*04/10/24 शुक्रवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *04.ऑक्टोबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.२, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~द्वितीया, नक्षत्र ~चित्रा,
योग ~वैधृति, करण ~बालव,
सूर्योदय-06:29, सूर्यास्त-18:23,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
🔵🟢🔴
0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
04. *अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ▪ म्हणी व अर्थ* ▪
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
04. बाप तसा बेटा ,
कुंभार तसा लोटा
*★ अर्थ ::~*
आईवडिलांप्रमाणे मुलाची वागणूक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ▫ सुभाषीत▫*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
04. *सत्यं कण्ठस्य भूषणम् ।*
⭐अर्थ :: ~ सत्य बोलणे हे
गळ्यातील खरे आभूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ♦दिनविशेष*♦
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
🛡 *04. ऑक्टोबर* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ राष्ट्रीय एकात्मता दिवस.
★ हा या वर्षातील २७७ वा (लीप वर्षातील २७८ वा) दिवस आहे.
★ जागतिक प्राणी दिन.
★ "जागतिक अंतराळ सप्ताह" ४ ते १० अाॅक्टोबर
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९५७ : सोविएत रशियाने ’स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.
●१९५९ : सोविएत रशियाच्या ’ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्या भागाची छायाचित्रे घेतली.
●१९२७ : गस्टन बोरग्लम याने ’माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३७ : जॅकी कॉलिन्स – इंग्लिश लेखिका व अभिनेत्री
◆१९३५ : अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक
◆१९२८ : ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार व लेखक
◆१९१३ : सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९८९ : ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट
●१९८२ : सोपानदेव चौधरी – कवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र. ’काव्यकेतकी’, ’अनुपमा’, ’सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत.
●१८४७ : महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
04. *जय भारता जय भारता*
🇮🇳🔺🇮🇳♦🇮🇳🔺🇮🇳
जय भारता, जय भारता, जय भारती जनदेवता
जय लोकनायक थोर ते, जय क्रांतिकारक वीर ते
जय भक्त ते, रणधीर ते, जय आमुची स्वाधीनता
तेजोनिधी हे भास्करा, प्रिय पर्वता, प्रिय सागरा
तरूवृंद हो, हे अंबरा, परते पहा परतंत्रता
बलिदान जे रणि जाहले, यज्ञात जे धन अर्पिले
शतकात जे हृदयी फुले उदयाचली हो सांगता
ध्वज नीलमंडल हो उभा, गतकाल हा वितरी प्रभा
भवितव्य हे उजळी नभा, दलितांस हा नित् तारता
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] 💎 प्रार्थना 💎*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
04. *तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी*
==••◆◆●★●◆◆••==
तिन्हिसांजेला प्रभुचरणांशी एक नित्य प्रार्थना
तिमिर जळू दे, ज्योत उजळु दे हीच मनोकामना
ओलांडून हा सोनउंबरा लक्षुमी आली घरी
सरस्वतीचा हात धरुनी तिला पूजुया उरी
सौभाग्याचे अभंग लेणे जपु या कुंकुंमखुणा
वत्सलतेचा गहिवर जेथे, स्पर्श प्रभूचा तेथे
होऊन मुरली घन:श्यामाची गोकुळनगरी गाते
तोच फुलांना जागविणारा, विश्वाची प्रेरणा
वाळवंटी ही कृष्णकमलिनी होऊन मीरा झुरते
ठायीठायी रूप तयाचे ध्यानामधुनी दिसते
जन्म होऊ द्या नृत्य हरीचे मंगलमय चेतना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] 🔵 बोधकथा*🔵
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
04. *❃❝ आत्मसात करा ❞❃*
━═•●◆●★★●◆●•═━
एक दिवस शाळेला सुट्टी असल्याची घोषणा गुरूजींनी केली म्हणून एका शिंप्याचा मुलगा आपल्या वडीलाच्या दुकानवर गेला. तिथे गेल्यानंतर तो लक्षपूर्वक आपल्या वडीलाच्या कामाच निरीक्षण करु लागला. त्याने पाहीले की त्याचे वडील कैचीने कपडे कापतात व कैचीला पायाखाली दाबुन ठेवतात व नंतर सुईने कापलेले कपडे शिवायचे व नंतर सुईला आपल्या टोपीला टोचुन ठेवायचे. जेव्हा त्याने चार पाच वेळा हे पाहीले तेव्हा आश्चर्याने त्याने वडीलांना एक गोष्ट विचारु का असे म्हटले वडीलानी होकार देताच तो म्हणाला बाबा तुम्ही जेव्हा ही कपडा कापता तेंव्हा कैची पायाखाली ठेवता व सुईने जेंव्हा कपडा शिवता तेंव्हा सुई टोपीला लावता. असं का? याचे उत्तर त्याच्या वडीलांनी दोन ओळीत दिले त्यात पूर्ण जीवनाचे सार सांगितले ते म्हणाले "बेटा कैची कापायचे काम करते आणि सुई जोडायचे काम करते कापणा-याची जागा नेहमी खाली असते तर जोडणा-याची जागा नेहमी वर असते यामुळेच मी सुई टोपीवर लावतो व कैचीला पायाखाली ठेवतो.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
जीवनात उंची गाठायची असेल तर सुईसारखे जोडण्याचे काम करा कैचीसारखे तोडण्याचे नाही. आज त्याचे डोळे उघडले व जीवनाचा खरा अर्थ कळला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
04. *"ज्याला दुःखातुन सुटका पाहीजे असेल त्याला लढावे लागेल...*
*आणि ज्याला लढायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल...*
*कारण ज्ञानाशिवाय लढाल तर पराभव निश्चित आहे...!!"*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] *🔴सामान्य ज्ञान🔴*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
04. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑
✪DSP चे पूर्ण रूप काय आहे ?
➜डेप्युटी सुप्रिटेंड ऑफ पोलीस.
✪पंचायत राज व्यवस्थेतील सर्वांत खालचा स्तर कोणता ?
➜ग्रामपंचायत.
✪संत एकनाथांचे गुरू कोण होते ?
➜जनार्धन स्वामी.
✪उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे ?
➜लातूर.
✪ डेटा कमी जागेत बसविणारे संगणकीय साफ्टवेयर कोणते ?
➜झिप
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
04. *❒जागतिक अंतराळ सप्ताह❒*
━━•●◆●★★●◆●•═━
(World Space Week)
● जागतिक अंतराळ सप्ताह ●
*★ ४ ते १० अाॅक्टोबर ★*
'स्पुटनिक - १' हा पहिला मानवनिर्मित उपग्रह ४ ऑक्टोबर १९५७ रोजी प्रक्षेपित करण्यात आला आणि अंतराळ संशोधनात तीव्र होऊ होऊ पाहणारी स्पर्धा टाळण्यासाठी 'आऊटर स्पेस ट्रिटी' या करारावर १० ऑक्टोबर १९६७ रोजी स्वाक्षऱया करण्यात आल्या त्यानंतर या क्षेत्रातील वाढती व्याप्ती आणि संदेशवहनात होणारी प्रगती पाहून संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत ६ डिसेंबर १९९९ रोजी ४ ते १० ऑक्टोबर हा 'जागतिक अंतराळ सप्ताह' अर्थात 'वर्ल्ड स्पेस विक' साजरा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
जागतिक अंतराळ सप्ताहातील उपक्रमांना जगात सर्वाधिक प्रतिसाद लाभतो. अंतराळ आणि शास्त्र या दोन्हींना कोणतीही बंधने नाहीत. व्यक्ती, देश, प्रांत, धर्म, जात, पंथ, भाषांचा त्यावर काहीही प्रभाव नाही. शास्त्रीय विचारसरणीतून एकता आणि विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागते. त्यामुळे जागतिक अंतराळ सप्ताहातून दिला जाणारा 'वैश्विक एकतेचा संदेश' भावी पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे यात शंकाच नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁शुक्रवार~04/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment