"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*05/04/24 शुक्रवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *05.एप्रिल:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन कृ.11, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~एकादशी, नक्षत्र ~धनिष्ठा,
योग ~साध्य, करण ~बालव,
सूर्योदय-06:28, सूर्यास्त-18:53,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

05. *अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
05. *कुत्र्याचे शेपूट वाकडे*
      *★ अर्थ ::~*
- मुळच्या स्वभावात बदल होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====
05. *सर्वेऽपि सुखिन: सन्तु ।*
          ⭐अर्थ ::~
जगात सगळे सुखी असोत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●•

     🛡 *★05. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ राष्ट्रीय नौकानयन दिन
★ हा या वर्षातील ९५ वा (लीप वर्षातील ९६ वा) दिवस आहे.
★ राष्ट्रीय सागरी संपत्ती दिन

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.
●१९४९ : भारत स्काऊट आणि गाईडची स्थापना झाली.
●१९३० : २४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.
●१६६३ : लाल महालात मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९०८ : बाबू जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान
◆१८५६ : बुकर टी. वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९३ : दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री
●१९४० : चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते
●१९२२ : पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

05. *✸ जय जवान जय किसान ✸*
       ●●●●●००००००●●●●●
एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान
जय जवान, जय किसान !
जय जवान, जय किसान, जय जय !

अखिल देश पाठीशी, 'जवान' व्हा रणी चला
किसान होऊनी कसा, भूमी सस्य श्यामला
यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
जय जवान, जय किसान !

शत्रू मित्र जाणुनी सावधान सर्वदा
आपल्या श्रमे करू प्रसन्‍न देवी अन्‍नदा
उभ्या जगात आपुली सदैव उंच ताठ मान
जय जवान, जय किसान !

अजिंक्य सैन्य आमचे, गाजवी पराक्रमा
भूमिदास दाखवी निर्मितीत विक्रमा
स्वतंत्र हिंद देश हा, स्वतंत्र सिंधू आसमान
जय जवान, जय किसान !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

05.  *❂ हे करुणाकरा ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥

तूही आदि तू अनंत । तूही दु:स्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

05.  *❃ व्यापारी व उंट ❃*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
  एक व्यापारी आपल्या दोन उंटावर माल लादून गावा गावातून तो विकत असे. अशाच एका गावात त्याने दिवसभर विक्री केली. रात्र झाल्याने तिथेच एका मंदिराच्या आवारात मुक्काम करण्याचे त्याने ठरवले. मैदानातील झाडाला उंट बांधून स्वतः मंदिराच्या ओसरीत झोपायचं असा विचार तो करतो. दोन्ही उंटांना झाडाजवळ नेतो. एका उंटाला दोरीने बांधतो. मात्र दुसऱ्या उंटाला बांधायला जातो तर दोरी कमी पडते., आता काय करावे...?  पंचाईत झाली...  उंट तसाच मोकळा ठेवणे शक्य नव्हते...  व्यापारी परेशान झाला. इकडे तिकडे एखादी दोरी सापडतीय का ते पाहून लागला., ती काही दिसेना...

  त्याची परेशानी पाहून मंदिराचा पुजारी त्याच्या जवळ येऊन म्हणाला, अरे., पहिल्या उंटाला बांधले तसेच दुसऱ्याला बांध.
महाराज, पण दोरी नाहीये ना...
पुजारी म्हणाला, "तू नुसतं दोरी बांधल्याचा नाटक कर".,
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने खोटे खोटेच उंटाला दोरी बांधली...  आश्चर्य म्हणजे त्यानंतर तो दुसरा उंटही निवांत खाली बसला...

   सकाळी व्यापारी उठून, सगळे आवरून दुसऱ्या गावी जायला निघाला. झाडाजवळ येऊन पहिल्या उंटाची दोरी सोडली.,  तो उंट उभा राहिला.

  दुसऱ्या उंटाला काही दोरी बांधलेली नव्हतीच म्हणून व्यापाऱ्याने त्या दुसऱ्याला फक्त "झ्याक झ्याक" असा आवाज देऊन उठवले...  पण तो दुसरा उंट काही उठेना., व्यापारी पुन्हा परेशान...

   तिथेच उभा असलेला पुजारी हसू लागला. तो म्हणाला, अरे, तो उठणार नाही. कारण तू त्याची दोरी कुठे काढलीस...?
पण महाराज., मी दोरी बांधलीच कुठे होती...?  नुसते नाटक केले होते ना...

  पुजारी म्हणाला, नाटक तुझ्यासाठी होते., पण त्याला तर ते खरेच वाटले होते ना...  म्हणून आता ती काल्पनिक दोरी सोडव., मग पहा...
त्याप्रमाणे व्यापाऱ्याने दोरी काढल्याचे नाटक केले.,  आणि काय आश्चर्य...? तो दुसरा उंट तटकन उठला की..., व्यापारी चकित झाला...!

   पुजारी म्हणाला जसा हा उंट अदृष्य दोरीने बांधला गेला तसेच आपणही जुन्या, कालबाह्य रूढीमध्ये अडकलॊ आहोत.

   "ती" अदृश्य दोरी काढून टाकण्याची इच्छाच नाही तर आपण दुसऱ्या आनंदाचा गावी जाणार कसे?

      *_🌀तात्पर्य_ ::~*
   आपल्या आनंदाच्या वाटेत आपल्या शिवाय दुसरा कोणीही अडथळा आणू शकत नाही...
   निष्कारण स्वतःच स्वतःला बांधून घेतलेल्या अनेक "दोऱ्या" सोडवून पाहूया.., आपण नक्की आनंदी होऊ.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

05. *जेव्हा आपली वेळ वाईट असते*
*तेव्हा लोकही वाईट वागतात...*
*आणि चांगली वेळ आली की*
*सगळेच चांगले वागतात...*
*_दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे._*
*_त्यामुळे  नेहमी  लक्षात ठेवा_*
*_माणसं बदलण्यात वेळ घालवू नका._*
*आपली परिस्थिती बदला*
*बाकी सगळं आपोआप बदलेल ..*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
05. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

◆ भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
   ➜ भारतरत्न.

◆ पृथ्वीचा अंतर्भाग कोणत्या खनिजापासून बनलेला आहे ?
   ➜ निकेल व लोह.

◆ भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे ?
   ➜ तापी नदी.

◆ 'मेळघाट व्याघ्र प्रकल्प' राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
   ➜ अमरावती.

◆ समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात ?
   ➜ सोनार तंत्रज्ञान
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

05.  *❒ बाजीप्रभू देशपांडे ❒*
       ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
*बाजीप्रभू देशपांडे तांबड्या मातीतील रणमर्द ...!*

          *बाजी प्रभू देशपांडे*
  हिरडस मावळातील सिंध गावाची फार मोठी आसामी.

    बापजादे नावाजलेले पैलवान ,घरची परंपराच मुळी कुस्तीची .गावात बाजींचा चारचौकी देशपांडे वाडा होता, त्या वाड्यात समृध्द घोड्यांची पागा होती. पागेच्या मागच्या बाजूला बाजींनी तालीम बांधली होती.

   शिवरायांनी मांडलेल्या स्वराज्याच्या खेळात बाजी सुध्दा सामील झाले होते,पण त्या आधी बाजी बांदल देशमुख सरकारांचे दिवान म्हणून होते,राजांनी रायरी सर करून फितूर चंद्रराव मोर्यांना ठार केले तेव्हा त्यांना बाजीप्रभू  देशपांडे हे सोन सापडलं, पण बाजी मनोमनी म्हणत असत कि राजे  हे सोन आधी मातीमोल होत..
तुमचा स्पर्श झाला आणि जीवनाचे सोने झाले. राजाना  तर रायरी जिंकल्यापेक्षा  'बाजी'मिळाल्याचा आनंद झाला होता..!!
बाजी स्वत पहाटे  ३ वा.
उठत असत. पूर्वीचे लोक भल्या पहाटे आपला दिवस सुरु करत असे म्हणजे दिवसभराच्या कामाला जास्त तास मिळत असे.

    पशुपक्षी बघा आपला दिवस कसा भल्या पहाटे सुरु करतात अगदी तसेच. बाजींच्या पदरी शूर धिप्पाड पैलवानांची फौज होती. सर्वजन कसलेले पैलवान होते.
सर्वच लढतीला उठत असत पहाटे...!
बाजींचे थोरले बंधू फुलाजी हे तर कुस्तीचे अतिशय व्यसनी.

   ३ तास लढत झाल्याशिवाय त्यांचे मनच भरत नसे..!! तर हे देशपांडे कुटुंब कुस्तीचे अतिशय नादिष्ट्य ..!!
बाजी स्वत लढत करत असत ,नंतर ५ हजार जोराचा ठेका एका दमात मारत असत ,तद्नंतर २ तास हात्यारांचा सराव.मग अंघोळ पाणी ..
तद्नंतर शंभू-भवानीची यथासांग पूजा झाली कि मग २ शेर तुपातील शिरा न्याहारीला यायचा.

    त्यानंतर  ५ शेर दुध पिउन मगच बाजी शिवरायांना भेटायला राजगडी रवाना होत असत...! एवढा प्रचंड व्यायाम, आणि खुराक ..?
    मग काय ..
बाजींचे काम काय लहान सहान होते ? अहो,त्यांच्या एका हाकेत बारा मावळ भगव्याखाली जमा होत होता ...
माणसासारखी माणसच काय पण हत्ती घोडे सुध्दा त्याना वचकून असत..!सकाळचा व्यायाम, खुराक, पूजा झाली आणि दिवसभराचे राजकारण संपवून सायंकाळी सुध्दा कुस्ती खेळल्याशिवाय अन्नाचा कण मुखात जात नसे..!

    आणि एके दिवशी ६ महिने सिद्दी जौहरच्या वेढ्यात अडकलेल्या राजांनी तांबड्या मातीत रंगलेली बाजींची फौज घेवून सिद्दीच्या वेढ्याबाहेर उडी मारली ..! आणि रक्ताची रंगपंचमी खेळून बाजींनी राजांना सहीसलामत वेढ्याबाहेर काढले..  ८ तास चिखल वाटेने , भर पावसात धावत येवून आणि पुढे ६ तास लढून .

   बाजी-फुलाजी या सख्या भावांनी राजांसाठी, मायभूसाठी स्वत:च्या  चाळण होऊन सुध्दा ती खिंड सोडली नव्हती...  
*तोफेंचे बार ऐकूनच तो देह ठेवला..*
*हि रग, हि जिद्द, हि तळमळ, हि रक्ताची उसळी..*
  
     हि मातृभूमीवर मरायची आग फक्त तांबडी मातीच देवू शकते..
त्याचसाठी हा आजच लेख....!
हे जे बाजी-फुलाजी किंवा अन्य मराठेशाहीचे असे मरायला तयार होत होते हि खरी शिवरायांच्या कार्याची पावती आहे. शिवछत्रपती जर खरे ओळखायचे असतील तर या नरवीरांच्या बलिदानातून ओळखावे.

   कोण तोफेचे आवाज होईपर्यंत प्राण सोडत नाही, तर कोणी पोटच्या पोराचे लग्न टाकून गड सर करायला जातो.
कोणं मृत्युच्या पालखीत हासत हासत बसतो. तर कोणी खोटा शिवाजी म्हणून मरणाच्या अंथरुणात झोपतो..!
यांचे हे असामान्य बलिदान हि शिवराय करत असलेल्या महान कार्याची खरीखुरी पावतीच होय..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ शुक्रवार~05/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment