"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*04/01/24 गुरूवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *04.जानेवारी:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.8, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~हस्त,
योग ~अतिगण्ड, करण ~बालव,
सूर्योदय-07:12, सूर्यास्त-18:14,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

04. *केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

04. *चालत्या गाडीला खीळ घालणे*
      *★ अर्थ ::~*  सुरळीत चाललेल्या गोष्टीत अडथळा आणणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

04.   *पठतो नास्ति मूर्खत्वम् ।*
    ⭐अर्थ ::~ अभ्यासू मनुष्य
       कधीही मूर्ख बनत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

  🛡 *★04. जानेवारी★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ आंतरराष्ट्रीय ब्रेल दिन
★ हा या वर्षातील चौथा दिवस आहे.
★ ब्रम्हदेश (म्यानमार) चा मुक्तिदिन

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५९ : लूना - १ हे अंतराळयान चंद्राच्या अगदी जवळ पोहोचले.
●१९३२ : सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल पंडित नेहरूंना दोन वर्षांची शिक्षा
●१९२६ : क्रांतिकारकांच्या गाजलेल्या काकोरी खटल्याच्या सुनावणीस लखनौ येथे सुरुवात झाली.
●१८८१ : लोकमान्य टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात केली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४१ : कल्पनाथ राय – केन्द्रीय मंत्री, राज्यसभा खासदार (३ वेळा), लोकसभा खासदार (४ वेळा),
◆१९२५ : प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता
◆१९१४ : *इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री* व लेखिका
◆१८१३ : सर आयझॅक पिटमॅन – शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक
◆१८०९ : लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (मृत्यू: ६ जानेवारी १८५२)

    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९४ : राहूलदेव बर्मन तथा ’पंचमदा’ – संगीतकार
●१९६५ : टी. एस. इलियट – अमेरिकेत जन्मलेले ब्रिटिश कवी, नाटककार, टीकाकार आणि नोबेल विजेते
●१९०८ : राजारामशास्त्री भागवत – विद्वान व  समाजसुधारक ज्ञानाच्या क्षेत्रातील मोठे प्रज्ञावंत,
●१९०७ : गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

04. *✸ सारे जहाँ से अच्छा ✸*
     ●●●●००००००●●●●
सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्तां हमारा।
हम बुलबुलें हैं इसकी वह गुलिस्तां हमारा ॥

ग़ुर्बत में हों अगर हम रहता है दिल वतन में।
समझो वहीं हमें भी दिल हो जहाँ हमारा ॥

परबत वो सबसे ऊँचा, हमसाया आसमां का।
वो संतरी हमारा वो पासवां हमारा ॥

गोदी में खेलती हैं, जिसकी हज़ारों नदियां।
गुलशन है जिसके दम से रश्के जिनां हमारा॥

ऐ आबे रोदे गंगा वह दिन है याद तुझको।
उतरा तेरे किनारे जब कारवां हमारा ॥

मज़हब नहीं सिखाता आपस में बैर रखना।
हिन्दी हैं हम वतन है हिन्दोस्तां हमारा ॥

यूनान, मिस्र, रोमा सब मिट गए जहां से।
अब तक मगर है बाकी नामों निशां हमारा ॥

कुछ बात है कि हस्ती मिटती मिटाये।
सदियों रहा है दुश्मन दौरे जमां हमारा ॥

'इक़बाल' कोई महरम अपना नहीं जहां में।
मालूम क्या किसी को दर्दे निहां हमारा ॥

सारे जहाँ से अच्छा  हिन्दोस्तां हमारा।
हम बुलबुलें हैं इसकी यह गुलिसतां हमारा॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

04. *❂ तू बुद्धि दे तू प्रकाश ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तू बुद्धि दे, तू प्रकाश दे, नवचेतना विश्वास दे
जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे

सापडे ना वाट ज्यांना हो तयांचा सारथी
हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती
करिती तुझी जे साधना त्यांना तुझा सहवास दे

सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती
नीती ना ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती
पंखात ह्या बळ दे नवे झेपावण्या आकाश दे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

04.        *❃❝ प्रेम ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━━
      एक तरुण बागेत काम करीत होता. सुर्य डोक्यावर आला तरी त्याचे बागकाम संपत नाहिसे पाहून त्याची आई घरातून ओरडली, ‘अरे गोविंदा ! ऊनं कोण रणरणतं आहे ! घरात ये ना ? वाटल्यास उरलेलं काम संध्याकाळी कर.’ दोन तीन वेळा सांगूनही आपला मुलगा आपल्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, असं पाहून त्या बाईने आपल्या चार-पाच वर्षांच्या नातवाला-म्हणजे उन्हात बागकाम करणाऱ्या मुलाच्या मुलाला उचललं आणि बागेत असलेल्या आपल्या मुलापाशी नेऊन ठेवलं.आपल्या मुलाला उन्हात आणून ठेवल्याचं पाहून त्याचा पिता आपल्या आईवर भडकून म्हणाला, ‘आई ! अगं ऊन कोण तापलयं ! आणि चंदूला तू इथे उन्हात आणून ठेवलसं ? त्याला उन्हाचा त्रास नाही का होणार?’ त्या तरुणाची आई मुद्दाम म्हणाली, ‘ऊन लागलं तर लागलं; त्यात विशेष काय आहे?’तो तरुण म्हणाला, ‘आई ! तो माझा मुलगा आहे. त्याल ऊन लागतयं म्हणून नुसता त्यालाचा त्रास होत नाही, तर त्याला होणाऱ्या त्रासामुळं माझ्याही जिवाची तगमग होऊ लागली आहे.’ यावर आई म्हणाली, ‘मग गोविंदा, तू अस विचार कर की, तुझ्या या मुलाला ऊन लागताच जशी तुझ्या जिवाची तगमग सुरु झाली, तशीच तगमग तू मघापासून उन्हात काम करीत असल्यामुळे माझ्याही जिवाची तगमग होत नसेल का ?’ वृध्द व प्रेमळ आईचा हा बिनतोड युक्तीवाद ऎकून गोविंदा निमूटपणे कुदळ, कोयती उचलून, बागेतून हसत हसत घरात गेला.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
    स्वत:पालकांच्या भूमिकेत गेल्याशिवाय आईवडिलांचे प्रेम, माया, काळजी कळत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

04. *ऋणानुबंधाची फुले कधीच कोमेजत नसतात...*
*आठवणींच्या सुगंधाने ती सदा दरवळत असतात....*
*आपली होणारी आठवण हा तोच सुगंध असतो....*
*जन्मोजन्मीच्या ऋणानुबंधांचा तो दरवळ असतो...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

04. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  इ. स. १४०० मध्ये भारताकडे येणारा सागरी महामार्ग कोणी शोधून काढला ?
➜वास्को - द - गामा.

✪ आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असते ?
➜ 'क'जीवनसत्व.

✪  WHO चे पूर्ण रूप काय आहे ?
➜ World Health Organization.

✪  महाराष्ट्रात कोणते पीक सर्वांत जास्त घेतले जाते ?
➜ ज्वारी.

✪  भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?
➜ आंबा
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

04.  *❒ ♦इंदिरा संत♦ ❒* 
     ━═•●◆●★●◆●•═━
_यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
◆जन्म नाव :~ इंदिरा नारायण संत
*●जन्म :~ ४ जानेवारी १९१४*
इंडी, कर्नाटक, भारत
●मृत्यू :~ १३ जुलै २०००

◆कार्यक्षेत्र :~ साहित्य, अध्यापन
◆भाषा :~ मराठी
◆साहित्य प्रकार :~ कविता

       ★ इंदिरा नारायण संत ★

    या मराठी कवयित्री आणि कथालेखक होत्या. शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला प्रारंभ केला. १९५०च्या दशकात त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले. आई, पत्नी, मुलगी या नात्यांतून भारतीय स्त्रीचे दिसणारे खडतर जीवन त्यांनी आपल्या कवितांमधून हळुवारपणे मांडले आहे. इंदिरा संत आणि त्याचे पती ना.मा. संत या दोघांच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह 'सहवास' या नावाने १९४० ला प्रसिद्ध झाला. दुर्दैवाने ना.मा. संत यांचे १९४६ साली निधन झाले. वेळीच सावरून या घटनेचा इंदिरा संत यांनी आपल्या कवितेवर परिणाम होऊ दिला नाही. विशुद्ध रूपातील इंदिरा संत यांची कविता टीकाकार तसेच काव्यरसिकांनी उचलून धरली. आजमितीस इंदिरा संत यांची सुमारे पंचवीस पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. रमेश तेंडुलकरयांनी इंदिरा संत यांच्या निवडक कविता 'मृण्मयी' नावाने १९८२ साली संपादित करून प्रसिद्ध केल्या आहेत.

      इंदिरा दीक्षित असलेल्या इंदिरा संत यांनी कोल्हापूर  व पुणे  येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.  बी.ए.,  बी.टी.डी. व बी.एड या पदव्या प्राप्त केल्यानंतर  बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम पाहण्यास त्यांनी सुरुवात केली. या कॉलेजात त्यांनी १९५६ ते १९७४ या काळात प्राचार्यपद देखील भूषवले. पुढे पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात  सहाध्यायी ना.मा.संत यांच्याशी त्या १९३५ साली विवाहबद्ध झाल्या.

      ■ "प्रकाशित साहित्य" ■
  इंदिरा संत यांचे प्रकाशित झालेले साहित्य पुढीलप्रमाणे:

           ★ कवितासंग्रह ★
   इंदिरा संत यांच्या समग्र कविता (पॉप्युलर प्रकाशन, २०१४). या पुस्तकाला अरुणा ढेरे यांची प्रस्तावना आहे.

       गर्भरेशीम १९८२, निराकार, बाहुल्या १९७२, मरवा, मृगजळ १९५७, मेंदी १९५५, रंगबावरी १९६४, वंशकुसुम, शेला १९५१,

          ★ कथासंग्रह ★
  कदली, चैतू, श्यामली, ललितलेख संग्रह, मृदगंध १९८६, फुलवेल १९९४

          ■ पुरस्कार ■
◆साहित्य अकादमी पुरस्का गर्भरेशीम
◆अनंत काणेकर पुरस्कार गर्भरेशीम
◆साहित्य कला अकादमी पुरस्कार  घुंघुरवाळा
◆महाराष्ट्र शासन पुरस्कार शेला रंगबावरी मृगजळ
◆ कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁बुधवार ~04/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment