"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*06/03/19 बुधवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठⓂ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 06/03/2019 ❁*
      *🔘 वार ~ बुधवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🍥 *06. मार्च:: बुधवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
  माघ अमावस्या,नक्षत्र : शतभिषा,
   योग : सिद्धि,  करण : चतुष्पाद,
सूर्योदय : 06:54, सूर्यास्त : 18:45,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

06. *सामर्थ्याच्या पाठीमागे शील हवे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

06. *खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी*
      *★ अर्थ ::~* चांगले मिळाले तर पाहिजे नाहीतर मुळीच नको.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

06.  *विनयात् याति पात्रताम् ।*
   ⭐अर्थ :: ~ नम्रतेमुळे पात्रता येते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★06. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★हा या वर्षातील ६५ वा (लीप वर्षातील ६६ वा) दिवस आहे.
★ 'घाना' चा स्वातंत्र्यदिन

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : शहर निर्वाह भत्ता (CCA), महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) म्हणून मिळणारी रक्‍कम करपात्र असल्याचे सर्वोच्‍च न्यायालयाचे शिक्‍कामोर्तब
●१९९८ : विख्यात गझलगायक जगजितसिंग यांना मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा ’लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर
●१९९७ : स्वाध्याय परिवाराचे संस्थापक पांडुरंगशास्त्री आठवले यांची टेंपलटन पुरस्कारासाठी निवड

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९६५ : देवकी पंडीत – गायिका
◆१९४९ : शौकत अजिझ – पाकिस्तानी राजकारणी
◆१४७५ : मायकेल अँजेलो – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : नारायण काशिनाथ लेले – कृष्ण यजुर्वेद शाखेतील वेदमूर्ती
●१९९२ : रणजित देसाई – नामवंत मराठी साहित्यिक, ’स्वामी’कार
●१९८२ : रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष
●१९८१ : गो. रा. परांजपे – मराठीतील आघाडीचे विज्ञान प्रसारक, नामवंत शास्त्रज्ञ, ’रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’चे पहिले भारतीय प्राचार्य
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

06. *✸ सत्य शिवाहुन सुंदर हे ✸*
        ●●●●●००००००●●●●●
दान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे

इथे मोल ना दामाचे, मोती होतिल घामाचे
सरस्वतीच्या प्रेमाचे प्रतीक रम्य शुभंकर हे

चिराचिरा हा घडवावा, कळस कीर्तिचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे

त्यागाला या नाव नसे, पुण्यवान हा देश असे
कल्पतरू हा उभा दिसे, त्या छायेतील मंदिर हे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====
06. *❂ तनमनाच्या मंदिरी या ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तनमनाच्या मंदिरी या जागवू या चेतना
अर्थ लाभो जीवनाला हीच अमुची प्रार्थना

चेतना माझ्यातही, याच्यातही, त्याच्यातही
पृथ्वी-जल-आकाश अन्‌ वायुतही, तेजातही
विश्वव्यापी या स्वरूपा नित्य माझी वंदना

एक आहे मागणे हातात या सामर्थ्य येवो
भीक-लाचारी-दयेचा स्पर्श ना आम्हांस होवो
कष्ट करु आयुष्य फुलवू मंत्र जप रे तू मना

घेतले व्रत आज आम्ही स्वप्‍न ते सत्यात येवो
दीन-दुर्बल-वंचितांचा विसर ना आम्हांस होवो
या जगी आनंद नांदो ही मनाची कामना
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
06.       *❃ युक्ती ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
  सूर्य  आणि वारा या दोघांची आपापल्या पराक्रमाबद्दल एकदा पैज लागली . जवळच एक वाटसरू बसला होता . त्याच्या अंगावरची घोंगडी काढून ठेवण्यास त्यास जो भाग पाडील तो खरा पराक्रमी समजावा, असे त्यांनी ठरविले . प्रथम वार्याने फार जोराने वाहून वाटसरूच्या अंगावरील घोंगडी उडविण्याचा पुष्कळ प्रयत्न केला . परंतु वार्यामुळे जसजशी अधिक थंडी वाजू लागली तसतसा तो वाटसरू आपली घोंगडी अधिकच बळकट
धरू लागला . शेवटी वारा दमला आणि स्वस्थ बसला . मग सूर्याने आपला पराक्रम दाखवण्यास सुरुवात केली . प्रथमतः आकाशात जे ढग आले होते ते त्याने दूर घालविले. नंतर त्याने आपली प्रखर किरणे वाटसरूच्या अंगावर सोडली . ती उष्णता त्या वाटसरूस सहन न झाल्यामुळे त्याने आपल्या अंगावरची घोंगडी काढून ठेवली .

         *_🌀तात्पर्य_ ::~*
    नुसत्या शक्तीच्या बळावर सगळीच कामे सिद्धीस जातील असे नाही .
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====
06.   *जिभेचं वजन*
             *खुप कमी असतं..*.
*पण तिचा तोल सांभाळणं*
        *खुप कमी लोकांना जमतं.*
 
    जीवनात आपला सल्लागार कोण आहे...  हे फार महत्वाचे आहे....

   *पराक्रमी तर दुर्योधन पण होता मात्र विजय अर्जुनाचाच झाला..!!*
  *कारण दुर्योधन शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन श्रीकृष्णाचा...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====
06. *✿ भारतातील सर्वात मोठे,*
          *उंच, लांब..... ✿*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑
★ सर्वात उंच मिनार =
       ~कुतूबमिनार, दिल्‍ली
               [उंची - 884 मीटर]
★ सर्वोच्‍च शौर्यपदक =
           ~ परमवीर चक्र
★ सर्वात मोठे सरोवर =
      ~वुलर सरोवर, जम्‍मू-काश्‍मीर
★ सर्वात मोठे राज्‍य (लोकसंख्‍या) =
        ~ उत्तरप्रदेश
★ सर्वात मोठा त्रिभूज प्रदेश =
         ~ सुंदरबन, पश्‍च‍िम बंगाल
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

06. *❒ ♦जिवा महाला ♦ ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
   वाचताना अंगावर काटा येतो " जिवा महाला "

    उमरठ हे गाव तसं ३५० वर्षांपूर्वी जेमतेम एक हजार वस्तीचे गाव.
सुभेदार तानाजी मालुसरे यांचे हे गाव.
गावात चारचौकी वाडा होता तानाजीरावांचा.

  आज गावची यात्रा भरली होती. गावात सायंकाळी कुस्तीची दंगल भरवण्यात आली होती. राजांची आणि तानाजीरावांची मैत्री लहानपणापासूनची. मिसरूड फुटायचं व्हतं त्यावेळचे सवंगडी.

   आज कुस्ती होती लखू बेरड या नावाजलेल्या पैलवानाची, त्याचे वस्ताद होते खुद्द बाजी पासलकर.
आणि त्याच्याबरोबर लढणारा होता तो भिकाजी ढेरे. हा हिरडस मावळातला.वस्ताद होते खुद्द फुलाजी बांदल.

   वास्तविक सर्व जण शिवाजी राजांना पाहायला जमणार होते आणि का नाही जमणार ??
लेकीसुना, संत सज्जन ,गाई वासरे सारे सारे सुखावले होते राजांच्या मुळे. स्वराज्य आणले होते ..!

    मैदान खचाखच भरले होते. लहान मोठ्या कुस्त्यांना प्रारंभ झाला. आणि पूर्वेकडून दस्तुरखुद्द शिवाजीराजे भोसले यांचे अश्वदल दाखल झाले. राजीयांनी पांढरा अंगरखा घातला होता. कृष्णा घोडीवर स्वार होते आणि कमरेला  तलवार बांधली होती. जणू सह्याद्रीचे दैवत भासत होते. राजे खाली उतरले ..

   तानाजीराव आपल्या फौजेसह राजांना भेटायला वाटेतच थांबले होते. राजांनी तानाजीरावांना मिठी मारली. तितक्यात खबर आली की, बाजी पासलकर यांच्या गावी रात्री नरभक्षक वाघाने हल्ला चढवला होता. त्यात लखू बेरड स्वत: वाघाशी चार हात करायला गेला .

   वाघाने त्याच्या पायाला जबर दुखापत केली. मात्र वाघाला नुसत्या हाताने ठार केले लखुने. हे ऐकून मैदान शांत झाले. खूप आशेने लोक कुस्त्या पाहायला मैलोन् मैल आले होते. आता भिकाजीला १० शेर वजनाचे कडे आयते बक्षीस मिळणार होते तेही राजांच्या हस्ते

    ''मंडळी, लखू बेरडाने काल नुसत्या हाताने वाघाला ठार केले ,पण त्याच्या पायाला जबर दुखापत झाली आहे. म्हणून तो आज लढू शकत नाही.

   या गावात असा कोण आहे का जो या भिकाजीशी दोन हात करू शकेल ?असेल तर समोर या.''

    ही घोषणा ऐकून मैदानाच्या पश्चिमेकडे कुजबूज सुरु झाली. एक भाल्यासारखा उंचापुरा रांगडा गडी कपडे काढून लांघ चढवून मैदानात येत होता. सर्व लोक जोरात ओरडत होते त्याला पाहून. राजे सर्व पाहत होते.

तितक्यात कोणीतरी किंचाळला...

   ''आरं आला रं जिवा आला ''
राजांनी चौकशी केली तानाजीरावांपाशी ..
तानाजी म्हणाले, ''राजं , ह्यो जिवाजी ,आपल्या हिकडचाच हाय, कुस्तीत लय भारी पवित्रा हाय याचा. दांडपट्टा तर लय चोख..फक्त परिस्थती नाय ..याचं वडील आपल्या थोरल्या महाराजान्सागट होतं..

   निजामशाहीचा दंगा झाला तवा ह्येच्या बाचा उजवा पाय निकामी झाला.. तेनच याला तयार केलाय."
राजांच्या चेहर्‍यावर एक तेज आले होते.

    कुस्तीची सलामी झडली. भिकाजी ने ठोक्यावर ठोके टाकून जिवाला नमवण्याचा प्रयत्न केला ,पण जिवाजी पण तितक्याच ताकतीने तो चुकवत होता. डाव-प्रतिडाव करत एक अर्धा तास गेला. भिकाजीने उसन्या अवसानाने पळत येवून पटात शिरायचा प्रयत्न केला ,पण सावध जिवाने फिरवून बाहेरची टांग लावली... भिकाजी अक्षरक्ष ५-६ फुट उडून पाठीवर पालथा झाला.

   सगळे प्रेक्षक वेड्यासारखे आत घुसले. जिवाला अक्षरशः डोक्यावर घेवून नाचू लागले. तितक्यात शिंगे-करणे गरजू लागली. खुद्द राजे येत होते.

   पटापटा सर्व बाजूला झाले.
राजीयांनी हासत हासत जिवाला मिठीच मारली. मनात काय राजकारण होते माहीत नव्हते; मात्र राजे जाम खुश झाले होते. राजांनी १० शेराचे सोन्याचे कडे जिवाला बक्षीस दिले.. आणि विचारले..

"जिवा काय करतोस ??"
जिवा उद्गारला ,'' काय नाय, वरातीत पट्टा फिरवतो, दंगलीत कुस्त्या खेळतो.''

राजे हसले आणि म्हणाले ..''येशील आमच्या सोबत ?....
पट्टा फिरवायचा आणि कुस्तीही खेळायची.....फक्त गानिमांच्यासोबत..!!
आहे कबूल ..??"

  जिवा हसला... होकारार्थी मान हलवून त्याने मुजरा केला. आणि हाच तो जिवा महाला ज्याने अफजलखानाचा अंगरक्षक सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवून राजांचा प्राण वाचवला जिवाजी महाला यांच्या पराक्रमास मानाचा मुजरा म्हणतात ना "होता जिवा, म्हणून वाचला शिवा".
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ बुधवार ~ 06/03/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment