स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य,
भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या जननी, शिक्षणक्रांती ज्योती,
_यांची जयंती निमित्त त्यांचे पवित्र_
*स्मृतीस विनम्र अभिवादन...!!*
*कोटी कोटी प्रणाम.*
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
*●जन्म :~ ३ जानेवारी १८३१,*
नायगाव,तालूका खंडाळा, सातारा
●मृत्यू :~ १० मार्च १८९७, पुणे
*⚜सावित्रीबाई फुले*
🔶 या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
🔷१८४० साली जोतिराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतिरावांचे वय तेरा वर्षांचे होते.
🔶सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतिरावांनाही एक नवा मार्ग सापडला त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
🔷१ मे, इ.स. १८४७ रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली.१ जानेवारी, १८४८ रोजी भिडेवाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनर्यानी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तर भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा २०१८ सालीही चालू आहे.
🔶सावित्रीबाईंच्या शाळेत सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी
"धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
🔷केशवपन बंद करण्यासाठी व पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. १८९०) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
🔶 सावित्रीबाईनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरीरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळवा हेही त्याचे कार्यक्षेत्र होते. सामजिक कार्यात त्यांचा पुढाकार असे. त्यामुळेच १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे १८९७ मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतः च्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाच्या बळी ठरल्या.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁बुधवार ~03/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment