Ⓜ💲🅿 परिपाठ Ⓜ💲🅿
*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*
*💥🇮🇳 राष्ट्रगीत 🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀
*💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
🔘 *"माझी शाळा"* 🔘
*ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
🔗🔗👇👇🔗🔗
https://goo.gl/RpQbsw
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *06. डिसेंबर:: शुक्रवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष शू.५, पक्ष :शुक्ल पक्ष,
तिथि ~पञ्चमी, नक्षत्र ~श्रवण,
योग ~ध्रुव, करण ~बालव,
सूर्योदय-06:58, सूर्यास्त-18:00,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ] ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━
06. *शिक्षण हे वाघीणीचो दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघा सारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ] ❂ म्हणी व अर्थ ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
06. *हपापाचा माल गपापा –*
*★ अर्थ ::~*
लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ] ❂ सुभाषीत ❂*
━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━
06. *गुरुशुश्रूषया विद्या ।*
⭐अर्थ ::~
विद्या ही गुरूंच्या सेवेने प्राप्त होते.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ] ❂ दिनविशेष ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
🛡 ★ 06. डिसेंबर ★ 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★ समता दिन
★ हा या वर्षातील ३४० वा (लीप वर्षातील ३४१ वा) दिवस आहे.
★ महापरिनिर्वाण दिन
~*★ महत्त्वाच्या घटना ★*~
🔹•••°°~°°°•••◆•••°°°~°°•••🔹
●२००० : थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
●१९८१ : डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.
●१९७१ : भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९३२ : कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक
◆१९२३ : वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार
◆१८५३ : हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार
◆१७३२ : वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल
~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१३ : नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते
●१९७६ : क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक
●१९७१ : कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक
●१९५६ : *डॉ. बाबासाहेब आंबेडकर* – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..
https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ] ❂ देशभक्ती गीत ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
06. *✹ देश मेरा प्यारा ✹*
●●●●००००००●●●●
देश मेरा प्यारा, दुनिया से न्यारा
धरती पे जैसे स्वर्ग है।
जां भी इसे उत्सर्ग है।
ऊँचे पहाड़ों में फूलों की घाटी।
प्यारे पठारों में खनिजों की बाटी।
माटी में मोगरा-गंध है।
बजता हवाओं में छंद है।
घन-घन घटाएँ, मुझको बुलाएँ।
हरे-भरे खेतों में सरगम बजाएँ।
बूँदों की भाषा सुरीली।
गीली हुई तीली-तीली।
जहाँ दिखे झरना, वहीं धरूँ धरना।
नदियों के पानी में चाहूँ मैं तरना।
मन ये गगन में उड़े रे।
ऐसे ये जी से जुड़े रे।
दूर मेरा देश ये गाँवों में बसता।
मुझको पुकारे है एक-एक रस्ता।
पैठा पवन मेरे पाँव में।
आना जी तू भी गाँव में।
देश मेरा प्यारा, दुनिया से न्यारा।
धरती पर जैसे स्वर्ग है।
जाँ भी इसे उत्सर्ग
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ] ❂ प्रार्थना ❂*
━┅═▣◆★✧★◆▣═┅━
06. *❂ विठ्ठला, तू वेडा कुंभार ❂*
✶✶✹✹★●★✹✹✶✶
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार !
माती, पाणी, उजेड, वारा
तूच मिसळसी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत, ना पार !
घटाघटांचे रूप आगळे
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविना ते कोणा नकळे
मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुखी अंगार !
तूच घडविसी, तूच फोडिसी
कुरवाळिसि तू, तूच ताडिसी
न कळे यातुन काय जोडिसी ?
देसी डोळे, परि निर्मिसी तयांपुढे अंधार !
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ] ❂ बोधकथा ❂*
━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━
06. *❃❝ गाढव व लांडगा ❞❃*
━━═•●◆●★●◆●•═━━
एकदा एक गाढव रानात भटकत होते. फिरता फिरता त्याच्या पायाला एक काटा बोचला. तो काटा काही त्याला काढता येईना. तेवढ्यात तिकडून एक लांडगा येताना त्याला दिसला. गाढव नम्रपणे त्याला म्हणाले, ‘वैदयबुवा! कृपा करून माझ्या पायातला हा काटा आपण काढून दया.’ लांडग्याने ते ऐकले आणि त्याच्या पायातला काटा काढून दिला. परंतु, त्या दुष्ट गाढवाने लगेच एक लाथ लांडग्याच्या तोंडावर मारली आणि कोलमडून पडलेल्या लांडग्याकडे बघत ते मजेने निघून गेले.
*🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
काही माणसे इतकी कृतघ्न असतात, की ज्याने आपल्याला संकटातून वाचवले त्याच्याशीसुध्दा ते शिष्टपणे वागतात.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ] ❂ प्रेरणादायी विचार ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
06. *संघटनेची ताकद हि केवळ सभासदांच्या संख्येवर अवलंबुन नसून सभासदांच्या प्रामाणिकपणावर , संघटनेशी एकानिष्ठतेवर आणि शिस्तपालनावर अवलंबून असते.*
*-डॉ. बाबासाहेब आंबेडकर.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ] ❂ सामान्य ज्ञान ❂*
━┅━▣◆★✧★◆▣═┅━
06. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪ रयत शिक्षण संस्थेचे बोधचिन्ह काय होते ?
➜ वटवृक्ष.
✪ भूदान ग्रामदान चळवळीचे प्रणेते कोणास संबोधतात ?
➜ विनोबा भावे.
✪ शिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करणारे संस्थान कोणते ?
➜ कोल्हापूर.
✪ नाशिक येथे उदोजी वस्तिगृह कोणी सुरू केले ?
➜ छत्रपती शाहू महाराज.
✪ 'बोरीबंदर ते पुणे' रेल्वे सुरूवात करावी म्हणून कोणी प्रयत्न केले ?
➜ नाना शंकरशेठ.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] ❂थोरव्यक्ती परिचय ❂*
━━●🇲=◆🇸◆=🇵●━━
06. *❒ डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
━━•●◆●★●◆●•═━━
*भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,*
समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ,
इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ,
_यांची पुण्यतिथी निमित्त त्यांचे पवित्र_
*स्मृतीस विनम्र अभिवादन...!!*
*कोटी कोटी प्रणाम.*
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
*दिव्यत्वाची जेथ प्रचीती*
*तेथे कर माझे जुळती ..!!*
🙏🌲🙏🌹🙏🌲🙏
●टोपणनाव :~ बाबासाहेब,
●जन्म :~ १४ एप्रिल १८९१
महू, इंदूर जिल्हा, मध्य प्रदेश
●मृत्यू :~ ६ डिसेंबर १९५६
दिल्ली, भारत
●पुरस्कार: भारतरत्न (१९९०)
●वडील :~ सुभेदार रामजी सकपाळ
●आई :~ भीमाबाई रामजी सकपाळ
●पत्नी नाव : ~ रमाबाई आंबेडकर,
डॉ. सविता आंबेडकर
◆ डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ◆
हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, लेखक, प्राध्यापक, समाज सुधारक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, मानवी हक्कांचे कैवारी आणि बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. शिवाय ते भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक आणि स्वतंत्र्य भारतीय संविधानाचे शिल्पकार होते.
आज संपूर्ण भारत आणि विश्व त्यांना ‘बाबासाहेब’ संबोधीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भीमा, भीम, भिवा, भीमराव, भीमराज, बाबा, बाबासाहेब इत्यादी नावांनी संबोधिले जाते. विश्वरत्न, विश्वमानव, विश्वभूषण, युगपुरूष, युगप्रवर्तक, महामानव, महापुरूष, उच्च विद्याविभूषीत, परोपकारी, क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, घटनासम्राट, घटनापती, बुद्धीसम्राट, समाजसूर्य, मसिहा, भारत भाग्यविधाता, महाविद्वान अशा अनेक उपाधींनी बाबासाहेबांना भारतीय जनते गौरविले आहे.
◆ शैक्षणिक विचार ◆
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील अस्पृश्य समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी यासाठी आंबेडकरांनी शिक्षणाचे महत्त्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षण हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाली की, तो किंवा ती पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करूनच बाहेर पडावी. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाेतेे की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या सशक्त होते.
◆ स्वातंत्र्य लढा ◆
डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. शिक्षण, अंधश्रद्धा, स्त्रियांची स्थिती,अर्थकारण, राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था या मुद्यांकडेहीत्यांचे अवधान होते. बाबासाहेबांनी भारतातील सर्व समाजांचा आणि सर्वप्रथम देशहिताचाच विचार केलेला आहे. एकीकडे ते जसे १९३० ते ३२ मध्ये झालेल्या गोलमेज परिषदांतून अस्पृश्यांच्या न्याय व हक्कांसाठी लढतात तसेच दुसरीकडे ते भारतातील सर्व स्त्रीयांच्या उन्नतीसाठी विशेषत हिंदू समाजातील स्त्रियांना सामाजिक प्रतिष्ठा, संपत्तीतील हक्क,घटस्फोट इत्यादीबाबत स्वातंत्र्य मिळावे म्हणून हिंदू कोड बील संसदेत मांडतात आणि ते नामंजूर झाले म्हणून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामाही देतात. स्त्रीयांना त्यांचा अधिकार मिळत नाही यामुळे बाबासाहेबांनी मंत्रीपदाचा त्याग केला.
१९३० सालच्या लंडन मधील गोलमेज परिषदेच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना भारत सोडावा असे ठणकावून सांगितले होते. आपल्या पी.एचडी. च्या प्रबंधातूनही त्यांनी ब्रिटिशांनी भारताच्या चालवलेल्या आर्थिक शोषणाचे विश्र्लेषण केले होते.
◆ महापरिनिर्वाण ◆
नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे कार्यक्रम उरकून आणि आता धम्मचक्र पुन्हा एकदा गतिमान झालेले पाहून ते दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात २० नोव्हेंबर १९५६ मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला ‘वर्ल्ड फेलोशिप ऑफ बुद्धिस्ट’च्या चौथ्या परिषदेस हजर राहले आणि आणि तेथिल प्रतिनिधींसमोर ‘बुद्ध की कार्ल मार्क्स’ या विषयावर भाषण केले. त्यात त्यांनी भगवान बुद्धाचा मार्ग मार्क्स पेक्षा कसा श्रेष्ठ आहे, ज्यात प्रेम, न्याय, बंधुत्व, विज्ञानवाद असून तो शोषण समाप्त करू शकतो असे सांगितले. आपल्या परतीच्या प्रवासात त्यांनी बनारसमध्ये दोन भाषणे दिली. दिल्लीमध्येही त्यांनी विविध बौद्ध समारंभात भाग घेतला, राज्यसभेच्या अधिवेशनात सहभागी झाले आणि आपल्या ‘भगवान बुद्ध आणि कार्ल मार्क्स’ या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण लिहून पूर्ण केले. ५ डिसेंबरच्या सायंकाळी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रस्ताविक आणि परिचय या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्यांनी रात्री त्यांची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी पहाटे १२.१५ वाजता ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीला निवासस्थानी त्यांचे महापरिनिर्वाण (निधन) झाले. तेव्हा त्यांचे वय ६४ वर्ष आणि ७ महिन्याचे होते. आणि बौद्ध बनून त्यांना केवळ सातच आठवडे झाले होते. दिल्लीहून विशेष विमानाने त्यांचे पार्थिव मुंबईला आणण्यात आले. मुंबई हे ठिकाण अत्यंविधीसीठी निश्चित झाले त्यानंतर देशभरातील त्यांचे अनुयायी मिळेल त्या साधनाने मुंबईला येऊ लागले.
बोधिसत्व घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध बनून केवळ सातच आठवडे झाले होते, तरीसुद्धा त्या अल्पशा काळात बौद्ध धम्माच्या प्रचारासाठी सम्राट अशोकनंतर त्यांनी अन्य कोणाही भारतीयापेक्षा सर्वात अधिक कार्य केले होते.
७ डिसेंबर १९५६ रोजी सायंकाळी ७.५० वाजता त्यांच्यावर मुंबई मध्ये बौद्ध पद्धतींनी अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबई हे त्यांच्या जीवनकार्यातील अधिकांश काळ मुख्यालय होते आणि तेथेच त्यांचे अजूनही सर्वात जास्त अनुयायी होते. चार मैल लांबीच्या यात्रेत १५ ते २० लाख लोक सहभागी झाले होते आणि तिला दादरमधील ‘राजगृह’या डॉ. आंबेडकरांच्या निवास्थानापासून स्थानिक स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यास चार तास लागले. मुंबई शहरान पाहिलेली ती सर्वात मोठी अत्यंयात्रा होती.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
*✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌
*❁शुक्रवार~06/12/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*
No comments:
Post a Comment