"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*03/09/24 मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *03. सप्टेंबर:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
      श्रावण अमावस्या
   नक्षत्र ~पूर्वाफाल्गुनी,
योग ~सिद्ध,करण ~नाग,
सूर्योदय-06:23 सूर्यास्त-18:51,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

03. *नशिबावर नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

03. *हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये*-
   *★ अर्थ ::~* दूरचे मिळण्याच्या आशेने जवळचे गमावू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

03.    *दुर्जनः परिहर्तव्यः*
     *विद्ययाऽलंकृतोऽपि सन् ।*
★अर्थ :~ दुर्जन हा विद्यायुक्त असला तरी त्याला दूर ठेवले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

  🛡 *★ 03. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २४६ वा (लीप वर्षातील २४७ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७१ : कतारला स्वातंत्र्य मिळाले.
●१९१६ : श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली.
●१७५२ : अमेरिकेत ग्रेगरीयन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.

   ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९७६ : विवेक ओबेरॉय – अभिनेता
◆१९४० : प्यारेलाल रामप्रसाद शर्मा –चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार
◆१९३१ : श्याम फडके – नाटककार
◆१९२३ : *कृष्णराव तथा ’शाहीर’ साबळे – महाराष्ट्र शाहीर*
◆१९२३ : किशन महाराज – तबलावादक
◆१८६९ : फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ

    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर – स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती
●१९६७ : अनंत हरी गद्रे तथा समतानंद –वार्ताहर,संपादक,थोर समाजसुधारक
●१९५८ : माधव केशव काटदरे – निसर्गकवी
●१९५३ : लक्ष्मण तथा ’खाप्रुमामा’ पर्वतकर – तबला, घुमट व सारंगीवादक. गोव्यातील ’घुमट’ हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/GP1pTx
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

03.  *✸ शौर्याची तव परंपरा.. ✸*
    ●●●●००००००●●●●
शौर्याची तव परंपरा!
महाराष्ट्रा वळुनि बघ जरा---

शिवबाच्या कीर्तीचे झडति चौघडे
गडकिल्ले अजुनीही गाति पवाडे---
दरि खोरे वीरकथा सांगे पठारा॥

सिंहगडीं अमरपदीं ताना पहुडला---
अन्याया तुडवित संताजि दौडला
आंग्रयांनी जागविले अरबी सागरा ॥--

चांदबिबी, लक्ष्मीनें खड्‌ग पेललें
तात्यानें समरावर वार झेलले---उमाजीनें डोंगरांत केला पुकारा ॥

वासुदेव ङ्गडक्यांना ङ्गांस---
लोकमान्य टिळकांचे सिंह गर्जले
सत्यास्तव ज्योतिबांनी केले संगरा ॥

परशराम, बाबु गेनू, वीर कोतवाल
छातीवर गोळी झेली हसत बिंदुबाळ--
बेचाळीस क्रांतीचा शूर सातारा ॥

लाखोंनी देशास्तव अर्पियले प्राण---गाति कोयना, कृष्णा त्यांचें कीर्तिगान
सह्याद्री अभिमानें ङ्गुलवि पिसारा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

03. *❂ गगनसदन तेजोमय ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
गगनसदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जगजीवन जनन-मरण
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकलशरण मनमोहन
सृजन तूच, तूच विलय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

03.    *❃❝ सत्कृत्य ❞❃*
  ━━•●◆●★●◆●•━━
    एका वनात एक पारधी राहत होता. त्‍याने खूप वन्‍य प्राण्‍यांची हत्‍या केली होती. त्‍यामुळे तो खूप पापी झाला होता. त्‍याची चाहूल लागली तरी वन्‍यप्राणी भीतीने प्राणी थरथर कापत असत. एकेदिवशी तो आपल्‍या शिकारीच्‍या शोधात असताना एका बेलपत्राच्‍या झाडावर चढला. खूप वेळ झाला तरी एकही शिकार त्‍याच्‍या हाती लागली नाही. तो खूप चिडला व बेलपत्राच्‍या झाडाचे एक एक पान खाली टाकू लागला. बराच वेळ हा त्‍याचा उद्योग चालू होता. झाडाच्‍या बुंध्‍याशी बेलपत्राचा हा मोठा ढीग तयार झाला पण हे पारध्‍याला माहित नव्‍हते. त्‍या झाडाखाली एक महादेवाची पिंड होती. त्‍या पिंडीवर बेलाच्‍या पानांचा ढीग पाहून महादेव प्रसन्‍न झाले व ते पारध्‍याच्‍या समोर प्रकट झाले. त्‍यांना समोर पाहून पारधी आश्‍चर्यचकित झाला व म्‍हणाला,''महादेवा, मी खूप क्रूर आहे, अनेक वन्‍यप्राणी मारले आहेत, खूप हिंसा केली आहे, पाप खूप केले पण पुण्‍याचे एकही काम केलेले मला तरी आठवत नाही तरी पण आपण मला कसे बरे प्रसन्‍न झालात?" यावर महादेव म्‍हणाले,''तू हिंसक आहेस, तुझ्या नकळत का होईना तू माझी पूजा केली आहेस. पूजा-प्रार्थना हे असे काम आहे की ते चुकून जरी घडले तरी त्‍याचे चांगलेच फळ मिळते. जर चुकून प्रार्थनेचे फळ इतके चांगले मिळत असेल तर नेहमी तर सत्‍कार्य केलेस तर किती फळ मिळेल? पारध्‍याला आपली चूक समजली व त्‍याने आयुष्‍यभर कष्‍ट करून जीवन जगला.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  एका सत्कृत्यामुळे देखिल आपले आयुष्य बदलून जाऊ शकते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

03. झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो " कचरा " साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः"कचरा" होवून जातो.

    *त्यामुळे एकत्र रहा, एकमेकांवर प्रेम करा, एकमेकांचा आदर करा, एकमेकांना मदत करा यातच आयुष्याचा खरा आनंद आहे...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
03. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  महाराष्ट्रातील तलावाचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?
  ➜ भंडारा.

✪  नागपूर कोणत्या फळाकरिता प्रसिद्ध आहे ?
  ➜संत्री.

✪  महाराष्ट्रातील काळी मृदा कोणत्या खडकापासून निर्माण झालेली आहे ?
  ➜ बेसाॅल्ट.

  ✪ महाराष्ट्रातील कोणत्या भागात आर्थिक दृष्ट्या संपन्न अशी वने आहेत ?
  ➜विदर्भ.

✪  महाराष्ट्रात सर्वांत जास्त अरण्याचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
  ➜ गडचिरोली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

03.  *❒ शाहीर साबळे ❒* 
     ━━•●◆●●◆●•═━
*"जय जय महाराष्ट्र माझा"*  हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत गायनारे
     *_"यांच्या जयंती निमित्त_*
        *_विनम्र अभिवादन"_*
     🌹🌷🌺🏵🌺🌷🌹
*●जन्म :~ ३ सप्टेंबर, १९२३*
             पसरणी-सातारा जिल्हा,
●मृत्यू :~ २० मार्च, २०१५, मुंबई

           शाहीर साबळे उर्फ
     कृष्णराव गणपतराव साबळे
 
        हे एक मराठी लोकशाहीर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे भारताच्या स्वातंत्र्यचळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झालेल्या चळवळीत शाहीर म्हणून फार मोठे योगदान आहे.. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे महाराष्ट्र राज्याभिमानगीत आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या प्रयोगांसाठी ते प्रामुख्याने ओळखले जात. मुक्त नाट्याचे ते आद्य प्रवर्तक समजले जातात. शाहीर साबळे हे कवी-गीतकार-संगीतकार, गायक, कुशल ढोलकी वादक, अभिनेते-दिग्दर्शक तसेच उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. ‘महाराष्ट्राची लोकधारा’द्वारे त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख आणि प्रसिद्धी केली. त्यांचे ’गर्जा महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचवले.

  ♦सामाजिक व राजकीय कारकीर्द

     शाहीर साबळे यांनी सामाजिक कार्यात बालपणीच सहभाग घेतला होता. अंमळनेरला असताना साबळे यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. पुढे मोठेपणीही चळवळीत त्यांना गुरुजींचा आशीर्वाद मिळाला. साने गुरुजींच्या अनेक सामाजिक कार्यात साबळ्यांचा सक्रिय सहभाग असे. पसरणी गावात भैरवनाथाच्या मंदिरात हरिजनांना प्रवेश देण्यासाठी गावातील तरुण मंडळींबरोबर त्यांनी पुढाकार घेतला. या वेळी साने गुरुजींबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील, सेनापती बापट व क्रांतिसिंह नाना पाटील या मंदिर प्रवेश प्रसंगी उपस्थित होते. साने गुरुजींच्या सहवासात आलेल्या साबळे यांना राष्ट्रभक्तीची प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतही भाग घेतला.

    पुढे तरुणपणी १९४२ची चलेजाव चळवळ, गोवा व हैद्राबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा अनेक आंदोलनांसह दारुबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ अशा सामाजिक कामांतही त्यांंनी स्वत:ला झोकून दिले होते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या कलापथकाने दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा स्वत:चा तसेच त्यांच्या 'आंधळं दळतंय' या प्रहसनाचा मोलाचा वाटा होता.

     *🔷शाहीर साबळे ही संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती 'तोफ' होती..*

          ◆ स्वातंत्र्य आंदोलन ◆
     १९४२मध्ये शाहीर साबळे स्वदेशी मिलमधे नोकरीला लागले, पण तिथेही रमले नाहीत. त्यांनी नोकरी सोडली आणि ते साने गुरुजींबरोबर त्यांच्या राष्ट्रीय कार्यक्रमांत सामील होऊ लागले. त्यांच्याच आशीर्वादाने साबळेंनी ’शाहीर साबळे आणि पार्टी’ स्थापन केली.

  *_शाहीर साबळयांनी गायलेली आणि लोकप्रिय झालेली गीते _*
🔸अरे कृष्णा हरे कान्हा (तमाशा गीत)
🔹अशी ही थट्टा (तमाशागीत)
🔸आज पेटली उत्तर सीमा
(देशभक्तिपर गीत)
🔹आठशे खिडक्‍या नऊशे दारं (लोकगीत)
🔸आम्ही गोंधळी गोंधळी.. (गोंधळगीत)
🔹जय जय महाराष्ट्र माझा (महाराष्ट्रगीत)
🔸जेजुरीच्या खंडेराया जागराला (जागरगीत)
🔹नवलाईचा हिंदुस्थान
🔸मल्हार वारी मोतीयाने द्यावी भरून (भक्तिगीत)
🔹महाराज गौरीनंदना (गण)
🔸महाराष्ट्र जय महाराष्ट्र (स्फूर्तिगीत)
🔹मुंबावतीची लावणी
🔸या विठूचा गजर हरिनामाचा (भक्तिगीत)
🔹विंचू चावला (भारूड)
🔸सैनिक माझे नाव (स्फूर्तिगीत)

*_मिळालेले सन्मान आणि पुरस्कार_*
💧अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेचे अध्यक्षपद
💧अखिल भारतीय मराठी नाट्य
संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर
💧भारत सरकारतर्फे पद्मश्री मिळवणारे पहिले शाहीर
💧भारतीय शांतिदूत मंडळाचे प्रतिनिधी म्हणून रशियाचा दौरा करणार्‍या पथकात सहभाग
💧महाराष्ट्र सरकारचा पहिला शाहीर अमर शेख पुरस्कार
💧दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार
💧संत नामदेव पुरस्कार
💧महाराष्ट्र गौरव पुरस्कार
💧पुणे महापालिकेचा शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार
💧१९५४-५५ मध्ये हिज मास्टर्स व्हॉईस ग्रामोफोन रेकॉर्ड कंपनीचे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून महंमद रफींबरोबर नाव झळकलेले कलावंत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁मंगळवार ~03/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment