*03/10/24 गुरूवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *03.ऑक्टोबर:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.१, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~हस्त, 
योग ~इन्द्र, करण ~किंस्तुघ्न, 
सूर्योदय-06:29, सूर्यास्त-18:25
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
🔵🟢🔴
03.  सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●=🇲=◆=🇸=◆=🇵=●••
03. *नव्याचे नऊ दिवस –*
  ★ अर्थ ::~ नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
••●=🇲=◆=🇸=◆=🇵=●••
03.   *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
             ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●=🇲=◆=🇸=◆=🇵=●••
     🛡 *03. ऑक्टोबर* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २७६ वा (लीप वर्षातील २७७ वा) दिवस आहे.
  ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९०	:	पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनीचे एकत्रीकरण झाले.
●१९३२	:	इराकला (युनायटेड किंग्डमपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
●१७७८	:	ब्रिटिश दर्यावर्दी कॅप्टन जेम्स कूक अलास्का येथे पोहोचला.
●१६७०	:	शिवाजी महाराजांनी दुसर्यांदा सुरत लुटली.
 ~*★जन्मदिवस / जयंती★*~
  🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९४९	:	नेते प्रमोद महाजन – भारतीय जनता पक्षातील दुसऱ्या पिढीतील महत्त्वाचे नेते होते.
◆१९१९	:	जेम्स बुकॅनन – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थतज्ञ 
◆१९०७	:	नरहर शेषराव पोहनेरकर – निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे 
◆१९०३	:	स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (मृत्यू: २२ जाने.१९७२)
 ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२	:	केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर (जन्म: २४ आक्टोबर १९२६)
●१९५९	:	दत्तात्रय तुकाराम तथा ’दत्तू’ बांदेकर ऊर्फ ’सख्याहरी’ – विनोदी लेखक, विडंबनकार व स्तंभलेखक 
●१८९१	:	एडवर्ड लूकास – फ्रेन्च गणिती 
●१८६७	:	एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/GP1pTx
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━
03.  *अजिंक्य भारत अजिंक्य*
       🇮🇳🔺🇮🇳♦🇮🇳🔺🇮🇳
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे
मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे
भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे
इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
••●=🇲=◆=🇸=◆=🇵=●••
03.  *देह मंदिर चित्तमंदिर*
     ==••◆◆●★●◆◆••==
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
दु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
जीवनी नवतेज राहो अंतरंगी भावना
सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
भेद सारे मावळू द्या वैर सार्या वासना
मानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधना
सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●=🇲=◆=🇸=◆=🇵=●••
03.     *💠 विश्वासघात* 💠
       •◆•◆•◆★◆•◆•◆•
   एक माणूस जंगलात शिकारीला गेला होता. त्या दिवशी शिकार काही मिळाली नाही. शेवटी तहान लागली म्हणून पाणी पिण्यासाठी तो जंगलातल्या तळ्यावर थांबला. हातातला तीर कामठा खाली ठेवून तो पाणी प्यायला लागला, एवढयात समोरून वाघ येताना त्याला दिसला. तो भीतीने पळायला लागला. वाघ पाठीमागे येतोय, हे बघून त्यांन जवळच्या झाडावर चढायला सुरुवात केली. पण झाडावर आधीच चढून बसलेलं अस्वल बघून त्याची भीतीने गाळण उडाली. वर अस्वल, खाली वाघ! आता काय करायचं ? 
तेवढयात अस्वल त्याला म्हणाला, "घाबरु नको. वर ये. मी तुला काही करणार नाही. मी वाघापासून जीव वाचविण्यासाठीच इथे आलोय."
माणूस मग वर गेला. वाघ मात्र झाडाखाली बसून होता. रात्र झाली तशी माणसाला झोप लागली. हे बघून वाघ अस्वलाला म्हणाला,   "हा परका माणूस. त्याला खाली ढकलून दे. माझी भूक भागली की मी तुला काही करणार नाही."  पण अस्वलानं तसं केलं नाही. 
थोड्या वेळानं माणसाला जाग आली. मग अस्वलानं जरा डोळे मिटले. वाघानं ही संधी साधली. तो माणसाला म्हणाला,  "अस्वलाला खाली ढकल. माझी भूक भागेल आणि तुझा जीव वाचेल." 
    माणसानं क्षणाचाही विचार न करता अस्वलाला धक्का दिला. सुदैवाने अस्वलानं पंजानं फांदीला घट्ट पकडले होते. त्यामुळे ते पडलं नाही व फांदी हालून माणूस वाघाच्या तावडीत पडला. 
    पण त्याला माणसाचा विश्वासघातकी स्वभाव कळला. ते म्हणालं, 
"मी तुझ्याशी दगा केला नाही. परंतु तू मात्र मला  फसवलस.
      सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणा-या असतात, याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण  आयुष्यभर संपत नाही..!!
        *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
 पाठीत खंजीर खुपसुन...
       कोणाचेही भले झाले नाही.
     ज्याचे कर्म चांगले आहे...
            तो कधी संपत नसतो..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====
03. खूप कमी लोक आपल्या
 आयुष्यात सुख आणि 
      आशीर्वाद घेऊन येतात…!!
 पण खूप जास्त लोक आपल्याला
       कटू अनुभव आणि
 शिकवण देण्यासाठी येतात…!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   🔴 सामान्य ज्ञान 🔴*
====••◆◆●★●◆◆••====
03. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
  ✪ 'कायमधारा पद्धती' कोणत्या गव्हर्नरने सुरू केली ?
 ➜ लाॅर्ड काॅर्नवालीस.
 ✪  भारतातील सर्वांत जुने विद्यापीठ कोणते ?
  ➜ कोलकाता.
 ✪  प्रांतांना कोणत्या कायद्याने स्वायत्तता मिळाली ?
  ➜ १९३५ चा कायदा.
 ✪  महात्मा गांधीनी सुरू केलेली पहिली चळवळ कोणती ?
  ➜ चंपारण्य.
 ✪  भारत छोडो आंदोलन केव्हा सुरू झाले ?
  ➜ ८ ऑक्टोबर १९४२.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
  *❒♦नेते प्रमोद महाजन ♦❒*  
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ३ ऑक्टोबर १९४९ (आंध्र प्रदेश)
●मृत्यु :~  ३ मे २००६ (मुंबई)
भाजपचे नेते प्रमोद महाजन हे महत्त्वाकांक्षी व आधुनिक जागतिक विचाराचे राजकारणी नेते होते. ते भारतीय जनता पक्षातील दुसऱ्या पिढीतील महत्त्वाचे नेते होते. भारताच्या पंतप्रधानपदावर जाण्याची योग्यता असलेला अलिकडच्या काळातील एकमेव मराठी नेता अशी त्यांची प्रतिमा होती. महाराष्ट्रातील सेना भाजप युतीचे ते शिल्पकार होते. भाजपचे महाराष्ट्रातील कार्यकर्ते तर प्रमोदजीना भावी पंतप्रधान ह्या स्वरुपात पाहत असत. त्यांचे बालपण अंबाजोगाईत गेले. २१ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.
त्यांचे शिक्षण योगेश्वरी विद्यालय आणि महाविद्यालय आणि रानडे पत्रकारिता या संस्थांत झाले. त्यांनी भौतिकशास्त्र आणि पत्रकारितेमध्ये पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली. नाटकांच्या सामायिक आवडीमुळे परिचय झालेल्या रेखा हमीने यांच्याशी ११ मार्च १९७२ रोजी त्यांचे लग्न झाले.
खोलेश्वर महाविद्यालयात इंग्लिशच्या अध्यापनाचे काम १९७१ पासून १९७४ पर्यंत केले. आणीबाणीच्या काळात प्रमोद महाजन सक्रिय राजकारणात उतरले. प्रमोद महाजन यांनी १९९६ मधील १३ दिवसांच्या वाजपेयी शासनामध्ये संरक्षणमंत्रिपद सांभाळले. १९९८ साली परत सत्ता आल्यावर ते प्रधानमंत्र्याचे सल्लागार तसेच केंद्रीय मंत्री होते.
प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन जोडगोळीने मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिगम महाराष्ट्र अक्षरश: पिंजून काढला होता. जनसंघाच्या मिणमिणत्या पणतीपासून भाजपला राष्ट्रीय पातळीवर नेण्याचे मोठे काम मुंडे-महाजन या जोडगोळीने केले.
अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रमोद महाजन विषयी सांगितले होते कि, “जरी प्रमोद महाजन बीजेपी मध्ये नसते तरीही ते, भारतातील असंख्य सामान्य युवकांना प्रेरणास्थान राहिले असते.
घरगुती वादातून प्रवीण महाजन या त्यांच्या भावाने ३ मे २००६ रोजी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
 *❁गुरूवार~03/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment