*06/10/24 रविवारचा परिपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*
*Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿*
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *06.ऑक्टोबर:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
आश्विन शु.३, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~तृतीया, नक्षत्र ~विशाखा,
योग ~प्रीति, करण ~गर,
सूर्योदय-06:30, सूर्यास्त-18:22,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
06. *माणूस धर्माकरिता नाही तर धर्म हा माणसाकरिता आहे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🔵🟢🔴
06. *वरातीमागून घोडे –*
★ अर्थ ::~ एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
06. *पठतो नास्ति मूर्खत्वम् ।*
⭐अर्थ ::~ अभ्यासू मनुष्य कधीही मूर्ख बनत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 06. ऑक्टोबर ★ 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ हा या वर्षातील २७९ वा (लीप वर्षातील २८० वा) दिवस आहे.
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००७ : जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
●१९६३ : पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
●१९४९ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
●१९२७ : ’वॉर्नर ब्रदर्स’चा ’जॅझ सिंगर’ हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
~*★ जन्मदिवस / जयंती ★*~
🔸•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔸
◆१९४६ : विनोद खन्ना – अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार
◆१९४३ : डॉ. रत्नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक
◆१८९३ : मेघनाद साहा – खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. भारताचे स्वत:चे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले.
◆१७७९ : माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार.
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००७ : बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री
●२००७ : एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत
●१९८१ : अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते
●१९७९ : *महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार* – इतिहासकार, लेखक, वक्ते, पद्मविभूषण,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/GP1pTx
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
06. *✸ कर चले हम फिदा ✸*
●●●●●००००००●●●●●
कर चले हम फिदा जानो तन साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियों ll धृ ll
साँस थमती गई नब्ज जमती गई
फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया
कट गये सर हमारे तो कुछ गम नहीं
सर हिमालय का हमने न झुकने दिया मरते मरते रहा बांकपन साथियों ll१ ll
जिंदा रहने के मौसम बहुत हैं मगर
जान देने की रूत रोज आती नहीं
हुस्न और इश्क दोनों को रूसवा करे
वह जवानी जो खूं में नहाती नहीं
आज धरती बनी हैं, दुल्हन साथियोंll२l
राह कुरबानियों की न वीरान हो
तुम सजाते ही रहना नए काफ़ीले
फतह का जश्न इस जश्न के बाद हैं
जिंदगी मौत से मिल रही हैं गले
बाँधलो अपने सरसे कफन साथियोंll३
खींच दो अपने खूं से जमीं पर लकीर
इस तरफ आने पाए न रावण कोई
तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे
छूने पाए न सीता का दामन कोई
राम हीतुम तुम्ही लक्ष्मण साथियों ll४ l
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
06. *❂ श्यामसुंदरा ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
वाजवि मुरली श्यामसुंदरा
तुझ्या मंदिरी नाचे मीरा !
करि करताळा, पायी घुंगुर
जन्म तुडविते हा क्षणभंगुर
देह नव्हे हा मोरपिसारा !
गोपिनाथ तू, मी तर गोपी
पुण्यशील तुज, जगास पापी
आले आले मी अभिसारा !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
06. *❃❝ गुरूचा उपदेश ❞❃*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
एक मुलगा गुरूजवळ दोरीवर उभे राहून नाचण्याचा खेळ शिकत होता. शिकत असताना तोल संभाळण्यासाठी त्याला हातात एक काठी घ्यावी लागत असे.
त्या मुलास नेहमी असे वाटे की, ह्या काठीची आपणास काही जरुरी नाही. शेवटी एके दिवशी तो आपल्या गुरूस म्हणाला,गुरुजी, या लांबलचक काठीचा उपयोग काय ? या काठीची मदत न घेता मी दोरीवर सहज कसरत करू शकेन. ह्या जड काठीमुळे मला अडचण होते. मी सशक्त व चपळ असल्याने काठी न घेता सुद्धा दोरीवर कसरत करू शकेन मी आताच तुम्हाला तसे करून दाखवतो.'
आणि लगेचच त्याने हातातील काठी खाली टाकली. काठी खाली टाकताच त्याचा तोल चुकला व तो दोरीवरून खाली पडला.
त्यावेळी त्याचे गुरू त्याला म्हणाले, 'मूर्ख मुला ! भोग आपल्या कर्माची फळं. मनात येईल तसं वागण्याच्या हट्टी स्वभावामुळं तू आपली हाडं मोडून घेतलीस. तू जी कला शिकतो आहेस त्याचं मुख्य साधन काठी. माझ्या सांगण्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा जर तू ती टाकून देशील तर हाच अनुभव तुला पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
*पूर्ण माहिती नसलेल्या शिष्याने गुरूच्या उपदेशाकडे दुर्लक्ष करू नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
06. *या जगात सर्वात...*
*मोठी संपत्ती "बुध्दी"*
*सर्वात चांगल हत्यार "धैर्य"*
*सर्वात चांगली सुरक्षा "विश्वास"*
*सर्वात चांगले औषध "हसू"*
*आणि आश्चर्य म्हणजे हे*
*"सर्व विनामुल्य आहे".*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
06. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ भारत प्रजासत्ताक म्हणून केव्हा अस्तित्वात आला ?
➜ १९५०.
✪ स्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटीश गव्हर्नर कोण होता ?
➜ लाॅर्ड माऊंटबॅटन.
✪ तिन्ही गोलमेज परिषदा - १९३०,१९३१,१९३२ कोठे भरल्या होत्या ?
➜ इंग्लंड.
✪ संस्थानाच्या विलिनीकरणात कोणी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती ?
➜ सरदार वल्लभभाई पटेल.
✪ मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली ?
➜ लाॅर्ड काॅर्नवाॅलिस.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
06. *❒ दत्तो वामन पोतदार ❒*
━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ ५ ऑगस्ट १८९०
बिरवाडी रायगड जिल्हा,
●मृत्यू :~ ६ ऑक्टोबर १९७९, पुणे
*महामहोपाध्याय दत्तात्रेय वामन पोतदार ऊर्फ दत्तो वामन पोतदार*
पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी, हे मराठी इतिहासकार, लेखक व वक्ते होते. १९६१ ते १९६४ सालांदरम्यान ते पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. भारताच्या केंद्र शासनाचे ते मान्यताप्राप्त पंडित होते.
त्यांनी आयुष्यभर अव्याहत विद्याव्यासंग केला.
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या बौद्धिक मार्गदर्शनात त्यांनी भाग घेतला होता. मराठी शुद्धलेखन महामंडळाचेही काही वर्षे ते अध्यक्ष होते. तमाशा सुधारणा समितीचे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनी बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांचा इतिहासाचा अभ्यास फार मोठा होता. प्राचीन मराठी साहित्य आणि मराठ्यांचा इतिहास ह्या विषयांवर त्यांनी भारत इतिहास संशोधक मंडळाच्या नियतकालिकांत आणि अन्यत्रही बरेच स्फुट लेखन केले आहे.
दत्तो वामन पोतदार अविवाहित होते.
~*सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि साहित्यिक कारकीर्द*~
🔹१९१५ साली ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळी ह्या संस्थेचे आजीव सदस्य झाले.
🔸१९१८ ते १९४७ ह्या काळात भारत इतिहास संशोधक मंडळाचे चिटणीस व नंतर १९७३ पर्यंत ते याच मंडळाचे कार्याध्यक्ष होते.
🔹१९२२ मध्ये भारतीय ऐतिहासिक अभिलेख आयोगाच्या मुंबई बैठकीस स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना निमंत्रित करण्यात आले. १९४० मध्ये भारत सरकारतर्फे त्याच आयोगाचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
🔸१९३३ ते १९३६ ह्या काळात ते महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादक होते.
🔹१९४६ ते १९५० ह्या काळात ते पुण्याच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या अध्यक्षपदी होते.
🔸१९३९ मध्ये अहमदनगर येथे भरलेल्या मराठी साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्ष झाले.
🔹१९४३ मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेचे ते कार्याध्यक्ष होते.
🔸१९४६ ते १९५० ह्या काळात संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले.
🔹१९४८ मध्ये पुण्याच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे ते कुलगुरू झाले.
🔸१९६० ते १९६३ ह्या काळात पुणे विद्यापीठाचे ते कुलगुरू होते.
🔹१९३९ ते १९४२ ह्या काळात हिंदुस्थानी बोर्डाचे ते सदस्य होते. १९४२ मध्ये ह्या बोर्डाचे ते अध्यक्ष झाले.
🔸१९५० ते १९५३ ह्या काळात हिंदी शिक्षण समितीचे ते अध्यक्ष होते. काही वर्षे ते संस्कृत महामंडळाचेही अध्यक्ष होते.
◆ पोतदारांना मिळालेले सन्मान◆
♦भारत सरकारने त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी दिली (१९४८).
♦हिंदी साहित्यसंमेलनाने त्यांना ‘साहित्यवाचस्पति’ ही उपाधी प्रदान केली.
♦बनारसच्या हिंदू विश्वविद्यालय व पुणे विद्यापीठ या दोन्ही संस्थांनी डी.लिट्. पदवी देऊन त्यांचा सन्मान केला.
♦पद्मभूषण पुरस्कार (१९६७)
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★🔅★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁रविवार ~06/10/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment