"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

*07/03/19 गुरुवार चा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
   *❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 _परीपाठ_ Ⓜ💲🅿*
━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━

*❁ दिनांक :~ 07/03/2019 ❁*
      *🔘 वार ~ गुरुवार 🔘*
*⌘⌘⌘✽⌘⌘⌘✪⌘⌘⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
 ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

  *💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
       🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

http://satishborkhade.blogspot.com/
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ]    ❂ आजचे पंचाग ❂*
  ━━═●🇲=◆🇸◆=🇵●═━━

  🍥 *07. मार्च:: गुरुवार* 🍥
 ━━═•●◆❃★❂★❃◆●•═━━
             फाल्गुन शु. १
     तिथी : शुक्ल पक्ष प्रतिपदा,
           नक्षत्र : पूर्वभाद्रपदा,
  योग : साध्य,  करण : किस्तुघ्न,
सूर्योदय : 06:54, सूर्यास्त : 18:46,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

07. *ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो...*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

07. *जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे*
      *★ अर्थ ::~*
- एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष करू लागल्याशिवाय त्यातील अडचणी आपणास कळत नाहीत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

07.   *ज्ञानस्याभरणं क्षमा ।*
             ⭐अर्थ :: ~
     क्षमा हे ज्ञानाचे भूषण होय.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

      🛡 *★07. मार्च★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक गणित दिवस
★ हा या वर्षातील ६६ वा (लीप वर्षातील ६७ वा) दिवस आहे.

    ~*🔺महत्त्वाच्या घटना 🔺*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००९ : केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना.
●२००६ : लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९५५ : अनुपम खेर – चित्रपट अभिनेता
◆१९११ : सच्‍चिदानंद हिरानंद वात्स्यायन तथा ’अज्ञेय’ – ज्ञानपीठ पारितोषिक (१९७८) व साहित्य अकादमी पुरस्कार  विजेते हिन्दी लेखक व वृत्तपत्रकार
◆१५०८ : हुमायून – दुसरा मुघल सम्राट (मृत्यू: १७ जानेवारी १५५६)

      ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
 🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२०१२ : रवि शंकर शर्मा ऊर्फ ’रवि’ – संगीतकार (जन्म: ३ मार्च १९२६)
●१९६१ : गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्‍न
●१९२२ : गणपतराव जोशी – रंगभूमीवरील असामान्य अभिनेते, शेक्सपियरच्या नाटकांतील त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या होत्या
●१६४७ : दादोजी कोंडदेव – छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

07. *✸ अजिंक्य भारत ✸*
    ●●●●●००००००●●●●●
अजिंक्य भारत, अजिंक्य जनता ललकारत सारे
ध्वज विजयाचा उंच धरा रे

मातीमधल्या कणांकणांतुन स्वातंत्र्याचे घुमते गायन
प्रगतीचे रे पाऊल पुढले संघटनेचा मंत्र जपा रे

भाग्यवान ते जवान सगळे हासत खेळत रणी झुंजले
स्वातंत्र्यास्तव मरण जिंकले मान राखला मातृभूमीचा रे

इतिहासाच्या पानोपानी बलिदानाची घुमती गाणी
धनदौलत रे देऊ उधळून पराक्रमाचे गीत गाउया रे
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

07. *❂ अजाण आम्ही तुझी लेकरे *
         ✶✶✹✹★●★✹✹✶✶
अजाण आम्ही तुझी लेकरे तू सर्वांचा पिता
नेमाने तुज नमितो, गातो तुझ्या गुणांच्या कथा

सूर्यचंद्र हे तुझेच देवा, तुझी गुरेंवासरें
तुझीच शेते, सागर, डोंगर, फुले, फळे, पाखरे

अनेक नावे तुला तुझे रे दाही दिशांना घर
करिशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर

खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी
हौस एवढी पुरवी देवा हीच एक मागणी
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
 *0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

07. *❃ मनाची एकाग्रता ❃*
      ••◆•◆•◆★◆•◆•◆••
   एकदा एका शेतकऱ्याला जाणवले की त्याचे घड्याळ धान्याच्या कोठारात हरवले आहे. जरी ते एक सामान्य घड्याळ होते तरी त्याचे लेखी त्याला अफाट भाावनिक मूल्य होते. बराच वेळ गवतात सर्वत्र शोधल्यावरही त्याला ते सापडेना. मग त्यांनी कोठाराच्या बाहेर खेळत असलेल्या मुलांच्या गटाला घड्याळ शोधण्यासाठी बोलावले व त्यानी त्या मुलांना वचन दिले की जो कोण त्याचे घड्याळ शोधून देईल, त्याला बक्षिस मिळेल.....

    बक्षिस मिळेल, हे ऐकून सगळी मुले कोठारात लगबगीने गेली, गवताच्या चारी बाजूने शोधायला लागली पण त्यांना घड्याळ कुठेही सापडेना.
नेमके जेंव्हा त्या शेतकर्‍याने घड्याळाचा शोध घेण्याचे थांबवायचे ठरवले तेव्हा एक मुलगा त्याच्या जवळ जाऊन शेतकर्‍याकडे शोधण्याची एक संधी मागू लागला.

   शेतकरी त्याच्याकडे बघून विचार करू लागला की "बिघडले कुठे...! हा मुलगा प्रामाणिक दिसतोय. देऊ या त्याला एक संधी...."
   शेतकर्‍याने त्या छोट्या मुलाला घड्याळाचा शोध घेण्यासाठी कोठाराट पाठवले. थोड्याच वेळात तो मुलगा हातात घड्याळ घेऊन नाचत नाचतच बाहेर आला. शेतकऱ्याला आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले...!!
त्याने त्या मुलाला विचारले की जिथे बाकीच्यांना अपयश आले, तिथे त्याला हे यश कसे काय प्राप्त झाले...!!

    मुलगा म्हणाला, “मी काहीच नाही केल, पण जमिनीवर शांत बसून राहिलो आणि ऐकू लागलो.त्या शांततेत मला घड्याळाची टिक-टिक ऐकू आली आणि मी त्या दिशेने शोधू लागलो.”

         *_🌀तात्पर्य_ ::~*
*एक शांत मन त्रासलेल्या मनापेक्षा चांगलं विचार करू शकते.*
*तुमच्या मनाला रोज काही क्षणांसाठी तरीशांतता द्या आणि मग पहा, तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमचे मन तीक्ष्णपणाने काम करून तुमचं जीवन कसे सजवते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

 07. *"माळी दररोज रोपांना पाणी देतो, पण फळ ,फुले फक्त त्या त्या ऋतूमाना प्रमाणेच येतात"*
     *"म्हणूनच आयुष्यात संयम ठेवा प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावर होणारच आहे, प्रतिदिवस प्रयत्नशील राहून आपलं काम अजून चांगलं करत रहा तुम्हाला त्याच फळ वेळ आल्यावर नक्कीच मिळणार..!!"*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

07. *✿ जागतिक भूगोल ✿*
     ◑◑◑◆◑◑●★●◑◑◆◑◑◑

■ सर्वात मोठे संग्रहालय :~
 *अमेरिकन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, न्यूयॉर्क..*

■ सर्वात मोठे ग्रंथालय :~
 *लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन..*

■ सर्वात जुनी भाषा :~
*चीन 6000 - 7000 वर्ष जुनी..*

■ सर्वाधिक लोकांकडून बोलली जाणारी भाषा :~
    *मॅडारिन (उत्तर चीनमध्ये बोलली जाणारी चीनी बोली.)..*

■ सर्वात मोठे लष्कर :~
 *रशियन लष्कर 50 लाख (1985)*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

07. *❒ गोविंद वल्लभ पंत  ❒* 
     ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
●जन्म :~ १० सप्टेंबर १८८७, ●मृत्यू :~ ७ मार्च १९६१
● पुरस्कार :~ भारतरत्‍न (१९५७),

    स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक नेते होते. त्यांचा जन्म १० सप्टेंबर १८८७ रोजी अल्मोड़ा जिल्ह्यात श्यामली या  पर्वतीय क्षेत्रातील खूंट या गावामध्ये मूळच्या महाराष्ट्रीय कऱ्हाड़े ब्राह्मण कुटुंबात झाला.

   महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाबरोबरच ते काँग्रेस स्वयंसेवक म्हणून काम करीत असत.डिसेंबर १९२१ मध्ये गांधीजींच्या आवाहनामुळे असहकार चळवळीच्या माध्यमातुन ते सक्रिय राजकारणात आले.

       पंत हे उत्तरप्रदेशाचे  प्रथम मुख्यमंत्री आणि भारताचे दुसरे गृहमंत्री होते. भारत सरकारने इ.स. १९५७ साली त्यांना भारतरत्न ने सन्मानीत केले.

   भारतरत्न पुरस्कार वितरणास त्यांच्याच गृहमंत्री पदाच्या करकिर्दीत सुरूवात झाली. हिंदी भाषेला राष्ट्रभाषा करण्याबाबत ते विशेष आग्रही होते. जमिनदारी पद्धत समाप्त करण्यात व कुळ कायदा अस्तित्वात आणण्यात त्यांचे मुख्य योगदान होते.अल्पसंख्यकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कुमाऊउ परिषदेची स्थापना केली.

७ मार्च १९६१ रोजी त्यांचे निधन झाले.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
 *✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

 *❁ गुरुवार ~ 07/03/2019 ❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐ MSP ⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment