"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*07/02/24 बुधवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://satishborkhade.blogspot.com/p/blog-page_365.html
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *07.फेब्रुवारी:: बुधवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
पौष कृ.12,  पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~द्वादशी, नक्षत्र ~पूर्वाषाढा,
योग ~वज्र, करण ~तैतिल,
सूर्योदय-07:10, सूर्यास्त-18:34,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]   ❂ सुविचार ❂*
━┅═▣◆★✪★◆▣═┅━

07. *भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात; त्याची खपली काढू नये.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
07. *दगडा पेक्षा वीट मऊ*
           *★अर्थ ::~*
- मोठ्या संकटापेक्षा लहान संकट बरे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆••====
07. *बुद्धिर्यस्य बलं तस्य ।*
      ⭐अर्थ ::~ ज्याच्याजवळ बुद्धी असते तो बलवान ठरतो.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••
      🛡 *07. फेब्रुवारी* 🛡
🔻===●●●★●●●===🔻
★हा या वर्षातील ३८ वा दिवस आहे.
★’ग्रेनाडा’चा स्वातंत्र्यदिन

   ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००३ : क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला.
●१९७१ : स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
●१९६५ : मराठी नाटकात प्रथमच फिरत्या रंगमंचाचा वापर  सुरू झाला.
●१९४८ : कसोटी क्रिकेटमधे शतक झळकवणारा नील हार्वे हा सर्वात लहान ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
●१९१५ : गंगाधर नरहर ऊर्फ बापुसाहेब पाठक यांनी पुण्यातील 'आर्यन' हे पहिले चित्रपटगृह सुरु केले. तेथे प्रदर्शित झालेला पहिला मूकपट होता हिर्‍याची अंगठी.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
●१९३८ : एस. रामचंद्रन पिल्ले – कम्युनिस्ट नेते
●१९३४ : सुजित कुमार – चित्रपट अभिनेता व निर्माता
●१८९८ :माता रमाई आंबेडकर-
महामानव डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली,त्यागमुर्ती...
(निर्वाण - २७ मे १९३५)
●१८१२ : चार्ल्स डिकन्स – इंग्लिश कादंबरीकार व लेखक

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९९ : हुसेन – नवविचारांचा पुरस्कार करुन पश्चिम आशियातील शांततेसाठी अथक प्रयत्‍न करणारे जॉर्डनचे राजे
●१९३८ : हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक
●१२७४ : श्री चक्रधर स्वामी – महानुभाव पंथाचे संस्थापक
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत 
    ━┅═▣◆★✧★◆▣═┅━

07. *✸ चढवू गगनि निशाण ✸*
   ●●●●००००००●●●●
चढवू गगनि निशाण आमुचे, चढवू गगनि निशाण
कोटि मुखांनी गर्जू जय जय स्वतंत्र हिंदुस्‍तान

निशाण अमुचे मनःक्रांतिचे, समतेचे अन्‌ विश्वशांतिचे
स्वस्तिचिन्ह हे युगायुगांचे ऋषिमुख-तेज महान

मूठ न सोडू जरि तुटला कर, गाऊ फासहि आवळला जर
ठेवू निर्भय ताठ मान ही झाले जरि शिरकाण

साहू शस्‍त्रास्‍त्रांचा पाउस, आम्ही प्रल्हादाचे वारस
सत्य विदारक आणू भूवर दुभंगून पाषाण

विराटशक्ती आम्ही वामन, वाण आमुचे दलितोद्धारण
नमवू बळिचा किरीट उद्धट ठेवुनि पादत्राण

हिमालयासम अमुचा नेता, अजातशत्रू आत्मविजेता
नामे त्याच्या मृत्युंजय हे चढवू वरति निशाण
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थना  💎*
====••◆◆●★●◆◆••====

07. *❂ विजयी वरदान ❂*
     ✶✶✹✹★●★✹✹✶✶
भगवंताचे जया लाभले। चिर विजयी वरदान।
संघा वाचुन कोण स्विकारिल। काळाचे आव्हान॥धृ॥

परंपरचे पौरुषाचे।पराक्रमी पुरुषांचे।
पुनीत पावन घडते येथे।पुजन वसुंधरेचे।
मांगल्याचे पावित्र्याचे। राष्ट्रीय चारित्र्याचे।
संघशक्तिने चरित्र घडते। बाल-तरुण-प्रौढाचे।
इथेच मिळतो मायभूमिला। अग्रपुजेचा मान॥१॥

पुण्यपुरातन इथे सनातन।ध्वज भगवा आमुचा
ग्राम नगर गिरिकंदरि डोले। जगी दिग्विजयाचा।
विश्वगुरुपदी सदा नांदला।विजयी जगताचा।
नानक गुरुचा महाराणाचा। विक्रमी शिवबाचा।
नील अंबरी फडकत असता। चढे नवे अवसान॥२॥

काल्पनीक प्रांतांच्या सीमा।भेद इथे ते सरले।
जाति-पंथ-भाषेचे अंकुर।कधी न इथे रुजले।
भिन्नत्वातुन अभिन्नतेचे।विशाल मंदिर उठले।
अंजिक्य-अविचल मंदिरात या।केशवदर्शन घडले।
कोटि कोटि हृदयांत चिरंतन। कार्याचा अभिमान॥३॥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

07.    *❃ देवाचा मित्र ❃*
       ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एक छोटा मुलगा रणरणत्या उन्हात फुलांचे गजरे विकत होता. ऊन खूप होते. तो मुलगा घामाघूम झाला होता. त्याचे अनवाणी पाय भाजत होते. सारखा तो पाय वर-खाली करत होता. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना तो गजरे विकत होता. त्याचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलासाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलाला दिली. त्या मुलाला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगा लहान होता. त्याला त्याचे अप्रूप वाटले. त्याने लगेचच चप्पल घालून बघितली. त्याला खूप छान वाटले. तो आनंदी झाला. आनंदात त्या मुलाने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाला, ""काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्‍नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, ""अरे नाही रे बाबा, मी देव नाही.‘‘ मुलगा पुन्हा तसाच निरागस हसला म्हणाला, ""काका - तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्‍य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलाला जवळ घेऊन दोन वाक्‍ये बोलून तेथून त्या मुलाचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्‍य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.
*स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार? म्हणून "शीवभावे जीवसेवा "करा.व देवाचा मित्र व्हा*
"जे का रंजले गांजले -त्यासी म्हणे जो आपुले | तोची साधु ओळखावा -देव तेथेची जाणावा" ||  
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆••====

07.   परिस्थिती जेव्हा अवघड
   असते तेव्हा व्यक्ती ला 
*"प्रभाव आणि पैसा"* नाही तर 
*"स्वभाव आणि संबंध"*
          कामाला येतात ...!!
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

07. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑

✪  ग्यानी झेलसिंग यांचे समाधी स्थळाचे नाव काय आहे ?
➜ एकतास्थळ.( दिल्ली )

✪ नवीन १००० रू. चे नोटेवर कशाचे चित्र होते ?
➜ मंगळयान.

✪ युरोपाचे रणक्षेत्र कोणत्या देशास म्हणतात ?
➜ बेल्जियम.

✪ भारतातील सर्वांत मोठा लष्करी सन्मान कोणता ?
➜ परमवीर चक्र.

✪  प्रघानमंत्री आवास योजनेची सुरूवात केव्हा झाली ?
➜ २५ जून २०१५.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ]  ❂ थोरव्यक्ती परिचय ❂*
━═●🇲=◆🇸◆=🇵●═━
07.  !! रमाबाई आंबेडकर जन्मदिन !!
महामानव डॅा.बाबासाहेब आंबेडकर यांची सावली,त्यागमुर्ती...
   *★माता रमाई आंबेडकर*
    *_"यांच्या जयंती निमित्त_*
         *_विनम्र अभिवादन"_*
      🌷🔹🌼🔹🌷
★जन्म - ७ फेब्रुवारी १८९८ (वंणदगाव,रत्नागिरी)
★निर्वाण - २७ मे १९३५ (राजगृह,दादर)

    बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्‍नी होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात.
रमाबाई आंबेडकर यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे (वलंगकर) व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई दाभोळजवळील वंणदगावात नदीकाठी वस्तीमध्ये राहत.

   रमा लहान असतानाच त्यांच्या आई यांचे आजारपणाने निधन झाले. आईच्या जाण्याने कोवळ्या रमाच्या मनावर आघात झाला. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.
   रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. त्यावेळी बालविवाहाची प्रथा समाजात रूढ होती. लग्नात लग्न मंडप तसेच पंचपक्वान्नाच जेवण, झगमग रोशनाई नव्हती. अतिशय साध्या पद्धतीने हे लग्न पार पडले. माता रमाई यांना जीवनात फारच दुःख सहन करावे लागले.
          इ.स. १९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले होते, त्यावेळी रमाईची खूप वाताहत होत होती. ती दुष्काळाच्या आगीत होरपळत होती. बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना रमाईचे हाल पहावले नाहीत. त्यांनी काही पैसे जमा केले. व ते पैसै रमाईला देऊ केले. तिने त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे घेतले नाहीत. स्वाभिमानी पतीची ती स्वाभिमानी पत्‍नी जिद्दीने दुःखांशी अडचणींशी गरिबीशी भांडत होती. मृत्युसत्र दुःख, त्याग, समजूतदारपणा, कारुण्य, उदंड मानवता व प्रेरणास्थान म्हणजे रमाई.

   इ.स. १९२१ बाबासाहेबांचा मुलगा बाळ गंगाधर, व इ.स. १९२६ मध्ये राजरत्‍नचा मृत्यू पाहिला. बाबासाहेबांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांना कळविले नाही.

    परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दुःखाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेले. रमाई एकट्या पडल्या.. घर चालवण्यासाठी तिने शेण गोवऱ्या.. सरपणासाठी वणवण फिरल्या. पोयबावाडीतून दादर माहीम पर्यंत जात असत बॅरिस्टराची पत्‍नी शेण वेचते म्हणून लोक नावे ठेवतील. म्हणून पहाटे सूर्योदयापूर्वी व रात्री ८.०० नंतर गोवऱ्या थापायला वरळीला जात असत. मुलांसाठी उपास करत असत.
अस्पृश्यतेच्या अग्निदिव्यातून होरपळून निघालेले बाबासाहेब आता समाजाला अस्पृश्यतेच्या रोगातून मुक्त करण्यासाठी व त्यासाठी निष्णात डॉक्टर होण्यासाठी अपार कष्ट घेऊ लागले. अर्धपोटी उपाशी राहून १८-१८ तास अभ्‍यास करु लागले.
त्याच वेळी रमाईने आपल्‍या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.
डॉ. बाबासाहेब परदेशातून शिक्षण घेऊन मुंबईला आले असता, त्यांच्या स्वागताला सर्व आंबेडकरी समाज मुंबई बंदरात आला. रमाईला नेसण्यासाठी चांगली साडी नव्हती म्हणून त्यांनी छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सत्कारप्रसंगी दिलेला भरजरी फेटा नेसून बाबासाहेबांच्या स्वागतासाठी आल्या. ते बोटीतून उतरताच त्यांच्या जयजयकाराने बंदर दुमदुमून गेले. अनेकजण त्‍यांना भेटत होते, हस्तांदोलन करीत होते. पण रमाई मात्र लांब कोपऱ्यात उभी होती. डॉ. बाबासाहेबांची नजर त्यांच्या रमाईवर गेली. ते जवळ गेले. त्यांनी विचारले, रमाई तू लांब का उभी राहीलीस? रमाई म्‍हणाली, तुम्हाला भेटण्यासाठी सारा समाज आतूर झाला असताना मी तुम्हाला अगोदर भेटणे योग्य नाही. मी तर तूमची पत्नीच आहे. मी तुम्हांस कधीही भेटू शकते. रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, "साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा." असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत. अशा रमाबाई आंबेडकर यांना जन्मदिनाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
             *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁बुधवार~07/02/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*


No comments:

Post a Comment