"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*06/02/19 बुधवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठⓂ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 06/02/2019 ❁*
      *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

🍥 *06. फेब्रुवारी:: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             माघ शु. २
     तिथी : शुक्ल पक्ष द्वितिया,
            नक्षत्र : धनिष्ठा,
   योग : वरियान, करण : बलव,
सूर्योदय : 07:11, सूर्यास्त : 18:34,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

06 *सामर्थ्य हा मनुष्याचा सर्व श्रेष्ठ गुण आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

06. *केळीवर नारळी अन् घर चंद्रमोळी--    ★ अर्थ ::~*
- अत्यंत गरीब परिस्थितीत असणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

06. *सत्यं कण्ठस्य भूषणम् ।*
   ⭐अर्थ ::~ सत्य बोलणे हे गळ्यातील खरे आभूषण आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

       🛡 *06. फेब्रुवारी* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ३७ वा दिवस आहे.

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९३२ : कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.
●१९१८ : ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५२ : डॉ. रिक चार्ल्सवर्थ – ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी
◆१९१५ : *रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘* या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी
◆१९११ : रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : बॅ. विठ्ठलराव गाडगीळ – केन्द्रीय नभोवाणी मंत्री
●१९३९ : सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक,
●१९३१ : मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित
●१८०४ : जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

06. *✸ आम्ही चालवू हा पुढे ✸*
       ●●●●●००००००●●●●●
गुरुने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा

पिता-बंधु-स्‍नेही तुम्ही माऊली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हां दिला कवडसा !

जिथे काल अंकूर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !

शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा !

जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी मानसी हाच आहे ठसा !

तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ति राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
06. *❂ शुभंकरोति म्हणा ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना
शुभंकरोति म्हणा, मुलांनो, शुभंकरोति म्हणा
शुभंकरोति कल्याणम्‌, शुभंकरोति कल्याणम्‌

जेथे ज्योती तेथे लक्ष्मी
उभी जगाच्या सेवाधर्मी
दिशादिशांतुन या लक्ष्मीच्या दिसती पाउलखुणा

या ज्योतीने सरे आपदा
आरोग्यासह मिळे संपदा
शत्रुबुद्धिचा विनाश होता सौख्य मिळे जीवना

दिव्या दिव्या रे दीपत्कार
कानी कुंडल मोतिहार
दिव्यास पाहून नमस्कार हा रिवाज आहे जुना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
06. *❃ कोकिळा,पोपट व घार ❃*
           ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   *एका गरीब भोळ्या कोकीळेला* एका घारीचे मरणप्राय भय वाटले. कारण घार तिच्या डोक्यावर ओरडत व भक्ष्यासाठी घिरट्या घालत फिरत होती.
        ते पाहून एक पोपट कोकीळाला म्हणाला की, 'इकडे ये, घाबरू नको, धीर धर. हा सर्व किलकिलाट व धडपड केवळ मूर्खपणाची आहे. शेवटी या आळशी घारीने एखादा गरीब बेडूक किंवा उंदीर पकडलेला तू पाहशील, अरे ससाणे हे खरे भयंकर पक्षी असून ते काही गडबड न करता मुकाट्याने प्राणी पकडून खातात.'

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
   *बोलेल तो करेल काय ? गर्जेल तो पडेल काय ?*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
06. हसता हसता सामोरे जा आयुष्याला...
  तरच घडवू शकाल भविष्याला....
    कधी निघून जाईल आयुष्य कळणार नाही...
     आताचा हसरा क्षण परत
मिळणार नाही..!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

06. *जगातिक स्थळांची टोपननावे*
        ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
★ *अज्ञात खंड* – आफ्रिका
★ *उंच इमारतीचे शहर* – न्यूयार्क
★ *भव्य अंतराचे शहर* – कोलकाता
★ *कांगारूंचा देश* – ऑस्ट्रेलिया
★ *सूर्यास्ताचा देश* – ब्रिटन
★ *उगवत्या सूर्याचा देश* – जपान
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
 ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

06.   *♦रामचंद्र द्विवेदी♦*
     ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
  हिंदी चित्रपटसृष्टीतील गीतलेखक, कवी, गायक व आधुनिक राष्ट्रकवी
यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏

*🔹जन्म :~ ६ फेब्रुवारी १९१५*
 बडनगर, मध्य प्रदेश, ब्रिटिश भारत
🔸मृत्यू :~ ११ डिसेंबर, १९९८
       मुंबई, महाराष्ट्र, भारत

  *रामचंद्र द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप*

    🔷रामचंद्र द्विवेदींचा जन्म बडनगर उज्जैन येथे झाला होता. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात  बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले. बहुधा त्या वेळी लंडनमध्ये होणाऱ्या बाँबहल्ल्यांमुळे ब्रिटिशांचे सेन्सॉर बोर्डाच्या कामकाजात लक्ष नव्हते.
     कवी प्रदीप यांच्या अटकेचे वॉरंट निघणार त्याआधीच ते गीत इतक्या लोकांच्या कानी पडले आणि असंख्य मुखांतून गायले जाऊ लागले, की अटक होताहोता टळली. प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते.

       *☀ऐ मेरे वतन के लोगो☀*
  🔶ऐ मेरे वतन के लोगो हे कवी प्रदीप यांनी इ.स. १९६३ साली भारत-चीन युद्धानंतर, या युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांना श्रद्धांजली म्हणून हिंदी भाषेत लिहिलेले एक देशभक्तीपर गीत आहे. हे गीत प्रत्येक भारतीयाच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत पेटविते. भारत-चीन युद्धानंतर खचलेल्या भारतीयांचे मनोबल उंचावण्याचे काम या गीताने केले होते. या गीताला सी. रामचंद्र यांचे संगीत असून लता मंगेशकर यांचा आवाज आहे.
    ♦भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते.

   🔷कारगील युद्धाच्या थोडेच दिवस आधी कवी प्रदीप निधन पावले होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ बुधवार ~ 06/02/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment