"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*07/01/24 रविवारचा परीपाठ*

◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *07.जानेवारी:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
मार्गशीर्ष कृ.11, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~एकादशी, नक्षत्र ~विशाखा,
योग ~शूल, करण ~बव,
सूर्योदय-07:13, सूर्यास्त-18:15,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

07. *इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

07. *नकटे व्हावे पण धाकटे होऊ नये*    
*★अर्थ ::~* परिस्थितीशी जुळवून घ्यावे पण लाचारी पत्कारु नये
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
  ━┅═▣◆★✪★◆▣━┅━

07.   *जयतु जयतु भारती ।*
            ⭐अर्थ ::~
    भारतमातेचा विजय असो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

🟥💜🟩
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *07. जानेवारी* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ७ वा दिवस आहे.
      
    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९७८ : एम. व्ही. चंद्रगुप्त ही मालवाहू नौका ६९ कर्मचार्‍यांसह होनोलुलूजवळील महासागरात बेपत्ता झाली.
●१९७२ : कन्याकुमारी येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
●१९३५ : कोलकाता येथे ’इंडियन नॅशनल सायन्स अ‍ॅकेडमी’चे (INSA) उद्‌घाटन झाले. पुढे १९५१ मधे तिचे मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आले.
●१७८९ : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची पहिली निवडणूक होऊन त्यान जॉर्ज वॉशिंग्टन विजयी झाले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९७९ : बिपाशा बासू – अभिनेत्री व मॉडेल
◆१९६१ : सुप्रिया पाठक – अभिनेत्री
◆१९४८ : शोभा डे – विदुषी व लेखिका
◆१९२८ : *विजय तेंडुलकर – नाटककार, चित्रपटकथालेखक, पत्रकार व साहित्यिक*
◆१९२५ : ’प्रभात’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या
◆१९२१ : चंद्रकांत गोखले – अभिनेते
◆१९२० : सरोजिनी बाबर – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका
◆१८९३ : जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना

    ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००० : डॉ. अच्युतराव आपटे – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्‍च शिक्षणाची व त्याद्वारे सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध व्हावी यासाठी आयुष्य वेचलेले विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक व स्वातंत्र्यसैनिक
●१९८९ : मिचेनोमिया हिरोहितो – दुसर्‍या महायुद्धाच्या आधी व नंतरच्या काळातील जपानी सम्राट
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व "मुख्य मराठी" बातम्या
वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━▣◆★✧★◆▣━┅━

07.      *● ध्वजगीत ●*
         🔺🇮🇳♦🇮🇳🔺
विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा।

सदा शक्ति बरसाने वाला,
प्रेम सुधा सरसाने वाला,

वीरों को हरषाने वाला,
मातृभूमि का तन-मन सारा।। झंडा...।

स्वतंत्रता के भीषण रण में,
लखकर बढ़े जोश क्षण-क्षण में,

कांपे शत्रु देखकर मन में,
मिट जाए भय संकट सारा।। झंडा...।

इस झंडे के नीचे निर्भय,
लें स्वराज्य यह अविचल निश्चय,

बोलें भारत माता की जय,
स्वतंत्रता हो ध्येय हमारा।। झंडा...।

आओ! प्यारे वीरो, आओ।
देश-धर्म पर बलि-बलि जाओ,

एक साथ सब मिलकर गाओ,
प्यारा भारत देश हमारा।। झंडा...।

शान न इसकी जाने पाए,
चाहे जान भले ही जाए,

विश्व-विजय करके दिखलाएं,
तब होवे प्रण पूर्ण हमारा।। झंडा...।

विजयी विश्व तिरंगा प्यारा,
झंडा ऊंचा रहे हमारा।
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

07. *✹ तिमिरातुनी तेजाकडे ✹*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
तिमिरातुनी तेजाकडे
ने दीपदेवा जीवना ॥
ज्योतीपरी शिवमंदिरी
रे जागवी माझ्या मना ॥
दे मुक्‍तता, भयहीनता
अभिमान दे, दे लीनता
दे अंतरा शुभदायिनी
मलयनिलासम भावना ॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

07. *जगज्जेत्ताअलेक्झांडर*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   जवळजवळ संपूर्ण जग जिंकून आपल्या सैन्यासह माघारी आपल्या देशात परतत होता.  परत जाताना तो अतिशय गंभीर आजारी झाला. अनेक उत्कृष्ट उपाय करूनही आजारातून बरे
होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. जिंकलेले संपूर्ण साम्राज्ज्य, एवढी मोठी शूर सेना, आपली जगज्जेती तीक्ष्ण तलवार आणी अमाप संपत्ती, ह्या सर्वांचा त्याग करून
आपणाला आता मृत्त्युला सामोरे जावे लागणार ह्याची त्याला जाणीव झाली.
   आपण आता कोणत्याही परिस्थितीत जिवंत आपल्या मायदेशी पोहचू शकत नाही हे त्याला कळून चुकले.

    मृत्त्युच्या शेवटच्या घटका मोजत
असताना त्याने आपल्या सरदाराला पाचारण केले आणी म्हणाला ” मी आता लवकरच हे जग सोडून निघून जाणार आहो, माझ्या तीन
इच्छा आहेत आणी त्या पूर्ण
करण्याची तुमची जबाबदारी आहे”
सरदाराला साश्रूपूर्ण होय म्हणण्याशिवाय गत्त्यंतर नव्हते. अलेक्झांदर म्हणाला :~
१. माझी पहिली इच्छा “
माझ्या खाजगी डॉक्टरनेच
माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून न्यावी”
२. माझी दुसरी इच्छा “
माझी शवपेटिका स्मशानभूमीवर
नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत
जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे”
३. आणि माझी अंतिम इच्छा ” माझे
दोन्ही हात शवपेटिकेच्या बाहेर काढून
लोंबकळत ठेवावे”

   आपला राजा आपणाला कायमचे सोडून जाणार, सर्व सेना अतिशय दुखी झाली. सरदाराने इच्छा पूर्ण करण्याचे आश्वासन दिले, तरी देखील हिम्मत करून प्रश्न विचारला

” हे राजन, ह्या कसल्या विचित्र इच्छा”, राजाने  एक दीर्घ श्वास घेतला आणी म्हणाला “माझ्या आयुष्यात मी जे काही आता शिकलो ते सर्व जगाला माहित व्हावे म्हणूनच ह्या तीन इच्छांची पूर्तता करणे गरजेचे आहे”.
■ माझ्या खाजगी डॉक्टरनेच माझी शवपेटिका एकट्यानेच उचलून न्यावी ह्यातून मला जगाला एक संदेश द्यावयाचा आहे. जगातील कोणीही उत्कृष्ट डॉक्टर देखील तुम्हाला मरणापासून वाचवू शकत नाही. मरण हे अंतिम सत्य आहे. त्यामुळे जीवन हे गृहीत न धरता ते चांगल्या प्रकारे कोणालाही न दुखावता कसे जगता येईल हा प्रत्येकाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. जगज्जेत्ता म्हणून नावलौकिक प्राप्त
करण्यासाठी मी आयुष्यभर सतत लढाया केल्या, अपार संपत्ती गोळा केली,पण मरताना मात्र मी काहीच घेवून जाणार नाही,
म्हणूनच
■ माझी दुसरी इच्छा
“माझी शवपेटिका स्मशानभूमीवर
नेण्याच्या संपूर्ण रस्त्यावर मी आतापर्यंत जिंकलेले सर्व सोने, चांदी, जडजवाहीर पसरून ठेवावे” केवळ संपत्ती कोणत्याही प्रकारे जमविणे म्हणजेच जीवन नाही हा संदेश लोकांना मिळेल आणी अशी संपत्ती मिळण्यासाठी केलेली धावाधाव म्हणजेच जीवनातील अमुल्य वेळेचा कालापव्य. जनतेला कळू द्या मी रिकाम्या हातानेच ह्या जगात आलो आणी रिकाम्या हातानेच हे जग सोडून जात आहो,म्हणून
■ माझी तिसरी इच्छा
” माझे दोन्ही हात शवपेटिकेच्या बाहेर काढून लोंबकळत ठेवावे” हे सर्व सांगून थोड्याच वेळात त्याचा मृत्त्यू झाला.

        *🌀तात्पर्य ::~*
  नको नको मना गुंतू माया जाळी
काळ आला जवळी ग्रासावया
जेव्हा काळाची ऊडी पडेल तेव्हा
कोणीही वाचवू शकत नाही
सगळ ईथेच ठेवुन जायचे आहे.
एक माणुस म्हणुन या संसारात वागा.
"चांगली कर्मे करा"
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
  ━┅━▣◆★✪★◆▣═┅━

07.  खरं बोलून मन दुखावल
      तरी चालेल...
पण खोट बोलून आनंद देण्याचा
        प्रयत्न करू नका...
आयुष्यातील काही गोष्टी कब्बडी च्या
         खेळाप्रमाणे असतात...
  *तुम्ही  यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात...!!*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
  ━┅═▣◆★✪★◆▣═┅━

07. *✿ सामान्य ज्ञान प्रश्नावली ✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  'लिटल मास्टर' असे कोणाला म्हणतात ?
➜ सुनिल गावस्कर.

✪  भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात ?
➜ मुंबई.

✪  सायना नेहवाल हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
➜ बॅंडमिंटन.

✪  महाराष्ट्रातील सर्वांत मोठे धरण कोणते ?
➜ जायकवाडी.

✪ 'कोरोनाची' सुरूवात कोणत्या शहरात झाली ?
➜ वुहान.( चीन )
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

07.  *🛡विजय तेंडुलकर🛡*
   ◤◥◤◥◤◥◤◥◤◥◤◥
🔹जन्म नाव :~ विजय धोंडोपंत तेंडुलकर
🔸जन्म :~ जानेवारी ६, १९२८
       कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत
🔹मृत्यू :~ मे १९, २००८
       पुणे, महाराष्ट्र, भारत
🔸कार्यक्षेत्र :~ साहित्य, पत्रकारिता
🔹भाषा :~ मराठी
🔸साहित्य प्रकार :~ नाटक, कथा

               *⚜विजय तेंडुलकर*
    🔶हे प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, राजकीय विश्लेषक होते. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. पुण्यात आणि मुंबईत त्यांचे वास्तव्य होते.

    🔷चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. नवभारत, मराठा, लोकसत्ता, नवयुग, वसुधा आदी वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी सदरलेखनाचे आणि संपादनाचे काम केले. १९४८ मध्ये 'आमच्यावर प्रेम कोण करणार' ही त्यांची कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली. १९५१-५२ च्या सुमारास भारतीय विद्याभवनाने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले. आकाशवाणीसाठीही त्यांनी नाटके लिहिली. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले नाट्यविषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी निगडित होते.

     🔶विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. 'शांतता कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणार्‍या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. त्यामुळेच नव्या-जुन्या कलावंतांना तेंडुलकरांनी लिहिलेल्या नाटकांचे आव्हान पेलण्याची ओढ सातत्याने राहिली.
     🔷तेंडुलकरांनी चित्रपट माध्यमही नाटकांच्याच ताकदीने हाताळले. सामना, सिंहासन, आक्रीत, उंबरठा, अर्धसत्य, आक्रोश, आघात, इत्यादी चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. स्वयंसिद्धा या दूरचित्रवाणी मालिकेचे लेखनही त्यांनी केले. तसेच १९७९ ते ८१ दरम्यान त्यांनी "टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस" या संस्थेत अभ्यागत प्राध्यापक म्हणूनही काम केले. नवनाट्याविषयी आस्था बाळगणार्‍या संस्था आणि त्यातील कार्यकर्त्यांबद्दल त्यांना जिव्हाळा होता.

               *💥पुरस्कार*
    🔶कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणार्‍या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, फिल्म फेअर, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णुदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹✹★✹◑◎●••
          *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❂█║▌║█║▌

*❁रविवार ~07/01/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment