*06/01/24 शनिवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *06. जानेवारी:: शनिवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.10, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~दशमी, नक्षत्र ~स्वाती,
योग ~धृति, करण ~वणिज,
सूर्योदय-07:13, सूर्यास्त-18:15,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
06. *समुद्राचा तळ शोधल्याशिवाय मोती मिळत नाहीत.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
06. *पालथ्या घड्यावर पाणी –*
★ अर्थ ::~
सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
06. *"सन्तोषतुल्यं धनमस्ति नान्यत्"*
⭐अर्थ ::~
समाधानासारखे दुसरे धन नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
🛡 *★06. जानेवारी★* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ पत्रकार दिन
★ हा या वर्षातील सहावा दिवस आहे.
~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९४४ : दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.
●१९२९ : गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन
●१९२४ : राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता
●१९०७ : मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
●१८३२ : पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले.
●१६६५ : शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६६ : ए. आर. रहमान – संगीतकार
◆१९५९ : कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेटकप्तान, समालोचक व प्रशिक्षक
◆१९२५ : रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक
◆१८६८ : गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी,
◆१८१२ : बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह, १८३२ मधे 'दर्पण' हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. ’दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले.
(मृत्यू: १८ मे १८४६)
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७१ : प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार
●१९१९ : थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
●१८८५ : भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक,
●१८८४ : ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ
●१८५२ : लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म: ४ जानेवारी १८०९)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
06. *✸ मग बोलू युध्दातून ✸*
●●●●००००००●●●●
भारताचे नागरिक
याचा आम्हा आभिमान
काय सांगू आम्हासाठी
राष्ट्रध्वजाची हो शान ।।धृ।।
याची घेता घेता आन
झाले शहिद जवान
देश माझा बलवान
आम्हा आहे अभिमान ।।१।।
रंग राष्ट्रध्वजाचे हो
एक दोन आणि तीन
शांती समृध्दीचे दोन
समाधान आणखीन ।।२।।
हिन्दी बांधव आम्ही हो
देश माझा हिंदुस्थान
राज्य लोकशाहीजे हे
याचा आम्हा अभिमान ।।३।।
अतिरेकी सावधान
माझा भारत महान
इथे नाही चालणार
काही कट कारस्थान ।।४।।
प्रश्न सोडवू सुटता
अरे आम्ही शांतीतून
युध्द आम्हीही जाणतो
मग बोलू युध्दातून ।।५।।
~सौ. मंगला रोकडे, धुळे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
06. *❂ असो तुला देवा माझा ❂*
━═●✶✹★✹✶●═━
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार
तुझ्या दयादातृत्वाला अंत नाही पार
॥धृ॥
तुझ्या कृपेने रे होतील फुले फत्तराची
तुझ्या कृपेने रे होतील मोती मृत्तिकेची
तुझ्या कृपेने रे होतील सर्प रम्य हार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥१॥
तुझ्या कृपेने होइल उषा त्या निशेची
तुझ्या कृपेने होइल सुधा त्या विषाची
तुझ्या कृपेने होइल पंगु सिंधुपार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥२॥
तुझ्या कृपासिंधूमधला बिंदू जरी मिळेल
तरी प्रभो ! शतजन्मांची मतृषा शमेल
तुझे म्हणुनी आलो राया ! बघत बघत दार
असो तुला देवा ! माझा सदा नमस्कार ॥३॥
~ साने गुरुजी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
06. *❃❝ उपकार ❞❃*
━═•●◆●★●◆●•═━
एकदा एका जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तो अत्यंत खादाड आणि दुष्ट होता. त्याला एकदा खूप जोर्याची भूक लागली, त्याने जंगलातले अनेक प्राणी मारून खाल्ले. पण इथेच तो अडकला. एका प्राण्याला मारल्यानंतर त्याला खाताना त्याच्या घशात त्या प्राण्याचे हाड अडकले.
त्याने ते हाड काढायचा खूप प्रयत्न केला, परंतु त्याला यश मिळाले नाही. त्याच्या त्या प्रयत्नांनंतर त्याला खूप त्रास सुरू झाला. त्याला नेमके काय करावे हेच समजत नव्हते. त्याने सुरुवातीला भुरपुर पाणी पिले, परंतु त्याला यश मिळाले नाही. मग त्याने आपल्या इतर मित्रांना आपल्या घशातले हाड काढण्यास सांगितले. परंतु त्याच्या साऱ्या मित्रांनी त्याच्याकडे पाठ फिरवली.
शेवटी त्याला त्याच्या डोक्यावरून एक बगळा उडत जाताना दिसला. त्याने त्या बगळ्याला आपली व्यथा सांगितली. तो म्हणाला बगळ्या तू तुझ्या त्या लांब चोचीने जर माझ्या घशात अडकलेले हे हाड काढलेस तर मी तुला बक्षीस देईन, तुझे ते उपकार मी कधीही विसरणार नाही.
बगळ्याला त्याची दया आली. त्याने लांडग्याला मदत करण्याचे ठरवले. तो त्या लांडग्या जवळ आला आणि त्याने त्या लांडग्याच्या घशात आपली चोच घालून आपल्या चोचीने ते अडकलेले हाड काढले. यानंतर त्या बगळ्याने त्याला आपले बक्षीस मागितले, परंतु त्या धूर्त लांडग्याने त्या बगळ्याला चकमा देत तो तेथून फरार झाला.
यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा त्या लांडग्याच्या घशात हाडाचा एक तुकडा अडकला, त्याला पुन्हा बगळा दिसला, परंतु बगळ्याने यावेळेस त्याला मुळीच मदत केली नाही कारण यापूर्वी त्याच्यावर केलेल्या उपकारांना तो लांडगा विसरला होता. म्हणून लक्षात ठेवा कधीही दुसऱ्यांनी केलेल्या उपकारांना विसरू नका.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
दुसऱ्याचे उपकार कधीही विसरू नये.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
06. *आनंद नेहमी चंदना*
*सारखा असतो,*
*दुस-यांच्या कपाळावर लावला तरी,*
*आपलीही बोटे*
*सुगंधीत करुन जातो....*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
06. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ लीळा चरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणी लिहिला ?
➜ म्हाई भट.
✪ भारतीय राज्यघटना केव्हा स्विकारली गेली ?
➜ २६ नोव्हेंबर १९४९.
✪ नाशिक हे शहर कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
➜ द्राक्षे.
✪ 'गीताई' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
➜ विनोबा भावे.
✪ गोविंदग्रज यांचे पूर्ण नाव काय आहे ?
➜ राम गणेश गडकरी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━
06. ❒ बाळशास्त्री जांभेकर ❒
━═•●◆●★●◆●•═━
मराठी पत्रकारितेचे पितामह,
हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार
अशा या महान पत्रकारस त्यांच्या
*जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!*
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
●जन्म :~ ६ जानेवारी १८१२
पोंभुर्ले, महाराष्ट्र
●मृत्यू :~ १८ मे १८४६
◆पेशा :~ पत्रकारिता, साहित्य
★बाळशास्त्री गंगाधरशास्त्री जांभेकर
हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार . दर्पण हे मराठीतले पहिले वृत्तपत्र त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी सुरू केले.
🔶जांभेकरांनी बालपणी वडिलांकडे घरीच मराठी व संस्कृत भाषांचा अभ्यास आरंभला. इ.स. १८२५ साली त्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले. मुंबईस येऊन ते सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या विद्यालयात अभ्यास करून त्यांनी विशीच्या आत कोणाही भारतीयाला तोवर न मिळालेली प्राध्यापक म्हणून नियुक्ती मिळवण्याइतपत ज्ञान कमवले. इ.स. १८३४ साली एल्फिन्स्टन कॉलेजात पहिले एतद्देशीय व्याख्याते म्हणून जांभेकरांची नियुक्ती झाली..
🔷बाळशास्त्रींना मराठी, संस्कृत, बंगाली, गुजराती, कानडी, तेलुगू, फारसी, फ्रेंच, लॅटिन व ग्रीक या भाषांचे ज्ञान होते. फ्रेंच भाषेतील नैपुण्याबद्दल फ्रान्सच्या राजाकडून त्यांचा मानसन्मान झाला होता.
*💥समाजकार्य*
🔶सार्वजनिक गंथालयांचे महत्त्व ओळखून 'बाँबे नेटिव्ह जनरल लायब्ररी' या ग्रंथालयाची जांभेकरांनी स्थापना केली. 'एशियाटिक सोसायटी'च्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते. ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती त्यांनी इ.स. १८४५ साली काढली.
🔷‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोकशिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्र्नाचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजित ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी बाळशास्त्रींनी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्ट्युडंट्स लिटररी ॲन्ड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले. अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत त्यांचे निधन झाले.
◆ सन्मान ◆
🔶त्यांना "जस्टिस ऑफ द पीस" ही करण्यात आले होते (१८४०).
♦६ जानेवारी, इ.स. १८३२ रोजी दर्पण वृत्तपत्राच्या पहिला अंक प्रकाशित झाला, तसेच योगायोगाने ६ जानेवारी हा जांभेकरांचा जन्मदिवसही असल्यामुळे हा दिवस दर वर्षी महाराष्ट्रात *"पत्रकार दिन"* म्हणून साजरा होतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁शनिवार ~06/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment