"माझी शाळा" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

 

*07/04/24 रविवारचा परीपाठ*
◥◣◢◤◥◣◢◤◥◣◢◤
*❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂*
*☙❀꧁Ⓜ🇸🅿꧂❀☙*

*Ⓜ💲🅿 परीपाठ Ⓜ💲🅿*

*⌘⌘⌘✽⌘✪⌘✽⌘⌘⌘*

   *💥🇮🇳 राष्ट्रगीत  🇮🇳💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

     *💥♦ प्रतिज्ञा ♦💥*
❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀ ➤ ❀

    *💥🇮🇳 संविधान 🇮🇳💥*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

*💎 सर्वप्रकारची शैक्षणिक 💎*
*माहिती असणारा ब्लॉग तसेच इतर आवश्यक ज्ञानवर्धक माहीतीसाठी*
  🔘 *"माझी शाळा"* 🔘
   *ब्लाँगला आवश्य भेट द्या..!!*
    🔗🔗👇👇🔗🔗

https://goo.gl/EXCPbS
▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄
*0१ ] ❂ आजचे पंचाग ❂*
  ━═●🇲◆🇸◆🇵●═━
🍥 *07.एप्रिल:: रविवार* 🍥 ━═•●◆❃★❂★❃◆●•═━
फाल्गुन कृ.13/14, पक्ष : कृष्ण पक्ष,
तिथि ~त्रयोदशी, नक्षत्र ~पूर्वाभाद्रपदा,
योग ~ब्रह्म, करण ~वणिज,
सूर्योदय-06:27, सूर्यास्त-18:54,
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0२ ]       ❂ सुविचार ❂*
  ━┅━═▣◆★✪★◆▣═━┅━

07. *साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0३ ]   ▪ म्हणी व अर्थ* ▪
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

07. *कावळ्याच्या शापाने गुरे मरत नाहीत*      *★ अर्थ ::~*
- दृष्ट माणसाच्या एखाद्या वाईट कृत्याने दुसऱ्याचे नुकसान होत नाही.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0४ ]    ▫ सुभाषीत▫*
====••◆◆●★●◆◆◆••====

07. *सर्वार्थसम्भवो देह: ।*
     ⭐अर्थ ::~ देह सर्व अर्थांच्या प्राप्तीचे साधन आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0५ ]    ♦दिनविशेष*♦
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

     🛡 *★07. एप्रिल★* 🛡
🔻====●●●★●●●====🔻
★ जागतिक आरोग्य दिन
★ हा या वर्षातील ९७ वा (लीप वर्षातील ९८ वा) दिवस आहे.

    ~*★महत्त्वाच्या घटना★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●१९९६ : सिंगर करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा फलंदाज सनत जयसूर्या याने केवळ १७ चेंडुत अर्धशतक झळकावण्याचावि विश्व विक्रम केला.
●१९४८ : जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली. व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस ’जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.
●१८७५ : आर्य समाजाची स्थापना झाली.

    ~*★जन्मदिवस / जयंती★*~
🔸•••°°~°°••◆••°°~°°•••🔸
◆१९४२ : जितेंद्र – चित्रपट अभिनेता
◆१९२० : *पण्डित रवी शंकर* – सतार वादक, ’भारतरत्‍न’
◆१८९१ : सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार
◆१५०६ : सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली गोव्यातील ’ओल्ड चर्च’मधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे.

     ~*★मृत्यू / पुण्यतिथी★*~
🔹•••°°~°°••◆••°°~°°•••🔹
●२००१ : गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ  वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले.
●१९७७ : राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक,
●१९३५ : डॉ. शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन'
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*🚦सतिष बोरखडे दारव्हा*
   💥📱7875840444💥
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
■आजच्या सर्व मुख्य मराठी बातम्या वाचण्यासाठी👇👇 क्लिक करा..

     https://goo.gl/8D33ox
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
✪✪✫✪✫✪✫★✫✪✫✪✫✪✪
*0६ ]  ❂ देशभक्ती गीत ❂*
  ━┅━═▣◆★✧★◆▣═━┅━

07. *✸ कर चले हम फिदा ✸*
       ●●●●●००००००●●●●●
कर चले हम फिदा जानो तन साथियो
अब तुम्हारे हवाले वतन साथियों ll धृ ll

साँस थमती गई नब्ज जमती गई
फिर भी बढ़ते कदम को न रुकने दिया
कट गये सर हमारे तो कुछ गम नहीं
सर हिमालय का हमने न झुकने दिया मरते मरते रहा बांकपन साथियों ll१ ll

जिंदा रहने के मौसम बहुत हैं मगर
जान देने की रूत रोज आती नहीं
हुस्न और इश्क दोनों को रूसवा करे
वह जवानी जो खूं में नहाती नहीं
आज धरती बनी हैं, दुल्हन साथियोंll२l

राह कुरबानियों की न वीरान हो
तुम सजाते ही रहना नए काफ़ीले
फतह का जश्न इस जश्न के बाद हैं
जिंदगी मौत से मिल रही हैं गले
बाँधलो अपने सरसे कफन साथियोंll३

खींच दो अपने खूं से जमीं पर लकीर
इस तरफ आने पाए न रावण कोई
तोड़ दो हाथ अगर हाथ उठने लगे
छूने पाए न सीता का दामन कोई
राम हीतुम तुम्ही लक्ष्मण साथियों ll४ l
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0७ ]      💎 प्रार्थणा  💎*
====••◆◆●★●◆◆◆••====

07. *❂ गगन, सदन तेजोमय ❂*
       ✶✶✹✹★●★✹✹✶✶
गगन, सदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश, देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून, तार्‍यांतुन
वाचले तुझेच नाम
जग, जीवन, जनन, मरण
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतुन
प्रेमरूप भासतोस
कधि येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकल-शरण, मनमोहन
सृजन तूच, तूच विलय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0८ ]    🔵 बोधकथा*🔵
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

07. *❃गाढव, माकड आणि चिचुंद्री*
        ••◆•◆•◆★◆•◆•◆••
      एके दिवशी एक गाढव आणि एक माकड बोलत बसले होते. गाढव म्हणाले, 'माझे कान इतके लांब आहेत त्यामुळे मला सगळेजण हसतात आणि मला बैलासारखी शिंगही नाहीत.

       माकड म्हणाले, 'माझ्या या लांबच लांब शेपटाची तर मला फारच लाज वाटते. त्याऐवजी मला कोल्ह्यासारखी गोंडेदार शेपूट असतं तर किती मजा आली असती.

      'हे सर्व ऐकून एक चिचुंद्री हळूच पुढे आली आणि म्हणाली, 'तुम्ही उगाच का रडत बसता?
       मला तर शिंग नाहीतच, शेपूटही इतकं आखूड आणि डोळ्यांनी सुद्धा नीट दिसत नाही.

*मग माझ्यापेक्षा तुमची स्थिती जास्त चांगली नाही कां ?'*

      *🌀❝ तात्पर्य ❞ ::~*
  देवाने आपणास काय दिले आहे, त्यात समाधानी रहावे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*0९ ]  🔷प्रेरणादायी विचार🔷*
====••◆◆●★●◆◆◆••====

07. *पिंपळाच्या रोपासारखं* खडकावर उगवता आलं पाहिजे,*
      *निर्भीडपणे निर्धाराच्या वाटेवर चालता आलं पाहिजे.*
    ’*वादळांचं काय, ती येतात आणि जातात,*
       *मातीत घट्ट पाय रोवून उभं रहाता आलं पाहिजे.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*१0 ]    *🔴सामान्य ज्ञान🔴*
====••◆◆●★●◆◆◆••====

07. *✿सामान्य ज्ञान प्रश्नावली✿*
   ◑◑◑◆◑◑★◑◑◆◑◑◑
✪  भारताच्या विमान वाहतुकीचे नाव काय आहे ?
➜  इंडियन एअरलाइन्स.

✪  भारतात चारमिनार कोठे आहे ?
➜ हैद्राबाद.

✪  गुजरात या राज्याची राजधानी कोणती आहे ?
➜ गांधीनगर.

✪  इंडिया गेट कोठे आहे ?
➜ दिल्ली.

✪  एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?
➜ अनंत.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*११ ] 🔶थोरव्यक्ती परिचय🔶*
••●==🇲=◆=🇸=◆=🇵==●••

07.   *❒  पंडित रविशंकर  ❒*
       ┄─┅•●●★◆★●●•┅─┄
जन्मनाव :~रवीन्द्र श्याम शंकर चौधरी
टोपणनाव :~ रबू
*जन्म :~ ७ एप्रिल १९२०*
      वाराणसी, उत्तर प्रदेश, भारत
मृत्यू :~ ११ डिसेंबर  २०१२
सॅन डियेगो अमेरिकेची संयुक्त संस्थाने
राष्ट्रीयत्व :~ भारतीय
कार्यक्षेत्र :~ हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत
संगीत प्रकार :~ सतारवादन
कार्यकाळ :~ १९३९ ते  २०१२

  🔘पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार, पद्मभूषण(१९८१), भारतरत्न(१९९९)

         *♦पंडित रविशंकर♦*
   🔹हे एक भारतीय संगीतज्ञ होते. हे इसवी सनाच्या विसाव्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जातात. अभिजात भारतीय संगीतातील मैहर घराण्याचे प्रवर्तक उस्ताद अलाउद्दीन खान यांचे ते शिष्य होते. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्त्य जगतास करून देण्याच्या प्रयत्‍नांत त्यांनी मोलाची भूमिका बजावली. सर्वाधिक प्रदीर्घ आंतरराष्ट्रीय कारकीर्दीचे गिनेस रेकॉर्ड (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर) त्यांच्या नावावर आहे.

             ◆संगीत जीवन◆
    🔸१९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचित झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडील शिक्षण १९४४ पर्यंत चालले.

    🔹रविशंकर यांनी १९३९ साली अहमदाबाद शहरात प्रथम खुली मैफल केली. १९४५ सालापासूनच त्यांच्या सांगीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट,धरती के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहाँसे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले.

    🔸इ.स. १९४९ साली रविशंकर दिल्लीच्या ऑल इंडिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृंद चेंबर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. इ.स. १९५० ते इ.स. १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपू त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपूर संसार) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी (१९८२)या चित्रपटांस संगीत दिले.

  🔹 पंडित रविशंकर यांनी मुंबईत इ.स. १९६२ साली व लॉस ॲन्जेलिस येथे १९६७ साली किन्नर स्कूल ऑफ म्युझिकची स्थापन केली.

      ◆पुरस्कार व सन्मान ◆
●१९६२ साली भारतीय कलेचे सर्वोच्च सन्मान पदक राष्ट्रपती पदक;
●१९८१ साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण;
●१९८६ साली भारताच्या राज्यसभेचे सदस्यत्व ;
●१९९८ साली स्वीडनचा पोलर म्युझिक प्राइज (रे चार्ल्‌स सोबत)
भारत सरकारकडून पद्मविभूषण
भारत सरकारकडून देशिकोत्तम
●१९९९ साली भारत सरकारकडून भारतरत्न;
●२००० साली फ्रेन्च सर्वोच्च नागरी सन्मान लिजियन ऑफ अनार;
●२००१ साली राणी दुसरी एलिजाबेथ यांच्याकडून ऑनररी नाईटहूड;
●२००२ साली भारतीय चेंबर ऑफ कॉमर्सचे लाइफ टाइम अचिव्हमेंट ॲवॉर्ड;
●२००२ चे २ ग्रॅमी पुरस्कार;
●२००३ साली आय.ई.एस.पी.ए. डिस्टिंगविश्ड आर्टिस्ट ॲवार्ड, लंडन;

★ *मॅगसेसे पुरस्कार, मनिला, फिलिपाइन्स; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून ग्लोबल ॲम्बॅसेडर ही उपाधी व इतर अनेक पुरस्कार मिळालेत.*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
••●◎◑✹★✹🔅✹★✹◑◎●••
           *✍ संकलन ✍*
*सतिष बोरखडे दारव्हा,यवतमाळ*
   ♦📱 7875840444 ♦
*✧❂ महाराष्ट्र शिक्षक पॅनल ❂✧*
█║▌║▌║█❃❂❃█║▌║█║▌

*❁ रविवार~07/04/2024❁*
*⋐⋑⛯⋐⋑⋐MSP⋑⋐⋑⛯⋐⋑*

No comments:

Post a Comment