"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*04/04/24 गुरूवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/kLBRXR
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━

🟢🔵🟣
🍥 *04.एप्रिल:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन कृ.10, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~दशमी, नक्षत्र ~श्रवण,
योग ~सिद्ध, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:29, सूर्यास्त-18:53,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

04. *बदलण्याची संधी नेहमी असते पण बदलण्यासाठी तूम्ही वेळ काढला का ?*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

04. *कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ*
      *★ अर्थ ::~* - आपलेच जातभाई आपले नुकसान करतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

04. *विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।*
             ⭐अर्थ ::~
विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ होय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★04. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ९४ वा (लीप वर्षातील ९५ वा) दिवस आहे.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९० : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
●१९६८ : मेम्फिस, टेनेसी येथे जेम्स अर्ल रे याने मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) यांची हत्या केली.
●१९६८ : ’नासा’ने ’अपोलो-६’ चे प्रक्षेपण केले.
●१९४९ : पश्चिम युरोपातील अकरा देश आणि अमेरिका अशा १२ देशांनी संरक्षणविषयक सामंजस्य करार करुन ’नाटो’ची (NATO) स्थापना केली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३३ : रामचंद्र गंगाराम तथा ’बापू’ नाडकर्णी – डावखुरे मंदगती गोलंदाज
◆१९०२ : पं नारायणराव व्यास – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक 

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर – कलादिग्दर्शक
●१९९६ : आनंद साधले – संस्कृत वाङ्‌मयातील अनेक ग्रंथांचा मोठ्या रसाळ पद्धतीने मराठीत परिचय करुन देणारे साहित्यिक
●१९७९ : पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान झुल्फिकार अली भूट्टो यांना फाशी
●१९६८ : मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर) – कृष्णवर्णीयांचे गांधी म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेतील मानवी हक्क कार्यकर्ते आणि नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या
●१६१७ : जॉन नेपिअर – स्कॉटिश गणितज्ञ, लॉगॅरिथम सारणीचे जनक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

04. *✸ या भारतात बंधुभाव.. ✸*
       ●●●●●००००००●●●●●
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, दे वरचि असा दे
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे

नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे

सकळांस कळो मानवता, राष्ट्रभावना
हो सर्व स्थळी मिळुनी समुदाय प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथ असू दे
दे वरचि असा दे

जातिभाव विसरूनिया एक हो आम्ही
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी
खलनिंदका मनीही सत्य न्याय वसू दे
दे वरचि असा दे

सौंदर्य रमो घराघरात स्वर्गीयापरी
ही नष्ट हो‍उ दे विपत्ती भीती बावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजी वसू दे
दे वरचि असा दे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
04. *❂ देह मंदिर, चित्तमंदिर ❂*
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
देह मंदिर, चित्तमंदिर, एक तेथे प्रार्थनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधनादु:खितांचे दु:ख जावो ही मनाची कामनावेदना जाणावयाला जागवू संवेदनादुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधनाजीवनी नवतेज राहो अंतरंगी भावनासुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवनाशौर्य लाभो, धैर्य लाभो, सत्यता संशोधनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधनाभेद सारे मावळू द्या वैर सार्या वासनामानवांच्या एकतेची पूर्ण होवो कल्पनामुक्त आम्ही फक्त मानू बंधुतेच्या बंधनासत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
04. *❃ गाढव आणि निर्दयी मणुष्य*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एक गाढव मोठा सहनशील होता. त्याचा धनी त्याजकडून त्याच्या शक्तिपलीकडे काम करून घेत असे व त्यास पोटभर खाऊही घालत नसे.
अशा स्थितीत त्या गाढवाने आपल्या धन्याची नोकरी पुष्कळ वर्षे केली. तो गाढव म्हातारा झाला असता, एके दिवशी त्याच्या धन्याने त्याच्या पाठीवर एवढे ओझे लादले की त्याच्या भाराने तो अगदी खचून गेला. रस्ता अवघड व खांचखळग्यांचा असल्यामुळे थोडयाच वेळाने त्याच्या पाठीवर लादलेली मातीची भांडी फुटून त्यांचे तुकडे तुकडे झाले.
हे पाहताच धनी त्याला निर्दयपणाने मारू लागला.
    त्यावेळी तो गाढव पडल्यापडल्याच आपली मान वर करून त्यास म्हणाला, ‘अरे कृतघ्न माणसा! हे सगळे नुकसान होण्यास तुझाच दुष्टपणा कारण आहे.
तू पहिल्यापासूनच मला कधीही पोटभर खाऊ घातले नाहीस व माझ्या सामर्थ्यापलीकडे ओझे माझ्या पाठीवर लादलेस, त्याचा हा परिणाम.’

        *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   काही लोक कृतघ्न आणि निर्दयी असतात. जे लोक प्रमाणिक पणे काम करतात त्यासच नेहमी छळण्यास धन्यता मानतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
04. दररोज सकाळी ऊठल्यानंतर प्रार्थना करा की..,
   हे ईश्वरा राञ तर सुखाने गेली पण
आता दिवस उगवला आहे..!!
     माझ्या या वाणी ने,माझ्या ह्रदयाने,
माझ्या डोळ्याने आणि माझ्या हाताने
कुणाचेही वाईट असे घडु नये..!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
04. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪ पृथ्वीवर ऋतूंची निर्मिती कशामुळे होते ?
➜ पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे.

✪ साखर कारखान्याचा जिल्हा कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
➜ अहमदनगर.

✪ मराठी व्याकरणातील विभक्तीची एकूण रूपे किती ?
➜ आठ.

✪ १९ फेब्रुवारी या दिवशी कोणता उत्सव असतो ?
➜ शिव जयंती उत्सव.

✪ इंद्रजीत भालेराव हे नाव कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
➜ कवितालेखन,साहित्यलेखन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

04. *❒ हिंद केसरी मारुती माने ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━

     हिंदकेसरी मारुती माने यांचा जन्म कवठे पिरानसारख्या लहान खेडयात अगदी गरीब कुटूंबात झाला. उंचपुरा देह, भरदार शरीर पाणीदार डोळे, गोरा रंग असे छाप पडणारे व्याक्तीमत्वं
छोटया वयापासून त्यांनी कुस्तीचा ध्यास घेतला आणि वडिलांकडून खेळाचा श्रीगणेशा गिरवला.
परिस्थिती बिकट असूनही वडिलांनी त्यांना खुराख कमी पडू दिला नाही.
कुस्तीचा आखाडा हेच भाऊचे खरे घर बनले. त्यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मल्ल म्हयणून ख्याकती मिळवली.

     सन 1960 ते 1972 हा त्यांचा नामवंत मल्ल म्हणून बहारीचा काळ होता. बैची मोट ओढणारे माने अशी त्यांची ख्याचती होती. मारुती माने आणि विष्णुपंत सावर्डेकर यांची कोल्हापूरत झालेली कुस्ती प्रचंड गाजली होती त्यांनी अनेक मोठमोठया कुस्या जिंकल्यां.
• अखिल भारतीय हिंद केसरी हा मानाचा किताब मिळाला
• ध्यनचंद पुरस्कामराने त्‍यांना गौरविण्यात आले.
• त्यांनी कष्टा्तून जागतिक स्तरावरचा पैलवान होण्याची जिदद बाळगली व पूर्ण केली.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
         *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ गुरूवार~04/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment