"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*04/03/24 सोमवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *04.मार्च:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
माघ कृ.8, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~अष्टमी, नक्षत्र ~ज्येष्ठा,
योग ~वज्र, करण ~कौलव,
सूर्योदय-07:12, सूर्यास्त-18:32,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

04. *टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

04. *ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी*
      *★ अर्थ ::~*
- उपकारकर्त्याच्या बाजूने बोलावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====

04. *चित्तप्रसादे प्रथमं यतस्व ।*
      ⭐अर्थ ::~ मन प्रसन्न ठेवण्यासाठी प्रथम प्रयत्न कर.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★04. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ औद्योगिक सुरक्षा दिन
★ हा या वर्षातील ६३ वा (लीप वर्षातील ६४ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते गुरुदासपूर येथील रणजितसागर धरण देशाला अर्पण
●१९६१ : १९४६ मधे इंग्लंडमधे बनवलेली युद्धनौका भारतीय सैन्यदलात दाखल झाली व तिचे ’आय. एन. एस. विक्रांत’ असे नामकरण करण्यात आले. ही भारतीय आरमारात दाखल झालेली पहिली विमानवाहू नौका होती.
●१९५१ : नवी दिल्ली येथे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते पहिल्या आशियाई खेळांचे उद्‍घाटन झाले. या खेळांत ११ देशांतील ४८९ महिला व पुरुष स्पर्धकांचा सहभाग होता.
●१८६१ : अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष झाले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९२२ : दीना पाठक – अभिनेत्री (मृत्यू: ११ आक्टोबर २००२)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०११ : अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल
●२००० : गीता मुखर्जी – स्वातंत्र्य सेनानी, कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, लोकसभा सदस्य
●१९९९ : विठ्ठल गोविंद गाडगीळ – भारतीय विमानोड्डाणाचा पाया घालणारे, ’एअर इंडिया’चे पहिले कर्मचारी
●१९९२ : शांताबाई परुळेकर – ’सकाळ’च्या प्रकाशिका आणि सकाळ पेपर्स प्रा. लि. च्या संचालिका
●१९५२ : सर चार्ल्स शेरिंग्टन – मज्जापेशीवर संशोधन करणारे नोबेल पारितोषिक विजेते (१९३२)
●१९२५ : ज्योतिरिंद्रनाथ टागोर – थोर बंगाली साहित्यिक, नाटककार, संगीतकार, चित्रकार व संपादक, रविंद्रनाथ टागोर यांचे वडील बंधू,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

04. *✸ जय भारता जय भारता ✸*
        ●●●●●००००००●●●●●
जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता

जय लोकनायक थोर ते, जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते, जय आमुची स्वाधीनता

तेजोनिधी हे भास्करा, प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृंद हो, हे अंबरा, परते पहा परतंत्रता

बलिदान जे रणि जाहले, यज्ञात जे धन अर्पिले
शतकात जे हृदयी फुले उदयाचली हो सांगता

ध्वज नीलमंडल हो उभा, गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा, दलितांस हा नित्‌ तारता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

04. *❂ मराठीची गौरव गाथा.. ❂*
        ✶✶✹✹★●★✹✹✶✶
कथा,कविता,सुंदर गाणी
ओवी,भारूड,अभंगवाणी
दासांसंगे श्लोक मनाचे
नित्य गाते मराठी वाणी

केशवसुतांचा शूर शिपाई
बालकवीची ती फुलराणी
तांबे,बोरकर,कांतांसवे
गाणी गाते बहिणाबाई

शूरांच्या त्या शौर्य गाथा
बिरबल सांगे चतूर कथा
रहस्य,विज्ञान,विनोद,अवकाश
मराठीचा भरला भाता

सोळा स्वरांची दुनिया सगळी
व्यंजन चौतीस सारी सजली
शब्दांपुढती विभक्ती प्रत्यय
मराठी भाषा ऐसी बनली
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

04.     *❃ किंम्मत ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
    एका राज महालात एक बाई
मोलकरीण म्हणुन काम करत असते.
तिचा लहान मुलगा ही तिथच तिच्या बरोबर येत असे. एक दिवस त्याला राजमहालात खेळता खेळता हीरा सापडतो , तो मुलगा तो हीरा घेऊन पळत आई कडे जातो. आई बघ मला हीरा सापडला , मोलकरीण हुशार असते , तीला वाटते हा हीरा घेऊन आपण बाहेर नाही जाऊ शकणार ,
ती मुलाला म्हणते नाही रे काच आहे तो हीरा नाही . असे म्हणुन हीरा बाहेर फेकुन देते .
      काम आटोपल्यावर जेव्हा ती घरी जायला निघते तेव्हा ती तो हीरा सोबत घेऊन जाते. मग ती तो हीरा सोनारा कडे घेऊन जाते. सोनाराला कळत कि हिला हा हीरा सापडला असणार कुठेतरी. हिला काय माहीत हा हीरा च आहे अस म्हणुन; तो तीला म्हणतो हा हीरा नाही ही तर काच आहे.
असे म्हणुन तो पण तो हीरा बाहेर फेकुन देतो.
      जेव्हा ती घरी जाते तेव्हा तो सोनार बाहेर जाऊन तो हीरा घेऊन येतो व जोहरी कडे घेऊन जातो .
जोहरी हीरा पाहतो त्याला कळत हा हीरा अनमोल आहे त्याची नियत खराब होते. तो हीरा घेतो आणि बाहेर फेकुन देतो काच आहे अस म्हणतो.
जसा हीरा बाहेर पडतो तसे त्याचे तुकडे तुकडे होऊन जातात.
हे सगळ एक वाटसरु लांबुन पाहत असतो. तो त्या ही-या जवळ येतो आणि त्याला म्हणतो मोलकरीण आणि सोनार ह्या दोघांनी तुला दोन वेळा फेकल तेव्हा तु तुटला नाही ,
पण आता का तुटला तु ,
हीरा म्हणतो जेव्हा मोलकरीण व सोनाराने मला फेकले ते माझी खरी किंमत जाणत नव्हते. परंतु जोहरी तर माझी किंमत जाणत होता, तरी त्याने मला फेकले हा आघात मी सहन करुच शकलो नाही. म्हणुन मी तुटलो. असेच मनुष्याच्या बाबतीत होत असते, जे तुम्ही काय आहे हे जाणुन पण तुमच मन तुडवतात तेव्हा तो आघात सहन करु शकत नाही.

   *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  कधीही आपल्या लोकांचे जराश्या स्वार्था करता मन तोडु नका... आपल्या आजुबाजुची खुप सारी आपली माणस हि-यासारखी असतात, त्यांच्या भावना व मन दुखवून त्यांच्या चांगल्या गुणांचे तुकडे तुकडे करू नका.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

04. *सराव तुम्हाला बळकट बनवतो.. दुःख तुम्हांला माणूस बनवते...*

     *अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते, यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते, परंतु फक्त*

     *विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची प्रेरणा देत असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

04. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  'वेस्टर्न ब्लाॅट' ही चाचणी कोणत्या आजाराशी संबंधित आहे ?
➜ एड्स.

✪  आशियाई विकास बॅंकेचे मुख्यालय कोठे आहे ?
➜ मनिला.

✪ साफ्टा करार कोणत्या संघटनेशी संबंधित आहे ?
➜ सार्क.

✪ आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण आहेत ?
➜ केशवसूत.

✪  मोसंबीसाठी महाराष्ट्रातील कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे ?
➜ श्रीरामपूर
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

04. *❒ ♦तानाजी मालुसरे♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
     शिवरायांचे मावळे तानाजी मालुसरे
आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी मोठ्या मोहिमा आखून मुघलांच्या ताब्यातील तेवीस किल्ले घेण्याचे ठरविले. सुरूवातीला त्यांनी कोंढाणा किल्ला घ्यायचे ठरवले. कारण कोंढाणा किल्ला स्वराज्यातील मध्यवर्ती किल्ला होता, या किल्ल्याच्या साह्याने बारा मावळावर ताबा ठेवणे शक्य होते. कोंढाणा किल्ला जिंकण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांनी आपल्या शिरावर घेतली. रायगड जिल्ह्यातील उमरठ (पोलादपुरजवळ) गावचे असणारे तानाजी मालुसरे यांचे मुळ गाव सातारा जिल्ह्यातील,जावळी तालुक्यातील गोडोली होय. तानाजी मालुसरे छत्रपतींचे बालपणीचे सवंगडी होते. आपला मुलगा रायबा याच्या लग्नात व्यस्त असलेल्या तानाजींनी,आधी लगीन कोंढाण्याचे मग लगीन रायबाचे असे म्हणत कोंढाणा ताब्यात घेण्याचा विढा उचलिला. कोंढाण्याचा किल्लेदार उदयभान राठोड हा एक शूर राजपूत होता.त्याच्या दिमतीला १५०० हशमांची फौज होती. ४ फेब्रुवारीच्या रात्री  राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करून सिंहगडाच्या पायथ्याला पोहचले. दिवसासुध्दा चढण्यास अवघड असणारा द्रोणगिरीचा कडा तानाजींनी कोंढाण्यावर चढाईसाठी निवडला. भयाण काळोखी रात्री मर्द मावळे दोरखंडाच्या साह्याने द्रोणगिरीचा कड्यावरून वर चढू लागले. कडा चढत असताना दोर तुटून कित्येक मावळे दरीत पडले पण शेवटी पाचशेवर मावळे कढा चढण्यात यशस्वी झाले. किल्ल्यावर अचानक हल्ला केल्यामुळे मुघल सैनिकांत गोंधळ माजला. किल्ल्यावर मोठी हातघाईची लढाई झाली. किल्लेदार उदयभान राठोड व तानाजी मालुसरे यांच्यात मोठी लढाई झाली.लढताना हातातील ढाल तुटल्यामुळे तानाजीने डाव्या हातावर शेला गुंडाळून त्यावर तलवारीचे वार झेलले. शेवटी दोघेही जखमी झाल्यामुळे खाली कोसळले. तानाजी धारातीर्थी पडल्यामुळे मराठी मावळ्यांमध्ये गोंधळ उडाला, याचवेळी सूर्याजी मालुसरे आणि शेलारमामा यांनी मुख्य दरवाज्यातून प्रवेश करून निकराची लढाई करून किल्ला काबीज केला. रात्रीच्यावेळी गडावरील गवताच्या गंज्या पेटवून राजगडावर छत्रपतींना किल्ला जिंकला गेल्याचा इशारा दिला. कोंढाणा इ.स.४ फेब्रुवारी,१६७० रोजी मध्यरात्री मराठ्यांच्या ताब्यात आला. कोंढाण्याचे संपूर्ण युध्द हे रात्री झाले.

   जासूस दूसरे दिवशीं वर्तमान घेऊन आला कीं, तानाजी मालसुरा यांनी मोठे युध्द केलें. उदेभान किल्लेदार यास मारिले आणि तानाजी मालसुरा पडला. असें सांगितलें. गड फत्ते केला असें सांगताच राजें म्हणूं लागले की,एक गड घेतला,परंतू एक गड गेला! असे तानाजीसाठीं बहूत कष्टी जाहाले. कोंढाणा किल्ला जिंकल्याची बातमी छत्रपतींना समजल्यानंतर अत्यंत दु:खी झालेल्या राजांनी गड आला पण सिंह गेला असे उद् गार काढले. त्यांनी कोंढाण्याचे नाव बदलून सिंहगड असे ठेवले. छत्रपतींनी आपल्या या सवंगड्याचे शव उमरठ या तानाजींच्या गावी पाठविले, ज्या मार्गावरून तानाजींचे शव गेले, तो मार्ग मढेघाट या नावाने ओळखला जातो. आपल्या धन्याच्या वचनाला जागून किल्ला ताब्यात घेणारा तानाजी खरोखरच सिंह होता.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁सोमवार ~ 04/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment