"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*03/02/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *03.फेब्रुवारी:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═
पौष कृ.8,  पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~विशाखा,
योग ~गण्ड, करण ~कौलव
सूर्योदय-07:12, सूर्यास्त-18:32,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

03. *जगी सर्व सुखी असा कोन आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

03.  आंधळा मागतो एक डोळा,
  देव देतो दोन डोळे~
      *★ अर्थ ::~*
- अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणे      
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
03.   *भावे हि विद्यते देव: ।*
    ⭐अर्थ :: ~ भाव तेथे देव आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
       🛡 *03. फेब्रुवारी* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ३४ वा दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९२८ : 'सायमन गो बॅक' या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.
●१९२५ : भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
●१८७० : अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
●१७८३ : स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६३ : रघुराम राजन – भारतीय अर्थतज्ञ
◆१९०० : तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ
◆१८२१ : डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर (मृत्यू: ३१ मे १९१०)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९६९ : सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री
●१९२४ : वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते
●१८३२ : पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली.
(जन्म: ७ सप्टेंबर १७९१)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
03.   *✸ महाराष्ट्र देशा ✸*
   ●●●●००००००●●●●
मंगल देशा,पवित्रा देशा,महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशानाजुक देशा,कोमल देशा, फुलांच्याहि देशाअंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशाबकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशाभाव भक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशाशाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशाध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी, वैभवासि, वैराग्यासीजरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा,महाराष्ट्र देशासह्याद्रीच्या सख्या,जिवलगा, महाराष्ट्र देशापाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषागोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषातुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांचीमंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांचीध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

03. *❂ दीनबंधु तू गोपाला रे ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे

तव तेज या तिमिरात दे आता
नवचेतना विश्वास दे आता

दीनबंधु तू गोपाला रे
कृपासिंधू तू नंदलाला रे
नंदनंदना रे मोहना

चुके वाट ज्याची तया तू आधार
आम्ही बाहुल्या तू खरा सूत्रधार
घे बालका सांभाळुनी आता
नवचेतना विश्वास दे आता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

03.      *❃ सत्कार्य ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   संत राबिया रोज पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकीत असत. हा त्यांचा रोजचा नियम होता. उर्वरित वेळेत त्या अध्ययन आणि अध्यात्मिक चर्चा करीत असत. एके दिवशी त्या सकाळी कबुतरांना दाणे टाकीत असताना, पाच-सहा तरुण तेथे फिरत फिरत आले आणि संत राबिया यांच्याजवळ येऊन उभे राहिले. संत राबियानी त्याच्यांकडे पाहून स्मितहास्य केले आणि नंतर मोठ्याने हसू लागली. ती का हसते? हे त्या तरुणांना कळले नाही. त्यांनी तिच्याजवळ तिच्या हसण्याचे कारण विचारले असता ती म्हणाली,"मी यामुळे हसले कारण या धरतीवर तुमच्यासारखे सजलेले, सुंदर आणि बलशाली तरुण आहेत. ती धरतीमाता किती भाग्यशाली आहे. माझे हसू हे देवाप्रती आभाराचे आहेत." हे ऐकून ते तरुण तिथेच उभे राहिले. राबियांचे कबुतराला दाणे टाकण्याचे कामही चालूच होते. त्या त्यांच्या कामात मग्न होत्या. मग काही वेळाने त्या रडू लागल्या. तरुणांना कळेना कि काही वेळापूर्वी हसणारी हि स्त्री अचानक का बरे रडू लागली. ते त्यांच्याजवळ गेले व पुन्हा त्यांना रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी राबिया त्यांना म्हणाल्या," आधी मी हसले होते धरतीवर किती बलशाली तरुण आहेत पण हे तरुण त्यांच्या इच्छाशक्तीचा, बलाचा वापर सेवेसाठी करत नाहीत. तरुणांनी या बलाचा वापर जर सृजनासाठी केला तर जगाचे किती कल्याण होईल. असे होत नाही आणि त्यांची बुद्धी त्यांना हे करण्याची का प्रेरणा देत नाही या गोष्टीने मला रडू आले." तरुणांना आपली चूक लक्षात आली. राबियाने त्यांना प्रेरित केले. त्यांच्याकडून सेवा करून जरी घेता आली नाही तरी तहानलेल्याना पाणी, भुकेलेल्याना अन्न आणि मायेचे दोन शब्द प्रत्येकासाठी द्यायला हवे हे त्यांना समजावले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  प्रत्येकाने थोडे थोडे सत्कार्य केले तर जग सुधरायला वेळ लागणार नाही. आपण एक दुसऱ्याची वाट पाहण्यात आयुष्य वाया घालत आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====

03. "एकाच वेळी हजार
        ध्येय ठेवण्यापेक्षा,
  *हजार वेळा एकच ध्येय ठेवा,*
         यश काय तुम्ही...
   *यशाचा इतिहास घडवाल*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆••====

03. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

◆ ' सेमीनरी हिल्स ' हे वनोद्यान कोणत्या जिंल्ह्यात आहे ?
  ➜ नागपूर

◆ मराठवाडा विभाग पूर्वी कोणाच्या राज्यात होता ?
  ➜ निजाम

◆ वसईचा भुईकोट किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  ➜ ठाणे

◆ यशवंतराव चव्हाणांच्या समाधीस्थळास कोणत्या नावाने ओळखले जाते ?
  ➜ प्रीतिसंगम

◆ 'वाॅटर अँन्ड लॅंड मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट ' कोठे आहे ?
  ➜ औरंगाबाद
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

03.    *💠उमाजी नाईक💠*
    ─┅━━▣▣▣━━┅─
●जन्म :~ ७ सप्टेंबर १७९१
      पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे
*●मृत्यू :~ ३ फेब्रुवारी १८३२*

*_एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक..._*
         *_उमाजी नाईक_*

    हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद  झाली, काही तशाच राहून गेल्या. सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो कि पळो करून सोडणारा व  सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा  महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला. तो म्हणजे 'उमाजी नाईक'.

   आद्याक्रांतीकाराबद्दल....
*"मरावे परि क्रांतीरूपे उरावे"*
अशी उक्ती आहे. ती आद्याक्रांतीकारक उमाजी  नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते. ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले  आहेत. त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले  नाहीत. इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना  म्हंटले आहे, उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो  कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी  सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही ?
तर टोस म्हणतो, उमाजीपुढे  छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. *त्याला फाशी दिली  नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.*

   हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे...!! जर इंग्रजांनी कुटनीती  आखली नसती  तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.

   नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई  व दादोजी  खोमणे यांच्या पोटी  ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे  झाला. उमाजीचे  सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी  पार  पाडत  होते. त्यामुळेच त्यांना नाईक हि पदवी मिळाली. उमाजी जन्मापासूनच  हुशार,चंचल,शरीराने धडधाकट, उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी हेरकला लवकरच आत्मसात केली होती. जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने  दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा, तलवार, भाते, कुर्हाडी, तीरकामठी ,गोफणी चालवण्याची कला अवगत केली. या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता  स्थापन करण्यास सुरवात केली. हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात  घेतले. १८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले. आणि  त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले. सर्वप्रथम त्याने इतर सर्व  किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू  घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची  वेळ आली. जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले. अशा परिस्थतीत करारी उमाजी  बेभान  झाला. छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने  त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत  माझ्या देशावर  परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी  नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत  जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात  पहिल्या बंडाची गर्जना केली.
      इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना  लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत  करण्यास सुरवात केली. कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो  भावासारखा धावून जाऊ लागला. इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक  वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली. परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने  त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले. आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या  कारवाया आणखी वाढल्या. उमाजी देशासाठी   लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ  लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले.
     उमाजीला पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या  मामलेदारास फर्मान सोडले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या  पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात  तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला. उमाजीने ५ इंग्रज  सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच  धास्तावले. उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५ हजार सैन्य होते.

   १८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या  देखभालीसाठी जनतेला वाटला होता.
३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने  ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता  त्याने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले. २१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला  पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी  गडावरून बंदुका,गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते. आणि काहीचे प्राण  घेतले होते.
    १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने  प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या  सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि  इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना  शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार  आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार  त्यांना शासन  करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला  होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.
     मोठे सावकार, वतनदार यांना इंग्रजांनी आमिषे दाखवीले. उमाजीच्या  सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले. त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला. इंग्रजांनी  उमजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये   आणि चारशे बिघे जमीन बक्षीस  म्हणून देण्याची घोषणा केली. तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी  उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
   १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना  उमाजीला इंग्रजांनी पकडले. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.
    या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा  सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत  वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत  फासावर चढला. अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या  बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते. उमाजीबरोबर  इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.

    अशा या धाडसी उमाजीनंतर तब्बल  १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव  बळवंत फडके जन्माला आले. त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८७९ साली इंग्रजांविरुद्ध पहिले बंड केले.. त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.
   अशा या आद्याक्रांतीकारक नरवीर उमाजी नाईक यांचा आपण विसर न पाडता त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस त्रिवार अभिवादन करूयात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁शनिवार ~03/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment