*04/11/24 सोमवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/UWrHm9
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *04. नोव्हेंबर:: सोमवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
कार्तिक शु.३, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~अनुराधा,
योग ~शोभन, करण ~तैतिल,
सूर्योदय-06:40, सूर्यास्त-18:03,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
04. *आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
04. *काखेत कळसा गावाला वळसा–*
★ अर्थ ::~ वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
04. *नास्त्युद्यमसमो बन्धु: ।*
⭐अर्थ :: ~
उद्योगासारखा दुसरा मित्र नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 04. नोव्हेंबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३०८ वा (लीप वर्षातील ३०९ वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००८ : बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.
●२००० : हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना ’आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार’ जाहीर
●१९४८ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.
●१९२२ : तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश
●१९२१ : जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७१ : तब्बू – अभिनेत्री
◆१९२९ : शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला
◆१९२९ : जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार
◆१८८४ : जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते
◆१८७१ : शरदचंद्र रॉय – मानववंशशास्त्रज्ञ. १९१२ ते १९३९ या दरम्यान ओरिसा बिहारमधील जमातींचा अभ्यास करुन त्यांनी शंभरहून अधिक शोधनिबंध व सात ग्रंथ लिहीले.
◆१८४५ : वासुदेव बळवंत फडके – राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी (मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३)
◆१६१८ : औरंगजेब – सहावा मुघल सम्राट
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००५ : सदाशिव मार्तंड गर्गे – समाजविज्ञान कोशकार
●१९९५ : यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते
●१९९१ : पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट – प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ, त्यांनी सुमारे १४० शोधनिबंध प्रसिद्ध केले.
●१९७० : पं. शंभू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
ొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొొ
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
04. *✸ जिंकू किंवा मरू ✸*
●●●●●००००००●●●●●
माणुसकीच्या शत्रूसंगे युद्ध आमुचे सुरू
जिंकू किंवा मरू
लढती सैनिक, लढू नागरिक
लढतील महिला, लढतील बालक
शर्थ लढ्याची करू
देश आमुचा शिवरायाचा
झाशीवाल्या रणराणीचा
शिर तळहाती धरू
शस्त्राघाता शस्त्रच उत्तर
भुई न देऊ एक तसूभर
मरू पुन्हा अवतरू
हानी होवो कितीहि भयंकर
पिढ्यापिढ्या हे चालो संगर
अंती विजयी ठरू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थणा ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
04. ❂गंजल्या ओठांस माझ्या धार❂
━━═●✶✹★●★✹✶●═━━
गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे !
आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे !
पांगळा बंदिस्त माझा जन्म आकाशून जावो
वादळी आवेग माझा चार भिंतींना कळू दे !
सारखे सौंदर्य माझ्या कोरड्या गात्री खळाळो
सारखे अस्तित्व माझे पेटताना दर्वळू दे !
लाभु दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतू
तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
04 . *❃❝ श्रीमंत कोण ❞❃*
━━═•●◆●★★●◆●•═━━
बिल गेट्स पेक्षा श्रीमंत कोण आहे. कुणीतरी बिल गेट्सना विचारलं, की तुमच्या पेक्षा श्रीमंत कुणी आहे का? ते म्हणाले, हो एकच आहे.
बर्याच वर्षांपूर्वी माझी नोकरी गेली होती आणि त्यानंतर मी न्यूयॉर्क विमानतळावर गेलो. मी तेथे वृत्तपत्रांचे शीर्षक वाचले. मला त्यापैकी एक आवडले आणि मला ते विकत घ्यायचे होते. पण माझ्याकडे सुटे पैसे नव्हते. मी सोडून दिले, अचानक, एक सावळा मुलगा मला बोलावून म्हणाला, "आपल्यासाठी हे घ्या वृत्तपत्र." मी म्हणालो, पण माझ्याकडे सुटे पैसे नाहीत. तो म्हणाला, "काही हरकत नाही, मी तुला हे मोफत देतो आहे"
योगायोगाने ३ महिन्यांनंतर मी पुन्हा तिथे गेलो. ती गोष्ट पुन्हा अगदी तशीच घडली आणि त्याच मुलाने पुन्हा एकदा मला आणखी एक वृत्तपत्र मोफत दिले.
मी म्हणालो, मी स्वीकारू शकत नाही. परंतु तो म्हणाला, "मी हे तुला माझ्या नफ्यातून देतोय"
१९ वर्षांनंतर जेंव्हा मी श्रीमंत झालो तेंव्हा मी त्या मुलाला शोधण्याचा निर्णय घेतला. सुमारे दीड महिन्यानंतर मी त्याला शोधले. मी त्याला विचारले, तू मला ओळखलेस? तो म्हणाला, "होय, आपण प्रसिद्ध बिल गेट्स आहात."
मी म्हणालो, तु खूप वर्षांपूर्वी मला दोनदा मोफत वृत्तपत्र दिले होतेस. आता मला ते भरुन काढायचे आहे. मी तुला जे पाहिजे ते सर्व देईन. सावळा तरुण माणूस म्हणाला, "आपण ते भरपाई करू शकत नाही!"
मी म्हणालो, का? तो म्हणाला, "मी तुम्हाला स्वतः गरीब असताना जे दिले, ते तूम्ही स्वतः श्रीमंत झाल्यावर मला कसे परत देऊ शकता?"
बिल गेट्स म्हणाले, मला वाटते की तो सावळा तरुण माझ्यापेक्षा श्रीमंत आहे.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
*आपल्याला दान करण्यासाठी श्रीमंत असण्याची किंवा श्रीमंत होण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्यात दानत असायला हवी...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
04 .भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो; भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
04. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ 'व्हॉट्सॲपची' निर्मिती केव्हा झाली ?
➜ २००९.
✪ कोणाचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो ?
➜ स्वामी विवेकानंद.
✪ 'बुलंद दरवाजा' कोठे आहे ?
➜ फत्तेपूर शिक्री.(उत्तर प्रदेश)
✪ ICU चा लॉंगफॉर्म काय आहे ?
➜ Intensive Care Unit.
✪ 'मेरी कोम' ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜ बॉक्सिंग.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
04. *❒ वासुदेव बळवंत फडके ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ४ नोव्हेंबर १८४५
शिरढोण, पनवेल तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
●मृत्यू :~ १७ फेब्रुवारी १८८३
एडन, येमेन
◆चळवळ :~ भारतीय स्वातंत्र्यलढा
◆प्रभाव :~ महादेव गोविंद रानडे,
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे
◆वासुदेव बळवंत फडके◆
हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले. येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.
*क्रांतीचा पाया*
आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली. १८७०च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाउन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली.
◆ सशस्त्र क्रांती ◆
यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ही वेळ नाही. असे सांगून त्यांना निराश केले
फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या 'सैन्यात' भरती केले. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पकडून देणाऱ्यास त्याहून मोठे इनाम जाहीर केले! याचबरोबर साप-किरड्यांना मारल्यावर मिळणाऱ्या बक्षिसाप्रमाणे प्रत्येक युरोपीय व्यक्तीला मारण्याबद्दलही त्यांनी इनाम जाहीर केले.
◆ धरपकड, खटला व मृत्यू ◆
२० जुलै १८७९ रोजी पंढरपूरकडे जात असताना कलदगी गावातील देवळात तुंबळ लढाईपश्चात इंग्रज सरकारने फडक्यांना जिवंत पकडले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर खटला चालवण्यात आला. पुण्यातील एकाही वकिलाने त्यांचे वकीलपत्र घेण्याची तयारी दाखवली नाही. शेवटी सार्वजनिक काकांनी त्यांचे वकीलपत्र घेतले व त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. फाशीची शिक्षा टळून त्यांना आजीवन कारावास व तडीपारीची शिक्षा झाली. फडक्यांना अरेबियातील एडन येथील तुरुंगात पाठवण्यात आले. तेथे एकांतवासाची शिक्षा भोगत असलेल्या फडक्यांनी एके दिवशी आपल्या कोठडीचे दार बिजागऱ्यांसकट उचकटून काढून तुरुंगातून पळ काढला. काही दिवसांनी इंग्रजांनी त्यांना परत पकडले व पुन्हा तुरुंगात टाकले.
तेथे आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीविरुद्ध फडक्यांनी आमरण उपोषण केले व त्यांना १७ फेब्रुवारी १८८३ रोजी मृत्यू आला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁सोमवार ~ 04/11/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment