"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*05/03/24मंगळवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *05.मार्च:: मंगळवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
माघ कृ.9/10, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~नवमी, नक्षत्र ~मूळ 
योग ~सिद्धि, करण ~गर,
सूर्योदय-07:11, सूर्यास्त-18:33,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

05. *काम निष्ठापूर्वक करा की तुमच्या मागे धावत येईल.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05. *डोंगर पोखरून उंदीर कढणे –*
  ★ अर्थ ::~ जास्त श्रम करून कमी फायदा होणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

05. *योजकस्तत्र दुर्लभ: ।*
            ⭐अर्थ ::~
योजना करणारा (एखाद्या गुणाचा उपयोग करुन घेणारा) दुर्मिळ असतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

      🛡 *★05. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ समता दिन
★ हा या वर्षातील ६४ वा (लीप वर्षातील ६५ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणूवीजप्रकल्प (युनिट - २) राष्ट्राला अर्पण
●१९९७ : ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणार्‍या टपाल तिकिटाचे प्रकाशन
●१९३१ : दुसर्‍या गोलमेज परिषदेपुर्वी गांधी-आयर्विन करार झाला.
●१६६६ : शिवाजीमहाराजांनी राजगडावरून आग्र्यास प्रयाण केले.
●१५५८ : फ्रॅन्सिस्को फर्नाडीस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९१६ : बिजू पटनायक – ओरिसाचे मुख्यमंत्री, केन्द्रीय पोलाद, खाणकाम आणि कोळसा मंत्री
◆१९१३ : गंगूबाई हनगळ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका
◆१५१२ : गेरहार्ट मरकेटर – नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९५ : जलाल आगा – चरित्र अभिनेता
●१९८९ : बाबा पृथ्वीसिंह आज़ाद – क्रंतिकारी स्वातंत्र्यसैनिक, गदर पार्टीचे एक संस्थापक
●१९८५ : पु. ग. सहस्रबुद्धे – ’महाराष्ट्र संस्कृती’कार
●१९६८ : नारायण गोविंद चाफेकर – समाजशास्त्रज्ञ व ग्रंथकार
●१९६६ : शंकरराव मोरे – समाजवादी व साम्यवादी विचाराचे व्यासंगी नेते, पुणे जिल्हा स्कूल बोर्डाचे अध्यक्ष
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

    https://goo.gl/8D33ox
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣━┅━

05.  *✹ने परत मातृभूमीला✹*
      ●●●●००००००●●●●
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला ॥घृ॥

भूमातेच्या चरणतला तुज धूतां ।
मी नित्य पाहिला होता ॥
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊं ।
सृष्टिची विविधता पाहूं ॥
तैं जननींहृद विरहशंकितहि झाले ।
परि तुवां वचन तिज दिधलें ॥
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्ठिं वाहीन ।
त्वरित या परत आणीन ॥
विश्वसलों या तव वचनीं । मी
जगदनुभवयोगें बनुनी । मी
तव अधिक शक्त उद्धरणी । मी
येईन त्वएं, कथुनि सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला ॥१॥

शुक पंजरि या हरिण शिरावा पाशीं ।
ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहुं यापुढती ।
दशदिशा तमोमय होती ॥
गुणसुमनें मी वेचियलीं या भावें ।
की तिनें सुगंधा घ्यावे ॥
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा
हा व्यर्थ भार विद्येचा ॥
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबहि आतां । रे
फुलबाग मला, हाय पारखा झाला ।
सागरा, प्राण तळमळला ॥२॥

नभिं नक्षत्रें बहुत एक परि प्यारा ।
मज भरतभूमिचा तारा ॥
प्रासाद इथें भव्य परी मज भारी ॥
आईची झोपडी प्यारी ॥
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा
वनवास तिचाजरि वनिचा
भुलविणें व्यर्थ हे आतां । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पतीईए, जी सरिता । रे
तद्विरहाची शपथ घालितो तुजला ।
सागरा, प्राण तळमळला ॥३॥

या फेनमिषें हंससि निर्दया कैसा ।
कां वचन भंगिसी ऐसा ? ॥
त्वत्स्वामित्या सांप्रत जी मिरवीते ॥
भिउनि कां आंग्लभूमीतें ॥
मम मातेला अबल म्हणुनि फसवीसी
मज विवासनातें देशी ॥
तरि आंग्लभूमि भयभीता ॥रे
अबला न माझि ही माता । रे
कथिल हें अगस्तिस आतां । रे
जो आचमनीं एक क्षणी तुज प्याला ।
सागरा प्राण तळमळला ॥४॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣━┅━

05. *❂ अविरत पुढे पुढे जाऊ ❂*
     ━━═●✶✹★✹✶●═━━
अविरत पुढे पुढे जाऊ
अम्हि ना विश्रांति आता घेऊ॥धृ॥

उध्दराया पूर्वज शापित घोर आचरुनि तप हे अविरत
मुक्ति मिळवुनी देइ भगीरथ सातत्याने भगीरथाच्या
पुढे पुढे जाऊ॥१॥

शांत सागरी सेतू बांधून नष्ट कराया संकट दारूण
जाई वानरासह रघुनंदन त्या धैर्याने रघुरायच्या
पुढे पुढे जाऊ॥२॥

स्वर्गी तो देवेन्द्र कोपला गारायुत पर्जन्य वर्षला
गोवर्धन गोपांनि उचलला चातुर्याने श्रीकृष्णाच्या
पुढे पुढे जाऊ॥३॥

धुमाकुळ यवनांचा चाले आवर घाली शिवराय बळे
घेवुनि संगे मित्र मावळे त्या शिवराया साक्ष ठेवुनी
पुढे पुढे जाऊ॥४॥

सातत्याच्या अन् धैर्याच्या चातुर्याच्या संघटनेच्या
मातृभूमिच्या उध्दाराच्या महाजनांच्या त्याच पथाने
पुढे पुढे जाऊ॥५॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05.  *❃❝ क्रोधा व संयम ❞❃*
     ━━═•●◆●★●◆●•═━
     एकदा भगवान श्रीकृष्ण, बलराम
आणि सात्यकी हे तिघे जंगलातून जात
असताना रात्रीच्या वेळी काहीच
न कळाल्याने रस्ता चुकले.
जंगल घनदाट होते, तेथे न पुढे
जाण्याचा मार्ग दिसत होता न मागे येण्याचा. तेव्हा तिघांनीही असा निर्णय
घेतला आता येथेच एखादी सुरक्षित जागा पाहून विश्राम करायचा आणि सकाळी उठून मार्गस्थ व्हायचे.

    तिघेही दमलेले होते पण प्रत्येकाने थोडा थोडा वेळ पहारा देण्याचे ठरवले.
पहिली पाळी सात्यकीची होती.
सात्यकी पहारा करू लागला

    तेव्हाच झाडावरून एका पिशाच्चाने हे पाहिले की एक माणूस पहारा करतो आहे आणि दोनजण झोपले आहेत. पिशाच्च झाडावरून खाली उतरले व सात्यकीला मल्लयुद्धासाठी बोलावू
लागले.
  पिशाच्चाने बोलावलेले पाहून
सात्यकी संतापला व क्रोधाने पिशाच्चावर धावून गेला. त्याक्षणी पिशाच्चाचा आकार बदलला व तो मोठा झाला. दोघांत तुंबळ मल्लयुद्ध झाले. पण जेव्हा जेव्हा सात्यकीला क्रोध येई तेव्हा तेव्हा पिशाच्चाचा आकार मोठा होई व ते सात्यकीला अजूनच जास्त जखमा करत असे.

   एका प्रहरानंतर बलराम जागे झाले व त्यांनी सात्यकीला झोपण्यास सांगितले. सात्यकिने त्यांना पिशाच्चा बदल काहीच सांगितले नाही. बलरामांनाही पिशाच्चाने मल्लयुद्धास निमंत्रण दिले. बलराम पण क्रोधाने पिशाच्चाशी लढायला गेले तर त्याचा आकार त्यांना वाढलेला  दिसून आला. ते जितक्या क्रोधाने त्याला मारायला जात तितका त्या पिशाच्चाचा आकार मोठा होत असे. शेवटी तोही प्रहर संपला व आता पहा-याची पाळी भगवान श्रीकृष्णाची होती.

    पिशाच्चाने मोठ्या क्रोधाने श्रीकृष्णांना आव्हान दिले पण श्रीकृष्ण शांतपणे मंदस्मित करत त्याच्याकडे पहात राहिले. पिशाच्च अजून संतापले व मोठमोठ्याने ओरडून श्रीकृष्णांना बोलावू लागले पण श्रीकृष्ण मंदस्मित करत शांत भाव जपत राहिले
व एक आश्चर्य झाले ते म्हणजे जसे जसे पिशाच्चाला क्रोध येऊ लागला तसतसा त्याचा आकार लहान होत गेला. रात्र संपत गेली अन पहाट
झाली शेवटी आकार लहान होत
होत पिशाच्चाचा एक छोटासा किडा झाला व श्रीकृष्णांनी अलगद
त्याला आपल्या उपरण्यात बांधून ठेवले.
  सकाळी सात्यकी व बलरामांनी रात्रीची कहाणी सांगताच श्रीकृष्णांनी तो किडा त्यांना दाखविला व म्हणाले,
"तुम्ही क्रोधाने याला कधीच जिंकू शकत नव्हता कारण हे क्रोधाचे पिशाच्च होते. त्याला शांती हेच औषध
आहे. क्रोधाने क्रोध वाढतो मात्र त्याचा प्रतिकार हा केवळ शांतभाव प्रकटीकरणाने होतो.
  मी शांत राहिलो म्हणून हे पिशाच्च बघा कसे आता या किड्यासारखे लहान होऊन बसले आहे.

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  क्रोधावर संयमानेच विजय मिळविता येतो. क्रोधाला क्रोधाने मारता येऊ शकत नाही तर शांतपणे, प्रेमानेच कमी करता येते, नष्ट करता येते. हे पिशाच्च बाहेर कोठे नसून, आपल्या विचारातच वसत असतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *फांदीवर बसलेल्या पाखराला फांदी तुटण्याची भीती नसते. कारण त्याचा त्या फांदीवर विश्वास नसून पंखावर विश्वास असतो.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  'यंग इंडिया' हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते ?
➜ महात्मा गांधी.

✪  'फ्रेंच ओपन २०१३' चे पुरूष गटाचे एकेरी विजेतेपद कोणी पटकावले ?
➜ राफेल नदाल.

✪  भारतातील सर्वांत मोठे तारघर कोठे आहे ?
➜ मुंबई.

✪  स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण आहे ?
➜ लाॅर्ड रिपन.

✪  संत तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान कोणते आहे ?
➜ देहू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

05. *❒ ♦अलेस्सांद्रो व्होल्टा♦❒* 
━═•●◆●★●◆●•═━━
बॅटरीच्या शोधासाठी प्रसिध्द..
● जन्म :~ १८ फेब्रुवारी १७४५
●स्मृतिदिन :~ ५ मार्च १८२७

     व्होल्टाच्या बॅटरीमुळं इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्राची पाळंमुळंच रोवली गेली. यातूनच मग पुढे ‘इलेक्ट्रोकेमिस्ट्री’ आणि ‘इलेक्ट्रोमॅग्नेटिझम’ यांच्यातले अनेक प्रयोग करणं शक्य झालं.
एकूणच गॅलव्हिनीच्या संशोधनाचा सगळीकडे ‘जाता जाता’ उल्लेख केला जातो, तर व्होल्टाच्या कामगिरीचा वापर नंतर तारायंत्र (‘टेलिग्राफ’), दूरध्वनी (‘टेलिफोन’) आणि बिनतारी (‘वायरलेस’) या यंत्रणांच्या संबंधित तंत्रज्ञानांच्या संशोधनात होणार होता!
    विजेची निर्मिती त्या बेडकाच्या शरीरात होत नसून तिचा उगम दुसरीकडे होतो हे दाखवून देण्यासाठी त्यानं आता जंग जंग पछाडलं. त्यासाठी त्यानं एक उपकरण तयार केलं. त्यात चांदी आणि जस्ताच्या धातूचे बरेच तुकडे घेतले. या तुकडय़ांमध्ये त्यानं ओलसर कार्डबोर्डच्या तबकडय़ा बसवल्या आणि एका जिवंत बेडकाच्या शरीरातून त्या उपकरणाच्या साहाय्यानं वीज सोडली, तर तोही थरथरला. गंमत म्हणजे यात कुठेही लेडन जारचा (म्हणजे तत्कालीन बॅटरीचा) वापर नव्हता. याचाच अर्थ म्हणजे त्या जिवंत बेडकाच्या शरीरात कुठली तरी अगदी कमी ताकदीची वीज होती आणि जेव्हा जास्त ताकदीच्या बाहेरच्या धातूच्या बॅटरीसदृश उपकरणाला त्या प्राण्याचा थेट स्पर्श झाला तेव्हा ती बेडकाच्या शरीरातली वीज त्या सर्किटमधून गेली, आणि त्यामुळे त्याच्या पायांची थरथर झाली.
    यानंतर व्होल्टानं स्वत:वरही प्रयोग केले! त्यासाठी त्यानं आपल्या तोंडात एक चांदीचा चमचा धरला. मग आपल्या जिभेच्या पुढच्या टोकावर एक पत्र्याचा तुकडा ठेवला. मग त्यानं तो तुकडा मागे असलेल्या चमच्याला जोडताच त्याला एक घाणेरडा वास आला! याचं कारण म्हणजे हे दोघं एकमेकांना जोडले जाताच या दोन वेगवेगळ्या धातूंमधून वीज गेली आणि ती वासाच्या रुपानं बाहेर प्रकटली!
म्हणजेच जिवंत किंवा मृत बेडकाचे पाय हलण्यामागचं कारण हे त्या बेडकाच्या शरीरात कुठलीही बॅटरी वगैरे नसून बाहेरच्या सर्किटला तो बेडूक चिकटला की तो बेडूकही त्याच सर्किटचा भाग होणं, आणि त्यामुळे त्याच्या शरीरातून वीज जाणं, आणि म्हणून तो थरथरणं हे असतं, असा अतिशय महत्त्वाचा निष्कर्ष त्यानं काढला. त्यामुळे ‘अॅनिमल इलेक्ट्रिसिटी’ वगैरे बंडल प्रकार असतात हे त्यानं दाखवून दिलं! दोन धातू जवळ आणले आणि त्यांच्यामध्ये ओलसरपणा असला की वीज तयार होते हे व्होल्टाच्या लक्षात आलं होतं. हा निष्कर्ष सनसनाटीच होता. यातच तर आपण आजही वापरत असलेल्या ‘बॅटरी’चीही मूळं होती!
     त्याच्या या निष्कर्षांमुळे इटलीतल्या सगळ्या बेडकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल! गॅलव्हिनीचा या दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर एका वर्षांनं, म्हणजे २० मार्च १८०० या दिवशी व्होल्टानं लंडनच्या मानाच्या ‘द रॉयर सोसायटी’चे सचिव सर जोसेफ बँक्स यांना पत्र लिहून आपल्या गॅलव्हिनीबरोबरच्या वादावर कायमचा पडदा टाकण्यात आपल्याला यश आल्याचं कळवलं. त्यासाठी आपल्या उपकरणात ठराविक पदार्थ विशिष्ट रचनाक्रमानं मांडून त्यांच्याद्वारे वीजनिर्मिती करण्यात आपल्याला यश मिळालेलं असून प्राण्यांच्या शरीरात वीज तयार होते वगैरे सगळं बकवास असल्याचा त्यानं दावा केला. अर्थातच व्होल्टाचं मत अर्धवट प्रमाणात बरोबर असणार होतं. त्यानं तयार केलेल्या त्या काळात ‘व्होल्टाईक पाईल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या उपकरणालाच आपण आज सगळीकडे वापरत असलेली बॅटरी म्हणून ओळखतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁मंगळवार~05/03/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment