"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*04/09/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *04. सप्टेंबर:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
भाद्रपद शु.१, पक्ष :शुक्ल पक्ष,
       तिथि ~प्रतिपदा,
   नक्षत्र ~उत्तराफाल्गुनी,
योग ~साध्य, करण ~बव,
सूर्योदय-06:24 सूर्यास्त-18:51,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]      ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

04. *उगवणारा प्रत्येक दिवस उमलणारा हवा.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

04. *कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ*
  ★ अर्थ ::~ आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

04.   *विद्याधनं सर्वधनप्रधानम् ।*
               ⭐अर्थ :: ~
विद्याधन हे सर्व धनांमध्ये श्रेष्ठ होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

   🛡 *★ 04. सप्टेंबर ★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील २४७ वा (लीप वर्षातील २४८ वा) दिवस आहे.

   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : रघुराम राजन यांनी ’रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे २३ वे गव्हर्नर म्हणुन पदभार हाती घेतला.
●१९९८ : स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सर्गेइ ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी ’गुगल’ची स्थापना केली.
●१९३७ : व्हेनिसमधील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ’प्रभात’च्या ’संत तुकाराम’ या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली. इतर दोन चित्रपट होते ऑस्ट्रेलियाचा ’फ्लाइंग डॉक्टर’ आणि हंगेरीचा ’मारिया नोव्हेर’.
●१९०९ : बालवीर (Scout) चळवळीचा पहिला मेळावा झाला.

  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९६२ : किरण मोरे – यष्टीरक्षक
◆१९५२ : ऋषी कपूर – अभिनेता
◆१९४१ : सुशीलकुमार शिंदे – केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
*◆१८२५ : पितामह दादाभाई नौरोजी* –भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्त्व मिळवणारे पहिले भारतीय
◆१२२१ : श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक

   ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : मोहम्मद उमर ’मुक्री’ – आपल्या अभिनयाद्वारे पाच दशके खळाळून हसवणारे विनोदी कलाकार व चरित्र अभिनेते
●१९९७ : डॉ. धर्मवीर भारती – हिन्दी लेखक, कवी, नाटककार, पत्रकार
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/GP1pTx
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━

04.      *✸ भारत माझा ✸*
    ●●●●००००००●●●● 
भारत सुंदर माझा,
स्वप्नातल्या स्वर्गापरी,
अभिमान मज त्याचा,
जन्मलो मी या भूवरी।

      भेदभाव ना कोणता,
      धर्म,पंथ विविधता,
      एकोप्याचा वाहे झरा,
      सर्वधर्म सहिष्णूता।

भारत माझा हा देश,
पाईक मी हो त्याचा,
राष्ट्रभक्ती हृदयी माझ्या,
राखे मान तिरंग्याचा।

      जगात सुंदर देश,
      हा माझा आहे भारत,
      संस्कृतीने भारताच्या,
      जग सारे प्रभावित ।
                  *~ अर्चना वासेकर*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

04. *❂ अविरत पुढे पुढे जाऊ ❂*
    ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अविरत पुढे पुढे जाऊ
अम्हि ना विश्रांति आता घेऊ॥धृ॥

उध्दराया पूर्वज शापित घोर आचरुनि तप हे अविरत
मुक्ति मिळवुनी देइ भगीरथ सातत्याने भगीरथाच्या
पुढे पुढे जाऊ॥१॥

शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारूण
जाई वानरासह रघुनंदन त्या धैर्याने रघुरायच्या
पुढे पुढे जाऊ॥२॥

स्वर्गी तो देवेन्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनि उचलला चातुर्याने श्रीकृष्णाच्या
पुढे पुढे जाऊ॥३॥

धुमाकुळ यवनांचा चाले आवर घाली शिवराय बळे
घेवुनि संगे मित्र मावळे त्या शिवराया साक्ष ठेवुनी
पुढे पुढे जाऊ॥४॥

सातत्याच्या अन् धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमिच्या उध्दाराच्या महाजनांच्या त्याच पथाने
पुढे पुढे जाऊ॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

04.  *❃❝ विवेकबुध्दी ❞❃*
  ━═•●◆●★★●◆●•═━
    'पन्नास रुपयांचे पेढे, पंधरा रुपयांचा नारळ, दहा रुपयांचा हार, एक रुपया चप्पल सांभाळण्याराला आणि पाच रुपये दान पेटीत' एवढे करुन आपण देवापर्यंत पोहोचतो का? याचा आपण नेहमी विचार करावा. देवापर्यंत तेव्हाच पोहोचू जेव्हा प्रत्येक गोष्टीत आपल्याला ते परमेश्वरीय तत्व जाणवेल. तेव्हा एखाद्या प्रसंगाकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन बदलेल. यावरुन एक कहाणी ऐकलेली आठवली. त्याचा संदर्भ गुरु ग्रंथ साहिबमध्ये येतो. ती कहाणी ऐकली आणि मनावर कायमची प्रभाव ठेवून गेली .

    कहाणी आहे राजा रणजीतसिंग यांची. त्यांची जगज्जेता होण्याची इच्छा होती व तसा त्यांचा पराक्रमही होता. लहोरी जिंकून ते आपल्या सेनेसह राज्यात परत येत असताना एक जंगल लागले. जंगलात एक म्हातारी जमिनीवरील दगड उचलून समोरच्या बोराच्या झाडावर मारीत होती व बोरे पडल्यावर त्याचे ढीग करुन ठेवीत होती. तिला राजेसाहेब जात असल्याची काहींच कल्पना नव्हती. तिचे दगड मारणे चालूच होते.
तेवढ्यात, तिने मारलेला एक दगड रणजीतसिंग यांच्या कपाळावर लागला आणि रक्ताची धार वाहू लागली. सैनिक सतर्क झाले व मारणा-याचा शोध घेऊ लागले.

    रणजीतसिंगाला दगड मारणारी म्हातारी दिसताच तिला पकडून त्यांनी महाराजांसमोर उभे केले. म्हातारीला परिस्थिती लक्षात आली. ती गयावया करुन म्हणाली, "महाराज  आपण इथे असल्याचे मला माहित नव्हते. रोजच्या प्रमाणे मी बोरे गोळा करीत होते. रोज ही बोरे विकून जे पैसे मिळतात त्यावर माझ्या कुटुंबांचे उदरभरण होते. मी आपल्याला जाणूनबुजून नाही मारले. मला क्षमा करावी महाराज." असे म्हणून तिने रणजीतसिंगांचे पाय धरले .

    सेनापती व सेना 'आता म्हातारीला देहदंडाची शिक्षा महाराज देतील' याची वाट बघत होते. रणजीतसिंगांना म्हातारीच्या परिस्थितीची जाणीव झाली. ते सेनापतीकडे वळून म्हणाले, "एक सोन्याच्या मोहरा भरलेली थैली घेऊन या."  थैली आल्यावर ती त्यांनी म्हातारीला दिली व तिला जाण्यास सांगितले.

    सेनापती व सेनेला आश्चर्य वाटले. न राहवून सेनापती महाराजांना म्हणाले, "महाराज, त्या म्हातारीला कठोर शिक्षा करायचे सोडून आपण तिला मोहरांचे इनाम का दिले महाराज?"

    त्यावर महाराज उत्तरले -
    "अरे, दगड मारल्यावर ते बोराचे झाड जर गोड बोरे देते तर,  रणजीतसिंगाने त्याहून काही कमी देणे शोभले असते का..??"

           🌀❝ तात्पर्य ❞ ::~
   आपल्या जीवनातसुद्धा असे प्रसंग अनेकदा येतात. त्या वेळी आपण आपली सद्सद्विवेकबुद्धी जागी ठेवून वागले पाहिजे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

04.  *सुखाची अपेक्षा असेल...*
*तर दुःख ही भोगावे लागेल...!!*

   *प्रश्न विचारावयाचे असतील...*
*तर उत्तर हि द्यावे लागेल...!!*

   जगात हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच लावता येत नाही..!!*
  
    *जीवनात यश हवे असेल...*
*तर संकटांना सामोरे जावेच  लागेल.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

04. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  'उत्तर भारताचे मॅंचेस्टर'  असे कोणत्या शहराला संबोधतात ?
  ➜ कानपूर.

✪  साखरेच्या उत्पादनात प्रथम क्रमांकावर असलेले राज्य कोणते ?
  ➜ महाराष्ट्र.

✪  भारताला स्वातंञ्य मिळाले तेव्हा अरूणाचल प्रदेशाचे नाव काय होते ?
  ➜नेफा. ( नाॅर्थ ईस्ट फ्रॅंटियर एजन्सी )

✪  भारतातील कोणत्या राज्यात आदिवासी विद्यापीठ उभारल्या जात आहे ?
  ➜मध्यप्रदेश. ( अमरकंटक )

✪  'मावसिनराम' हे सर्वांधिक पर्जन्यासाठी ज्ञात असलेले गाव कोणत्या राज्यात आहे ?
  ➜ मेघालय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━

04. *❒♦ दादाभाई नौरोजी ❒* 
     ━═•●◆●★★●◆●•═━
*भारतीय राजकारणातील भीष्माचार्य*
_यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

*●जन्म :~ ४ सप्टेंबर १८२५*
             मुंबई, महाराष्ट्र, भारत
●मृत्यू :~  ३० जून १९१७
●व्यवसाय :~ बॅरिस्टर

         *◆ दादाभाई नौरोजी ◆*
      हे पारशी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस-व्यापारी व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील होते. त्यांनी लिहिलेल्या पॉव्हर्टी अँड अन-ब्रिटिश रूल इन इंडिया (अर्थ: भारतातील अ-ब्रिटिश राजवट आणि गरिबी) या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ ब्रिटनाकडे कसा वाहिला जात होता, याकडे लक्ष वेधले. इ.स. १८९२ ते इ.स. १८९५ या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसदसदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरले. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या स्थापनेचे श्रेय ए.ओ. ह्यूम व दिनशा एडलजी वाच्छा यांच्यासह दादाभाई नौरोजींना दिले जाते.
            
     "दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखतात." ते भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते होते. भारतीय अर्थशास्त्राचे जनक.* जहाल व मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे नेते. भारतीय स्वराज्याचे पहिले उद्गाते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे व तेथील हॉउस ऑफ कॉमन चे सभासद बनणारे ते पहिले भारतीय. भारताच्या लुटीच्या सिद्धान्ताचे जनक. १८८३ साली ब्रिटिशा कडून त्यांना जस्टीस ऑफ पीस हा क़िताब देण्यात आला.

      मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिले भारतीय. ते रा. गो. भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. महंमद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते.

    *◆ जीवन प्रवास ◆*
१८४५ - स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन करण्यात सह्भाग.
१८८५ - भारतीय राष्ट्रिय कॉ्ंग्रेसचे संस्थापक सदस्य.
१८८६, १८९३ व १९०६ - भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे अध्यक्षपद.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁ बुधवार~04/09/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment