"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*03/06/19 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

 *Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━

*❁ दिनांक :~ 03/06/2019 ❁*
      *🔘 वार ~ सोमवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲◆🇸◆🇵●═━━

    🍥 *03. जून:: सोमवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
          वैशाख अमावस्या,
            नक्षत्र : रोहिणी,
      योग : सुकर्म,  करण : नाग,
सूर्योदय : 06:00,  सूर्यास्त : 19:13,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

03. *लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहवं लागतं.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

03.  *हपापाचा माल गपापा*
            ★ अर्थ ::~
 फुकटचे मिळालेले फुकटच जाते
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. *विद्यारत्नं महद्धनम् ।"*
            ⭐अर्थ ::~
 विद्यारूपी रत्न हे एक मोठे धन आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

     🛡 *★03. जून★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील १५४ वा (लीप वर्षातील १५५ वा) दिवस आहे. 

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९८ : जमिनीवरील व हवेतील लक्ष्यावर मारा करणार्‍या ’त्रिशूल’ या क्षेपणास्त्राची ’द्रोणाचार्य’ या युद्धनौकेवरुन कोचीजवळ यशस्वी चाचणी
●१९८४ : ’ऑपरेशन ब्लू स्टार’ – भारतीय सैन्याने सुवर्णमंदिरात लपुन बसलेल्या अतिरेक्यांना हुसकावून लावण्यासाठी सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
●१९५० : मॉरिस हेर्झॉग आणि लुईस लॅचेनल यांनी ’अन्‍नपूर्णा’ या ८,०९१ मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
●१९४७ : हिन्दूस्तानच्या फाळणीची ’मांउंटबॅटन योजना’ जाहीर झाली.
●१९१६ : महर्षि कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
●१८१८ : मराठेशाहीचा अस्त – शेवटचा पेशवा बाजीराव हा मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाला आणि त्याने मराठी राज्याचे उदक इंग्रजांच्या हातावर सोडले. शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
     🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६६ : वासिम अक्रम – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान व जलदगती गोलंदाज
◆१९२४ : एम. करुणानिधी – तामिळनाडूचे १५ वे मुख्यमंत्री
◆१८९२ : आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका
◆१८९० : बाबूराव पेंटर – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, चित्रकार, शिल्पकार आणि ’कलामहर्षी
◆१८९० : खान अब्दुल गफार खान तथा ’सरहद गांधी’

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
     🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१० : अजय सरपोतदार – मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष
●१९९७ : रतन पेडणेकर ऊर्फ मीनाक्षी शिरोडकर – चित्रपट व नाट्य अभिनेत्री,
●१९५६ : वामन गोपाळ तथा ’वीर वामनराव’ जोशी – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, ’राष्ट्रमत’ आणि ’स्वतंत्र हिन्दुस्तान’चे संपादक, लेखक 
●१९३२ : सर दोराबजी टाटा – उद्योगपती व लोकहितबुद्धी
●१६५७ : विल्यम हार्वी – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारा इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

03. *❃❝ म्हातारा आणि तरूण ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
    एक अविचारी तरूण रस्त्याने चालला असता म्हातारपणामुळे त्याचे शरीर धनुष्यासारखे वाकले आहे.
          असा एक माणुस त्याला दिसला तेव्हा तो त्या म्हाता-याला म्हणाला,'बाबा तूमचं हे धनुष्य मला विकत देता का?
          म्हातारा त्यावर म्हणाला,' तूम्ही पैसे खर्च करून धनुष्य विकत घेण्यापेक्षा थोडे थांबाल तर बिनपैशाचे असंच धनुष्य तूम्हाला मिळेल,कारण तूम्हाला म्हातारपण आलं म्हणजे तुमच्याही शरीराचंअसंच धनुष्य होणार आहे.
         हे ऐकताच तो तरूण माणुस खाली मान घालून  निमुटपणे चालता झाला.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   माणसाला म्हातारपणामुळे निर्माण झालेल्या वैगुण्याबद्दल त्याची चेष्टा करून त्यात आनंद मानने हे माणुसकीचं लक्षण नव्हे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. स्वत:चा आत्मविश्वास वाढवायचा
असेल तर स्वत:विषयीच्या सकारात्मक बाबिंचेच चिंतन
   सतत केले पाहिजे...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. *✿ सामान्य ज्ञान भारत ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
■  *जगातील अभ्रकाच्या एकूण साठ्यापैकी किती टक्के साठे भारतात आहे ?*
● 60%( अभ्रकाच्या उत्पादनात भारताचा जगात प्रथम क्रमांक लागतो.)

■  *बनरघट्टा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे ?*
● बंगळूर (कर्नाटक)

■  *रंगनथिट्टू अभयारण्य कोठे आहे?*
● म्हैसूर (कर्नाटक)

■ *भारतात क्षेत्रफळानुसार एकूण जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात सर्वाधिक आहे ?*
● सिक्किम ( 82.31%)

■ *भारतातील सर्वाधिक उंचिचे धरण कोणते ?*
● भाक्रा-नानगल(227 मीटर)

■ *सर्व प्रथम एव्हरेस्ट शिखर सर करणारा गिर्यारोहक कोण ?*
ANS- शेर्पा नाॅर्गे (29 मे 1953)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

03. *❒ वामन गोपाळ जोशी ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १८ मार्च १८८१
●मृत्यू :~ ३ जून, १९५६

     हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक, मराठी नाटककार, कवी आणि पत्रकार होते.

        ★ वामन गोपाळ जोशी ★
     हे मूळचे समशेरपूरचे होते. त्यांचे शिक्षण मराठी सातवीपर्यंत झाले होते. शिक्षणासाठी नाशिकला गेले असतांना त्यांची गाठ तिथल्या गुप्त क्रांतिकारकांशी पडली, आणि वामनराव जोश्यांनी देशसेवेचा विडा उचलला. शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी स्वदेशी आणि बहिष्काराची शपथ घेतली. त्यातूनच बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी घेतले. अहमदनगर शहरातील गुजर गल्लीत बाँब बनविण्याचे प्रशिक्षण देण्याचे कामही त्यांनी सुरू केले.

    अनंत कान्हेरे, वामनराव जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी इंग्रज कलेक्टर जॅक्सनच्या खुनाची योजना आखली. २३ डिसेंबर, १९०९ रोजी जॅक्सनवर गोळ्या झाडून त्याचा खून केला. या प्रकरणी इंग्रजांनी ७ आरोपींवर खटला चालविला. आरोपींत त्यावेळी अकोल्यात असलेले वामनराव जोशी हे एक होते. त्यांना २५ वर्षाच्या जन्मठेपेची शिक्षा झाली. मे, इ.स. १९२२ मध्ये त्यांची सुटका झाली. परंतु स्वस्थ न बसता ते इ.स. १९३० च्या जंगल सत्याग्रहात अग्रभागी राहिले. महात्मा गांधींच्या  चळवळीतही त्यांचा सहभाग होता. स्वातंत्र्योत्तर काळात हलाखीची आर्थिक स्थिती असताना इ.स. १९५६ साली भारत सरकारने स्वदेशसेवेसाठी त्यांना ४,५०० रुपये इतके मानधन दिले होते. तेही त्यांनी निस्पृहपणे शासनाला परत केले होते.

   त्यांच्या राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकावर ब्रिटिश भारतीय शासनाने बंदी घातली होती. आयुष्याच्या उत्तरार्धात ते अमरावतीला स्थायिक झाले होते.

   वामनराव जोशी यांच्या नावाने अमरावतीत वीर वामनराव जोशी खुले रंगमंदिर नावाचे नाट्यगृह आहे. त्यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. या व्यायामशाळेने १९३६ साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता. दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृती हजर होते. सिद्धनाथ काण्यांच्या आग्रहास्तव संघाच्या पथसंचालनाच्या वेळी ’गॉड सेव्ह द किंग’ऐवजी ’वंदे मातरम्’ हे गीत वाजवण्यात आले. हे राष्ट्रप्रेम पाहून हिटलरने स्वत: डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांना प्लॅटिनम मेडल व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. संघाच्या जाण्यायेण्याचा आणि जर्मनी राहण्याचा सर्व खर्च औंध संस्थानचे अधिपती श्रीमंत पंतप्रतिनिधी यांनी केला होता. वीर वामनराव जोशींमुळेच महात्मा गांधी, राजगुरू, सुभाषचंद्र बोस यांनी या हनुमान आखाड्याला भेट दिली होती.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ सोमवार ~ 03/06/2019❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment