*05/10/24 शनिवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ 
 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
 *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *05.ऑक्टोबर:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.३, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~स्वाती, 
योग ~विष्कम्भ, करण ~तैतिल, 
सूर्योदय-06:30, सूर्यास्त-18:23,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━
🔵🟢🔴
05.  *शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघा सारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
05. *खायला काळ भुईला भार –* 
  ★ अर्थ ::~ ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
05. *बुद्धिः कर्मानुसारिणी ।*
            ⭐अर्थ ::~
 बुद्धी ही कर्माचे अनुसरण करणारी असते. (आपण जसे कर्म करतो त्याप्रमाणे आपली बुद्धी बनते.)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
  🛡 ★ 05. ऑक्टोबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील २७८ वा (लीप वर्षातील २७९ वा) दिवस आहे.
   ~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
 🔹•••°°~°°•••◆••°°~°°•••🔹
●१९८९	:	मीरासाहेब फातिमा बिबी या सर्वोच्च न्यायालयातील पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या.
●१९५५	:	पंडित नेहरुंच्या हस्ते ’हिन्दूस्तान मशिन टूल्स’ या कारखान्याचे उद्घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
●१८६४	:	एका भीषण चक्री वादळामुळे कोलकात्यात सुमारे ६०,००० जण ठार
  ~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
 🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९२२	:	शंकरसिंग रघुवंशी – शंकर-जयकिशन या जोडीतील संगीतकार 
◆१९२२	:	यदुनाथ दत्तात्रय थत्ते – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार’ ’साधना’ मासिकाचे संपादक 
◆१८९०	:	किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला – तत्त्वज्ञ. गांधीजींच्या हत्येनंतर साडेचार वर्षे ते ’हरिजन’चे संपादक होते. 
  ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९७	:	चित्त बसू – संसदपटू, ’फॉरवर्ड ब्लॉक’चे सरचिटणीस 
●१९९२	:	बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत – नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री (१९५५), इजिप्त, नॉर्वे, ब्रिटन इ. देशांतील भारताचे राजदूत
●१९९१	:	 *रामनाथ गोएंका –* ’इन्डियन एक्सप्रेस’ वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, स्वातंत्र्य चळवळीतील नेते 
●१९८१	:	 भगवतीचरण वर्मा – हिन्दी कथाकार, कादंबरीकार, कवी, एकांकिकाकार, पटकथाकार व नाटककार, पद्मभूषण 
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
 वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
     https://goo.gl/GP1pTx
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣═┅━
05. *✸ गे मायभू तुझे मी फेडीन ✸*
    ●●●●००००००●●●●
गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.
आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दांत सोड माझ्या आता हळूच पान्हा.
आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मांस अर्थ आला !
मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयाग… काशी !
आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी;
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
05. *❂ !!! आजचा अभंग !!! ❂*
     ━═●✶✹★★✹✶●━━
अमृताचीं फळें अमृताची वेली ।
ते चि पुढें चाली बीजाची ही ॥१॥
ऐसियांचा संग देइ नारायणा ।
बोलावा वचना जयांचिया ॥२॥
उत्तम सेवन सितळ कंठासी ।
पुष्टी कांती तैसी दिसे वरी ॥३॥
तुका म्हणे तैसें होइजेत संगें ।
वास लागे अंगें चंदनाच्या ॥४॥
                    ~ संत तुकाराम
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●━━
05. *❃❝ कष्टाचे सार्थक होणे ❞❃*
  ━═•●◆●★★●◆●•═━
         " एकदा एक व्यापारी त्याच्या काही नोकरांबरोबर दुसऱ्या देशात व्यापार करण्यासाठी जात असतो जाताना त्यांना रस्त्यात वाळवंट लागते. वाळवंटात चालून चालून त्याच्या काही नोकरांना पाण्याविना चक्कर यायला लागते. उन्हामुळे आणि जवळ कोठेही पाणी नसल्यामुळे नोकर कासावीस होऊ लागतात . 
   त्यांची अवस्था पाहून व्यापारी मनात विचार करतो जर मीच माघार घेतली तर माझे नोकर पण माघार घेतील. मला माघार घेऊन चालणार नाही.मला आशावादी राहायला हवे. व्यापारी इकडे तिकडे पाहू लागतो त्याला जवळच एक हिरवे झुडूप दिसते. 
व्यापारी विचार करतो कि जर पाणी नाही तर हिरवे झुडूप कसे आले? म्हणजे नक्कीच येथे पाणी असावे . व्यापाऱ्याला हायसे वाटते. 
व्यापाऱ्याने नोकरांना तेथे खोदायला सांगितले त्याचे नोकर खोदतात पण खाली दगडच दिसतात. पाणी लागताच नाही व्यापारी म्हणतो आणखी थोल खोद व्यापारी दगडांना आपले कान लावतो त्याला जमिनी खालील पाण्याच्या प्रवाहाचा आवाज ऐकू येतो. व्यापारी त्या दगडांवर एक हातोडा मारतो. आणि काय आश्चर्य जमिनीतून पाण्याचे कारंजे उडू लागते. ते पाणी पिउन सर्वाना खूप आनंद होतो. त्यांच्या कष्टाचे सार्थक होते.
      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~* 
  *"प्रयत्न केला तर यश मिळते. "*   
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
05.  *जिवनात खरं बोलून "मन"*
    *दुखावलं तरी चालेल...*
*पण खोट बोलून "आनंद" देण्याचा कोणाला कधीच प्रयत्न करू नका...*
   कारण....   त्यांच आयुष्य असतं 
  *फक्त तुमच्या "विश्वासांवर...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
05. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
➜जम्मू काश्मीर. 
✪ 'शिका, संघटित व्हा, संघर्ष करा' ही घोषणा कोणी दिली ?
➜डॉ.बाबासाहेब आंबेडकर.
✪रक्तगट कोणी शोधून काढले ?
➜कार्ल लँडस्टेनर.
✪भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ?
➜लोकमान्य टिळक.
✪पोलिओची लस कोणी शोधून काढली ?
➜जोनास साल्क
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
05. *❒♦स्टीव्ह जॉब्स♦❒*  
  ━═•●◆●★★●◆●•═━
●जन्म :~ २४ फेब्रुवारी १९५५, अमेरिका
●मृत्यू :~ ५ ऑक्टोबर २०११;
   आयपॅड, आयफोन, स्मार्टफोन इत्यादिचा संशोधक.. *यांच्या स्म्रुतीदिनानिमीत्त*
       *विन्नम्र अभिवादन..!!*
  🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
             ★ स्टीव्ह जॉब्स ★
      हा एक अमेरिकन व्यवसायिक होता आणि तो ॲपल ह्या अमेरिकन कंपनीचा सहसंस्थापक व मुख्याधिकारी होता. जॉब्स हा काही काळ पिक्सार अॅनिमेशन स्टुडिओजचा मुख्य व्यवस्थापक होता आणि नंतर तो वॉल्ट डिस्ने कंपनीचा संचालक सदस्य होता. इ.स. १९७० मध्ये जॉब्स याने स्टीव्ह वॉझनियाक, माइक मारक्कुला आणि इतर (ॲपल कंपनीचे सर्व सदस्य) यांच्या समवेत व्यक्तिगत संगणक तयार केला. ॲपल-२ या मलिकेअंतर्गत मॅकिंटॉश नावाची प्रचालन यंत्रणा तयार केली. इ.स. १९८५ मध्ये कंपनीच्या सदस्यांसमावेत झालेल्या वादामुळे त्याने राजीनामा दिला आणि नेक्स्ट या नावाने व्यवहारात आणि उच्च शिक्षणात उपयोगी होईल अशी संगणकीय यंत्रणा (संगणकाचा वापर) किंवा प्रणाली तयार करणारी कंपनी स्थापन केली. इ.स. १९९७ साली 'नेक्स्ट'चे 'ॲपल'मध्ये विलीनीकरण झाले, त्याला पुन्हा 'ॲपल'मध्ये म्हणून स्थान मिळाले. यावेळी त्याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
 जॉब्स याला व्यवहारिक जगाच्या इतिहासात एक सणकी, कलंदर, सिलिकॉन व्हॅलीचे ठेकेदार म्हणून ओळखले जाते. त्याला सौंदर्यपूर्ण वस्तू बनवण्याची व वापरण्याची आवड असून याच कामासाठी त्याने वाहून घेतले आहे. त्याने प्रकृतिअस्वास्थ्य व अन्य वैयक्तिक कारणांसाठी २९ जून २००९ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा राजीनामा दिला. आयफोन, 'आयपॉड', 'आयपॅड' हे लोकप्रिय, बहूपयोगी उत्पादने त्याच्यामुळेच बाजारात आले. स्टीव जॉब्सला उपभोक्ता संगणकक्षेत्रातील नवीनतेचा व अविष्कारचा जनक म्हणून संबोधले जाते. मृत्यू स्टिव जॉब्सचा कर्क रोगामुळे मृत्यू झाला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
 *❁शनिवार ~05/10/2024❁* 
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment