"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*03/04/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/FPp9Nc
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *03.एप्रिल:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═
फाल्गुन कृ.9, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~उत्तराषाढा,
योग ~शिव, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:30, सूर्यास्त-18:53,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

03. *हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

03. *काखेत कळसा गावाला वळसा*
      *★ अर्थ ::~* - जवळचीच वस्तू लक्षात न राहिल्याने इतरत्र शोधणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

03. *शीलं परं भूषणम् ।*
           ⭐अर्थ ::~
शील (चारित्र्य) हेच श्रेष्ठ भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★03. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील ९३ वा (लीप वर्षातील ९४ वा) दिवस आहे.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० आय. एन. एस. आदित्य हे नौकांना इंधन पुरवणारे संपूर्ण भारतीय बनावटीचे वेगवान जहाज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाले.
●१९७३ : मार्टिन कूपर या मोटोरोला कंपनीतील संशोधकाने जगातील पहिला मोबाईल टेलिफोन कॉल बेल लॅब्जमधील डॉ. जोएल अँगेल याला केला.
●१९४८ : ओरिसा उच्‍च न्यायालयाची स्थापना

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६२ : जयाप्रदा – चित्रपट अभिनेत्री व संसद सदस्य
◆१९१४ : फील्ड मार्शल सॅम माणेकशा (मृत्यू: २७ जून २००८)
◆१९०४ : रामनाथ गोएंका – ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते
◆१९०३ : कमलादेवी चट्टोपाध्याय – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या (१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या
◆१८८२ : द्वारकानाथ माधव पितळे उर्फ ’नाथमाधव’ – सामाजिक व ऐतिहासिक कादंबरीकार.

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : हरकिसन मेहता – प्रसिद्ध गुजराती कादंबरीकार, ’चित्रलेखा प्रकाशन’चे मुख्य संपादक
●१९८५ : डॉ. वासुदेव विष्णू मिराशी – महामहोपाध्याय, संस्कृत विद्वान, प्राच्यविद्यासंशोधक.
●१६८० : छत्रपती शिवाजी राजे भोसले (जन्म: १९ फेब्रुवारी १६३०)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. *✸ उभवू उंच निशाण ✸*
       ●●●●●००००००●●●●●
उभवू उंच निशाण !
नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण !

दीन दीन जे, दलित दलित जे
त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान
उभवू उंच निशाण !

अंध अमानुष रूढी घालिती अखंड जगी थैमान
त्या क्रुरांना हे क्रांतिचे मूर्तिमंत अव्हान
ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान्‌
शूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ न ते बलिदान

ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकूनी राज्य महान
पुसुनी आसवें मानवतेची होती बुद्ध महान
हे समतेचे, हे ममतेचे, गांधीजीचे गान
हरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
03.  *❂ भारत अमुचा देश ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
भारत अमुचा देश, भारत अमुचा देव
'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक
भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक

आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, आम्ही हिंदी
प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठचि सर्वांमधी
दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ

धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू
उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू
विशाल भारत स्वप्‍नी त्याचा साकारू आलेख

प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, पुजु या मानवतेला
मित्र जगाचे सार्‍या होऊ, मित्र करू या त्याला
सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेख
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
03. *❃ संत बहिणाबाई ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   बहिणाबाई या विख्यात महिला संत होऊन गेल्या. एकदा त्या आपल्या बगीच्यात लावलेल्या रोपट्यांना पाणी घालत होत्या. त्यावेळी ४ विद्वान त्यांचेकडे आले आणि म्हणाले, "आम्ही या जिज्ञासेने तुमच्याकडे आलो आहोत कि आम्ही वेदांचाही अभ्यास केला आहे, विविध शास्त्रांचाही अभ्यास केला आहे. परंतु त्याचा आम्ही उपयोग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. आम्ही देशाच्या प्रगतीसाठी काही तरी करू इच्छितो. जेणेकरून देशात सर्वत्र सुख,समाधान, विकास होईल. पण हे लक्ष्य गाठण्यासाठी काय करायला हवे हे आम्हाला समजत नाही." बहिणाबाईनी चारही विद्वानांकडून त्यांच्या लक्ष्य प्राप्तीच्या बाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पहिला विद्वान म्हणाला, मी देशातील सर्वाना साक्षर आणि सभ्य पाहू इच्छितो, तर दुसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना सुखी आणि संपन्न करू इच्छितो" तिसरा विद्वान म्हणाला,"मी सर्वाना एकत्रित करून राष्ट्रऐक्य घडवू इच्छितो" तर चौथा विद्वान म्हणाला, "मला माझा देश प्रगतीशील आणि शक्तिशाली, बलाढ्य राष्ट्र झालेला बघायची इच्छा आहे. तर आता तुम्ही आम्हाला सांगा कि आम्ही काय करू जेणेकरून आमच्या चौघांच्या प्रयत्नाने देश प्रगती करेल." बहिणाबाई म्हणाल्या,"तुम्ही चौघे मिळून शिक्षणाचा प्रसार करा." विद्वान हैराण झाले कि आपण देशाच्या प्रगतीचे बोलतो आहोत आणि बहिणाबाई शिक्षणाबद्दल बोलत आहेत हे कसे होऊ शकते. तेंव्हा त्यांची झालेली वैचारिक कोंडी जाणून बहिणाबाई म्हणाल्या,"शिक्षणाने ज्ञान आणि विवेकाची प्राप्ती होते, शिक्षणाने उद्योगशीलता वाढते, त्यातून देशाची आवक वाढते, आर्थिक सक्षमता आल्याने एकता प्रस्थापित होते, तेंव्हा राष्ट्र शक्तिशाली बनते." बहिणाबाई यांचा संदेश आपल्या हृदयात साठवून चौघे चार दिशेला शिक्षण प्रसार करण्यास निघून गेले.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   *शिक्षणाने सर्व काही साध्य होते, "शिकाल तर टिकाल "*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
03.   *_प्रत्येक कणात देव_*
*_असतो, मग तुंम्ही मंदिरात का जाता?_*
       👌🏻 खुप सुंदर उत्तर 👌🏻
   वारा तर उन्हातही वाहतो, पण त्याचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो तसेच देव सगळीकडे असतो,
*परंतु त्याचा आनंद मंदिरातच मिळतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
03. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  आपल्या भारत देशाचे राष्ट्रगीत हे सर्वप्रथम कोठे गायले गेले ?
➜ भारतीय राष्ट्रीय कोंग्रेसच्या अधिवेशनात.(कोलकत्ता)

✪ 'ग्राम गणराज्य' ची संकल्पना कोणाची होती ?
➜ महात्मा गांधी.

✪ भारत देशातील चिनीमातीचे उत्पादन कोठे होते ?
➜ केरळ,सिंगभुम.(झारखंड)

✪ भारत देशाच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशाची संख्या किती ?
➜ सात.

✪ सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?
➜ नर्मदा.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
19. *❒ शिवाजी शहाजी भोसले ❒*
         ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
इतिहासाच्या पानावर, रयते च्या मनावर...
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या
प्रमाणावर...
राज्य करणारा राजा म्हणजे
       *राजा शिवछत्रपती*
    *यांना मानाचा मुजरा...!!*

🔹जन्म :~ १९ फेब्रुवारी १६३०
           शिवनेरी किल्ला, पुणे

🔸मृत्यू :~ ३ एप्रिल १६८० रायगड

🔹राज्याभिषेक :~ ६ जून १६७४
         ★ अधिकारकाळ :~
【६ जून १६७४ ते ३ एप्रिल १६८०】
         ★ राज्यव्याप्ती :~
पश्चिममहाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासून दक्षिण भारतात तंजावरपर्यंत

🔸राजधानी :~ रायगड किल्ला
🔹वडील :~ शहाजीराजे भोसले
🔸आई :~ जिजाबाई

         💥 _*राजब्रीदवाक्य*_ 💥
_'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'_

     *छत्रपती शिवाजीराजे भोसले*

   🔶 हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणार्‍या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.

   🔷महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी महाराज हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजी महाराजांचा जन्मदिवस हा ’शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजआणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजी महाराज्यांच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.

    🔶शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. विएतनामच्या युद्धात शिवकालिन् गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करुन् अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.

             💥 _*जन्म*_ 💥
*शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ*

   🔷पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजी महाराजांची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली.त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते.

  🔷 इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ बुधवार~ 03/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment