"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*03/11/19 रविवारचा परीपाठ*
   ◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ💲🅿꧂❀*
*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर सर्व आवश्यक ज्ञानवर्धक उपयुक्त माहीतीसाठी...*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
 ━━═•●◆❃❂❃◆●•═━━

 *🍥03.नोव्हेंबर:: रविवार🍥*
 ━━═•◆❃❂❃◆•═━━
          कार्तिक शु. ७
     तिथी : शुक्ल पक्ष सप्तमी,
         नक्षत्र : उत्तराषाढा,
      योग : ध्रुति, करण : गर,
सूर्योदय : 06:39, सूर्यास्त : 18:04,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

03. *काळ हा सर्वांचा न्याय निवाडा करणारा न्यायाधीश आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

03. *झाकली मूठ सव्वा लाखाची –*
  ★ अर्थ ::~ दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. *विद्या गुरूणां गुरु: ।*
      ⭐अर्थ ::~
 विद्या गुरुजनांनाही पूज्य आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

   🛡 ★ 03. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★जागतिक औद्योगिक सुरक्षितता दिन
★हा या वर्षातील ३०७ वा (लीप वर्षातील ३०८ वा) दिवस आहे.
★पनामा, डॉमिनिका व मायक्रोनेशियाचा स्वातंत्र्यदिन
★संस्कृती दिन – जपान
     
        ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९५७ : रशियाच्या ’स्पुटनिक-२’ या अंतराळयानातून गेलेली ’लायका’ नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
●१९१३ : अमेरिकेत ’आय कर’ सुरू झाला.
●१८३८ : ’द टाइम्स ऑफ इंडिया’ हे जगातील सर्वाधिक खपाचे इंग्लिश दैनिक ’द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५४ : लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता
◆१९३७ : लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार
◆१९३३ : अमर्त्य सेन – कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते (१९९८) अर्थशास्त्रज्ञ
◆१९०१ : पृथ्वीराज कपूर – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक
◆१६८८ : सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : कैलाशपती मिश्रा – गुजरातचे राज्यपाल
●१९९२ : प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते
●१८१९ : अनंत फंदी – शाहीर, ’फटका’कार, गोंधळी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొ
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. *✸ सत्य शिवाहुन सुंदर हे ✸*
        ●●●●●००००००●●●●●
दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे

इथे मोल ना दामाचे, मोती होतिल घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे

चिराचिरा हा घडवावा, कळस कीर्तिचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे

त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. *❂ अविरत पुढे पुढे जाऊ ❂*
     ━━═●✶✹★●★✹✶●═━━
अविरत पुढे पुढे जाऊ
अम्हि ना विश्रांति आता घेऊ॥धृ॥

उध्दराया पूर्वज शापित घोर आचरुनि तप हे अविरत
मुक्ति मिळवुनी देइ भगीरथ सातत्याने भगीरथाच्या
पुढे पुढे जाऊ॥१॥

शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारूण
जाई वानरासह रघुनंदन त्या धैर्याने रघुरायच्या
पुढे पुढे जाऊ॥२॥

स्वर्गी तो देवेन्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनि उचलला चातुर्याने श्रीकृष्णाच्या
पुढे पुढे जाऊ॥३॥

धुमाकुळ यवनांचा चाले आवर घाली शिवराय बळे
घेवुनि संगे मित्र मावळे त्या शिवराया साक्ष ठेवुनी
पुढे पुढे जाऊ॥४॥

सातत्याच्या अन् धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमिच्या उध्दाराच्या महाजनांच्या त्याच पथाने
पुढे पुढे जाऊ॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

03.  *❃❝ मोर आणि बगळा ❞❃*
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     एका मोराने बगळ्याला पाहून आपला सुंदर पिसारा फुलवला व हा कोणी फालतू प्राणी आहे असे मनात आणून त्याला तो आपल्या रंगीत पिसार्‍याचे सौंदर्य दाखवू लागला.

       त्याचा गर्व कमी व्हावा म्हणून बगळा त्याला म्हणाला,

       'अरे, सुंदर पिसं हे तुझ्या मोठेपणाचे लक्षण असतं तर.....

      तुमची जात श्रेष्ठ आहे हे मी कबूल केलं असतं.

     पण मला वाटतं जमिनीवर चालून खेळ खेळण्यात,
             अन् नाचण्यापेक्षा....
       आकाशात फिरण्याची शक्ती असणं हेच खरं मोठेपणाचं आहे !'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    आपल्या अंगी असलेला गुण दुसर्‍याजवळ नसला म्हणजे त्याला हिणवावे असे जर असेल तर दुसर्‍याजवळच्या गुणासाठी त्याने आपल्याला का हिणवू नये ? सगळेच गुण एकाच माणसाजवळ असतात असे नाही म्हणून कोणी कोणास हिणवू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03.  *"ताकदीची"* गरज त्यांनाच 
     लागते ज्यांना काही
   "वाईट" करायचे असते,

 *नाहीतर जगात* सर्व काही मिळवायला फक्त "प्रेमच" पुरेसे असते,

      *कारण "प्रेमानेच*"
        जग जिंकता येते "!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

03. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
       ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
 ■ बल्लारपूर कागद गिरणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
   ➜ चंद्रपूर

 ■ राज्यातील पहिले कायम स्वरूपी बाल न्यायालय खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात सुरु करण्यात आले आहे ?
   ➜ नाशिक

 ■ पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली ?
   ➜ डॉ. बाबासाहेब आंबेडकर

 ■ खालील पैकी कोणते शहर महाराष्ट्राचा 'हरित पट्टा' म्हणून ओळखले जाते
   ➜ नाशिक

 ■ 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती ?
   ➜ 7 वी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ व्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

03. *❒ ♦लक्ष्मीकांत बेर्डे♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
*●जन्म :~ ३ नोव्हेंबर १९५४*
         मुंबई, महाराष्ट्र
●मृत्यू :~ १६ डिसेंबर २००४
         मुंबई, महाराष्ट्र
◆इतर नावे ~ लक्ष्या , हास्यसम्राट
◆कार्यक्षेत्र~ मराठी/हिंदी चित्रपट,

            *💠लक्ष्मीकांत बेर्डे*
     🏵हा मराठी चित्रपटांमधील व नाटकांमधील एक प्रसिद्ध अभिनेता होता. आपल्या कारकिर्दीत त्याने मुख्यतः विनोदी भूमिका साकारल्या. सहज विनोदी अभिनयामुळे ते विनोदी अभिनेते म्हणून नावारूपाला आले.

  🏵 लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच चित्तवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे. त्यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होते. शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांतने मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. १९८३-८४ मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या "टूर टूर" ह्या नाटकामधे प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

    🏵लेक चालली सासरला या चित्रपटाद्वारे प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत त्याने इ.स. १९८५ साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने भूमिका साकारलेले धुमधडाका (इ.स. १९८५), अशी ही बनवाबनवी (इ.स. १९८८) व थरथराट (इ.स. १९८९) हे चित्रपट प्रचंड लोकप्रिय ठरले. सूरज बडजात्या-दिग्दर्शित मैने प्यार किया या चित्रपटाद्वारे सलमान खानच्या साथीत त्याने इ.स. १९८९ साली हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी पदार्पण केले. त्याने विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन (इ.स. १९९१), बेटा (इ.स. १९९२) व हम आपके है कौन (इ.स. १९९४) इत्यादी हिंदी चित्रपटही खूप गाजले.

      किडनीच्या (मूत्रपिंड) आजारामुळे लक्ष्मीकांत बेर्डे हे मुंबई येथे १६ डिसेंबर २००४ रोजी मरण पावले. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टी हळहळली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁रविवार ~ 03/11/2019❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment