Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *05. डिसेंबर:: गुरूवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.४, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~चतुर्थी, नक्षत्र ~उत्तराषाढा,
योग ~वृद्धि, करण ~विष्टि,
सूर्योदय-06:58, सूर्यास्त-18:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
05. *मनाचे स्वातंत्र्य हे खरे स्वातंत्र्य आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
05. *खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी*
*★ अर्थ ::~* चांगले मिळाले तर पाहिजे नाहीतर मुळीच नको.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
05. *पृथ्विभूषणं राजा ।*
⭐अर्थ ::~
राजा हा पृथ्वीचे भूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
🛡 ★ 05. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ हा या वर्षातील ३३९ वा (लीप वर्षातील ३४० वा) दिवस आहे.
★ International Volunteer Day for Economic and Social Development
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●१९५७ : इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
●१९३२ : जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.
●१८४८ : अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४३ : लक्ष्मण देशपांडे – ’वर्हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक
◆१९०५ : शेख अब्दुल्ला – शेर - ए - कश्मीर (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)
◆१९०१ : वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक
●१९५९ : कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते.
●१९५१ : अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार
●१९५० : *योगी अरविंद घोष –* क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
05. *✸ आता उठवू सारे रान ✸*
●●●●००००००●●●●
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतकर्यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण
किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेउनि पेटवतिल सारे रान
कोण आम्हां अडवील, कोण आम्हां रडवील
अडवणूक त्या करणारांची उडवू दाणादाण
शेतकर्यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडि पडे
तिरंगि झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान
पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
05. *❂ शुद्धी दे बुद्धी दे ❂*
━━═●✶✹★✹✶●═━━
शुद्धी दे, बुद्धी दे, हे दयाघना
शक्ती दे, मुक्ती दे आमुच्या मना
तरतम ते उमजेना, उमजेना सत्य
फसविते आम्हांला विश्व हे अनित्य
दिग्दर्शन मज व्हावे हीच कामना
स्वत्वाला विसरून जर भ्रमले हे चित्त
ऋजुतेवर मात करी द्रोह हा प्रमत्त
निर्भयता जागावी हीच प्रार्थना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
05. *❃❝ चांगली वागणुक ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच; सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे. पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात. मग तुमच्यावर आरोप होतात. मग तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात.. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतििबंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही. तर ही शहाणी, समंजसपणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. परंतु प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो. यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. 'हेचि फल काय मम तपाला'? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही. कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडाओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा 'थेंबे, थेंबे' संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते. आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
शेवटी काय तर''आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ''पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात त्यामुळे संयम बाळगुण प्रगती करणे हीच खरी चपराख विरोधी मित्रांना बसेल बाकी आपण सर्वजन सुज्ञ आहातच!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
05. *हसणे फार सुंदर आहे !*
*दुसऱ्याला हसवीणे त्याहून सुंदर* *आणि वंदनीय आहे..*
*मात्र दुस-यावर हसणे निंदनीय आहे.*
*स्वतःसाठी रडणे स्वार्थ आहे...*
*मात्र दुसऱ्यासाठी रडणे प्रेम आहे.*
*“जीवनात हसणे, रडणे अटळ आहे फक्त हेतू शुद्ध, निरपेक्ष आणि परोपकारी असला की सर्व सुंदर आहे”....*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
05. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ भारतात कोणत्या राज्याची किनारपट्टी सगळ्यात मोठी आहे ?
➜ गुजरात.
✪ जागतिक मानवी हक्क दिन कधी साजरा केला जातो ?
➜ १० डिसेंबर.
✪ सीताफळाचे सर्वाधिक उत्पादन महाराष्ट्रात कोठे होते ?
➜ दौलताबाद.(औरंगाबाद)
✪ आकाशात दिसणा-या इंद्रधनुष्यात हिरवा रंग कोठे असतो ?
➜ मध्यभागी.
✪ 'बटाट्याची चाळ' हे पुस्तक कोणत्या लेखकाचे आहे ?
➜ पु.ल.देशपांडे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
05. *❒ ♦योगी अरविंद♦ ❒*
━━═•●◆●★●◆●•═━
क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी
_यांची पुण्यतिथी निमित्त त्यांचे पवित्र_
*स्मृतीस विनम्र अभिवादन...!!*
*कोटी कोटी प्रणाम.*
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
●जन्म :~ १५ ऑगस्ट १८७२
*●मृत्यू :~ ५ डिसेंबर १९५०*
★ श्री ऑरोबिंदो ऊर्फ योगी अरविंद घोष ★
हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ आणि महायोगी होते. ते स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षण तज्ज्ञ, आणि महाकवी या विविध भूमिकांनी ओळखले जातात.
🔷अरविंदांचा जन्म १५ ऑगस्ट १८७२ रोजी कलकत्ता येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णधन घोष आणि आईचे नाव स्वर्णलता होते.
🔶लहानपणापासूनच त्याच्या विचारांवर इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी आणि गॅरिबाल्डी यांची छाप होती. वयाच्या सातव्या वर्षी अरविंदांना शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. लहान वयातच त्यांनी लॅटिन, इंग्लिश, ग्रीक या भाषांमध्ये नैपुण्य मिळविले. केंब्रिजला शिकत असताना त्यांच्या मनात देशप्रेमाची भावना जागृत झाली. ते 'इंडियन मजलिस' या संघटनेचे कार्यवाह बनले. अल्पावधी तच ते एक जहाल देशभक्त म्हणून ओळखले जाऊ लागले.
🔷भारतात परतल्यानंतर ते बडोदा संस्थानच्या नोकरीत रुजू झाले. बडोद्यास सयाजीराव गायकवाड यांचे सचिव म्हणून त्यांनी काम केले.
■ स्वातंत्र्यलढ्यात सहभाग ■
🔶याच काळात ते राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीकडे ओढले गेले. ते लोकमान्य टिळकांचे सहकारी बनले. राष्ट्रीय आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले. त्यांनी मुंबईच्या 'इंदुप्रकाश वृत्तपत्र' या वर्तमानपत्रात लेख लिहून आपली राजकीय मतेही मांडली. अल्पावधीतच ते हिंदुस्थाना तील अग्रगण्य नेत्यांपैकी एक बनले. बंगालच्या १९०६मध्ये झालेल्या फाळणीनंतर ते हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. त्याच वर्षी त्यांनी मातरम् हे वृत्तपत्र सुरू केले. बंगालमधील क्रांतिकारक चळवळीचे प्रवर्तक असताना, इंग्रज सरकारने त्यांना एका खटल्यात गोवले. त्यांना १९०७ मध्ये एका वर्षाची कैद झाली. त्यांना अलिपूर येथे कारावासात ठेवण्यात आले होते.
■ जीवनाला कलाटणी ■
🔷जेथे त्यांनी योगसाधना केली. त्यांना तेथे सर्वत्र वासुदेवाचे दर्शन झाले, असे म्हणतात. हा त्यांचा अनुभव त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दरम्यान, त्यांच्या बचावाचे काम देशबंधू चित्तरंजन दास यांनी केले. त्यांची यथावकाश निर्दोष सुटका झाली. झालेल्या या साक्षात्कारानंतर, भारताच्या स्वातंत्र्याविषयी ते निःशंक झाले. राजकारणातून निवृत्ती घेऊन, ते समग्र मानव जातीच्या परिवर्तनाच्या दिशेने स्वतःला कार्यप्रवृत्त करते झाले. ब्रिटिशांचा ससेमिरा चुकविण्यासाठी ते गुप्तपणे प्रथम चंद्रनगरला आणि नंतर १९१० मध्ये पाँडिचेरी येथे गेले. ते १९५० पर्यंत म्हणजे अखेरपर्यंत ते तेथेच राहिले. पोंडिचेरी ही त्यांची कर्मभूमी, योगभूमी ठरली. मानवाची प्रगती आणि आध्यात्मिक उत्क्रांती याविषयी त्यांचे स्वतंत्र चिंतन नंतर प्रसिद्ध झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌
*❁गुरूवार ~5/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment