"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*06/07/24 शनिवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘⌘✪⌘⌘✽⌘⌘⌘*

 *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

 *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://urlzs.com/dmQmp
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *06. जुलै:: शनिवार* 🍥
━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आषाढ शु. 1,पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~प्रतिपदा, नक्षत्र ~पुनर्वसु,
योग ~व्याघात, करण ~किंस्तुघ्न,
सूर्योदय-06:06, सूर्यास्त-19:20,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

06. *अश्रु येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]    ❂ म्हणी व अर्थ ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

06.  तेरड्याचा रंग तीन दिवस –
   ★ अर्थ ::~  एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ❂ सुभाषीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣━┅━

06. *प्रज्ञा नाम बलं ह्येव निष्प्रज्ञस्य बलेन किम् ।*
                ⭐अर्थ ::~
  प्रज्ञा हेच खरे बळ आहे. प्रज्ञाहीन माणसाला बळाचा काय उपयोग ?
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

     *🛡 ★ 06. जुलै ★ 🛡*
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील १८७ वा (लीप वर्षातील १८८ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००६ : चीन युद्धापासून बंद असलेली भारत व तिबेट यांना जोडणारी ’नाथू ला’ ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
●१९४७ : रशियात ए के ४७ या बंदुकांच्या उत्पादनास सुरूवात झाली.
●१८९२ : ब्रिटिश संसदेचे सभासद म्हणून दादाभाई नौरोजी या पहिल्या भारतीय व्यक्तिची निवड झाली.
●१७८५ : ’डॉलर’ हे अमेरिकेचे अधिकृत चलन बनले. हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारित होते.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३० : डॉ. एम. बालमुरलीकृष्णन – दाक्षिणात्य संगीताचे गायक व व्हायोलिनवादक, पद्मश्री (१९७१), पद्मविभूषण (१९९१)
◆१९२० : डॉ. विनायक महादेव तथा ’वि. म.’ दांडेकर – अर्थतज्ञ, ’इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी’ या संस्थेची त्यांनी उभारणी केली. त्यांचे ’पॉव्हर्टी इन इंडिया’ हे पुस्तक गाजले
◆१९०१ : डॉ. श्यामाप्रसाद मुकर्जी – केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक
◆१८८१ : संत गुलाबराव महाराज 

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००२ : धीरुभाई अंबानी – उद्योगपती
●१९९९ : एम. एल. जयसिंहा – कसोटी क्रिकेटपटू, शैलीदार फलंदाज
●१९९७ : चेतन आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक
●१९८६ : ’बाबू’ जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

06.   *✸ महाराष्ट्र देशा ✸*
     ●●●●०००००●●●●●
मंगल देशा,पवित्रा देशा,महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशानाजुक देशा,कोमल देशा, फुलांच्याहि देशाअंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशाबकुलफुलांच्या प्राजक्तीच्या दळदारी देशाभाव भक्तिच्या देशा आणिक बुद्धीच्या देशाशाहीरांच्या देशा कर्त्या मर्दांच्या देशाध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी, नाचते करी;जोडी इह पर लोकांसी, व्यवहारा परमार्थासी, वैभवासि, वैराग्यासीजरिपटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकचि देशाप्रणाम घ्यावा माझा हा श्रीमहाराष्ट्र देशा ॥१॥

अपार सिंधुच्या भव्य बांधवा,महाराष्ट्र देशासह्याद्रीच्या सख्या,जिवलगा, महाराष्ट्र देशापाषाणाच्या देही वरिसी तू हिरव्या वेषागोदा, कृष्णा, भीमा तुझिया ललाटिंच्या रेषातुझिया देही करी प्रतिष्ठा प्रथम प्राणांचीमंगल वसती जनस्थानिंची श्रीरघुनाथांचीध्येय जे तुझ्या अंतरी ..... ॥२॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣━┅━

06. *❂ गणपती गजानान ❂*
  ━━●✶✹★●★✹✶●═━
दाता तू गणपती गजानान
भजती तुजसी गुणीजन

मुक्ता माणिक किरिट शिरावर
गौरतनु वर कस्तुरी केशर
निर्गुण निरवधी सकळ कलानिधी
हे प्रभुवरा अमरनायका
हे शुभकरा भावे तुजसी आलो शरण

शुंडा उदरी वळली अभिनव
कांती मनोहर रूप नवोनव
रुणझुण चरणी वाजती किंकिणी
हे नटवरा ललित लाघवा
हे प्रियकरा व्हावे घडीघडी एक स्मरण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    ❂ बोधकथा ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●═━

06. *❝ कृती महत्वाची ❞*
  ━━•●◆●★◆★●◆●•━━
    स्वामीजींच्या प्रवचनासाठी गावोगावहून लोक आले होते. स्वामीजी आपल्या श्रोत्यांना उत्तम उपदेश करत. या उपदेश सभेला ‘सत्संग‘ म्हणत. एकदा स्वामीजींना काही लोकांनी सत्संगासाठी निमंत्रित केल होत. दिवस थंडीचे होते. येणारे लोक शाली, स्वेटर घालून तसेच मफलर बांधून आले होते. त्यात काही काही उच्चभ्रू श्रीमंतही होते. मात्र, स्वामीजींचा वेश साधाच. अंगावर घाबळी पांघरलेली.
    एका मोठया प्रशस्त दिवाणखान्यात सभा सुरू झाली आधी एक भजन सुरू होते. मग स्वामीजींचा उपदेश. तेवढ्यात एक याचक त्या दिवाणखान्याच्या दाराशी आला. उघडाबंब थंडीने कुडकुडत, हातात कटोरा घेऊन उभा होता. दिनवाण्या मुद्रेने त्याने आत पाहिल. भजन सुरूच होत. स्वामीजी उठून त्या याचकाकडे गेले. आपल्या अंगावरची घाबळी त्याच्या अंगावर पांघरली आणि शिष्याला खूण केली. शिष्याने काही नाणी त्याच्या कटो-यात टाकली आणि मग तो गरीब याचक निघून गेला. हे सर्व दृष्य सर्वच लोक बघत होते. भजन संपलं.
    सत्संग सूत्रसंचालक म्हणाला, ‘आता स्वामीजी आपल्याला उपदेश करतील. आपले कान त्यासाठी आतुरले आहेत‘. पण स्वामीजी काही बोलेनात. बराच वेळ झाला तरी ते स्वस्थच बसून होते. श्रोत्यांमध्ये चुळबूळ सुरु झाली. अखेर सूत्रसंचालक म्हणाला, ‘स्वामीजी, आपण आम्हाला उपदेश देताय ना?‘
‘मी उपदेश दिला आहे,‘ स्वामीजी खणखणीत आवाजात म्हणाले. 
’आपण काहीच बोलला नाहीत,‘ सुत्रसंचालक म्हणाला.
‘अस्स! म्हणजे तुम्हाला फक्त शब्दांचा उपदेश हवा आहे; कृती नको. त्या थंडीत कुडकुडणा-या माणसाची अवस्था तुमच्या ध्यानी नाही आली? मी केलेली कृती हाच माझा उपदेश!
सर्व श्रोते थक्क झाले.

         *🌀तात्पर्य ::~*
   केवळ कोरड्या शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━

06. *काट्यांवर चालणारी व्यक्ती*
   *ध्येयापर्यंत लवकर पोहचते..!!*

   *कारण रूतणारे काटे*
*पावलांचा वेग वाढवितात..!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]   ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━

06. *✿  राष्ट्रीय माहिती ✿*
    ◑◑◑◆◑●★●◑◆◑◑◑      
*● भारत देश कोणत्या खंडात आहे?*
➡  आशिया

*● भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंग आहेत?*
➡  तीन- केशरी, पांढरा, हिरवा

*● राष्ट्रध्वजावरील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे?*
➡  त्याग आणि शौर्याचे प्रतिक

*● राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो?*
➡  शांततेचा.

*●राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे?*
➡  समृद्धीचे प्रतिक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━

06. *❒ श्यामाप्रसाद मुखर्जी ❒* 
   ━━•●◆●★◆★●◆●•━━
    *केंद्रीय मंत्री आणि भारतीय*
        *जनसंघाचे संस्थापक*
_यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांना_
        *विनम्र अभिवादन..!!*
   🙏🐾🌷🌹🌹🌷🐾🙏
●जन्म :~ ६ जुलै १९०१, कलकत्ता
●मृत्यू :~ २३ जून १९५३

         ◆ श्यामाप्रसाद मुखर्जी ◆
    श्री.आशुतोष मुखर्जी व योगमाया देवी यांचे घरी में जन्मलेले डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे दोन  कारनाणी नेहमी आठवणीत आहेत.

    पहीले कारण श्री आशुतोष मुखर्जी कलकत्ता विश्वविद्यालय चे संस्थापक उपकुलपति होते. 1924 मध्ये त्यांच्या निधन झाल्या नंतर केवळ 23 वर्षातच  श्यामाप्रसाद ला विश्वविद्यालय प्रबन्ध समिति मधे घेतले. 33 वर्ष वयातच
कलकत्ता विश्वविद्यालय चे उपकुलपति च्या खुर्ची वर बसण्याचा गौरव मिळाला. चार वर्षातच त्यांच्या कार्यकाळ मध्ये  विश्वविद्यालय ला भरपूर प्रगति केली.

    दूसरे कारण डॉ .मुखर्जी  यांनी जम्मू कश्मीर ला भारतात पूर्ण सहभागी करण्याची मागणी साठी सत्याग्रह केला होता. याच मागणी साठी डॉ .मुखर्जी यांनी आपले प्राणाचे बलिदान सुद्धा दिले.

   हे बंगालीभाषक गृहस्थ भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राजकारणातील हिंदुत्व व हिंदुराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जातात. श्यामाप्रसाद मुखर्जींनी जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाचेच नाव पुढे भारतीय जनता पक्ष झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
             *✍संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
║▌║▌║█❃❂❃█║▌║║▌

*❁ शनिवार~06/07/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment