*04/02/24 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *04.फेब्रुवारी:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष कृ.9,  पक्ष : कृष्ण पक्ष, 
तिथि ~नवमी, नक्षत्र ~विशाखा, 
योग ~वृद्धि, करण ~गर, 
सूर्योदय-07:12, सूर्यास्त-18:32,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂* 
 ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
04. *काळ हा सर्वांचा न्याय निवाडा करणारा न्यायाधीश आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪ 
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
04. *असतील शिते तर जमतील भूते*
      *★ अर्थ ::~* 
- माणसाजवळ पैसा असेपर्यंतच लोक त्याच्या भोवती जमा होतात.   
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
  ━┅═▣◆★✪★◆▣━┅━
04. *शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम् ।*
   ⭐अर्थ ::~ शरीर हे धर्माचरणाचे प्रथम साधन आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆🇸◆=🇵==●••
      🛡 *04. फेब्रुवारी* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★जागतिक कर्करोग दिन
★हा या वर्षातील ३५ वा दिवस आहे.
   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००४	:	 मार्क झुकरबर्गने फेसबुकची स्थापना केली.
●१९६१	:	आंतरराष्ट्रीय कीर्तीचे निष्णात डॉक्टर आणि आधुनिक बंगालचे शिल्पकार डॉ. बिधनचंद्र रॉय यांना ’भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
●१९४८	:	श्रीलंका देशाला स्वातंत्र्य मिळाले.
●१९४४	:	’चलो दिल्ली’चा नारा देत आझाद हिन्द सेनेचे दिल्लीकडे कूच
●१७८९	:	अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची एकमताने नेमणूक करण्यात आली.
●१६७०	:	ज्याच्या मृत्युमुळे शिवाजी महाराजांनी 'गड आला पण सिंह गेला ' असे उदगार काढले, त्या तानाजी मालुसरे यांचा सिंहगडावर मृत्यू.
    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७४	:	उर्मिला मातोंडकर – चित्रपट अभिनेत्री
◆१९३८	:	 पं. बिरजू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक व गुरू
◆१९२२	:	 *स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – शास्त्रीय गायक*
◆१९१७	:	जनरल ह्याह्याखान – पाकिस्तानचे ३ रे राष्ट्राध्यक्ष  
◆१८९३	:	चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक
      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२	:	भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ – चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक 
●२००१	:	पंकज रॉय – क्रिकेटपटू, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित 
●१९७४	:	सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ 
●१८९४	:	अॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक 
●१६७०	:	नरवीर तानाजी मालुसरे 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]     ❂ देशभक्ती गीत ❂*
   ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
04.  *✸ जिंकू किंवा मरू ✸*
    ●●●●००००००●●●●
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू
लढती सैनिक, लढू नागरिक
लढतील महिला, लढतील बालक
शर्थ लढ्याची करू
देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू
हानी होवो कितीहि भयंकर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━
04. *❂ शुद्धी दे बुद्धी दे ❂*
      ✶✶✹✹★●★✹✹✶✶
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना
स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆🇸◆=🇵==●••
04.  *❃ सापाचे शेपुट ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   *एकदा एका सापाच्या शेपटाने* त्याच्या डोक्याविरुद्ध बंड उभारले. ते म्हणाले, 'कोणत्याही प्राण्याच्या एकाच शेपटानं वाटेल तिकडं जावं अन् दुसर्या शेपटाला त्याच्या मनाविरुद्ध आपल्या बरोबर ओढत न्यावं ही मोठ्या लाजेची व जुलुमाची गोष्ट आहे.' 
           हे शेपटाचे बोलणे ऐकून डोक्याने त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले, 'शेपटाला डोळे नाहीत, मेंदू नाही. यामुळेच त्याला वाटेल तिकडे जाण्याचे स्वातंत्र्य नाही.' पण डोक्याचा हा युक्तिवाद शेपटास आवडला नाही. त्याने आपला हट्टीपणा तसाच चालू ठेवला. 
           ते पाहून डोक्यास फार राग आला. त्याने त्यास वाटेल तिकडे जाण्याची परवानगी दिली. मग शेपटाने आपल्या इच्छेप्रमाणे फिरावयास सुरुवात केली. 
            साप शेपटाकडून मागे सरपटत चालला असता एका उंच कड्यावरून खाली घसरला व त्यामुळे त्याच्या सर्व अंगाला फारच लागले. आपल्या मूर्खपणामुळे असे घडले हे पाहून शेपटास फार लाज वाटली व डोक्याशी स्पर्धा करण्याचे त्याने अजिबात सोडून दिले.
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
   प्रत्यक्ष अनुभवाशिवाय स्वतःची किंमत व कर्तबगारी काय आहे हे मनुष्यास समजत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━
04. "विनाकारण शत्रुचीं सख्यां वाढवुन वाटेत अडचणी निर्माण करून घेण्यापेक्षा...;
  *"नेहमी मित्राचीं संख्या वाढवुन यशाचा राजमार्ग तयार करत रहा..!"*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
04. *महाराष्ट्रातील~अष्टविनायक*
   ●☆●☆●☆●☆●☆●☆●
१) महागणपती ~रांजणगांव (पुणे)
२) चिंतामणी ~थेऊर (पुणे)
३) मोरेश्वर ~मोरगांव (पुणे)
४) विघ्नहर ~ओझर (पुणे)
५) गिरिजात्मक ~लेण्याद्री (पुणे)
६) बल्लाळेश्वर ~पाली (रायगड)
७) वरद विनायक ~महाड (रायगड)
८) सिध्दी विनायक ~सिध्दटेक
                         (अहमदनगर)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂* 
 ━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
24. *♦ स्वरभास्कर पंडित ♦*
        *🔻भीमसेन जोशी🔻*
   ─┅━━▣▣▣━━┅─
  _*🐾यांचा आज स्मृतिदीन*_🐾
           _त्यानिमित्त त्यांना_
      _*विनम्र अभिवादन..!!*_
    🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
*🔸जन्म	 :~ ४ फेब्रुवारी १९२२*
       	         रोना कर्नाटक
🔹मृत्यू	 :~ २४ जानेवारी २०११,	पुणे
🔸वडील :~ 	गुरुराज जोशी
🔹जोडीदार	:~ सौ वत्सला जोशी
🔸कारकिर्दीचा काळ	 १९४१-२०११
🔹गौरव :~ गौरव	डॉक्टरेट डि. लिट्.
🔸पुरस्कार	 :~ *भारतरत्न पुरस्कार* *पद्मश्री पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार पद्मविभूषण पुरस्कार, संगीताचार्य पुण्यभूषण पुरस्कार, स्वरभास्कर पुरस्कार तानसेन पुरस्कार*
 
       *♦पंडित भीमसेन जोशी*
  🔷हे भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविले गेलेले लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते.
           *💥संगीतशिक्षण	💥*
  🔶भीमसेन जोशीं वडील एक शिक्षक होते. भीमसेनचा संगीताकडे असलेला ओढा त्यांना पसंत नव्हता. भीमसेनांनी वैद्यकीय अथवा अभियांत्रिकी शिक्षण घ्यावे असा त्यांचा आग्रह होता. या मतभेदांमुळे अखेर भीमसेनांनी घर सोडण्याचे आणि त्याकाळी शास्त्रीय संगीतासाठी ख्यातनाम असलेल्या ग्वाल्हेर, लखनौ, रामपूर या शहरांपैकी एका ठिकाणी जाण्याचे ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी इ.स. १९३३ साली वयाच्या अकराव्या वर्षी घर सोडले आणि ते ग्वाल्हेरात दाखल झाले.
🔶भीमसेन जोशींनी, त्यांचे गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मरणार्थ १९५२ सालापासून पुणे येथे दरवर्षी होणारा सवाई गंधर्व संगीत महोत्सव सुरू केला.
             *💥कारकीर्द💥*
   🔷भीमसेनांनी त्यांची पहिली संगीत मैफिल इ.स. १९४२ साली वयाच्या केवळ एकोणविसाव्या वर्षी पुण्यातील हिराबागेत घेतली. त्यापुढील वर्षीच त्यांच्या काही कानडी आणि हिंदी भाषेतील उपशास्त्रीय गीतांचे पहिल्यांदा ध्वनिमुद्रण झाले. आणि पुढील काही वर्षांनी त्यांच्या शास्त्रीय गायनाचे. सवाई गंधर्वांच्या षष्ट्यब्दी सोहळ्यानिमित्त त्यांनी गायन केले आणि महाराष्ट्राला त्यांची पहिली नीट ओळख झाली.
🔶तरुण पंडितजी त्यांची लोकप्रियता आणि त्यामुळे संगीत मैफिलींसाठी करावी लागणारी त्यांची धावपळ वाढली. त्यांच्या त्या काळी वारंवार होणार्या विमान प्रवासांमुळे, त्यांना पु.ल.देशपांडे यांनी गमतीने 'हवाईगंधर्व' ही पदवी बहाल केली होती. कित्येक वेळा एकाच दिवसात दोन शहरांतील मैफली घेण्यासाठी ते दोनदा विमानप्रवास करीत.
🔷भीमसेन जोशींना हिंदुस्थानी शास्त्रीय गायन पद्धतीचे ख्याल गायक म्हणत असले तरी त्यांनी १९४० च्या दशकात लखनौमध्ये एक वर्ष राहून तेथील ख्यातनाम गायकांकडून ठुमरी शिकून घेतली होती. ते ठुमरीही अतिशय छान गात. भीमसेन जोशींनी 'संतवाणी' या नांवाने मराठी अभंगगायनाचे अ़क्षरशः हजारो कार्यक्रम केले. कवि वसंत बापट त्यांच्या अभंगवाणी कार्यक्रमात अनेकदा अतिशय सुरेख निरूपण करीत.
🔶भारतात शास्त्रीय गायनाच्या हिंदुस्थानी आणि कर्नाटकी या दोन प्रमुख शाखा मानल्या जातात. भीमसेन जोशींचे वैशिष्ट्य असे की ते दक्षिणी भारतात प्रचलित असलेल्या कर्नाटकी गायनातल्या चीजा हिंदुस्थानी पद्धतीने गाऊन दाखवीत. त्यामुळे त्यांचे गायन कर्नाटकी संगीताची परंपरा असलेल्या दक्षिणी भारतातही, विशेषतः तरुण पिढीमध्ये लोकप्रिय झाले.
🔷अशा या महान गायकाचे सोमवार दिनांक जानेवारी २४,इ.स. २०११ रोजी सकाळी ८:०५ वाजता पुणे येथे वयाच्या ८८ व्या वर्षी देहावसान झाले.
    🔶भीमसेन जोशींना अ॑नेक पुरस्कारांनी आणि सन्मानांनी गौरविण्यात आले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
            *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
 *❁रविवार ~04/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment